आरोग्य

लहान मुलांच्या कानदुखीवर १२ परिणामकारक घरगुती उपाय

    In this Article

कान दुखणे हे प्रत्येकासाठी वेदना आणि अस्वस्थतेचे एक सामान्य कारण आहे. बाळांना कानदुखी झाल्यास हे चिंता करण्याचे एक मोठे कारण असते कारण मुलांना आपल्याला वेदना का होत आहेत हे सांगता येत नाही. म्हणूनच बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने ह्या वेदना कशा दूर करता येतील ह्याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. कानात वेदना होण्याची अनेक कारणे आहेत जसे की कानाचा संसर्ग, कानाच्या पडद्याला छिद्र असणे आणि कानात फोड येणे इत्यादी. कानदुखी होण्यामागची कारणे ओळखणे महत्वाचे आहे.

मुलांच्या कान दुखीवर नैसर्गिक उपाय

जर एखादे मूल सतत रडत असेल, अस्वस्थ दिसत असेल किंवा त्याचा कान आपल्यापासून दूर नेत असेल तर त्याला कानात संक्रमण झालेले असू शकते. मुलांमध्ये कानदुखीसाठी घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत. . गरम पाण्याचा शेक: ​​कान आणि मानेच्या भागाभोवतीच्या वेदना कमी करण्यासाठी गरम टॉवेल वापरा. लोखंडी जाळीवर किंवा गरम लोखंडावर दाबून तुम्ही टॉवेल गरम करू शकता. गरम पाण्याने भरलेली पिशवी किंवा गरम पाण्याने भरलेली लहान प्लास्टिकची बाटली देखील तुम्ही वापरू शकता. बाळाला शेकताना त्याला अस्वस्थ वाटू शकते. परंतु तुम्ही रागावू नका किंवा चिडू नका तर तुमच्या मुलाला आराम मिळण्यासाठी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. . बर्फाचा शेक: ​​जर शेकण्याने मदत होत नसेल तर त्याऐवजी कोल्ड कॉम्प्रेस वापरा. सावधगिरी बाळगा आणि आपल्या मुलाच्या त्वचेवर थेट बर्फ ठेवणे टाळा, कारण त्यामुळे रक्त प्रवाह थांबतो. बर्फ वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवा किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. ह्यासाठी गोठलेली दुधाची पिशवी वापरणे देखील चांगला पर्याय आहे. जर बर्फ नसेल तर लहान प्लास्टिकच्या बाटलीत थंड पाणी भरा आणि आपल्या बाळाची वेदना कमी करा. . तुळशीची पाने: सोपा आणि स्वस्त उपाय नेहमीच वापरणे आवश्यक आहे. तुळस हे आपल्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तुळशीची पाने बारीक करा त्याचा रस काढा आणि कानात काही थेंब घाला.
  . ऑलिव्ह ऑईल: ऑलिव्ह ऑईल हे मुलांच्या कानातील संसर्गावर उपचार करण्याचा सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय आहे. स्वच्छ पॅन किंवा मायक्रोवेव्हमध्ये ऑलिव्ह ऑईल हलके गरम करा. स्वच्छ इअरबडच्या सहाय्याने दुखऱ्या कानात आणि कानाजवळील भागात हलकेच लावावे. आसपासच्या भागात तेलाच्या थेंबांचे डाग पडू नयेत म्हणून टॉवेल वापरा. . लसूण: लसणाच्या दोन पाकळ्या चिरडून घ्याव्यात आणि तीळ / ऑलिव्ह तेलात गरम करा. स्वच्छ कापड वापरुन गाळा आणि दुखऱ्या कानाजवळ आणि कानात हे तेल लावा. . निलगिरी तेल आणि औषधी कापूस: नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब कापसाच्या बोळ्यावर घाला आणि वेदना कमी करण्यासाठी संक्रमित कानात तो कापूस ठेवा. वेदना कमी होईपर्यंत दररोज ही प्रक्रिया पुन्हा करा.
. मोहरीचे तेल: बऱ्याच घटनांमध्ये, जास्त प्रमाणात तयार झालेले कानातील मेण बाहेर टाकले जाते. तथापि, जेव्हा हे होत नाही, तेव्हा इअरवॅक्स कडक होऊ शकतो. त्यामुळे अडथळा येऊन संसर्ग होऊ शकतो. अडथळा कमी करण्यासाठी संक्रमित कानात कोमट मोहरीच्या तेलाचे काही थेंब घाला. ही प्रक्रिया आठवडाभर सुरू ठेवा. काही नरम मेण आपोआप बाहेर येईल आणि उर्वरित मेण काढण्यासाठी आणखी काही तेल वापरले जाऊ शकते. मोहरीचे तेल मेण आणि लहान गोष्टी काढून संक्रमित क्षेत्र साफ करते. तुम्ही कानाची तपासणी करण्यासाठी फ्लॅशलाइट वापरू शकता आणि कान स्वच्छ झाला आहे की नाही ते पाहू शकता. कानातील मेण काढण्यासाठी तुम्ही खालील चरणांचे अनुसरण करू शकता: . निलगिरी तेल मसाज: नीलगिरीचे तेल कधीही मूळ स्वरूपात वापरू नका कारण ते तीव्र असते. नारळ तेल, तीळ तेल किंवा ऑलिव्ह तेलाने ते सौम्य करा. स्वच्छ भांडी वापरुन किंचित गरम करा किंवा मायक्रोवेव्ह करा. कानाच्या आणि मानेच्या आसपासच्या भागाला खालच्या दिशेने मालिश करा, जेव्हा तेल थंड होते तेव्हा परत गरम करावे. . स्तनपान: स्तनपान देणाऱ्या मातांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. आईच्या ताज्या दुधाचे काही थेंब संक्रमित कानात घाला. शिशुंमध्ये कानाच्या संसर्गावर उपचार करण्याचा हा एक सुप्रसिद्ध उपाय आहे कारण त्यात प्रतिपिंडे असतात. दूषित भांड्यामुळे दुधात संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी. तसेच, हे थेट स्तनातूनच दिले जाऊ नये कारण बाळाच्या कानासाठी तो दबाव जास्त असेल. चांगल्या स्वच्छ भांड्यामध्ये दूध घ्यावे आणि ड्रॉपर्स वापरावेत. हा सर्वात चांगला मार्ग आहे. १०. मीठ: मुलांच्या कानातील संसर्गाच्या उपचारांसाठी आपण घरगुती मीठ वापरू शकता. एका मिनिटासाठी एक कप मीठ मायक्रोवेव्ह करा. मिक्स करून पुन्हा एक मिनिटासाठी गरम करावे. कापडात बांधून त्याची पुरचुंडी करावी. संक्रमित कानावर १० मिनिटे ठेवावी आणि आवश्यक असल्यास पुन्हा असे करावे.
११. कांदे: रक्ताचा प्रवाह कमी होण्यासाठी दुखऱ्या कानाचा भाग उंचावर ठेवा. एक छोटा कांदा घ्या, तो मऊ होण्यासाठी मंद आचेवर गरम करा आणि त्याचा रस काढा. कानात त्याचे काही थेंब घाला. कांद्याच्या रसातील जिवाणूंविरूद्द लढण्याची गुणवत्ता संक्रमणाविरूद्ध लढायला मदत करेल आणि वेदना कमी होतील. १२. टी ट्री ऑइल: टी ट्री ऑइल देखील मुलांमध्ये कान दुखण्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. टी ट्री ऑइल मध्ये ऑलिव्ह ऑइल घालून ते सौम्य करा. आणि ते हलकेच गरम करा. प्रत्येक कानात काही थेंब घालण्यासाठी स्वच्छ ड्रॉपर वापरा. कान हा एक अतिशय संवेदनशील अवयव असल्यामुळे ही प्रक्रिया हलकेच करा आणि त्यावर कुठलाही जास्तचा फोर्स वापरू नका. कान दुखणे हा सामान्यतः एक आजार नसून लक्षण आहे. सर्दी, फ्लू आणि कफ ही मुलांना होणाऱ्या वेदनेची मुख्य कारणे आहेत. त्वरित आराम मिळवण्यासाठी हे सोपे घरगुती उपचार आहेत, परंतु कान दुखीचे कारण आधी ओळखणे महत्वाचे आहे. नमूद केलेले उपाय चांगले काम करतात आणि त्वरित आराम देखील देऊ शकतात. तथापि, नेहमीच कान दुखीवर घरगुती उपचारांद्वारे उपाय केले जाऊ शकत नाही. कानाच्या पडद्याला छिद्र असल्यास आणि संसर्ग खूप झालेला असल्यास कानाचे कायमचे नुकसान करतात. म्हणूनच जर वेदना असह्य झाल्यास किंवा ह्या वेदना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चालू राहिल्यास आपण आपल्या मुलास बालरोगतज्ञांना दाखवले पाहिजे. आणखी वाचा: मुलांना उलट्या होत असल्यास त्यावर १३ परिणामकारक घरगुती उपाय मुलांच्या तोंड येण्याच्या (तोंडातील अल्सर) समस्येवर ११ घरगुती उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved