आहार आणि पोषण

गरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे?

स्त्री तिच्या गर्भारपणात जे काही खाते त्याचा परिणाम बाळावर होतो. म्हणूनच आईने काय खावे किंवा काय खाऊ नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. बरेच निरुपद्रवी वाटणारे अन्नपदार्थ वाढणाऱ्या बाळासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अश्या बऱ्याच पदार्थांपैकी एक म्हणजे पपई.

गरोदरपणात पपई खाणे

पपईच्या सेवनाबद्दल गर्भवती महिलांमध्ये संभ्रम आहे.पिकलेली पपई, सावधगिरीने खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते, परंतु कच्च्या पपईमुळे गरोदरपणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात

. लवकर गर्भधारणा

गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यात किंवा टप्प्यात, गर्भ नाजूक असतो आणि त्याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. लॅटेक्ससारख्या अगदी कमी प्रमाणात असलेल्या हानिकारक पदार्थांमुळे देखील बरेच नुकसान होऊ शकते. कच्च्या पपईमध्ये लॅटेक्स असते, त्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होते. पपईच्या बाबतीत फळांच्या लॅटेक्स मध्ये पपाइनअसते. हे पपाइनप्रोस्टाग्लॅन्डिन्स (शरीराचे स्वतःचे पदार्थ) आणि ऑक्सिटोसिन (मेंदूच्या पिट्यूटरी ग्रंथीद्वारे तयार केलेले संप्रेरक ) सारखे कार्य करते, ज्यामुळे गर्भाशयाचे संकुचन होते. गरोदरपणात गर्भाशयाचे असे असामान्य किंवा अप्राकृतिक आकुंचन झाल्यामुळे गर्भपात किंवा बाळाचा अकाली जन्म होऊ शकतो. पपाइन गर्भाच्या महत्त्वपूर्ण आवरणाला देखील कमकुवत करते, त्याचे अस्तित्व अवघड बनविते. म्हणूनच, पहिल्या तिमाहीत, कच्ची पपई खाणे पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे

. तिसरी तिमाही

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत किंवा शेवटच्या तीन महिन्यांत, पपई मध्ये असलेल्या 'पॅपेन' ह्या एन्झाईममुळे गर्भाशयाचे आकुंचन लवकर सुरु होऊ शकते. त्यामुळे समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून बऱ्याच स्त्रिया गरोदरपणात पपईचे सेवन करण्यापासून दूर राहतात. सर्वेक्षणाद्वारे असेही दिसून येते की गरोदरपणात कच्ची पपई खाल्ल्याने नाळेजवळ रक्तस्त्राव सुद्धा होतो.

गरोदरपणात पपई (पिकलेली) खाण्याचे फायदे

पूर्णतः पिकलेली पपई सहसा गरोदरपणात सुरक्षित आणि फायद्याची मानली जाते.

गरोदरपणात पपई खाण्याचे नकारात्मक प्रभाव

गरोदरपणात पपई खाण्याचे इतर काही परिणामः

. गर्भाशयाच्या आकुंचन होण्यास कारणीभूतः

कच्च्या किंवा अर्थवट पिकलेल्या पपईमध्ये लॅटेक्स किंवा पेपेन असते, आणि ते प्रोस्टाग्लॅंडिन आणि ऑक्सिटोसिनला उत्तेजित करू शकते. संप्रेरकांमुळे गर्भाशय आकुंचन पावते आणि अकाली प्रसूती होऊ शकते. पपईमुळे गर्भपात होऊ शकतो, कारण पपई मधील घटक मासिक पाळी सुरु होण्यास उत्तेजन देतात. गर्भावस्थेच्या सुरुवातीस पपई खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. ह्या कालावधीत नाळ तयार होत असते आणि अगदी कमी प्रमाणात असलेले लॅटेक्स सुद्धा गर्भाशयाला हानी पोहोचवण्यास कारणीभूत ठरते.

. गर्भाच्या विकासास अडथळा:

पेपसीन आणि पॅपेन गर्भाचे अस्तित्व आणि विकासासाठी हानिकारक असू शकतात. अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की गरोदरपणात पपई खाल्ल्याने रोपण रोखले जाऊ शकते आणि जोखीम वाढू शकते आणि गर्भाला संभाव्य हानी पोहोचू शकते.

. कमजोर गर्भाच्या आवरणाला कमकुवत करते:

पॅपेन बहुतेक वेळा पेशींच्या विघटनसाठी वापरले जाते, कारण ते प्रोटीओलाइटिक सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य आहे. ते पेशींची वाढ रोखण्यासाठी आणि गर्भाच्या ऊतकांच्या विकासास अडथळा म्हणून ओळखले जाते.

. रक्तस्त्राव आणि सूज येऊ शकते:

कच्च्या पपई मुळे रक्तवाहिन्यांवरील दाब वाढवू शकतो आणि अगदी अंतर्गत रक्तस्राव किंवा नाळेत रक्तस्त्राव होऊ शकतो. नाळेतील रक्तस्त्रावामुळे गरोदरपणात आणि प्रसूतीशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते. पपईमुळे नाळेचा विकास आणि कार्यावर परिणाम होतो.

. आतड्यांसंबंधी हालचाल वाढवते:

पपईमुळे आतड्याची हालचाल वाढते. तथापि, आतड्यांची हालचाल जास्त झाल्यास गर्भाशयाच्या आजूबाजूला दबाव निर्माण करू शकते आणि गर्भपात होऊ शकतो. पपई तंतुमय पदार्थानी समृद्ध आहे. पोट आणि आतड्यांवरील दबाव ह्यामुळे शक्यतो गर्भपात होऊ शकतो.

. मज्जासंस्थेला प्रभावित करते:

पपईची पाने आणि बियामध्ये कार्पिन असते. हा विषारी पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेसाठी हानिकारक असतो.

. गर्भाच्या विकासास हानिकारक तसेच गर्भपात होण्यास कारणीभूत

पपई आणि किमोपापाइन हे पपईमध्ये असलेले दोन एंझाइम आहेत. हे दोन्ही एन्झाइम्स गर्भाच्या विकासास हानिकारक (टेराटोजेनिक) तसेच गर्भपात करणारी (अबोर्टीफिशिअंट) आहेत.

. गर्भपात / अकाली प्रसूतीच्या इतिहास असलेल्या स्त्रियांसाठी हानिकारक:

ज्या स्त्रियांची अकाली प्रसूती झाली आहे किंवा गर्भपात झाला आहे अशा स्त्रियांना पेपेनमुळे गरोदरपणात गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच, अशा स्त्रियांना गरोदरपणात पपई टाळण्याचा सल्ला दिला जातो.

. एस्ट्रोजेन उत्पादनास उत्तेजन देते:

पपईमधील पेपेन मासिक पाळी नियमित करण्यास देखील मदत करते. गरोदरपणात मासिक पाळी कधीही होत नाही. त्यामुळे योनीतून रक्तस्त्राव होणे हे गर्भपात किंवा एक्टोपिक गर्भधारणेचे संकेत आहे. पपई शरीराचे तापमान वाढवते आणि शरीरात इस्ट्रोजेन उत्पादन वाढवते.

१०. मुतखडा होण्यास कारणीभूत आणि ओटीपोटावर दाब वाढतो

पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि ते रोग प्रतिकारशक्तीसाठी चांगले आहे, परंतु त्यामुळे जास्त प्रमाणात मुतखडे होतात. व्हिटॅमिन सी मुळे शरीरात ऑक्सलेट तयार होते ज्यामुळे खडे तयार होण्यास प्रोत्साहन मिळते. खड्यांमुळे वेदना होऊ शकतात आणि यामुळे अंतर्गर्भाशयातील दबाव वाढतो, ज्याचा परिणाम गर्भावस्थेवर होतो.

११. रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो:

जर गर्भवती महिलेस गरोदरपणात मधुमेहाचा इतिहास असेल तर गरोदरपणात पपई खाणे असुरक्षित असते.

१२. त्वचेचा रंग बिघडणे:

पपईमधील बीटा कॅरोटीन पपईला केशरी रंगाची छटा देते. जास्त प्रमाणात पपई खाल्ल्यास कॅरोटीनेमिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौम्य समस्येस कारणीभूत ठरते. त्वचेचा रंग बिघडणे रोखण्यासाठी पपई टाळावी.

तुम्ही पपईचा रस पिऊ शकता का?

नाही, अशी शिफारस केली जाते की बाहेर मिळणाऱ्या पपईच्या रसाचे सेवन टाळले पाहिजे. पपईचा एक मुख्य फायदा म्हणजे पपई तंतुमय पदार्थानी समृद्ध आहे. त्याचे रसात रुपांतरित केल्याने ह्या फायद्याकडे दुर्लक्ष होते. याव्यतिरिक्त, पॅकमध्ये उपलब्ध असलेल्या पपईच्या रसात लॅटेक्स किंवा पॅपेनची टक्केवारी तुलनेने जास्त असते. म्हणून, तुम्हाला हवे असल्यास घरगुती रसाला प्राधान्य देणे चांगले. संरक्षक पदार्थ आणि साखर घातल्यास त्याचे फायदेशीर गुणधर्म कमी होऊ शकतात. ताज्या रसाचे योग्य आणि कमी प्रमाणात सेवन करा.

गर्भवती असताना कच्ची पपई खाण्याची जोखीम

कच्च्या पपईमध्ये लॅटेक्स जास्त प्रमाणात असते. गरोदरपणात कच्ची पपई खाल्ल्याने तुमच्या गरोदरपणात त्याचा हानिकारक परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे, गर्भवती असताना स्त्रिया आजारपण आणि ऍलर्जीच्या बाबतीत जास्त असुरक्षित असतात.

गर्भवती महिलांसाठी पपई खाणे चांगले आहे का?

योग्य प्रमाणात पपईचे सेवन गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे. पिकलेली पपई गर्भवती स्त्रिया खाऊ शकतात. पपईमुळे गर्भपात होतो ही एक सामान्य समज आहे, परंतु हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले नाही. खरं तर, पिकलेली पपई गर्भावस्थेतील आहारात भर घालण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे कारण ते आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी भरलेले असते. ह्या फळामुळे गरोदरपणात छातीत होणारी जळजळ आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते . योग्य प्रमाणात पपईच्या सेवनाने गर्भवती महिलेस फायदा होतो.

पपईऐवजी खावीत अशी इतर फळे

आपण आपल्या गरोदरपणात पपई न खाण्याचा निर्णय घेतल्यास आणि पपईतून मिळणारे पौष्टिक मूल्य मिळण्यासाठी कोणती फळं चांगली ह्याचा विचार करत असाल तर ही यादी म्हणजे आपले उत्तर आहे.

. संत्री

संत्री हे फायबर, व्हिटॅमिन सी आणि पाण्याचे उत्तम स्रोत आहेत. ते आपल्याला हायड्रेटेड ठेवतात आणि व्हिटॅमिन सी शरीरातील लोह शोषण्यास मदत करते तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट करते.

. डाळिंब

डाळिंबे व्हिटॅमिन के, कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रथिने यासारख्या पोषक द्रव्यांसह समृद्ध असतात, ही सर्व पोषणमूल्ये गर्भाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. डाळिंबाचा रस नाळेच्या दुखापतीपासून संरक्षण करण्यासाठी देखील ओळखला जातो.

. पेरू

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅरोटीनोईड्स आणि फोलेट्स असतात जे पचनास मदत करतात, पेरूमुळे स्नायू आणि सांध्यांना आराम मिळतो आणि बद्धकोष्ठतापासून मुक्त होण्यास मदत होते.

. द्राक्षे

द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात फोलेट, जीवनसत्त्वे, फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. द्राक्षे संक्रमण रोखण्यासाठी आणि शरीरात गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या जैविक बदलांचा सामना करण्यास मदत करतात.

. सफरचंद

सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर असते. या सर्व गोष्टी गर्भाचे पोषण करतात आणि गर्भाच्या वाढीस मदत करतात.

प्रसूतीनंतर पपई खाणे सुरक्षित आहे का?

बऱ्याच स्त्रिया हा प्रश्न विचारतात - प्रसूतीनंतर पिकलेली पपई खाणे सुरक्षित आहे का? होय, पपई हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचे समृद्ध स्रोत आहे. हिरव्या पपईच्या सेवनामुळे शरीरात ऑक्सिटोसिन ह्या संप्रेरकाचे उत्पादन वाढविण्याची क्षमता निर्माण होते आणि म्हणूनच दुधाचा प्रवाह वाढतो. अशा प्रकारे, स्तनपान देणाऱ्या मातांसाठी हे फायदेशीर आहे. तुमच्या आहारात पपईचा समावेश करा आणि तुमच्या अंत: करणात बाळासोबत बंध जोडा. कधी विचार केला आहे का की, पपईमुळे गरोदरपण संपुष्टात येऊ शकते? उत्तर, पुन्हा, होय, हे आहे. पपईच्या संप्रेरक प्रभावांमुळे ती गर्भनिरोधकाचा नैसर्गिक मार्ग म्हणून कार्य करू शकते. पिकलेल्या किंवा कच्च्या पपईचे सेवन हा एक विवादास्पद विषय आहे, बहुतेक स्त्रिया गरोदरपणात पपई पूर्णपणे टाळण्याचा पर्याय निवडतात. तथापि, पपईचे अल्प प्रमाणात सेवन केले जाऊ शकते, परंतु गरोदरपणातील समस्यांचा इतिहास नसावा म्हणजे बाळावर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना अशी चिंता राहणार नाही. खरं तर, पपई मधील पोषक तत्त्वे बाळाच्या वाढीस मदत करतात. स्रोत अणि सन्दर्भ: आणखी वाचा: गरोदरपणात आंबे खाणे सुरक्षित आहे का? गरोदरपणात टरबूज खाणे सुरक्षित आहे का?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved