आहार आणि पोषण

गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम

जेव्हा एखाद्या स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते तेव्हा तिच्या खाण्याच्या सवयी चांगल्या प्रकारे बदलतात. आणि अर्थातच, हे आवश्यक आहे, कारण गरोदरपणात निरोगी आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही गर्भवती असाल तर बाळाच्या निरोगी वाढीसाठी तुमच्या शरीरात अतिरिक्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वे आवश्यक असतील. आणि तुमच्या शरीरात तुमच्या बाळाचे पालनपोषण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पोषणद्रव्ये मिळण्यासाठी संतुलित आहार घेणे हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता असे काही पोषक स्नॅक्स म्हणजे सुकामेवा आणि नट्स. कारण ते आई आणि बाळाला विविध फायदे पुरवतात. परंतु त्यांना आपल्या आहाराचा एक भाग बनविणे पूर्णपणे सुरक्षित आहे का ? पाहुयात!

गरोदरपणात सुकामेवा आणि नट्स खाणे सुरक्षित आहे का?

सुकामेवा आणि नट्स हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अमीनो ऍसिड्सचे भांडार आहेत, म्हणून त्यांना गर्भवती महिलेच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. सुक्या मेव्यामध्ये बी १-बी ९, सी, के, , आणि एच सारखी निर्णायक जीवनसत्त्वे असतात. भूक लागल्यास गर्भवती असताना सुकामेवा खाणे उपयुक्त ठरू शकते. गरोदरपणात सुकामेवा खाणे सुरक्षित असते परंतु इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, गरोदरपणात त्यांचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण जास्त प्रमाणात घेतल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तुम्ही गरोदरपणात सुकामेवा मध्यम प्रमाणात खाऊ शकता.

गरोदर असताना सुकामेवा आणि नट्स खाण्याचे फायदे

सुकामेवा आणि नट्स कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त आणि सेलेनियम इत्यादी घटकांनी समृद्ध असतात. ते अँटीऑक्सिडेंटचा एक चांगला स्त्रोत देखील आहेत आणि गर्भवती महिलांसाठी एक उत्तम स्नॅक म्हणून भूक शांत करण्यास देखील चांगले आहेत.

सुकामेवा आणि नट्स खाण्याचे दुष्परिणाम आणि जोखीम आहे काय?

मध्यम प्रमाणात सेवन केल्यास, गरोदरपणात सुकामेवा आणि नट्स पूर्णपणे सुरक्षित असतात. तथापि, जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर आरोग्याच्या विविध समस्या येऊ शकतात.

सावधगिरी

जरी सुकामेवा आरोग्यासाठी चांगला असला तरी त्याचे सेवन करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

एका दिवसात तुम्ही किती सुकामेवा आणि नट्स खाल्ले पाहिजे?

सुक्यामेव्यामध्ये ताज्या फळांपेक्षा बर्‍याच कॅलरी असतात. काही नट्समध्ये देखील कॅलरी जास्त असतात. म्हणून, तुम्ही विशेषतः गरोदरपणात काय खावे हे पाहणे आवश्यक आहे. ह्या काळात तुम्ही एका दिवसात १०० ग्रॅमपेक्षा जास्त सुकामेवा आणि नट्स खाऊ नये. उदाहरणार्थ, तुम्ही बदामाचे चार ते सात तुकडे, अक्रोडचे चार, दोन खजूर आणि एका वेळी सुमारे आठ पिस्ता खाऊ शकता.

गरोदरपणात सुका मेवा आणि नट्स खाण्याचे शिफारस केलेले प्रमाण

गर्भवती महिलांना जवळजवळ सर्व सुकामेवा आणि बियांची शिफारस केली जाते. तुम्ही गर्भवती असल्यास, तुमच्या आयुष्यातील ह्या खास काळात तुम्ही नियमितपणे आपल्या आहारामध्ये खालील गोष्टींचा समावेश केला असल्याची खात्री करा.
सुकामेवा आणि नट्स पोषणमूल्ये कॅलरीज कशी मदत होते
बदाम कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रथिने, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन ई ५२९
  • रक्तदाब नियमित करते
  • बाळाचे दात आणि हाडे विकसित करण्यात मदत करते
  • बाळामध्ये जन्माचे वजन कमी करण्यास प्रतिबंध करते आणि मेंदूच्या विकासास चालना देते
वाळलेल्या जर्दाळू फायबर, व्हिटॅमिन ए, कॉपर, व्हिटॅमिन ई ३८१
  • बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
  • स्नायू आणि अवयव कार्य सुधारते
  • प्री-एक्लेम्पसियाचा धोका कमी करते
मनुका लोह आणि फायबर ४८८
  • बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते
अक्रोड ओमेगा-3 फॅट्स ७२०
  • बाळाच्या मेंदूत आणि दृष्टीच्या विकासास मदत
होते
काजू फॉस्फोरस ६४०
  • सामान्य हृदय गती सुनिश्चित करते
वाळलेले सफरचंद फायबर, पोटॅशियम २०८
  • आतड्यांसंबंधी कार्य सुधारते
  • स्नायू कार्य सुधारते
  • रक्तदाब नियंत्रित करते
पिस्ता कॉपर ३३०
  • अवयव आणि स्नायूंच्या सुरळीत कामकाजाची हमी देते
खजूर तंतुमय पदार्थ ५०२
  • पचन प्रोत्साहित करते आणि वजन नियंत्रित राखते
सुके अंजीर तंतुमय पदार्थ ३७१
  • बद्धकोष्ठता आणि हृदयरोगाशी सामना करण्यास मदत करते
शेंगदाणे प्रथिने ८२८
  • निरोगी जन्म वजन

सुकामेवा आणि नट्स खातानाच्या टिप्स

गरोदरपणात सुकामेवा आणि नट्स सेवन करण्याविषयी बरेच गैरसमज आहेत. काजू, बदाम, जर्दाळू, मनुका, खजूर, अक्रोड आणि पिस्ता हा सुकामेवा गर्भवती महिलांसाठी चांगला आहे. सुकामेवा पौष्टिक असल्याने तुम्ही दररोज आपल्या आहारात त्यांचा शिफारस केलेल्या प्रमाणात समावेश करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. आपण हे करण्याचे काही मार्ग येथे आहेतः
गरोदरपणाच्या काळात तुम्ही पोषक अन्न खाल्ले पाहिजे आणि तसेच आपल्या मुलाच्या आणि स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. खाण्याच्या निवडी करताना गोंधळून न जाणे महत्वाचे आहे. तुम्हाला तुमचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांकडून बरेच सल्ले मिळतील आणि काय खावे आणि काय खाऊ नये यासंबंधीची भरपूर माहिती तुम्हाला गोंधळात टाकू शकेल. पण काळजी करू नका. तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी काय चांगले आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणखी वाचा: गरोदरपणात तीळ खाणे सुरक्षित आहे का? गरोदर असताना नारळपाणी पिणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved