अन्य

गुढीपाडवा २०२३: गुढीपाडव्यासाठी सुंदर रांगोळ्या

गुढीपाडव्याचा सण म्हटलं की दारापुढे छानशी रांगोळी हवीच. गुढीपाडवा हा महाराष्ट्रीयन हिंदू लोकांसाठी महत्वाचा सण आहे कारण त्यांच्यासाठी हा सण म्हणजे नवीन वर्षाची सुरूवात आहे. बहुतेक मराठी कुटुंबे आपल्या दारासमोर सुंदर रांगोळ्या काढून आनंदोत्सव साजरा करतात. तुम्ही गुढी पाडव्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन्स शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आमच्याकडे तुमच्यासाठी काही रांगोळीच्या डिझाइन्स आहेत त्या तुम्ही गुढीपाडव्यासाठी काढून बघू शकता.

गुढीपाडव्याला रांगोळी काढण्याचे महत्त्व

पौराणिक कथांनुसार, कोणे ऐके काळी एक राजा होता आणि त्याचा एक पुजारी होता. एके दिवशी, पुजाऱ्याच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला. पुजारी व राज्यातील प्रत्येकजण दु: खी होता. मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी संपूर्ण राज्याने श्रीब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली. लोकांच्या प्रार्थनांनी ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यानंतर त्याने पुजार्‍याला जमिनीवर आपल्या मुलाचे छायाचित्र रंगवण्यास सांगितले त्यानुसार पुजाऱ्याने आपल्या मुलाचे चित्र जमिनीवर काढले आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने त्या चित्राला जीवन दिले आणि मुलगा जिवंत झाला. प्रत्येकाने ब्रह्मदेवाचे आभार मानले आणि तेव्हापासून रांगोळी काढण्याची परंपरा सुरू झाली. या संदर्भात रांगोळी सृष्टीचे सार आणि नवीन सुरुवात दर्शविते. रांगोळी हा गुढीपाडव्याच्या उत्सवाचा एक भाग बनला आहे.

गुढीपाडव्यासाठी ७ रांगोळ्या

इथल्या सर्व कलाप्रेमींसाठी आणि ज्यांना ह्या गुडीपाडव्यासाठी रांगोळी काढायची आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे काही लोकप्रिय डिझाईन्सची एक यादी आहे.

१. फुलांची रांगोळी

फुलांच्या रांगोळीचे डिझाइन बरेच लोकप्रिय आहे आणि काही वेळातच फुलांची रांगोळी तयार केली जाऊ शकते. बहुतेक स्त्रिया सणाच्या वेळी फुलांची रांगोळी तयार करतात आणि त्यातीलच एक सण म्हणजे  गुढी पाडवा. आपण आपल्या घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यावर वेगवेगळ्या फुलांचे डिझाईन्स बनवू शकता. आपल्या आवडीच्या फुलांचे नमुने तयार करा आणि फुलांची रांगोळी पूर्ण करताना पाकळ्या काढायला विसरू नका.

२. मोराची रांगोळी

मोराची रांगोळी देखील बरेच लोक काढतात परंतु सगळ्यांचं ती जमते असे नाही. आपण प्रथमच रांगोळी काढत असल्यास मोराची रांगोळी कठीण वाटू शकते परंतु आपण सराव केल्यास तुम्हाला मोराची रांगोळी काढणे नक्की जमेल. आपण मयूर पंखांची रांगोळी देखील काढू शकता. बेस म्हणून निळा आणि हिरवा  रंग वापरा आणि आपल्या आवडीच्या इतर रंगांसह प्रयोग करा.

३. संस्कार भारती रांगोळी

संस्कार भारती रांगोळी ही रांगोळी काढण्याची एक विशेष कला आहे आणि ती महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. संस्कार भारती रांगोळीमध्ये एक नमुना तयार करण्यासाठी तीन ते चार बोटे वापरली जातात. संस्कार भारती रांगोळी पूर्ण काढून झाल्यावर खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला मोठी डिझाईन्स काढायची असतील आणि भूमितीबद्दल प्रेम असेल तर तुम्ही संस्कार भारती रांगोळी काढून पहा.

४. चमकी वापरून काढलेली रांगोळी

गुढीपाडवा हा एक आनंददायक प्रसंग आहे म्हणून तुम्ही तो चमकदार आणि रंगतदार बनवणे आवश्यक आहे. तुम्ही चमकीने रांगोळी काढू शकता किंवा रांगोळी काढून नंतर त्यावर चमकी टाकू शकता.

५. ठिपक्यांची रांगोळी

ठिपक्यांची रांगोळी म्हणजे आधी ठिपके काढून नंतर त्यावर नक्षी तरी केली जाते. ठिपक्यांची रांगोळी म्हणजे रांगोळीचा एक बेसिक प्रकार आहे आणि तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही अशी ठिपक्यांची रांगोळी काढण्याचा प्रयत्न करू शकता आणि ती काढणे खूप सोपे आहे.

६. स्वस्तिक रांगोळी

स्वस्तिक हे चिन्ह आपल्या संस्कृतीत देवत्व आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जाते. आपण स्वस्तिक रांगोळी काढू शकता कारण ती शुभ मानली जाते. रांगोळी डिझाइन म्हणून याचा वापर करताना आपण स्वस्तिकच्या मूलभूत चौकटीत अधिक रंग भरू शकता आणि सुंदर फॅनसारख्या पॅटर्नमध्ये विकसित करू शकता.

७. आरशांसह रांगोळी

तुमच्या रांगोळी डिझाईनला तुम्हाला आणखी काही वेगळं करायचे असेल तर तुम्ही त्यात लहान आरसे जोडू शकता. काही विशिष्ट रांगोळीच्या नमुन्यात लहान आरसे चांगले दिसतात. विविध आकारात छोटे आरसे वापरुन तुम्ही रांगोळी डिझाइन खरोखरच जिवंत करू शकता. आपल्या देशातील काही राज्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा आपल्या घरासमोर अशी रांगोळी काढून हा सण उत्साहात साजरा करा. वर नमूद केलेल्या डिझाइन काढण्याचा प्रयत्न करा आणि तुमची कला सगळ्यांना दिसू द्या. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! आणखी वाचा: गुढीपाडव्यासाठी ५ चविष्ट आणि विशेष पाककृती तुमच्या प्रियजनांसाठी सर्वोत्तम गुढीपाडवा शुभेच्छा संदेश, मेसेजेस आणि कोट्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved