अन्य

मकर संक्रांतीसाठी ११ विशेष पदार्थ आणि रेसिपी

    In this Article

मकर संक्रांत हा भारतात साजरा केला जाणारा लोकप्रिय सण आहे. ह्याच काळात कापणीचा हंगाम सुरु होतो. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असला तरी ह्या सणाचा उत्साह सगळीकडे सारखाच असतो. मकर संक्रांत हा हिंदूंचा एक प्राचीन सण आहे. सौरचक्रानुसार तो साजरा केला जातो. ह्या सणाच्या दिवशी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. सूर्याची, उत्तरेकडे (उत्तरायण) प्रवासास सुरुवात होते. मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होण्यास सुरुवात होते आणि थंडी संपून वसंत ऋतूचे आगमन होते.

भारतात गोडधोड पदार्थांशिवाय कोणताही सण साजरा होत नाही. मकर संक्रांतीचा सण सुद्धा त्यास अपवाद नाही. मग वाट कसली पाहताय, हाच तर ह्या लेखातील चर्चेचा विषय आहे! ह्या लेखात, आम्ही तुमच्यासाठी खास मकरसंक्रांतीसाठी पाककृती दिलेल्या आहेत. त्या पाककृती ह्या वर्षी तुम्ही करून पहा!

मकर संक्रांतीसाठी ११ स्पेशल रेसिपी

मकर संक्रांतीचा शुभ सण हा त्या दिवशी केल्या जाणाऱ्या विशेष पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. ह्या दिवशी केल्या जाणाऱ्या चवदार आणि पारंपरिक पदार्थांची प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पहात असतो. आम्हाला माहित आहे की तुम्हाला देखील अशा छान छान पाककृती करायच्या आहेत आणि त्या तुम्ही करून बघू शकता हे पदार्थ घरी करणे खूप सोपे आहे! येथे मकर संक्रांतीच्या काही पाककृती आहेत. ह्या पाककृती देशाच्या अनेक भागांमध्ये केल्या जातात.

. तिळगुळ वडी

तिळगुळ वडी, गूळ आणि तीळ घालून बनवली जाते. ही मकर संक्रांतीची पारंपारिक पाककृती आहे. महाराष्ट्रातील लोक हा तिळगुळ आपल्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना देतात व नमस्कार करतात. ‘तिळगुळ घ्या गोड बोलाअसे म्हणतात. ह्या संक्रांतीच्या पाककृती मध्ये जे काही घटक आहेत त्यामध्ये भरपूर पौष्टिक मूल्य आहे. हे घटक ऋतू बदलासाठी आवश्यक आहेत. ह्या मकर संक्रांतीला करून बघण्यासाठी खाली तिळाच्या वडीची रेसिपी देत आहोत.

साहित्य:

कृती:

. शेंगदाणा चिक्की

शेंगदाण्याची चिक्की ही मकर संक्रांतीची आणखी एक आवडती रेसिपी आहे. लोहरी किंवा पोंगल साजरे करणाऱ्यांनाही ह्या पाककृतीचा आनंद घेता येतो. ही चिक्की गूळ घालून देखील बनवली जाते आणि हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी ही एक उत्तम गोड कृती आहे. चला पाहूया संक्रांतीची ही स्वादिष्ट रेसिपी.

साहित्य:

कृती:

गुळाचा पाक

शेंगदाण्याची चिक्की

. मुरमुरा लाडू

संक्रांतीसाठी ही आणखी एक स्वादिष्ट रेसिपी आहे. ही रेसिपी केवळ स्वादिष्टच नाही तर बनवायलाही अत्यंत सोपी आहे. मुरमुरे आणि गुळाचा पाक वापरून केलेले मुरमुरा लाडू तुम्हाला काहीतरी गोड आणि कुरकुरीत खायला हवे असेल तर योग्य आहेत.

साहित्य:

कृती:

. पतिशप्ता

मकर संक्रांतीला बंगालमध्ये पौष संक्रांत म्हणतात. या खास प्रसंगी, तुम्हाला प्रत्येक बंगाली घरात एक स्वादिष्ट मिठाई पाहायला मिळेल. ह्या सणाच्या वेळी बंगाली लोक ही मिठाई बनवतात आणि तो स्वादिष्ट गोड पदार्थ म्हणजे पतिशप्ता. पतिशप्ता हा पदार्थ परिष्कृत पीठ, रवा आणि तांदळाच्या पीठाने बनवलेला पदार्थ आहे. रेसिपी जाणून घेण्यासाठी वाचा -

साहित्य:

पिठासाठी

सारण

कृती:

सारण

पतिशप्ता

. सक्कराई पोंगल

सक्कराई पोंगल किंवा गोड पोंगल हा पोंगल ह्या सणाच्या दिवशी तामिळनाडूमध्ये तयार केलेल्या अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. हा पदार्थ सहसा हरभरा, गूळ, तांदूळ आणि सुक्या मेव्यापासून बनवला जातो. त्याचे हंगामी आणि पारंपारिक महत्व आहे. विशेषत: दक्षिण भारतातील शीर्ष संक्रांती पाककृतींपैकी ही एक पाककृती आहे.

साहित्य:

कृती:

. पुरण पोळी

पुरण पोळी ही संक्रांतीची आवडती रेसिपी अनेक कुटुंबांमध्ये घरात तयार केली जाते. ही पारंपारिक मकर संक्रांती रेसिपी काही मूलभूत घटकांसह बनविली गेली आहे आणि सण साजरा करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा नक्कीच आनंद होईल. ५ ते ६ छोट्या पुरण पोळ्या करण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य खाली दिलेले आहे -

साहित्य:

कृती:

. उडदाच्या डाळीची कचोरी

उडीद डाळ कचोरी ही एक उत्तम अशी मकर संक्रांती साठीची रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता. हे चवदार खाद्यपदार्थ सणाच्या मेनूमध्ये संतुलन राखण्यास मदत करू शकतात. तर ह्या संक्रांतीला ही रेसिपी बनवा. तिळगुळ वडीसोबत कचोरी द्यायला विसरू नका.

साहित्य:

कृती:

. चना डाळ खिचडी

ही संक्रांतीसाठी एक उत्तम खिचडी रेसिपी आहे. हि रेसिपी तुम्ही ह्या वर्षी करून पाहू शकता. ह्या रेसिपी ला पंजाबी चना डाळ खिचडी किंवा भुनी खिचडी असे म्हणतात. ही भाताची रेसिपी तुमचे संक्रांतीचे जेवण पूर्ण करेल. ही संक्रांतीची खास रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे ते येथे दिलेले आहे.

साहित्य:

कृती:

. टॅमरिंड राईस

भाताच्या पाककृतींपैकी, चिंचेचा भात तुमच्या संक्रांतीच्या पाककृतींमध्ये एक चांगली भर घालेल. भारताच्या दक्षिणेकडील भागात, या डिशला पुलियोगरे, पुलिहोरा किंवा पुलियोधराई म्हणून देखील ओळखले जाते आणि जवळजवळ दररोज ह्या भाताचा आनंद घेतला जातो. ह्या मकर संक्रांतीत तुम्ही टॅमरिंड राईस कसा बनवू शकता हे जाणून घेण्यासाठी वाचा.

साहित्य:

मसाल्यासाठी

फोडणीसाठी

कृती:

१०. लेमन राईस

जर तुमच्याकडे चिंच नसेल, तर तुम्ही या वर्षीच्या संक्रांतीच्या पाककृतींमध्ये लेमन राईस समाविष्ट करू शकता. तुम्ही तो कसा बनवू शकता ते येथे दिलेले आहे

साहित्य:

कृती:

११. गूळ पोळी

महाराष्ट्रात मकर संक्रातीला हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे गूळ पोळी. चला तर मग गूळपोळीची पाककृती पाहुयात: साहित्य: कृती: हा गोळा पोळपाटावर ठेऊन पोळी लाटून घ्या. लाटलेली पोळी तव्यावर टाकून खरपूस भाजून घ्या. त्यावर साजूक तूप घाला आणि गरमागरम तिळगुळाची पोळी खाण्याचा आनंद घ्या. मकर संक्रांतीच्या दिवशी करण्यासाठी ह्या काही पाककृती इथे दिलेल्या आहेत. तुम्ही त्या ह्या वर्षी करून बघू शकता. देशाच्या विविध भागात जिथे मकर संक्रात साजरी केली जाते तिथे ह्या पाककृती केल्या जातात परंतु पदार्थांची नावे भिन्न असू शकतात. दुकानातून मिठाई आणि स्नॅक्स खरेदी करणे टाळा. त्याऐवजी, घरी बनवा. मेनू साधा पण रुचकर ठेवा. शुभ प्रसंगाचा जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सर्व विशेष खाद्यपदार्थ तयार करा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा!

आणखी वाचा:

मुलांसाठी मकर संक्रांतीच्या सणाची माहिती मकरसंक्रांत: तुमचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसाठी शुभेच्छासंदेश, मेसेजेस आणि कोट्स

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved