आरोग्य

मुलांना होणाऱ्या उलट्या – प्रकार, कारणे आणि उपचार

उलटी होणे म्हणजे कुठल्यातरी आरोग्यविषयक समस्येचे लक्षण असते. तसेच उलटी झाल्यामुळे पचन न झालेल्या अन्नपदार्थांपासून सुटका होते परंतु तुमच्या मुलाला सतत उलटी होत असेल तर मात्र ते काळजीचे कारण आहे. नक्कीच, पोट नैसर्गिक पद्धतीने साफ होत असते, परंतु सतत उलटी होत असेल तर तुम्हाला लक्ष घातले पाहिजे. उलटी होताना तुमच्या मुलाच्या पोटातील पदार्थ तोंडावाटे बाहेर फेकले जातात. उलटी होण्यामागे अनेक कारणे आहेत जसे की अन्नातून विषबाधा, गॅस्ट्रीटीस, तसेच खूप जास्त अन्न शिजवणे किंवा डोक्याला इजा होणे इत्यादींपैकी कुठले कारण आहे ते शोधून वेळीच उपचार केले पाहिजेत.

तुमच्या मुलाला होणाऱ्या उलटीचे प्रकार

. थोडे दूध बाहेर काढणे

जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत असाल, तर प्रत्येक वेळेला तुमच्या बाळाने थोडे दूध बाहेर काढणे सामान्य आहे.

. जोरदार उलटी करणे

जर तुमच्या बाळाने पोटातील अन्नपदार्थ अगदी जोरदारपणे बाहेर काढले तर त्यास प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग म्हणतात. जर ह्यामध्ये खूप जास्त पदार्थ बाहेर आले असे वाटत असले तर त्यामध्ये फक्त शेवटी खाल्लेले अन्नपदार्थ असतात. अशा प्रकारची उलटी कधीतरीच होते, परंतु प्रत्येक वेळेला बाळाला पाजल्यावर किंवा भरवल्यावर असे होत असेल तर मात्र ते काळजीचे कारण आहे.

. रिफ्लक्स

लहान मुलांना सामान्यतः अशी उलटी होते. कुठल्याही कारणाव्यतिरिक्त बाळाच्या पोटाची झडप उघडली जाते. असे केल्याने पोटातील पदार्थ उलट्या दिशेने बाहेर पडतात. बाळांना होणाऱ्या रिफ्लक्स मुळे कुठलाही धोका नसतो. बाळ बसू लागल्यावर किंवा चालू लागल्यावर हा त्रास कमी होतो.

मुलांना उलटी होण्याची कारणे

मुलांना उलटी होण्यामागे सामान्यपणे आढळणारी कारणे खालीलप्रमाणे

. काही पदार्थाना ऍलर्जी

तुमच्या मुलाला काही पदार्थांची जसे की दूध, गहू, अंडी, मासे किंवा शेंगदाण्याची ऍलर्जी असू शकते आणि त्यामुळे ते खाल्ल्यानंतर बाळ उलटी करून अशा पदार्थाना प्रतिक्रिया देते. त्याच्यामुळे बाळाला तीव्र पोटदुखी होते आणि त्यानंतर मळमळ आणि उलट्या सुरु होतात.

. गॅस्ट्रोएन्टेरीरिट्स

अशा प्रकारचा संसर्ग झाल्यावर मुलांना उलटीची भावना होते. जिवाणू, विषाणू आणि प्यारासाईट्स ही मुलांना होणाऱ्या गॅस्ट्रोएन्ट्रीरिट्स ची कारणे आहेत. आणि त्यामुळे अतिसाराचा त्रास होऊ शकतो.

. पचनाच्या समस्या

जर तुमच्या मुलाच्या अपेंडिक्सला संसर्ग झाला असेल किंवा त्याच्या पचन संस्थेमध्ये अडथळा असेल तर त्याला उलट्यांचा त्रास होऊ शकतो. पोटामधील ऍसिड रिफ्लक्स हे सुद्धा मुलांना उलटी होण्याचे कारण आहे.

. अन्नातून विषबाधा

ह्यामुळे तीव्र मळमळ आणि उलटी होऊ शकते त्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. अन्नातून विषबाधा हे कमी शिजवलेल्या मांस, चिकन किंवा माश्यांमधील हानिकारक जिवाणूमुळे होते. जर तुम्हाला अन्नातून विषबाधा झाली आहे अशी शंका अली तर तुमच्या मुलाला होणारी मळमळ, पोटदुखी आणि जुलाब ह्याकडे लक्ष द्या.

. ताण आणि भावनिक उलथापालथ

जर तुम्ही नवीन शहरात नुकतेच स्थलांतरित झालेले असाल किंवा जर तुमचे मूल आता वेगळ्या शाळेत जात असेल तर ह्या बदलांमुळे जास्तीचा ताण वाढू शकतो. तुमच्या मुलाला परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या कालावधीत ताण जाणवू शकतो. हा ताण त्याला वाद विवाद स्पर्धा/ इतर स्पर्धा किंवा नवीन लोकांशी बोलताना सुद्धा जाणवू शकतो. ही परिस्थिती मुलांमधील मळमळ आणि उलटीला कारणीभूत असू शकते.

. फ्लू आणि इतर आजार

वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या ऍलर्जी, ऍसिड रिफ्लक्स, स्वाईन फ्लू आणि कानाचा संसर्ग हे काही आजार आहेत ज्यामुळे लहान मुलांना उलटीचा त्रास होऊ शकतो. अपेंडिक्स मुळे पोटात तीव्र वेदना होऊ शकतात ज्यामुळे सुद्धा मुलांना उलट्या होतात. अशा वेळी अपेंडिक्स काढले जाऊ शकते आणि नंतर उलट्या थांबतात. लॅबिरिंथिटीस ( कानाचा संसर्ग) मुळे खूप चक्कर आल्यासारखे होते आणि मुलांना उलट्या होतात.

. मेंदूचे आजार

बऱ्याच वेळा असे दिसून येते की मुलाला भावनिक धक्का बसतो. (कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू किंवा घटस्फोट किंवा पालकांचे वेगळे राहणे), त्यामुळे जास्त उलट्या होतात. मेंदूतील ट्युमरमुळे मेंदूला सूज येते आणि हा दाब म्हणजे मुलांमधील उलट्यांचा कारण आहे.

मुलांना उलट्या होताना खालील लक्षणे दिसू शकतात

मुलांना उलट्या होत असताना पालकांनी खालील लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे जेणेकरून त्याचे कारण शोधात येईल आणि त्यावर योग्य ते उपचार घेता येतील
  1. तीव्र डोकेदुखी
  2. मळमळ
  3. हृदयाच्या ठोक्यांचा दर वाढणे
  4. त्वचा फिकी पडणे
  5. थकवा
  6. भूक मंदावणे
  7. निर्जलीकरण
  8. लाळ गाळणे किंवा थुंकणे
  9. अस्वस्थता
  10. अतिसार
  11. सौम्य ताप
  12. चक्कर येणे
  13. अन्न खाण्यास कुरबुर आणि झोप न लागणे
  14. पोटदुखी किंवा पोटात सूज
  15. वारंवार उलटी (जोरात उलटी काढण्याचा प्रयत्न)
मुलांमध्ये उलटीमुळे निर्जलीकरण हा लक्षणीय दुष्परिणाम आहे आणि निर्जलीकरणाची इतर लक्षणे म्हणजे:

निदान

तुम्ही डॉक्टरांच्या क्लिनिकला भेट देता तेव्हा डॉक्टर मुलाच्या स्थितीची सविस्तर तपासणी करतात. उलट्या केव्हा सुरु झाल्या, मुलाने किती वेळा उलट्या केल्या आणि उलट्या होण्यापूर्वी जेवणामध्ये काय खाल्ले ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यावी लागतील. त्यामुळे तुमच्या मुलाच्या आजाराचे योग्यरित्या निदान होण्यास मदत होईल, म्हणूनच आपण आवश्यक उत्तरे दिली असल्याची खात्री करा. डॉक्टर बाह्य तपासणी व्यतिरिक्त, निदान पूर्ण करण्यासाठी खाली दिलेल्या वैद्यकीय चाचण्या सुचवतील. या चाचण्यांमध्ये खालील चाचण्या समाविष्ट आहेत.

. ओटीपोटाचा एक्स-रे

आपल्या मुलाच्या पचनसंस्थेतील कोणताही अडथळा किंवा जखम ओळखण्यासाठी हा एक्स-रे उपयुक्त आहे. उलट्या करण्याचे कारण शोधून काढण्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टरांना एक मौल्यवान मार्गदर्शक आहे.

. ओटीपोटाचा सीटी स्कॅन

ही चाचणी ट्यूमर किंवा एपेंडिसाइटिस तपासण्यासाठी केली जाते. मुलाच्या पोटाची स्पष्ट प्रतिमा संगणक आणि एक्स-रे मशीन वापरुन घेतली जाते.

. रक्त चाचण्या

संक्रमण तपासण्यासाठी ही चाचणी पहिली केली जाते. पोट, यकृत किंवा मेंदूसारख्या अवयवांमधील कोणत्याही दोषांसाठी रक्ताची चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो

. पोट किंवा ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड

आतील अवयव आतल्या बाजूने कसे दिसतात हे पाहण्यासाठी अशा चाचण्यांमध्ये ध्वनीलहरी वापरल्या जातात. जर आपल्या मुलास पोट, पचन संस्था किंवा अपेंडिक्स संबंधित अडचणी येत असतील तर अल्ट्रासाऊंड मुळे हे ओळखण्यास मदत होते.

उपचार

चिंताग्रस्त पालक सामान्यत: मुलांच्या उलट्या कशा थांबतील ह्यासाठी जास्त उत्सुक असतात. कारण उलट्या झाल्यामुळे द्रवपदार्थाचे नुकसान होते. यामुळे मुलाच्या शरीरातील पाणी कमी होते. आणि म्हणूनच, त्वरीत उपचार करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास, स्थिती अधिकच बिघडू शकते आणि इस्पितळात दाखल करावे लागू शकते. जर आपल्या मुलाला उलट्या होत असतील तर येथे काही उपाय आहेत जर तुमच्या मुलाला ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन जे सामान्यतः ओआरएस म्हणून ओळखले जाते दिल्यास तीव्र डिहायड्रेशन त्वरीत रोखता येते. जास्त प्रमाणात उलट्या झाल्याने द्रवपदार्थाचा झालेला ऱ्हास भरून काढण्यासाठी मीठ, साखर आणि पाण्याचे हे मिश्रण उपयोगी ठरते. मुलाला बरे होईपर्यंत हे नियमित वेळेवर द्यावे लागते. तुमच्या बाळाचे पोट शांत राहावे आणि उलटीची भावना कमी व्हावी म्हणून ही औषधे गरजेची आहेत. ह्या औषधांमुळे तुमच्या मुलाला होत असलेली उलटीची भावना नियंत्रित होण्यास मदत होईल. डॉक्टर प्रतिजैविकांचा डोस लिहून देतील जेणेकरून तुमच्या बाळाची फ्लू किंवा जिवाणू संसर्गापासून सुटका होईल. परंतु, तुमच्या मुलाने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळी औषधे घेणे जरुरीचे आहे. असे केले नाही तर अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. जर मुलाने तोंडातून द्रवपदार्थ घेण्यास नकार दिला तर ही स्टेप गरजेची आहे. निर्जलीकरण टाळण्यासाठी शरीराला आवश्यक द्रव्ये आय. व्ही. मधून दिली जाण्याची गरज आहे.

उलट्या कमी होण्यासाठी मुलाला मदत करण्यासाठी टिप्स

बर्‍याच पालकांना नक्की कोणती पाऊले उचलावीत याबद्दल गोंधळ होऊ शकतो आणि जेव्हा मुलाला उलट्या होतात तेव्हा काय करावे याबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो. उलट्या थांबण्यासाठी तुम्हाला खालील टिप्स उपयुक्त ठरू शकतील

. आपल्या मुलाच्या आहारावर लक्ष केंद्रित करा

या कालावधीत आपल्या मुलाच्या आहाराचा एक महत्त्वपूर्ण आणि आवश्यक भाग म्हणजे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्रवपदार्थ असले पाहिजेत. ओआरएस किंवा ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन्स नियमितपणे घेतले पाहिजे. पाणी आणि सौम्य फळांचा रस हे शरीराला सजलीत करण्यासाठी इतर पर्याय आहेत. शीतपेये, सफरचंद, पेअर किंवा चेरी रस सारख्या फळांचा रस टाळा, कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. आपल्या मुलाच्या आहारात फळे, भाज्या दही, तांदूळ आणि बटाटे यांचा समावेश असावा. पचण्यास कठीण असलेले चरबी आणि तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळावेत . जर आपले बाळ स्तनपान घेत असेल तर डॉक्टरांनी तुम्हाला सांगेपर्यंत स्तनपान देणे थांबवू नका. नवजात बाळांना आईचे दूध पचविणे सोपे असते आणि म्हणूनच सामान्यत: अर्भकांसाठी ओआरएसची शिफारस केली जात नाही.

. ओरल रीहायड्रेशन थेरपी द्या

जरी ह्या उपचार पद्धतीमुळे उलट्या थांबण्यास मदत होत नाही, परंतु निर्जलीकरण होऊ नये म्हणून ते एक शक्तिशाली साधन आहे. ओआरएस मिश्रण जवळच्या औषधांच्या दुकानात उपलब्ध असते. जर सौम्य डिहायड्रेशन किंवा अतिसार असेल तर आपल्या मुलास ओआरएस देण्यासाठी चमचा, कप किंवा दुधाच्या बाटलीचा वापर करा. जर आपल्या मुलाने त्याचा सामान्य आहार खाण्यास नकार दिला तर ओआरएस द्या. पॅकवर शिफारस केलेला डोस वाचा आणि नियमित अंतराने द्या. ओआरएस सोल्यूशन योग्य प्रकारे दिल्यानंतर आपल्या मुलास नियमित आहार घेता येऊ शकतो.

.उलटी होण्याची भावना कमी करा

बाह्य घटक जसे की धूर, उष्णता, तीव्र गंध, आर्द्रता, कोंदट खोल्या आणि परफ्यूम ह्यामुळे उलट्यांचा त्रास होऊ शकतो. शक्यतोवर अशा गोष्टी टाळा. आपल्या मुलासाठी हवा खेळती असलेली खोली निवडा. खोलीत आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी ह्युमिडिफायर ठेवा. अचानक केलेल्या हालचालींमुळे उलट्या आणि मळमळ ह्यासारखे त्रास उद्भवू शकतात, म्हणून शक्यतो जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलास अंथरुणावर ठेवा. परफ्यूम, डीओडोरंट्स आणि रूम फ्रेशनर्स ह्यामुळे आपल्या मुलास अस्वस्थता येऊ शकते, म्हणूनच आपले मूल पूर्ण बरे होईपर्यंत फवारणी करणे टाळा. तीव्र वास बाहेर टाकणार्‍या खाद्यपदार्थांना या काळात दूर ठेवले पाहिजे.

मुलांच्या उलट्यांवर घरगुती उपाय

जर आपल्या मुलास वारंवार उलट्या होत असतील तर खालील घरगुती उपचार करुन पहा. या सोप्या आणि वापरण्यास सुलभ उपायांमुळे नैसर्गिकरित्या आराम पडतो.

. मीठ आणि साखर

हा पूर्वापार चालत आलेला उपाय करणे सोपे आहे आणि दररोजच्या वापरातील घटकांमधून तयार केला जाऊ शकतो. सतत उलट्या केल्याने तीव्र डिहायड्रेशन होऊ शकते आणि मुलाच्या शरीरातून आवश्यक पोषक द्रव्ये बाहेर फेकली जाऊ शकतात. ह्या मिश्रणामुळे द्रवपदार्थांची कमतरता पुन्हा भरुन निघू शकते आणि शरीराचे सजलीकरण होऊ शकते.

. पपई

हे सामान्यतः उपलब्ध फळ अँटीबैक्टीरियल संयुगांनी भरलेले आहे जे शरीरात पचन आणि शरीरातील आम्ल कमी करण्यास मदत करते. पपईमध्ये सर्व आवश्यक नैसर्गिक एन्झाइम्स असतात ज्यामुळे अन्न मऊ होऊन पचन त्वरित होते. पपईमुळे पोटातील हानिकारक जंतू काढून टाकण्यास देखील मदत होते.

. कांद्याचा रस

एक चमचा कांद्याच्या रसामध्ये तेवढ्याच प्रमाणात आल्याचा रस मिसळा आणि आपल्या मुलास खायला द्या. उलट्या आणि मळमळ थांबविण्यासाठी हा एक अत्यंत उपयुक्त घरगुती उपाय आहे कारण त्यात नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म आहेत. आले सहज उपलब्ध नसल्यास दीड कप कांद्याचा रस घ्या आणि त्यात दोन चमचे सेंद्रिय मध घाला. उलट्या थांबेपर्यंत एकावेळी आपल्या मुलास अर्धा चमचा रस द्या. हे विशिष्ट परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते, परंतु असे करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. जिरे

उलट्यांवर एक उत्तम उपाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिऱ्यांमुळे स्वादुपिंडांमध्ये निर्माण होणाऱ्या स्रावांमध्ये वाढ होते.ह्यामुळे पोट शांत होते आणि पचन सुधारते, अस्वस्थ वाटणे देखील कमी होते. एक वाटी पाणी उकळवा आणि त्यात बारीक जिरे घाला. या मिश्रणामध्ये थोडेसे जायफळ घालण्यामुळे मुलांच्या उलट्या परिणामकरीत्या कमी होतात. आणखी एक मिश्रण तुम्ही करून घेऊ शकता ते म्हणजे अर्धा चमचा चमचा जिरेपूड आणि थोडी वेलची एक चमचा मधात घालून आपल्या मुलास देऊ शकता. उलट्या होऊ नयेत म्हणून तुमच्या मुलाला हे चाटण थोडे थॊडे देत रहा.

. ऍपल सायडर व्हिनेगर

एक चमचा मध आणि सफरचंद सायडर व्हिनेगर घ्या आणि एका ग्लास पाण्यात मिसळा. हे मिश्रण आपल्या लहान मुलाला नियमित वेळेच्या अंतराने द्या. व्हिनेगरमध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात जे अन्न विषबाधा बरे करण्यास उपयुक्त आहेत. पाण्यात व्हिनेगर मिसळा आणि आपल्या मुलास त्याने तोंड धुण्यास सांगा. यामुळे उलट्यांचा आम्लीय वास दूर होईल आणि उलट्या होण्याच्या संवेदना कमी होतील. शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचा एक चांगला मार्ग आहे.

. पुदीना

जर उलट्या आणि मळमळ पासून ह्या त्वरित आराम देणाऱ्या उपायाचा विचार करीत असाल तर, पुदीना एक वनौषधी आहे. हा उपाय करण्यासाठी, पाणी उकळवा आणि वाळलेल्या पुदिन्याची पाने (सेंद्रिय) एक चमचे घाला. पुदिन्याची पाने १० मिनिटे पाण्यात ठेवा आणि नंतर ते पाणी गाळा. उलट्यांपासून मुक्त होण्यासाठी दिवसातून तीनदा हा उपाय करा. ताजी पुदीना पाने चघळण्याने देखील मळमळ होण्याची भावना कमी होते. उलट्यांच्या बाबतीत लिंबाचा रस, पुदीनाचा रस आणि मध (प्रत्येकी एक चमचे) यांचे मिश्रण तितकेच प्रभावी ठरू शकते

. आले

मुलांचा उलट्यांचा त्रास थांबविण्यासाठी, अदरक हा एक सिद्ध उपाय आहे, कारण त्यात नैसर्गिक प्रतिरोधक गुणधर्म असतात. हे आपल्या मुलाच्या पचन संस्थेला शांत करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करते आणि मळमळ होण्यापासून सुटका होते. एका वाटीत एक चमचा ताज्या आल्याचा रस घ्या आणि त्यात अंदाजे एक चमचे लिंबाचा रस घाला. हे चांगले मिसळा आणि दर दोन तासांनी आपल्या मुलास द्या. असे केल्याने उलट्या आणि मळमळ कमी होण्यास मदत होईल. मुलांना मध घातलेला ताज्या आल्याचा चहा आवडतो, म्हणून तुम्ही हे देखील करून पहा.

. तांदूळ पेज

तांदळाची पेज म्हणजे तांदळापासून बनविलेले स्टार्च आहे. जेव्हा जठराला आलेली सूज उलट्या होण्याचे कारण असते, तेव्हा तांदूळ पाणी खूप प्रभावी ठरू शकते. पांढर्‍या तांदळाची पेज लहान मुलांसाठी सहज पचण्यायोग्य असल्याने आपण पांढर्‍या तांदळाचा वापर केला आहे याची खात्री करा. हे करण्यासाठी, एक वाटी पांढरा तांदूळ घ्या आणि त्यात दोन कप पाणी घालून उकळवा. हे मिश्रण गाळा आणि एका कपमध्ये तांदळाचे पाणी वेगळे करा. तांदळाची पेज आपल्या आजारी मुलाला द्या आणि उलट्या कमी होऊन पूर्णपणे थांबल्या आहेत ना ह्यावर लक्ष ठेवा

आपण डॉक्टरांना कधी फोन कराल?

जेव्हा आपल्यास आपल्या मुलामध्ये खालील लक्षणे दिसतात तेव्हा डॉक्टरांना फोन करून ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे:

सावधानता

जर आपल्या मुलाला उलट्या होत असतील तर काही खबरदारीच्या उपाययोजना केल्या नाहीत तर गंभीर परिणाम होऊ शकतात उलट्या सहसा गॅस्ट्रोएन्टेरिटिसमुळे उद्भवतात आणि मुलाच्या आरोग्यास गंभीर समस्या उद्भवू शकत नाहीत. तथापि, प्रसंगी हे एखाद्या गंभीर व्याधीचे लक्षण म्हणून ओळखले जाते आणि डॉक्टरांकडून त्वरीत त्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जर त्यांना समस्यांची लक्षणे आढळली आणि त्या मोठ्या समस्या होण्यापूर्वी त्याकडे लक्ष दिले तर ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली जाऊ शकते आणखी वाचा : लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved