गर्भधारणा होताना

गर्भनिरोधक स्पंज – वापर, प्रभावीपणा, फायदे आणि बरंच काही

कधीकधी काही अप्रत्यक्ष दुष्परिणामांमुळे काही स्त्रियांसाठी जन्म नियंत्रणाच्या सामान्य पद्धती काम करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, कुणीतरी योनि स्पंज किंवा गर्भनिरोधक स्पंजची निवड करू शकते. योनि स्पंज जन्म नियंत्रणाचे एक साधन आहे जे रिव्हर्सिबल आहे. काही स्त्रिया गर्भधारणा टाळण्यासाठी योनी स्पंज वापरण्यास प्राधान्य देतात कारण बहुतेक औषधांच्या दुकानात ते अगदी प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध होतात आणि वापरण्यासही सोपे असतात. तथापि, पुरुष काँडोमच्या तुलनेत योनिमार्गातील स्पंज एचआयव्ही सारख्या लैंगिक संक्रमित रोगापासून (एसटीडी) संरक्षण देऊ शकत नाही.

गर्भनिरोधक स्पंज म्हणजे काय?

गर्भनिरोधक स्पंज हे डोनटच्या आकाराचे स्पंज असते, ह्याचा आकार सुमारे दोन इंच इतका असतो. हे मऊ, गोल योनी स्पंज पॉलीयुरेथेन फोमपासून बनविलेले असते. स्त्रियांसाठीचे हे स्पंज नाकेबंदी आणि शुक्राणुनाशक पद्धतींद्वारे गर्भधारणा रोखण्यास मदत करते. लैंगिक संबंधात गर्भ निरोधक स्पंज योनीमध्ये खोलवर घातलाजातो. स्पंज गर्भाशय मुखावर एक संरक्षक आवरण बनवते आणि शुक्राणूंना गर्भाशयात जाण्यापासून थांबवते. प्रत्येक स्पंजमध्ये जोडलेल्या कपड्याचा एक लूप असतो ज्यामुळे ते बाहेर काढणे सोयीचे होते. स्पंज पुन्हा वापरण्यायोग्य नसतो आणि वापरल्यानंतर टाकून द्यावा.

त्याचे कार्य कसे चालते?

स्पंजचे काम डायफ्रामसारखेच असते. स्पंज जन्म नियंत्रणाचे कार्य दोन प्रकारे करते. स्पंजला एक खाच असते ज्यामुळे स्पंज गर्भाशयात घट्ट बसू शकते आणि संरक्षणात्मक अडथळा निर्माण होतो आणि शुक्राणूंचा प्रवेश आत होत नाही. गर्भाशयाच्या मुखामध्ये (म्हणजेच योनी आणि गर्भाशयाच्या दरम्यानचा मार्ग) प्रवेश करण्यापूर्वी स्पंज वीर्य शोषून घेतो. योनिमार्गाच्या स्पंजमध्ये शुक्राणूनाशक पदार्थ असतो जो शुक्राणूंना अंड्यात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. शारीरिक संबंधांपुर्वी स्त्रियांनी स्पंज वापरण्याची योग्य पद्धत अवलंबणे आवश्यक आहे. योनीमध्ये खोलवर घालण्यापूर्वी स्पंजला पाण्यात भिजवून थोडा ओला करणे जरुरी आहे. संभोग करण्यापूर्वी आपण सुमारे २४ तास योनीमध्ये स्पंज घालू शकता. वापरानंतर, आपण लूपच्या मदतीने स्पंज बाहेर खेचू शकता. स्पंजचा वापर करताना कॉन्डोमचा वापर केला तरी चालतो किंवा फक्त स्पंज वापरला तरी चालतो. तथापि, कंडोमसह वापरल्यास गरोदरपणापासून चांगले संरक्षण मिळू शकते

गर्भनिरोधक स्पंजचा प्रभावीपणा

स्पंजचा वापर केल्याने गर्भधारणा टाळण्यास कशी मदत होते ते इथे दिले आहे

. गर्भधारणा रोखण्यासाठी स्पंजचा प्रभावीपणा

जेव्हा आपण जन्म नियंत्रणाबद्दल बोलतो, तेव्हा गर्भनिरोधक स्पंज बाजारात उपलब्ध असणारी सर्वोत्तम पद्धत असू शकत नाही. परंतु, लैंगिक संबंधात सर्वात प्रभावी होण्यासाठी स्पंजचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. उत्पादनाच्या सूचना योग्यरित्या पाळणे गरजेचे आहे आणि प्रत्येक वेळी शारीरिक संबंध ठेवण्याआधी त्याचा वापर केल्यास त्याची कार्यक्षमता वाढू शकते. पण खरे सांगायचे तर प्रत्येक वेळी त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे पूर्णपणे शक्य होणार नाही. ज्या स्त्रीने बाळाला जन्म दिलेला नाही आणि स्पंजचा वापर योग्य रित्या करत आहे अशा स्त्रियांच्या बाबतीत यशाचा दार ९१% इतका जास्त असतो. परंतु खरे पाहता त्याचा प्रभावीपणा ८८% पेक्षा जास्त नसतो. परंतु जर स्त्रीने आधी बाळाला जन्म दिला असेल तर यशाचा दर ८०% पेक्षा सुद्धा कमी असतो. म्हणून मुले असलेल्या स्त्रियांसाठी ह्या गर्भनिरोधक साधनाची निवड तितकीशी योग्य नाही. त्यामुळे गर्भनिरोधक स्पंज वापरणाऱ्या १०० स्त्रियांपैकी ९ -११ स्त्रियांना गर्भधारणा राहते.

. स्पंजची परिणामकता वाढवण्यासाठी मार्ग

स्पंज प्रभावीपणे काम करण्यासाठी, तुम्ही लैंगिक संबंध ठेवण्याआधी स्पंज वापरू शकता. शारीरिक संबंध ठेवण्याआधी स्पंज सातत्याने वापरल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. स्पंजची परिणामकता वाढवण्यासाठी ते गर्भनिरोधक गोळ्या किंवा पुरुषांचे कॉन्डोम ह्यासोबत वापरणे चांगले. दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या पतीने आतमध्ये वीर्यस्खलन न करणे आणि योनीत स्खलन होण्याआधीच शिश्न बाहेर काढून घेणे हा होय. स्पंज आणि पुरुषांनी कॉन्डोम वापरणे हा सर्वात चांगला मार्ग आहे त्यामुळे लैंगिक संबंधांपासून पसरणारे आजार कमी होतील.

. स्पंज मुळे लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते का?

स्पंजमुळे लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळत नाही. उलटपक्षी, स्पंज मुळे एचआयव्ही सारख्या आजारांचा धोका जास्त असतो. शुक्राणूनाशक स्पंजची परिणामाकता लक्षणीयरीत्या कमी होते कारण स्पंजवर असलेल्या शुक्राणूनाशक आवरणामध्ये नोनोकझिनॉल -९ सारख्या रसायनामुळे योगनिमार्गाच्या भित्तिकांना इजा होते आणि त्यामुळे एसटीडी पसरवणारे जिवाणूंचा योनीमार्गातून सहज शरीरात प्रवेश होतो. त्यामुळे एसटीडीना आळा घालण्यासाठी तुम्ही त्याची नियमितपणे तपासणी करून घेणे चांगले.

स्पंज कसा वापरावा?

प्रभावी जन्म नियंत्रणासाठी स्पंजचा योग्य वापर तितकासा अवघड नाही. एकदा तुम्ही तो वापरण्याचा पुरेसा सराव केला की स्पंज वापरणे सोपे आहे. स्पंज घालणे हे टॅम्पॉन योनीमध्ये ढकलण्यासारखे आहे.

. गर्भनिरोधक स्पंज घालणे

स्पंज वापरताना खालील गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. तुम्ही प्रत्येक तपशील लक्षात ठेवण्याचा ताण घेऊ नका. सर्व उत्पादनांवर तपशीलवार सूचना असतात. त्यांचे पालन केल्यास तुम्हाला स्पंजचा वापर योग्य रित्या करता येऊ शकेल.

. स्पंज आतमध्ये केव्हा घालू शकतो?

संभोगाच्या आधी २४ तास तुम्ही स्पंज आतमध्ये घालू शकता. शुक्राणूनाशक सक्रिय झाल्यावर आणि योनीमार्गात घातल्यानंतर स्पंज कार्य करण्यास तयार असतो. म्हणून, शारीरिक संबंध ठेवण्याच्या आधी गर्भनिरोधक घातले पाहिजे. एकदा योनीमार्गात स्पंज घातल्यानंतर तुम्ही पुढचे २४ तास कुठलाही व्यत्यय न येता तुम्हाला हवे तेवढे वेळा शारीरिक संबंध ठेवू शकता. ह्या कालावधीत तुम्हाला स्पंज बदलण्याची गरज नाही.

. आतमध्ये किती काळ तुम्ही स्पंज ठेवू शकता?

संभोगानंतर तुम्ही कमीत कमी ६ तास स्पंज आतमध्ये तसाच ठेवला पाहिजे. परंतु एकूण ३० तासांपेक्षा जास्त काळ स्पंज आतमध्ये राहता कामा नये. एकूण ३० तास स्पंज आत ठेवण्याची सक्ती नाही परंतु सुरक्षिततेसाठी लैंगिकतेनंतर ६ तास पाळले पाहिजे.

. स्पंज काढणे

तुम्ही हात काळजीपूर्वक धुतल्यानंतर, तुमच्या योनीमध्ये बोट सरकवा आणि ते स्पंजच्या लूपमध्ये घाला. मग लूपच्या मदतीने अगदी हळूवारपणे आणि स्थिरतेने स्पंजला योनीतून बाहेर काढा. जर तुम्हाला स्पंजचे लूप सापडत नसेल तर तुम्ही स्पंजला पकडू शकता आणि हळू हळू त्यास सरकवू शकता. तुम्हाला स्पंजपर्यंत पोहोचण्यात अडचण येत असल्यास, योनिमार्गाच्या स्नायूंच्या मदतीने तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करा. वापरलेल्या स्पंजची कचरापेटीत टाकून काळजीपूर्वक विल्हेवाट लावावी, टॉयलेटमध्ये फ्लश करू नये.

गर्भनिरोधक स्पंज किती सुरक्षित आहे?

स्पंजचे धोके काय आहेत?

तुमच्याकडे खालील वैद्यकीय समस्या असल्यास,स्पंजचा वापर टाळता येऊ शकेल: स्पंज वापरताना आपल्याला खाली सूचीबद्ध असलेल्या लक्षणांपैकी काही आढळल्यास त्याचा वापर बंद करा आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. ती लक्षणे अशी असू शकतात:

जन्म नियंत्रण स्पंजचे फायदे

खालील फायद्यांमुळे बर्‍याच स्त्रियांना जन्म नियंत्रण स्पंजची निवड करणे आवडते:

तोटे

जन्म नियंत्रणाच्या इतर सर्व पद्धतींप्रमाणेच स्पंजचेही काही तोटे असू शकतात. जरी बहुतेक स्त्रियांना सामान्यत: स्पंज वापरणे सुरक्षित वाटत असले तरी काही स्त्रियांनी गर्भनिरोधक स्पंजचे दुष्परिणाम देखील नोंदवले आहेत. त्याचे काही तोटे खालीलप्रमाणे असू शकतातः

आपण ते कोठे खरेदी करू शकता?

शुक्राणूनाशक स्पंज बहुतेक औषधांच्या किंवा केमिस्टच्या कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येतो. गर्भ निरोधक स्पंज ऑनलाइन देखील उपलब्ध आहे. गर्भनिरोधक स्पंजची किंमत तुम्ही कुठे राहता आणि जेथे खरेदी करीत आहात त्यानुसार वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये मध्ये जन्म नियंत्रण स्पंजचा प्रचलित ब्रँड म्हणजे 'द टुडे स्पंज' ह्याची किंमत तीनच्या पॅक साठी १५ डॉलर आहे. परंतु सामुदायिक आरोग्य केंद्रे किंवा क्लिनिकमध्ये विनामूल्य स्पंज किंवा कमी किंमतीचे स्पंज उपलब्ध असू शकतात. गर्भनिरोधक स्पंज योग्य पद्धतीने आणि सातत्याने वापरणे अत्यावश्यक आहे. विश्वसनीय जन्म नियंत्रण पद्धत म्हणून त्याचा प्रभावीपणा निश्चित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. उत्पादनाच्या सूचनांचे पालन केल्यास स्पंजचा योग्य वापर करण्यास मदत होईल. सराव करून, योग्यप्रकारे त्याचा वापर करण्यास सोपे जाते. स्पंजला सातत्याने वापरणे शक्य नसल्यास , तुम्ही जन्म नियंत्रणाची इतर पद्धती निवडू शकता जी तुलनात्मकपणे वापरण्यास सोपी असू असते. इम्प्लांट्स किंवा आययूडी सारख्या गर्भनिरोधक पद्धती अधिक विश्वासार्ह असतात. कोणत्याही परिस्थितीत, स्पंज वापरताना पुरुषांनी कॉन्डोम वापरल्याने आपल्याला गर्भधारणेपासून आणि एसटीडी पासून उत्कृष्ट संरक्षण मिळते. आणखी वाचा : गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना तपकिरी रंगाचा स्त्राव होणे सामान्य आहे का?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved