आरोग्य

मुलांमधील उष्माघाताची ६ लक्षणे आणि तो कसा टाळावा?

उन्हाळ्यात मुलांना घरातच ठेवणे अशक्य आहे. अखेर शाळा आणि गृहपाठापासून सुट्टी मिळाल्यानंतर त्यांना फक्त बाहेर दिवसभर खेळायचे असते. परंतु पालक म्हणून आपणास त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटणे साहजिक आहे, विशेषत: प्रत्येक येणाऱ्या वर्षात उन्हाळ्याचे तापमान किती वाढते आहे ते आपण पहात आहोत. उन्हाचे शरीरावर खूप वेगवेगळे परिणाम होतात - उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, भूक कमी होते आणि उन्हाळ्यात बऱ्याच प्रकारच्या ऍलर्जी वाढतात आणि आजारपण येते. उन्हाळ्यातील अशीच एक गंभीर समस्या म्हणजेउष्माघात'.

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात म्हणजे जेव्हा दीर्घकाळ असह्य उन्हाचा संपर्क असतो - विशेषत: उन्हाळ्याच्या दुपार दरम्यान - तेव्हा शरीराची तापमान नियमन प्रणाली बिघडते. साधारणत:माणसाचे शरीर आसपासच्या तापमानात होणारी वाढ किंवा घट लक्षात घेता स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करण्यास सक्षम असते. म्हणूनच आपल्याला उन्हाळ्यात जास्त घाम घेतो (शरीराला थंड करण्यासाठी) आणि हिवाळ्यामध्ये जास्त अन्न खातो (कारण अन्न पचन शरीरात उष्णता निर्माण करते आणि आपल्याला उबदार ठेवते). तथापि, शरीराच्या या नैसर्गिकथर्मोस्टॅटिकक्षमतेची एक मर्यादा असते -जर बाह्य तापमानवाढीचे प्रमाण जास्त असेल तर शरीर हे करू शकत नाहीत. म्हणूनच उन्हाळ्यात खूप जास्त काळ उन्हात राहिल्यास शरीराची नैसर्गिक थर्मोस्टॅट अयशस्वी होऊ शकते, परिणामी उष्माघात होतो.

उष्माघात होण्यामागील प्राथमिक लक्षणे

वरील स्पष्टीकरणात लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचा शब्द म्हणजेप्रदीर्घ. उष्माघात अचानक कधीच उद्भवत नाही. उन्हात र्बरेच तास राहिल्यास उष्माघात होतो. म्हणूनच, उष्माघात रोखणे शक्य आहे. आपल्याला फक्त हीटस्ट्रोकची प्राथमिक चिन्हे आणि लक्षणे ओळखण्याची गरज आहे. तुमच्या मुलास उष्माघात होण्यापूर्वी त्याच्यामध्ये खालील लक्षणे दिसू शकतात

उष्माघाताची सामान्य लक्षणे

उष्माघात ही अत्यंत गंभीर स्थिती आहे ज्यासाठी त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. परंतु, तुमच्या मुलास उष्माघात आहे हे ओळखण्यास सक्षम असणे महत्वाचे आहे. हीटस्ट्रोकची वैशिष्ट्ये येथे आहेत.

. घाम येणे

आपण सहसा उन्हात असताना घाम फुटतो. उष्माघाताच्या स्थितीत असलेल्या व्यक्तीला घाम फुटणार नाही. हीटस्ट्रोकचे हे पहिले, सर्वात स्पष्ट आणि सहज ओळखता येणारे चिन्ह आहे.

. वेगाने , उथळ श्वासोच्छ्वास

हे आणखी एक लक्षण आहे जे ओळखणे सोपे आहे. उष्माघात झालेल्या व्यक्तीचा श्वास उथळ, अडथळे असणारा आणी जलद होईल.

. गरम, कोरडी, जळजळ होणारी त्वचा

उष्माघाताचा परिणाम होणार्या पहिल्या अवयवांपैकी एक म्हणजे त्वचा. त्वचा लाल, गरम आणि खूप कोरडी होईल.

. विसंगती

उष्माघाताने ग्रस्त मूल गोंधळलेले दिसेल; चक्कर आलेल्या स्थितीत तो कोठे जात आहे आणि तो काय करीत आहे याबद्दल त्याला खात्री नसल्यासारखे त्याच्या हालचाली असतील. गंभीर प्रकरणांमध्ये, जेव्हा त्याला त्याच्या नावासारखे साधे प्रश्नविचारले जातात तेव्हा तो प्रतिसाद देऊ शकत नाही.

. फिट्स

त्याला अचानक, अत्यधिक, धक्कादायक, अनियंत्रित फिट्स येऊ शकतात

. शुद्ध हरपणे

अखेरीस, उष्माघाताने पीडित मुलाची शुद्ध हरपून ते बेशुद्ध होऊ शकते

उष्माघातासाठी प्रथमोपचार

जेव्हा एखाद्याला उष्माघाताचा त्रास होतो तेव्हा योग्य प्रथमोपचार करणे महत्वाचे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णवाहिका बोलावणे. हे नेहमीच आवश्यक नसते, परंतु उष्माघाताने ग्रस्त असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करणे सामान्य आहे. तुम्ही रुग्णवाहिका येण्याच्या प्रतीक्षेत असताना, पुढील गोष्टी करा

बर्फ वापरू नका - एक महत्वाची टीप

ह्या मुळे तुम्ही गोंधळात पडाल परंतु 'आईस बाथ' शरीराच्या तापमानाला खाली आणण्याचा सर्वात वेगवान मार्ग असू शकतो. खरं तर, उष्माघाताच्या बाबतीत बहुतेकदा हा एक प्राथमिक उपचार म्हणून सुचवला जाते. तथापि, ही पद्धत तरूण आणि लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. याचे कारण - लहान मुले आणि बाळांचे शरीर तापमानातील ह्या अचानक अत्यंत कमी होण्याला सामोरे जाऊ शकत नाही. हे प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते. म्हणून तुम्ही काहीही करा बर्फ वापरू नका.

प्रतिबंध हा उपचार करण्यापेक्षा चांगला असतो

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की लहान बाळे, लहान मुले आणि वृद्ध लोक विशेषत: उष्माघाताने आणि डिहायड्रेशन, चक्कर येणे इत्यादी उष्णतेशी संबंधित इतर समस्यांमुळे ग्रस्त असतात. कारण मोठ्या माणसांप्रमाणे त्यांचे शरीर उष्णतेचा तितकाच कार्यक्षमतेने सामना करण्यास असमर्थ असते. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत हीटस्ट्रोक टाळणे अत्यावश्यक आहे स्वत: ला आणि आपल्या मुलास उष्माघातापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही अवलंब करू शकता असे काही सोपे उपायः आणखी वाचा: तुमच्या मुलाला नुकसान पोहचवू शकतात असे सनस्क्रीन मधील १० सामान्य घटक
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved