गर्भधारणा होताना

घरगुती गरोदर चाचण्या

तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असताना, तुम्हाला शक्य तितक्या लवकर गरोदर चाचणी करून घ्यायची असते. जर एखाद्या दिवशी तुम्हाला चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल आणि एक किंवा दोन दिवसांनी तुमची मासिक पाळी चुकली असेल, तर तुम्हाला चिंताग्रस्त वाटू शकते आणि तुम्ही डॉक्टरांना भेटण्याआधी घरी गर्भधारणा चाचणी करून घेऊ शकता. तुम्ही गरोदर आहात की नाही हे शोधण्याचा हा एक सोयीस्कर मार्ग आहे. परंतु जर तुम्ही यापूर्वी कधीही घरगुती गर्भधारणा चाचणी केलेली नसेल, तर तुम्हाला त्याबद्दल काही प्रश्न असतील. घरगुती गरोदर चाचण्या, केव्हा कराव्यात, कशा कराव्यात आणि ह्याबद्दल बरेच काही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

घरगुती गरोदर चाचणी म्हणजे काय?

घरगुती गरोदर चाचण्या तुमच्या लघवीमधील मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोफिन (एचसीजी),ह्या संप्रेरकाची उपस्थिती शोधण्यासाठी डिझाइन केलेली आहे. तुम्ही गरोदर होताच, तुमच्या गर्भाशयात फलित अंड्याचे रोपण झाल्यावर तुमचे शरीर एचसीजी तयार करू लागते.

पेशींद्वारे स्रवलेल्या एचसीजी ह्या संप्रेरकांमुळे नाळ तयार होते. घरगुती गरोदर चाचणीमुळे घरातच लवकर चाचणी करता येते आणि गर्भधारणा झाल्यानंतर सुमारे ६ ते १४ दिवसांत लघवीमध्ये एचसीजी हे संप्रेरक आहे किंवा नाही हे शोधता येते.

रोपणाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत, शरीरातील एचसीजी चे स्तर झपाट्याने वाढतात. घरगुती गरोदर चाचण्या पुरेशा संवेदनशील असल्यामुळे स्त्रीची मासिक पाळी एक दिवस उशीरा येताच शरीरातील एचसीजी ची पातळी शोधली जाते.

तुमच्या पहिल्या घरगुती गरोदर चाचणीचा परिणाम नकारात्मक असल्यास, ते तुमच्या शरीरातील एचसीजी च्या कमी पातळीमुळे असू शकते. तुमच्या मासिक पाळीला उशीर होत असल्यास, तुम्ही गरोदर चाचणीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करू शकता.

काही गर्भधारणा चाचण्या इतरांपेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि तुमच्या शरीरातील कमी एचसीजीची पातळी सुद्धा शोधतात.

गरोदर चाचणी किट्स बद्दल

होम प्रेग्नेंसी टेस्ट किट हे घरी तुमच्या गर्भधारणेची पुष्टी करण्याचा सर्वात सोयीचा मार्ग आहे. ह्या किट्स वापरण्यास सोप्या आहेत आणि त्यापैकी बहुतेक अचूक परिणाम देतात. आजकाल बाजारात होम प्रेग्नेंसी टेस्ट किटचे अनेक ब्रँड उपलब्ध आहेत परंतु ते सर्व तुमच्या लघवीतील एचसीजी ची पातळी शोधून सारख्याच पद्धतीने कार्य करतात.

घरगुती गरोदर चाचणी खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा

त्यांच्या व्यतिरिक्त, घरी गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी इतर विविध नैसर्गिक घरगुती गरोदर चाचण्या आहेत

घरी गर्भधारणा चाचणी कशी करावी?

गर्भधारणेला पुष्टी मिळण्यासाठी तुम्ही घरी चाचणी करू शकता. यासंबंधी तुम्ही प्रेग्नेंसी किटमधील सूचना काळजीपूर्वक वाचल्याचे सुनिश्चित करा कारण ते किटनुसार भिन्न असू शकतात.

बहुतेक चाचणी किट वापरण्यास अतिशय सोयीस्कर आहेत. तुम्ही फक्त टेस्ट स्टिकवर लघवी करून तपासू शकता. परंतु, काही चाचण्यांमध्ये, गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला एका लहान कपमध्ये लघवीचा नमुना घ्यावा लागेल आणि नंतर त्या कपमध्ये चाचणी पट्टी घालावी लागेल. त्यांपैकी काही किट्स लघवीचा नमुना चाचणी स्टिकवर ठेवण्यासाठी ड्रॉपर देखील देतात.

तसेच, परिणाम प्रदर्शित करण्याची पद्धत बदलू शकते. त्यापैकी काही चाचणी पट्टीवर गुलाबी किंवा निळ्या रेषा दिसतात तर इतर चाचण्यांमध्ये अधिक किंवा वजा चिन्ह दिसते किंवा मूत्र रंगात बदल दिसू शकतात. नवीन डिजिटल चाचण्या त्यांचे परिणाम फक्त 'गर्भवती' किंवा 'गर्भवती नाही' अशा शब्दांमध्ये दाखवतात आणि तुम्ही गरोदरपणाच्या कितव्या आठवड्यात आहात ह्याचा अंदाज काही चाचण्या देतात.

घरगुती गरोदर चाचणी कधी घ्यावी?

तुम्ही गर्भधारणा चाचणी करण्यापूर्वी हि चिन्हे लक्षात घ्या

मी होम प्रेग्नन्सी किट कधी वापरावे?

आजकाल, बहुतेक चाचण्या तुमच्या मासिक पाळी चुकल्याच्या पहिल्या दिवसापासून तुमची गर्भधारणा ओळखू शकतात. बाजारात आणखी प्रगत आणि संवेदनशील चाचण्या उपलब्ध आहेत. ह्या चाचण्यांमध्ये मासिक पाळी येण्यापूर्वी एचसीजीची कमी पातळी असली तरीसुद्धा गर्भधारणा देखील ओळखता येते. या सुरुवातीच्या चाचण्यांचे परिणाम कदाचित अचूक नसतील.

तुम्ही वापरत असलेल्या चाचणीची पर्वा न करता तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी चाचणी घेऊ शकता परंतु चाचणी घेण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नका कारण यामुळे शरीरातील एचसीजी पातळी कमी होऊ शकते.

तथापि, बहुतेक चाचण्यांसाठी दिवसाची पहिली लघवी वापरण्याची शिफारस करतात कारण एचसीजीची पातळी रात्रभर लघवीमध्ये केंद्रित होते .

तुमची मासिक पाळी अनियमित असल्यास, तुम्ही चाचणी घेण्यासाठी अनुभवलेल्या प्रदीर्घ मासिक पाळी चक्राच्या कालावधीची प्रतीक्षा करावी कारण तुमची पाळी नेमकी कधी येणार आहे याची तुम्हाला खात्री नसते.

त्याचप्रमाणे, जर तुम्ही अलीकडे गोळी घेणे थांबवले असेल तर तुम्हाला तुमच्या नियमित मासिक पाळी चक्राबद्दल खात्री नसेल. अशावेळी, तुमच्या पहिल्या चाचणीचा निकाल नकारात्मक असल्यास, आणखी तीन दिवस प्रतीक्षा करा आणि पुन्हा चाचणी घ्या.

घरगुती गर्भधारणेच्या चाचण्या किती अचूक आहेत?

जर चाचणीच्या किट वर दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत केल्यास, घरी करता येणाऱ्या गर्भधारणेच्या चाचणीचा निकाल हा ९९. ९९ टक्के अचूक असतो. परंतु कधीकधी कमी एचसीजी पातळी, चाचणीची संवेदनशीलता किंवा अंड्याचे रोपण केल्यापासून गेलेले दिवस वेगवेगळे परिणाम देऊ शकतात.

काही प्रकरणांमध्ये, घरगुती गर्भधारणा चाचणी खोटी आणि नकारात्मक असू शकते. कदाचित तुम्ही गरोदर नसल्यामुळे किंवा तुमची एचसीजी पातळी इतकी कमी असू शकते की ती अजून शोधली जाऊ शकत नाही. त्यामुळे असे परिणाम येऊ शकतात. तुम्ही खूप लवकर चाचणी घेतल्यास, तुमच्या सिस्टममध्ये पुरेसे एचसीजी तयार नसल्यामुळे तुम्हाला खोटे नकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्ही आणखी तीन दिवस थांबावे आणि तुम्हाला गर्भधारणेची इतर चिन्हे दिसल्यास पुन्हा चाचणी घ्यावी.

घरगुती गर्भधारणा चाचणी चुकीची सकारात्मक दर्शविण्याची शक्यता फारच कमी आहे. तुम्ही गरोदर नसतानाही तुम्हाला खोटे-सकारात्मक परिणाम मिळतात. हे एचसीजी असलेल्या औषधांच्या सेवनामुळे असू शकते जे परिणामांवर परिणाम करू शकते

गरोदर चाचणीसाठी घरगुती उपचार

तुमची मासिक पाळी चुकल्यास किंवा मासिक पाळीस विलंब झाल्यास तुम्हाला चिंता वाटू शकते. आणि तुम्हाला लवकरात लवकर गर्भधारणा चाचणी करावीशी वाटू शकेल. जर तुम्हाला लवकर चाचणी घ्यायची असेल आणि चाचणी किट खरेदी करण्यासाठी तुम्ही बाजारात जाऊ शकत नसाल, तर तुम्ही घरगुती गर्भधारणा चाचणीद्वारे सहजपणे गर्भधारणा तपासू शकता.

तुमच्या गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी महागड्या वैद्यकीय चाचणीवर पैसे खर्च करण्याऐवजी, तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध घटक वापरून तुम्ही गर्भधारणा चाचणी करू शकता. यामुळे तुमची गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे घरी तपासणे अगदी सोपे आणि स्वस्तात होते.

टूथपेस्ट, व्हिनेगर, बेकिंग सोडा इत्यादी नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने तुम्ही गर्भवती आहात की नाही हे तपासण्यात मदत करू शकते. पण, घरगुती गर्भधारणेच्या चाचण्या अचूक आहेत का? या घरगुती चाचण्यांच्या निकालांच्या अचूकतेची खात्री देणारे कोणतेही वैज्ञानिक संशोधन नाही. ते तुमच्या लघवीतील एचसीजी पातळी देखील तपासतात परंतु घरी या चाचण्या करण्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

आपण गर्भवती असल्याची शंका असल्यास गर्भधारणा चाचणी करा. जर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला, तर स्त्रीरोगतज्ञांच्या भेटीची वेळ निश्चित करा.

आणखी वाचा:

लघवीची गर्भधारणा चाचणी – घरी आणि दवाखान्यात १५ सोप्या आणि विश्वसनीय घरगुती गर्भधारणा चाचण्या

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved