गर्भारपण

गरोदरपणात घरातील कुठली कामे करावीत आणि कुठली टाळावीत?

गरोदरपणात स्त्रियांचे वजन बर्‍याच प्रमाणात वाढते आणि त्यामुळे त्यांना शरीर संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात कारण वजन एकाच ठिकाणी जास्त असते आणि ते म्हणजे पोट. त्यामुळे गर्भवती महिलांना वेगाने हालचाल करणे कठीण होऊ शकते. तसेच त्यामुळे थकव्याची भावना निर्माण होते आणि मग नेहमीची घरातील कामे करावीत का असा प्रश्न पडू शकतो. गरोदरपणात बर्‍याच घरगुती कामांमध्ये भाग घेणं सुरक्षित असलं तरी काही कामे टाळली जावीत किंवा इतरांना दिली जावीत. आपण कोणते काम केले पाहिजे आणि कोणते काम करू नये तसेच गरोदरपणात बैठ्या जीवनशैलीमुळे येणारी जोखीम तसेच कठोर कामे केल्यास त्यासंबंधीची जोखीम ह्या बाबतची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात घरगुती कामे करणे सुरक्षित आहे का?

उत्तर सोपे आहे - तणावमुक्त गर्भधारणा होण्यासाठी कामामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. हे सामान्यपणे समजले जाते की कठोर काम करणे धोकादायक असले तरी काहीच काम न करणे तेवढेच आरोग्यहीन आहे. बैठी जीवनशैली देखील गरोदरपणात प्रतिकूल परिणाम देऊ शकते. म्हणूनच, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की घरातील बहुतेक कामांमध्ये भाग घेणे सुरक्षित आहे.

गर्भवती असताना आपण करू शकता अशी घरगुती कामे

काही मूलभूत कामे सहजतेने केली जाऊ शकतात, तर काही कामे वेगळ्या पद्धतीने करण्याचा सराव असावा लागतो.

गरोदरपणात टाळावीत अशी घरगुती कामे

जवळजवळ सर्व घरगुती कामे गरोदरपणात पहिल्या काही महिन्यांमध्ये करता येतील. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात घरगुती कामे करणे सुरक्षित असल्यास, काही घरगुती कामे ह्या काळात टाळली पाहिजेत कारण शरीरावर अनावश्यक ताण येऊ शकतो आणि बाळाला संभाव्य धोका पोहोचण्याची शक्यता असते. रोजची तीच आणि नीरस कामे केल्याने स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात जे गर्भवती महिलांसाठी चांगले नाही. गरोदरपणात घरातील कामे करणे सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. गरोदरपणात घरगुती कामे करणे सुरक्षित असले तरी काही घरगुती कामे गर्भवती महिलांसाठी धोकादायक असतात. टाळावयाची कामे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या शरीराचे ऐकणे देखील महत्वाचे आहे. तुम्हाला थकवा येईल अशी कामे करणे टाळा. कामासोबत तुम्हाला चांगली विश्रांतीसुद्धा मिळेल असे वेळापत्रक तयार करा. संदर्भ आणि स्रोत: स्रोत १ आणखी वाचा: गरोदरपणात होणारा ‘मॉर्निंग सिकनेस’ गरोदरपणातील पोटदुखी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved