गर्भारपण

गरोदरपणातील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

जर तुम्ही गर्भवती असाल तर पोषक अन्न खाण्यासोबतच तुम्हाला पुरेसे पाणी देखील प्यावे लागेल. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला गरोदरपणात हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला असेलच. अर्थातच डिहायड्रेशन झाले आहे किंवा नाही हे शोधणे कठिण असू शकते परंतु यामुळे गरोदरपणात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. होय, हे कोणालाही त्रासदायक ठरू शकते, परंतु गर्भवती महिलांसाठी ते जास्त त्रासदायक असते. गरोदरपणात निर्जलीकरणाची (डिहायड्रेशनची) बहुतेक प्रकरणे सौम्य असतात, परंतु गंभीर घटनेमुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

निर्जलीकरण (डिहायड्रेशन) म्हणजे काय?

जेव्हा आपल्या शरीरात जितके पाणी प्यायले जाते त्यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी कमी होते तेव्हा निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन होते. म्हणून जर तुम्ही पीत असलेल्या पाण्याने ऱ्हास झालेल्या पाण्याची पातळी भरून निघत नसेल तर तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता. डिहायड्रेशनमुळे उष्माघात, थकवा आणि स्ट्रोक यासारख्या इतर समस्या उद्भवू शकतात. शरीराचे नेहमीचे सामान्य कार्य सुरु राहण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागू शकतो. गरोदरपणात तुम्हाला जास्त पाण्याची गरज असते कारण तुमचे शरीर बाळासाठी रक्त आणि द्रव तयार करीत असते, म्हणूनच हायड्रेटेड रहाणे आवश्यक आहे.

गरोदरपणात निर्जलीकरणाची कारणे

गरोदरपणात निर्जलीकरण होण्याची अनेक कारणे आहेत. या कारणांमुळे गरोदरपणामध्ये निर्जलीकरणावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण आपण ती परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करू शकतो.

गर्भवती महिलांमध्ये डिहायड्रेशनची चिन्हे आणि लक्षणे

सामान्यत: डिहायड्रेशनचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे तहान लागणे. मात्र शरीर जास्त गरम होणे हे सुद्धा डिहायड्रेशनच्या प्रमुख लक्षणांपैकी एक असू शकते; तुम्ही पुरेसे पाणी न प्यायल्यास तुमच्या शरीरास उष्णतेचे नियमन करणे अवघड होते आणि शरीर जास्त गरम राहण्याची प्रवृत्ती तयार होते. परंतु डिहायड्रेशनची इतरही अनेक लक्षणे आहेत ज्यांच्यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. डिहायड्रेशनची लक्षणे सौम्य ते मध्यम ते तीव्र स्वरूपाची असू शकतात. चला तर मग त्या लक्षणांवर एक नजर टाकूया.

सौम्य निर्जलीकरण

मध्यम डिहायड्रेशन

तीव्र निर्जलीकरण

गरोदरपणात यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा तुम्हाला डिहायड्रेट झाल्यासारखे वाटत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या कारण दीर्घकाळापर्यंत डिहायड्रेशन आपल्या बाळासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

धोके

गर्भधारणेदरम्यान डिहायड्रेशनशी संबंधित धोके खालीलप्रमाणे आहेत.

गर्भधारणेदरम्यान डिहायड्रेशनशी संबंधित गुंतागुंत

निर्जलीकरण गर्भवती महिलेला ती गरोदरपणाच्या कुठल्या टप्प्यावर आहे यावर अवलंबून असते. गर्भधारणेच्या तीन तिमाह्यांमध्ये डिहायड्रेशनचे धोके खाली स्पष्ट केले आहेत.

पहिल्या तिमाहीत डिहायड्रेशनचे परिणाम

दुसर्‍या आणि तिसर्‍या तिमाहीत डिहायड्रेशनचे परिणाम

गरोदरपणातील निर्जलीकरणासाठी उपचार

जर तुम्हाला गरोदरपणात सौम्य ते मध्यम प्रमाणात डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर त्यास सामोरे जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जास्त पाणी पिणे. जर तुम्हाला डिहायड्रेशन मळमळ आणि उलट्या झाल्याने होत असतील तर, त्यासाठीच्या औषधोपचारांवर डॉक्टरांशी बोला. ते तुम्हाला जास्त पाणी पिण्यास सांगतील आणि मळमळ सुद्धा कमी करण्यास मदत करतील. तुम्ही इलेक्ट्रोलाइट सप्लीमेंट पिऊ शकता का ह्याबाबत तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा कारण ते तुमच्या शरीरात संतुलन साधू शकतात. तथापि, तीव्र डिहायड्रेशन असेल तर तुम्हाला आपत्कालीन कक्षात जावे लागेल आणि डिहायड्रेशनसाठी आय. व्ही. द्वारे द्रवपदार्थ घ्यावे लागतील.

गर्भवती स्त्रीने किती पाणी प्यावे?

गरोदरपणात तुम्ही किती पाणी प्यावे हे ठरविण्यासाठी तुम्ही तुमच्या लघवीचा रंग तपासला पाहिजे. लघवीचा एकतर पांढरा किंवा हलका पिवळा असावा. गरोदरपणात, जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा नारिंगी असेल तर तुम्हाला दिवसभरात जास्त पाणी प्यायले पाहिजे. जर तुम्ही हलक्याफुलक्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असाल तर क्रियाकलापातील प्रत्येक तासासाठी एक कप पाणी पिणे चांगले असते. तुम्ही नियमितपणे व्यायाम केल्यास, पाण्याचा झालेला ऱ्हास भरून काढण्यासाठी तुम्ही जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. बर्‍याच स्त्रियांना तहान लागली असल्याचे समजत नाही. जरतुम्ही पाणी पिण्यास विसरत असाल आणि बर्‍याचदा तुम्हाला तहान लागत नसेल तर तुम्ही पाण्याचे सेवन किती आणि केव्हा केले आहे हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक जर्नल ठेवणे आवश्यक आहे. हे अ‍ॅपद्वारे देखील केले जाऊ शकते, कारण ऍपमुळे तुम्हाला केव्हा आणि किती पाणी प्यावे ह्याबाबतचे रिमाइंडर येतील. जेवणाच्या आधी आणि नंतर एक ग्लास पाणी घ्या. ह्यामुळे तुम्हाला पाणी पिण्याची आठवण केली जाईल तसेच बद्धकोष्ठतेशी संबंधित कोणत्याही समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल.

गर्भधारणेदरम्यान डिहायड्रेशन कसे टाळता येईल?

असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे आपण हे सुनिश्चित करू शकता की आपण गर्भधारणेदरम्यान हायड्रेटेड रहाल

तुम्ही डॉक्टरांना कधी फोन केला पाहिजे ?

डिहायड्रेशनमुळे चिंताजनक लक्षणे उद्भवू शकतात. जर तुमची नाडी कमकुवत असेल किंवा अशक्तपणा असेल तर आपत्कालीन कक्षात त्वरित धाव घ्यावी. याशिवाय शौचातून रक्त पडत असेल किंवा हृदयाचे ठोके वेगाने पडत असतील तरी देखील डॉक्टरांची तातडीने भेट घेतली पाहिजे. जर तुम्ही आठ तासांपेक्षा जास्त वेळ लघवी केली नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

गरोदरपणातील निर्जलीकरणाबाबत नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे इथे वाचा.

. डिहायड्रेशनमुळे बाळाचा अकाली जन्म कसा होऊ शकतो?

डिहायड्रेशनमुळे रक्ताचे प्रमाण कमी होत असल्याने ऑक्सिटोसिन या संप्रेरकाची पातळी वाढते. इतर गोष्टींबरोबरच हा संप्रेरक गर्भाशयाच्या भिंतींच्या आकुंचनासाठी जबाबदार असतो. जर गरोदरपणात नंतरच्या काही महिन्यांत डिहायड्रेशन झाले तर ह्या आकुंचनामुळे तुमची अकाली प्रसूती होण्याची शक्यता असू शकते.

. डिहायड्रेशनमुळे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात पेटके येण्याचा त्रास होतो का?

डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीराचे तापमान वाढेल. जेव्हा हे होते, तेव्हा तुमच्या स्नायूंमध्ये पेटके येण्यास सुरुवात होते. तुमच्या गरोदरपणात कोणत्याही अवस्थेत निर्जलीकरण होऊ शकते. नियमितपणे पुरेसे पाणी पिऊन आणि ताजे फळे खाऊन तुम्ही हायड्रेटेड रहाणे अत्यावश्यक आहे निर्जलीकरण ही अशी स्थिती आहे जी आपल्या नकळत आपल्यावर पकड घेते. म्हणून, तुम्ही किती पाणी प्यायले आहे तसेच तुमच्या लघवीच्या रंगाचा मागोवा ठेवा. तुम्हाला दररोज सांगितलेल्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी अ‍ॅप्स किंवा रिमाइंडर्स वापरा. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त तुमच्या स्वत: साठीच नव्हे तर तुमच्या पोटात वाढणार्‍या बाळासाठी सुद्धा पाणी पीत आहात. त्यामुळे सजलीत रहा आणि ह्या काळात तुम्हाला काहीही समस्या येत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. आणखी वाचा:  गरोदरपणातील पोटदुखी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved