गर्भारपण

गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार

गॅस्ट्रोफेजियल रिफ्लक्स डिसीज (जीईआरडी) ह्या समस्येला अपचन किंवा ऍसिड रिफ्लक्स म्हणून देखील संबोधले जाते. ही एक अतिशय सामान्य आणि पुनःपुन्हा उद्भवणारी स्थिती आहे. ह्यामध्ये प्रामुख्याने लोअर ओसोफॅगियल स्फिंटर किंवा एलईएस नावाच्या स्नायूवर परिणाम होतो. हा स्नायू पोटाच्या जवळ, अन्ननलिकेच्या खालच्या भागात आढळतो. गरोदरपणात ही स्थिती अत्यंत सामान्य आहे. जरी ह्यामुळे काही धोका नसला तरी सुद्धा त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते.

गर्भवती असताना छातीत जळजळ होते तेव्हा कसे वाटते?

छातीत जळजळ होणे ही समस्या संपूर्ण गरोदरपणात कधीही उद्भवू शकते. हा आजार बर्‍याच स्त्रियांना संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत त्रास देत असतो. तिसर्‍या तिमाहीत छातीत जळजळ आणि अपचन अधिक सामान्य होते कारण वाढत्या गर्भाशयामुळे आतडे आणि पोटावर दबाव येतो. पोटावर दबाव आल्याने अन्न पुन्हा अन्ननलिकेत परत येऊ शकते. अपेक्षेपेक्षा जास्त वजन वाढल्यास गर्भधारणेनंतर एक वर्षापर्यंत याचा अनुभव घेऊ शकता. गरोदरपणात जळजळ होण्याची लक्षणे खालीलप्रमाणे: टीपः गरोदरपणात छातीत जळजळ होण्यामुळे तुमच्या मुलाला इजा होणार नाही किंवा तुमच्या प्रसूतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

गरोदरपणात डिस्पेप्सियाची कारणे

आपल्या शरीरात एक झडप असते ज्यामुळे आपण नुकतेच खाल्लेले अन्न आणि पचनासाठी जबाबदार असणारे आम्ल राखण्यात मदत करते. जेव्हा ह्या झडपेची समस्या निर्माण होते तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे छातीत जळजळ होते. आपल्या छातीत जळजळ होण्याची अनेक कारणे आहेत. गरोदरपणात याचा आपल्यावर परिणाम होण्याची काही मुख्य कारणे आहेतः
छातीत जळजळ अत्यंत दीर्घ कालावधीसाठी होत राहिल्यास आपल्या डॉक्टरांशी बोला. हे प्री-एक्लेम्पसियाचे लक्षण असू शकते. ही स्थिती उच्च रक्तदाब आणि लघवीतील प्रथिनांद्वारे दर्शविले जाते. आई आणि बाळ दोघांसाठीही हे खूप धोकादायक असू शकते.

गरोदरपणात छातीत जळजळ झाल्यामुळे काही गुंतागुंत निर्माण होते का?

ह्या स्थितीमुळे अन्ननलिकेस तात्पुरती सूज येऊ शकते ज्यामुळे ओईसोफॅगिटिस नावाची स्थिती उद्भवू शकते. आधी सांगितल्याप्रमाणे ऍसिड रिफ्लक्स हे प्री-एक्लेम्पसिया नावाच्या उशीरा गर्भधारणेच्या आजाराचे लक्षण असू शकते.

गर्भवती असताना ऍसिडिटीवर उपचार

छातीत जळजळ होण्याची प्रक्रिया अनेक तंत्रे आणि औषधे वापरून केली जाऊ शकते. या स्थितीचा उपचार करण्याचे काही मार्ग येथे आहेतः आपल्या बाळाला इजा होऊ शकेल कोणत्याही प्रकारचे उपचार करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्या.

गरोदरपणात छातीत जळजळ होण्याचे घरगुती उपचार

जरी छातीत जळजळ होण्यावर औषधोपचार केले जाऊ शकतात, तरीसुद्धा घरीच विविध तंत्राचा वापर करून त्याचे व्यवस्थापन आणि उपचार देखील केले जाऊ शकतात. गरोदरपणात छातीत जळजळ होण्याचे काही लोकप्रिय नैसर्गिक उपाय येथे आहेतः
छातीत जळजळ होण्यावर इतर घरगुती उपचारांबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला, त्यांच्याबरोबर उपचारांच्या पर्यायांवर चर्चा करा आणि डॉक्टरी सल्ल्याशिवाय गर्भवती असताना कधीही उपचार सुरु करु नका

प्रतिबंध

छातीत जळजळ होणे धोकादायक नाही आणि त्यावर उपचार आहेत आणि ही समस्या व्यवस्थापित करता येते. पण तरीही ही समस्या होऊ नये म्हणून काळजी घेता येते. गरोदरपणात ऍसिडिटी कशी टाळता येईल ह्याविषयी महत्वाच्या टिप्स खाली देत आहोत. छातीत होणारी जळजळ आणि त्याविषयी जाणून घेतल्याने ती नियंत्रित करणे, प्रतिबंधित करणे आणि त्यावर उपचार करणे सोपे जाते. तुमच्या पतीशी, काळजी घेणाऱ्या व्यक्तींशी आणि डॉक्टरांशी, असलेल्या स्थितीबद्दल बोलणे लक्षात ठेवा. ही स्थिती हानिकारक नाही आणि प्रतिबंधात्मक आहे. तुमच्यासाठी योग्य उपाय सापडेपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धती, उपाय करून पहा. गरोदरपणात छातीत जळजळ होण्याविषयी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते धोकादायक नाही आणि बाळाच्या जन्माच्या वेळी आणि बाळाच्या आरोग्यास त्याचा कुठलाही त्रास नाही. आणखी वाचा: गरोदरपणात होणारी सर्दी: कारणे, लक्षणे आणि उपचार गरोदरपणात योनीमार्गातून होणारा स्त्राव
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved