गर्भारपण

गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार

जेव्हा गरोदरपणात सर्दी होते तेव्हा परिस्थितीला समजून घेणे नेहमीच चांगले असते. आपल्याला सर्दी का होते आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो इथपासून ते त्यासाठी सर्वोत्तम उपाय आणि ते टाळण्यासाठी काय करावे हे माहिती असणे जरुरी आहे.

सर्दी आणि खोकल्याची कारणे

होणाऱ्या आईच्या रोगप्रतिकारक यंत्रणेमध्ये होणारे बदल तिला सर्दी आणि फ्लू होण्यासाठी कारणीभूत असतात. सर्दी बर्‍याच प्रकारच्या विषाणूंमुळे उद्भवते, सर्वात सामान्य विषाणू म्हणजे ऱ्हिनोव्हायरस. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर सर्दी पसरते आणि विषाणू नाक, डोळे आणि तोंडातून प्रवेश करतात. श्वसनमार्गामध्ये विषाणू किंवा जिवाणूंच्या संसर्गामुळे खोकला होतो, जो सर्दीमुळे होऊ शकतो. हवेतील प्रदूषकांमुळे खोकला वाढू देखील शकतो. असे होणे संपूर्ण भारतातील बर्‍याच शहरांमध्ये सामान्य आहे. जुनाट खोकला, सर्दीनंतरही चालू राहतो. विषाणू तुमच्या प्रणालीमधून बाहेर पडल्यानंतरसुद्धा, तुमचा श्वसनमार्ग अद्याप सूजलेला, नाजूक राहू शकतो. आपण योग्यरित्या हायड्रेटेड नसल्यास खोकला देखील राहू शकतो, ज्यामुळे श्लेष्माची निर्मिती वाढते.

सर्दीची लक्षणे

इथे काही सामान्यतः आढळणारी सर्दीची लक्षणे दिलेली आहेत

खोकला आणि सर्दी आपल्या बाळाला हानी पोहोचवू शकते का?

थोडक्यात, सामान्य सर्दी किंवा इन्फ्लूएंझा आणि त्याच्याशी संबंधित लक्षणांमुळे बाळावर प्रतिकूल परिणाम होत नाही. गर्भवती आईला कदाचित शारीरिक ताणामुळे जास्त थकवा वाटेल. बाळ गर्भजलाने वेढलेले असल्याने खोकल्याचा बाळावर परिणाम होत नाही. तथापि, खोकला तीव्र किंवा हिंसक होण्यापूर्वी त्यावर उपचार करणे व्यावहारिक आहे. लक्षात ठेवा की खोकला आणि सर्दी होणाऱ्या आईला कमकुवत करते आणि तिच्या पोषणावर देखील परिणाम करते, ज्याचा दीर्घकाळापर्यंत बाळाच्या विकासावर हानिकारक परिणाम होतो. म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे आणि लक्षणे जास्त काळ कशी टिकून राहणार नाहीत ह्यावर लक्ष दिले पाहिजे.

साधी सर्दी किंवा फ्लू आहे हे कसे ठरवायचे?

आपण आपल्या सर्दीचे फ्लू असे किंवा फ्लूचे सर्दी असे निदान केले नाही याची खात्री करा. फ्लू ही सर्दीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे आणि त्यासाठी अधिक लक्ष आणि काळजी घ्यावी लागते. या दोघांमधील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फ्लूमध्ये तीव्र ताप, सर्दी, डोकेदुखी आणि घसा खवखवणे समाविष्ट आहे जे दुसर्‍या दिवसापासून किंवा तिसर्‍या दिवसापर्यंत आणखी वाढते. जेव्हा आपल्याला फ्लू होतो तेव्हा स्नायूंमध्ये देखील वेदना जाणवतील आणि शारीरिक दुर्बलता देखील जाणवेल. फ्लू सर्दीपेक्षा जास्त काळ टिकतो. अगदी तीव्र सर्दीत देखील फ्लूसारखी तीव्र लक्षणे दिसत नाहीत म्हणूनच त्या दोघांमध्ये फरक करणे खूप सोपे आहे. सर्दी असल्यास तुम्ही कार्यरत राहू शकता आणि खवखवणारा घसा दुसऱ्या दिवशीपर्यंत कमी होतो. वाहणारे नाक आणि खोकला ही सर्दीची दोन मुख्य लक्षणे आहेत.

सर्दी आणि खोकल्यासाठी सुरक्षित औषधे

गरोदरपणात खोकल्यासाठी औषधोपचार शोधताना, हुशारीने आणि काळजीपूर्वक निवडा. आपण दुकानातून औषधे घ्यायला जाण्यापूर्वी तुम्ही घरगुती उपाय करून करून बघू शकता. कधीकधी, गरम पाण्याने शॉवर घेणे, आल्याचा चहा आणि चिकन सूप पुरेसे नसते. एक किंवा दोन गोळ्या बरे होण्याच्या प्रक्रियेस वेगवान करतात. औषधे घेताना ती आपल्या डॉक्टरांना विचारून घ्या. आणि खालील काही गोष्टी लक्षात ठेवा.
औषधे कशी निवडायची ते जाणून घ्या. जेव्हा तुम्ही गरोदरपणात सर्दी आणि खोकल्यासाठी औषधे निवडता तेव्हा त्यातील घटकांचा अभ्यास करा आणि कमीतकमी घटक असलेले उत्पादन निवडा. एक कंपाऊंड किंवा केमिकल तुमच्या सर्दी खोकल्याच्या लक्षणांवर लढा देते, अनेकांचा कॉम्बो नव्हे. येथे एक मूलभूत सुरक्षित यादी आहे.

तुम्ही टाळली पाहिजेत अशी औषधे

अशी काही औषधे आहेत जी तुम्हाला सर्दी झाल्यावर तुम्ही टाळली पाहिजे कारण त्यांचे दुष्परिणाम गर्भवती महिला किंवा मुलांसाठी हानिकारक आहेत. तथापि, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.

घरगुती उपचार

जर तुम्हाला गरोदरपणात सर्दी किंवा फ्लू झाला तर काळजी करण्याचे काही कारण नाही. खरं तर, खोकला आणि सर्दीसाठी बरेच नैसर्गिक उपाय आहेत जे सहजपणे केले जाऊ शकतात.

प्रतिबंध

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि सर्दीचा संसर्ग रोखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. सर्दी होऊ नये म्हणून स्वच्छता राखणे ही आणखी एक महत्वाची बाब आहे. तसेच,तीव्र हवामान असलेल्या ठिकाणी जाऊ नका त्यामुळे शरीरावर ताण येऊन शरीराची प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जेव्हा थंडीची लक्षणे काही दिवसांनंतर जात नाहीत किंवा वाढतात तेव्हा आपल्याला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. तीव्र खोकला येत असेल तरीसुद्धा डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. लक्षणे गंभीर असताना स्वतःचे स्वतः औषधोपचार करू नका. डॉक्टर, गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असलेली औषधे लिहून देतील. गरोदरपणात खोकल्यासाठी स्वतः सिरपची निवड करू नका. तुमच्यासाठी सुरक्षित असलेले औषध डॉक्टरांकडून लिहून घ्या. गरोदरपणामुळे उद्भवलेल्या अनेक आव्हानांपैकी एक म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होणे. खोकला आणि सर्दीसारखे विकार होणाऱ्या आईसाठी त्रासदायक होऊ शकतात. प्रतिबंधात्मक उपाय केल्यास आणि गर्भवती महिलांसाठी सुरक्षित औषधे घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते. आणखी वाचा: गरोदरपणात होणारा ‘मॉर्निंग सिकनेस’ गरोदरपणात उन्हात बसणे सुरक्षित आहे का?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved