बाळ

लसीकरणानंतर बाळाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी काही टिप्स

    In this Article

लसीकरण आपल्या बाळाला अनेक भयानक आजारांपासून संरक्षण देते. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे परिपक्व झालेली नस ल्याने विषाणूचा  धोका असतो. विषाणूंचा हा वाढलेला संसर्ग तसेच स्वच्छतेकडे कमी लक्ष देण्यामुळे मुलांकडून इतरांना त्याचे संक्रमण पसरण्याची शक्यता निर्माण होते. पाळणाघरे  आणि शाळांमध्ये अनेक मुले एकत्र जमतात तेव्हा संक्रमणाची शक्यता आणखी वाढते. म्हणूनच, हे आवश्यक आहे की आपल्या मुलास सर्व शिफारस केलेल्या लसी वेळेवर दिल्या जाव्यात.

लस देताना बाळाला होणाऱ्या  वेदना पाहून अनेक माता अस्वस्थ होतात. लसीकरण आपल्या मुलाच्या चांगल्यासाठी असते आणि टाळले जाऊ नये. तथापि, तुम्ही तुमच्या  मुलाचा लसीकरणाचा अनुभव कमी तणावपूर्ण बनवू शकता

लसीकरणानंतर तुमच्या  बाळाच्या वेदना दूर करण्याचे १० मार्ग

लस देताना आणि नंतर तुमच्या मुलाच्या  वेदना कमी करण्यासाठी तुम्ही करु शकता अशा काही गोष्टी येथे आहेतः

१. आपल्या बाळाला जवळ घ्या

त्याला जवळ घ्या! जेव्हा आईवडील मुलांना जवळ घेतात तेव्हा मुले शांत होतात आणि कमी रडतात. कारण ओळखीच्या स्पर्शाने त्यांना सुरक्षित वाटते.

२. बाळाला पाजा

लहान मुले एका वेळी एकाच  कामावर लक्ष केंद्रित करतात, म्हणून लसीकरणानंतर बाळाला दूध दिल्यास त्याचे लक्ष दुसरीकडे वेधले जाऊ   शकते आणि वेदना देखील कमी होतात.  लसीकरणानंतर  बाळाला अधिक वेळा स्तनपान दिल्याने बाळ हायड्रेटेड राहील  आणि ताप येण्याची शक्यता कमी होते.

३. बाळाला  विचलित करा

तुमचे बाळ  इंजेक्शन घेत असताना त्याच्या आवडत्या खेळण्याकडे  त्याचे लक्ष वेधून घ्या. यामुळे त्याचे दुखण्याकडे लक्ष जात नाही.

४. इंजेक्शन दिलेल्या भागावर  कूल कॉम्प्रेस / आईस पॅक वापरा

एक थंड कॉम्प्रेस इंजेक्शनच्या ठिकाणी लावल्यास  सूज किंवा वेदना कमी होऊ शकतात. एक कपडा थंड पाण्यात भिजवा आणि इंजेक्शनच्या जागी ठेवा.  वेदना कमी करण्यासाठी तुम्ही त्याऐवजी आईस पॅक देखील वापरू शकता.

५. इंजेक्शनची जागा बधिर करणाऱ्या  क्रिम्सबद्दल चौकशी करा

तुम्ही तुमच्या  बालरोगतज्ञांना इंजेक्शन देण्यापूर्वी तो भाग बधिर करणारे  क्रीम किंवा स्प्रे वापरण्यास सांगू शकता. तुम्ही ह्याविषयी आधीपासूनच स्पष्टीकरण दिल्यास ते सर्वोत्तम आहे कारण त्यासाठी तुम्हाला एखाद्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असू शकते.

६. वेदनारहित इंजेक्शनची निवड करा

संपूर्ण पेशींच्या लसीच्या उलट  वेदनाहीन इंजेक्शन्स किंवा एसेल्युलर लस, घेतल्यामुळे कोणतीही लक्षणे नसतात किंवा थोडीशीही वेदना होत नाही. हा पर्याय उपलब्ध असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता आणि त्याची निवड करायची किंवा नाही हे ठरवू शकता.

७. कॉम्बिनेशन शॉट्स

तुमच्या  बाळाला घ्यावयाच्या इंजेक्शनची संख्या कमी करण्यासाठी एकाच शॉटमध्ये वेगवेगळ्या रोगांचे लसीकरण एकत्र केले जाऊ शकते. तुम्ही  याबद्दल बालरोगतज्ञांकडे चौकशी करू शकता.

८.  बाळाची त्वचा चोळा

इंजेक्शनच्या आधी आणि नंतर इंजेक्शनच्या आसपासच्या भागास हळूवारपणे मालिश केल्यास वेदना कमी होऊ शकते.

९. शांत रहा

तुम्ही चिंताग्रस्त झाल्यास बाळाची भीती वाढेल  आणि त्याला विचलित करेल. लस देताना तुम्ही बाळाला धरलेले असल्यास शांत रहा जेणेकरून बाळ तणावग्रस्त होणार नाही.

१०. 'फाईव्ह एस' दृष्टीकोन वापरा

लसीकरणानंतर तुमच्या बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे 'फाईव्ह एस'चा वापर करू शकता

११. वेदना कमी करणाऱ्या औषधांबद्दल चौकशी करा

जर तुमच्या  बाळाला वेदना झाल्यामुळे खूप रडत असेल किंवा लस दिल्यानंतर ताप आला असेल तर, तुम्ही बालरोगतज्ञांशी एसीटामिनोफेन किंवा इबुप्रोफेन सारखी औषधे देण्याबद्दल बोलू शकता.

तुमच्या बाळाचे  लसीकरण करणे महत्वाचे आहे कारण जीवघेण्या रोगांपासून संरक्षण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून, शांत रहा आणि लक्षात ठेवा की तुमच्या  बाळाला थोडावेळ त्रास होईल. वर सांगितलेली सगळी काळजी घेऊन लसीकरणाचा अनुभव तुम्ही बाळासाठी  कमी त्रासदायक करू शकता.

आणखी वाचा: बाळाला पाणी देण्यास केव्हा आणि कशी सुरुवात करावी?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved