टॉडलर (१-३ वर्षे)

लहान मुलांसाठी आधार कार्ड – तुमच्या मुलाच्या आधार कार्डासाठी अर्ज कसा कराल?

आधारकार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी ओळखीचा सर्वात विश्वासार्ह आणि महत्वाचा पुरावा बनला आहे. ह्यामध्ये कार्डधारकाचे महत्वपूर्ण असे बायोमेट्रिक तपशील आहेत जे तयार करणे फार कठीण आहे. वय काहीही असो, आधारकार्ड देणारी संस्था म्हणजेच, यूआयडीएआयने ही योजना प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शक्य केली आहे.

मुलांना आधार कार्डची आवश्यकता का आहे?

जरी आपले मूल १८ वर्षांचे नसले तरीही तरीही आधार कार्ड आपल्या मुलासाठी उपयुक्त ठरू शकते. आधार कार्ड असण्याचे काही फायदे येथे आहेत.

१. ओळख पुरावा

सर्व वयोगटातील लोक त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर शकतात. आधार कार्डचा उपयोग आहे हा विमान आणि रेल्वेचे बुकिंग करण्यासाठी, शाळांमध्ये प्रवेश इत्यादी, तसेच प्रौढ आणि मुलांची ओळख स्थापित करण्यासाठी वापरले जाऊ शकते. १८ वर्षांचे झाल्यावर मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इत्यादींसारखी शासनाकडून इतर अधिकृत कागदपत्रे मिळविण्यासाठीही आधारकार्ड खूप उपयुक्त आहे.

. बँक खाती उघडण्यासाठी

आपल्या मुलांसाठी बँक खाती उघडण्यासाठी, आधार कार्ड वापरले जाऊ शकते. आज बहुतेक बँका राहण्याचा आणि ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारतात. मुलाला त्याचा जन्म प्रमाणपत्र आणि आयडी पुरावा द्यावा लागेल, परंतु येथे, जन्म प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास मुलाचे आधार कार्ड वापरले जाऊ शकते. तथापि, अल्पवयीन मुलासाठी बँक खाते उघडण्यासाठी पालकांचे आधार कार्ड असणे जरुरीचे आहे.

. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक

तुमचे मूल अल्पवयीन असले तरी तुम्ही त्याच्या नावावर म्युच्युल फंडाची गुंतवणूक करू शकता. सहसा, मुलाचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते, परंतु बर्‍याच कंपन्या आजकाल आधारकार्ड देखील स्वीकारतात.

आपल्या मुलाच्या आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा?

मुलांसाठी आधारकार्डची नोंदणी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया वेगळी आहे

. पाच वर्षे व त्याखालील वयोगट

. पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी

. ऑनलाईन नोंदणीसाठी

मुलांसाठी एम-आधार आणि ई-आधार कार्ड कसे वापरावे?

पालक त्यांच्या मुलाच्या आधार कार्डवर त्यांचे स्वत: चे फोन नंबर नोंदवू शकतात आणि त्यांच्या स्मार्टफोनमध्ये नेहमीच त्यांच्या मुलाचे आधार कार्ड ठेवण्यासाठी एम-आधार अ‍ॅप वापरू शकतात. हे ऍप तब्बल ३ आधार कार्ड ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ह्यामध्ये पालक आपल्या मुलाच्या आधार कार्डसह स्वतःच्या आधार कार्डचे व्यवस्थापन करू शकतात. जेव्हा त्यांना ओळख पटविणे आवश्यक असेल तेव्हा आधार कार्ड दाखवले जाऊ शकते कारण हे खूप उपयुक्त आहे. ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या तसेच ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांना ह्याचा उपयोग होऊ शकतो.
अर्ज सादर केल्याच्या ६० दिवसानंतरही तुम्हाला आधार कार्ड मिळाले नाही, तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासून पाहू शकता. जर ऑनलाईन स्थिती आपले आधार कार्ड तयार असल्याचे दर्शवित असेल तर आपण ई-आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि नंतर प्रिंटआउट घेऊ शकता. -आधार कार्ड नेहमी वैध असते.

लहान मुलांच्या (बाल) आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

आपल्याला आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या याद्या येथे आहेत

. पाच वर्षे व त्याखालील वयोगटातील मुलांसाठी

. पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मुलांसाठी

मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि ओळखपत्रापैकी कोणताही एक खाली दिलेला पुरावा :

सामान्य प्रश्न

तुम्हाला तुमच्या मुलासाठी आधार कार्ड मिळण्याच्या प्रक्रियेबद्दल बरेच प्रश्न असू शकतात. त्यापैकी काहींची उत्तरे येथे आहेत.

. मुलांसाठी आधार कार्ड असणे सक्तीचे आहे का?

मुलांसाठी आत्तापर्यंत आधार कार्ड असणे बंधनकारक नाही, परंतु त्यासाठी त्यांची नावनोंदणी करण्यात काही नुकसान नाही.

. मुलांच्या आधार कार्डचा प्रोसेसिंग काळ किती आहे?

तुमच्या घरच्या पत्त्यावर आधार कार्ड पोहोचण्यासाठी तुम्ही नोंदणी केलेल्या दिवसापासून ९० दिवसांचा कालावधी लागेल.

. बाल आधार कार्डचा रंग काय आहे?

जर तुमच्या मुलाचे वय ५ वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड मिळेल. हे कार्ड तो केवळ ५ वर्षाचा होईपर्यंत वैध असेल. तो ५ वर्षांचा झाल्यावर आपल्याला त्याचे बायोमेट्रिक्स सबमिट करावे लागतील कारण बाल आधार कार्ड यापुढे वैध राहणार नाही.

. १५ वर्षांचे झाल्यावर मुलाचे आधार कार्ड अद्यतनित करणे अनिवार्य आहे काय?

होय, तो १५ वर्षाचा झाल्यावर बायोमेट्रिक्स आणि छायाचित्र सादर करणे अनिवार्य आहे. यास फक्त काही मिनिटे लागतात आणि ही सेवा विनामूल्य आहे.

. शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे काय?

अनेक शाळांकडून असे म्हटले जाते की पालकांनी शाळेत प्रवेश घेताना आधार कार्ड तयार केले असले तरी ते बंधनकारक केले गेले नाही.

. मुलांसाठी आधार नोंदणीसाठी काही फी आहे का?

नावनोंदणीचा ​​खर्च सरकार उचलते आणि मुलाची नोंद घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मुलाच्या बायोमेट्रिक अपडेटसाठीसुद्धा शुल्क आकारले जात नाही. आधार कार्ड मिळवणे अद्याप मुलांसाठी सक्तीचे नसले तरी त्यांची नावनोंदणी करणे अधिक चांगले आहे कारण यामुळे भविष्यात त्यांचे जीवन सुकर होईल. जेव्हा मुलास ओळखीचा पुरावा हवा असेल तेव्हा आधार कार्डाची मदत होईल. जरी मूल वेगवेगळ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी परदेशात जाण्याचा विचार करीत असेल, तरीही आधार कार्ड असल्यामुळे ती कार्यवाही सुकर होईल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved