गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे गरोदरपण : ४ था आठवडा

गर्भधारणा झाली आहे हे समजल्यावर आणि गरोदरपणाच्या ४ थ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर आपल्या बाळाची वाढ कशी होत आहे ह्याची उत्सुकता पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रीला असते. बऱ्याच स्त्रिया ४थ्या आठवड्यात जुळ्या बाळांची काही चिन्हे किंवा लक्षणे आहेत का हे बघतात आणि जुळ्या बाळांची गर्भधारणा झाली आहे का हे जाणून घेण्यास उत्सुक असतात. परंतु, तुमच्या पोटात एकाधिक बाळे आहेत का हे जाणून घेण्यासाठी गरोदरपणाच्या ४ थ्या आठवड्यात गर्भाची वाढ खूप कमी असते. सोनोग्राफी द्वारे सुद्धा एका पेक्षा जास्त बाळे आहेत किंवा नाही हे गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यानंतरच समजते. तसेच, गरोदरपणाच्या १० ते १४ आठवड्यांच्या दरम्यान तुम्हाला जुळी किंवा एकाधिक बाळे आहेत का हे कळू शकेल. विशिष्ट गोष्टींबद्दल माहिती असणे नेहमीच चांगले असते. या लेखात, आम्ही एकाधिक / जुळ्या बाळांचे भ्रूण रोपण आणि गरोदरपणाच्या ४थ्या आठवड्यात त्यांची वाढ याबद्दल थोडीशी चर्चा करू. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

४ थ्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक भ्रूणांचे रोपण

४थ्या आठवड्यानंतर, शुक्राणूंनी फलित केलेली अंडी गर्भाशयापर्यंत पोहोचतात आणि रोपण प्रक्रिया सुरू करतात. जेव्हा अंडाशयातून एकापेक्षा जास्त अंडी सोडली जातात आणि ती शुक्राणूंद्वारे फलित होतात तेव्हा जुळे किंवा तिळे भ्रूण तयार होतात. काही वेळा, एकच अंडे एकाधिकात विभागली जाते आणि एकसारखे जुळे किंवा तिळे बनतात. ह्या अंड्यांचे गर्भाशयामध्ये रोपण होते आणि भ्रूण वाढू लागतात.

गरोदरपणाच्या चौथ्या आठवड्यात बाळाची वाढ

जेव्हा तुमचा गर्भावस्थेच्या ४था आठवडा पूर्ण होऊ लागतो तेव्हा गर्भाशयातील बाळांच्या न्यूरल ट्यूब तयार होऊ लागतात. हे मज्जातंतू, पाठीचा कणा, मणके आणि मेंदूची प्रारंभिक अवस्थेत वाढ होत असल्याचे चिन्हांकित करते. रक्तवाहिन्या आणि हृदय तयार होऊ लागताच रक्ताभिसरण यंत्रणेत वाढ देखील होऊ लागते. नाळ तयार होऊन तिचे कार्य सुद्धा ह्याच कालावधीत सुरु होऊ लागते.

गरोदरपणाच्या ४थ्या आठवड्यात बाळांचा आकार केवढा असतो?

गर्भाशयात असलेले बाळ अद्याप भ्रूणावस्थेत आहे. ते बियाण्याइतकेच लहान आहे (अगदीच तंतोतंत सांगायचे तर ते जवळजवळ १/२५ इंच इतके असते) . सर्व शारीरिक आणि आतील घडामोडी त्यामध्ये वेगाने चालू आहेत. खूपच लवकरच, चेहर्‍याची थोडीशी वैशिष्ट्ये आणि हातापायांची उपस्थिती येत्या आठवड्यात दिसू लागेल. गर्भधारणेनंतर तुमच्या शरीरात बदल होतील. चला तर मग सामान्यपणे आढळणारे काही बदल पाहुयात.

होणाऱ्या आईच्या शरीरात होणारे सामान्य बदल

बऱ्याच स्त्रियांमध्ये, ४ थ्या आठवड्यात गर्भधारणा निश्चित होते, या टप्प्यावर होणारे शरीरातील काही विशिष्ट बदल खालीलप्रमाणे:
४ थ्या आठवड्यात गर्भधारणा चाचणी कशाची पुष्टी करेल यावर एक नजर टाकूया.

४ थ्या आठवड्यातील गर्भधारणा चाचणी

गरोदरपणाच्या ४ थ्या आठवड्यांत जुळ्या मुलांसाठी अल्ट्रासाऊंड केल्याने त्यास पुष्टी मिळण्यास काही डॉक्टरांना मदत होईल, परंतु सामान्यत: हा निकाल कदाचित बरोबर नसेल. अनेक स्त्रिया अगदी गर्भवती असूनही, या टप्प्यावर त्यांची गर्भधारणा चाचणी सकारात्मक येत नाही. हे प्रामुख्याने एचसीजी संप्रेरकाची पातळी गर्भधारणा चाचणी निकालास चालना देण्यासाठी जास्त प्रमाणात नसल्यामुळे होते. एचसीजी संप्रेरक पुढील अंडी सोडण्यास देखील प्रतिबंधित करते आणि गर्भधारणा झाल्यापासून, अप्रत्यक्षपणे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनच्या पातळीस उत्तेजन देते. हे सर्व प्रभाव पाळी थांबण्यासाठी तसेच ओव्हुलेशन थांबविण्यासाठी एकत्र काम करतात. गर्भधारणा चाचणीचा अंतिम निकाल समजण्यासाठी मासिक पाळीच्या अपेक्षित दिवसापासून कमीतकमी एका आठवड्यानंतर चाचणी करा. म्हणूनच, आम्हाला माहित आहे की, गर्भधारणेच्या ४ थ्या आठवड्यांनंतर, एखाद्या महिलेला जुळे किंवा तिळे होणार आहेत हे ओळखणे शक्य नाही. तथापि, अनेकांचा असा विश्वास आहे की गर्भधारणेच्या लक्षणांवरून त्या स्त्रीला जुळे किंवा एकाधिक बाळे होणार आहेत किंवा कसे हे समजते.

४ थ्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक गर्भधारणेची लक्षणे

इतर महिलांच्या तुलनेत जुळ्या किंवा एकापेक्षा जास्त बाळांसह गर्भवती असलेल्यांना स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळी चक्राच्या सुरुवातीच्या काळात गर्भधारणेची तीव्र लक्षणे दिसू शकतात. त्यापैकी काही तीव्र लक्षणे पुढीलप्रमाणे आहेतः
यापैकी बहुतेक बदल मुख्यत: एकाधिक भ्रुणांच्या उपस्थितीमुळे होऊ शकतात, ज्यामुळे शरीरात प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन तसेच एस्ट्रॅडिओल आणि एचसीजी संप्रेरक पातळी वाढते. आपण जुळ्या/एकाधिक बाळांसह गर्भवती असो किंवा नसो, गर्भधारणा झाली आहे हे समजल्यानंतर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या आनंदी आणि निरोगी गर्भारपणासाठी इथे काही टिप्स दिलेल्या आहेत त्यांचे अनुसरण तुम्ही करू शकता.

गर्भारपणात काळजी घेण्याविषयक काही टिप्स

स्त्रियांनी पाळाव्यात अशा काही सूचना आहेत

हे करा

हे करू नका

एका पेक्षा अधिक बाळांची गर्भधारणा होणे हे बऱ्याच स्त्रियांसाठी रोमांचक असू शकते परंतु, गर्भाशयात त्यांची वाढ होत असतानाच प्रत्येक स्त्रीचा अनुभव वेगळा असेल. तुम्ही स्वतःची काळजी घ्या कारण तुमचा हा गरोदरपणाचा प्रवास इतर कोणासारखा नसेल. पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ५ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved