गर्भधारणा होताना

गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित काळाची गणना करण्याच्या पद्धती

हजारो वर्षांपासून, लोक गर्भधारणा टाळण्यासाठी, सुरक्षित लैंगिक संबंधांसाठीचा कालावधी ठरवत आले आहेत. एकदा तुम्हाला मासिक पाळी म्हणजे काय आणि प्रत्येक टप्प्यात काय होते हे समजल्यानंतर तुम्ही अधिक अचूकतेसह सुरक्षित दिवसांची गणना करू शकता. सुरक्षित कालावधी मोजण्यामागचा मुख्य उद्धेश म्हणजे कुठलेही दुष्परिणाम न होता नैसर्गिकरित्या गर्भधारणा टाळणे हा आहे.

सुरक्षित काळ (अनफर्टाईल पीरियड) म्हणजे काय?

'सेफ पीरियड' म्हणजे असे दिवस जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच, जर तुम्हाला बाळ नको असेल आणि निरोधक वापरायचे नसेल तर ह्या काळात तुम्ही आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित असते. जीवशास्त्रीयदृष्ट्या बोलायचे झाले तर, अशी वेळ असते जेव्हा स्त्रीबीज सुपीक नसतात. स्त्रीबीज नसताना जर आपण संभोग केला असेल तर आपण गर्भवती होऊ शकत नाही कारण मासिक पाळीचा हा वंध्यत्वाचा काळ आहे. बहुतेक स्त्रियांमध्ये, पुढील मासिक पाळी सुरू होण्याच्या सुमारे १४ दिवस आधी ओव्हुलेशन होते. तुमची पुढील मासिक पाळी कधी सुरू होईल हे जाणून घेणे सोपे नाही. परंतु , जर तुमची मासिक पाळी पूर्णत: नियमित असेल तर ओव्हुलेशनच्या दिवसांची गणना करणे सोपे जाईल. हे करण्यासाठी, तुम्हाला मागील मासिक पाळीची तारीख प्रारंभ बिंदू म्हणून वापरण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ओव्हुलेशनच्या फक्त चार दिवस आधी आणि ओव्हुलेशननंतर तीन दिवसांनंतर स्त्रीबीज फलित केली जाऊ शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर , हा सुरक्षित कालावधी नाही आणि म्हणूनच, आपण या काळात संभोग टाळला पाहिजे

तुम्ही तुमच्या सुरक्षित कालावधीची गणना का करावी?

तुमच्या सुरक्षित कालावधीची गणना करणे फायदेशीर आहे ह्याचे कारण म्हणजे संरक्षणाशिवाय आणि गर्भधारणेची कोणतीही भीती न बाळगता लैंगिक संबंध ठेवणे कोणत्या दिवसात अनुकूल आहे हे तुम्हाला समजण्यास मदत होईल. तुम्हाला लगेच मूल नको असल्यास तुमच्या सुरक्षित कालावधीची गणना कशी करावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. तथापि, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित कालावधीची गणना ही जन्म नियंत्रणाची एक उत्तम पद्धत आहे कारण त्यात संप्रेरकांवर आधारित गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्या लागत नाहीत. तसेच , आय.यू.डी. किंवा हार्मोन इंजेक्शन नसतात ज्याचा तीव्र परिणाम मूड बदलण्यापासून ते वजन वाढण्यापर्यंत होऊ शकतो.

गर्भधारणा टाळण्यासाठी आपल्या सुरक्षित कालावधीची गणना कशी करावी?

तुमच्या सुरक्षित दिवसांची गणना करण्यासाठी, तुम्हाला मासिक पाळीचे विविध टप्पे समजणे आवश्यक आहे.

मासिक पाळी चक्राचे विविध टप्पे

मासिक पाळी तीन टप्प्यात विभागली जाऊ शकतेः फॉलिक्युलर फेज (प्री-ओव्हुलेशन फेज), ओव्हुलेशन फेज आणि ल्यूटियल फेज (ओव्हुलेशननंतरचा टप्पा). प्रत्येक टप्प्यातील कालावधी प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असतो. तथापि, सरासरी मासिक पाळी २८ दिवस असल्याचे मानले जाते. मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून मासिक रक्तस्त्राव मोजला जातो. प्रत्येक टप्प्यात काय होते ते पाहूया.

. फोलिक्युलर फेज / प्रोलीएरेटिव्ह फेज

फॉलिक्युलर फेज ओव्यूलेशनच्या आधी येते. ह्या फेज मध्ये अंडाशयातील स्त्रीबीजे परिपक्व होतात. ओव्यूलेशनला सुरुवात झाल्यावर हा टप्पा संपतो. अंडाशयातील फोलिकल्सना परिपक्वता येते. ह्या टप्प्यात एस्ट्राडायोल हे संप्रेरक काम करते आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच) तयार होते.

. ओव्हुलेशनचा टप्पा

ह्या ओव्हुलेशन अवस्थेमध्ये परिपक्व स्त्रीबीजाचा कोश फुटतो आणि स्त्रीबीज सोडले जाते (ज्याला अंडी देखील म्हणतात). ओव्हुलेशनच्या आधीचा आणि नंतरचा काळ सामान्यतः ओव्हुलेशचा टप्पा म्हणून ओळखला जातो. ओव्यूलेशनच्या काळात स्त्रीला गर्भधारणा होण्याची जास्त शक्यता असते.

. ल्यूटियल फेज / सिक्रीटरी फेज

ल्यूटियल फेज मासिक पाळीचा शेवटचा टप्पा आहे. हा टप्प्यात कॉर्पस ल्यूटियमची निर्मिती जेव्हा सुरु होते तेव्हा ह्या टप्प्यास सुरुवात होते आणि गर्भधारणा झाल्यावर हा टप्पा संपतो. कॉर्पस ल्यूटियम ही एक तात्पुरती अंतःस्रावी रचना असते जी एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोजेन तयार करण्यास मदत करते. गर्भाशयाच्या आतील अस्तर, म्हणजेच एंडोमेट्रियमची देखभाल करण्यासाठी शरीराला इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोजेनची आवश्यकता असते. मासिक पाळीनंतर स्त्रीसाठी सुरक्षित दिवस शुक्राणू आणि अंडी या दोघांच्या आयुष्यावर अवलंबून असतात. मासिक पाळीचे सरासरी दिवस (२८ दिवस) असतील तर बहुतेक प्रकरणांमध्ये, मासिक पाळीच्या १४ व्या दिवशी ओव्हुलेशन होते. प्रत्येक स्त्रीसाठी ओव्हुलेशन कालावधी बदलू शकतो आणि १२ व्या दिवसापासून ते चक्राच्या १९ व्या दिवसापर्यंत असू शकतो. एक शुक्राणू सहसा पुनरुत्पादक मार्गामध्ये ३ ते ५ दिवस जगतो. म्हणून,ओव्हुलेशनच्या पाच दिवस आधी असुरक्षित संभोग केल्यास गर्भवती होण्याची शक्यता असते. स्त्रीबीजांचे आयुष्य अगदी छोटे असते - केवळ २४ तास. जर त्या कालावधीतगर्भधारणा झाली नाही तर अंडी मारतात.

गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित कालावधी तक्ता

सुरक्षित दिवस आणि असुरक्षित दिवसांच्या ब्रेकअपचा एक त्वरित दृष्टीक्षेप येथे आहे ज्यामुळे तुमच्यासाठी गणना सुलभ होईल तसेच तुमचे दिवस सुरक्षित कोणते ते समजेल.

कॅलेंडर पद्धती वापरून सुरक्षित काळाची गणना

रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार
सुरक्षित कालावधीची सुरुवात सुरक्षित दिवस
१० ११ १२ १३ १४ असुरक्षित दिवस
१५ १६ १७ १८ १९ २० २१ असुरक्षित दिवस
२२ २३ २४ २५ २६ २७ २८ सुरक्षित दिवस
सुरक्षित कालावधीची सुरुवात २९ ३० सुरक्षित दिवस

गर्भधारणा टाळण्यासाठी कधी लैंगिक संबंध ठेवावेत?

. लैंगिक संबंधांसाठी सुरक्षित कालावधी म्हणजे काय?

ढोबळमानाने जर तुम्ही लैंगिक संबंध ठेवत असाल तर तुम्ही गर्भवती होऊ शकता! सर्व गणना आणि सिद्धांत असूनही, स्त्री कधी ओव्हुलेट होईल हे अगदी ठामपणे सांगता येईल असा कोणताही निश्चित मार्ग नाही. बहुतेक स्त्रियांचे ओव्यूलेशन त्यांची मासिक पाळी सुरू होण्याच्या १२ ते १४ दिवस आधी सुरु होते, परंतु काही स्त्रिया वेगळ्या वेळी ओव्यूलेशन होते. म्हणूनच, गर्भधारणा टाळण्यासाठी लैंगिक संबंध केव्हा ठेवले पाहिजेत हा बऱयाचदा अंदाज लावण्याचा खेळ आहे.

. सुरक्षित कालावधी केवढा असतो?

त्यांच्या अनुभवांच्या आधारे, बर्‍याच स्त्रियांचा असा विश्वास आहे की मासिक पाळी सुरु होण्याच्या आधी आणि मासिक पाळी संपल्यानंतर लगेच लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे. सावध रहा, चढ-उतार करणारे हार्मोन्स आणि वेळापत्रक बदलल्याने ही गणना चुकीची होऊ शकते. सामान्य नियम म्हणून, जर आपले चक्र नियमितपणे (२८ दिवस) असेल तर, मासिक पाळीच्या आधी सात दिवस सुरक्षित कालावधी असेल. परंतु हे विसरू नका की तुमची मासिक पाळी नियमित असेल तरच ही गणना कार्य करते.

. ओव्हुलेशनच्या वेळेची गणना कशी करावी?

लैंगिक संबंधांसाठी सुरक्षित कालावधी आणि ओव्यूलेशन कालावधी संबंधित आहेत कारण ओव्हुलेशनच्या आधारावर सुरक्षित दिवसांची गणना केली जाते. लोकप्रिय पीरियड कॅल्क्युलेटर पद्धतीनुसार, २६ ते ३२ दिवसांच्या नियमित मासिक पाळी चक्राचे पहिले १ ते ७ दिवस सुरक्षित असतात. पुनरुत्पादक कालव्यात शुक्राणूंचे आयुष्य ३ ते ५ दिवस असल्याचे लक्षात घेते. ही पद्धत गणना करते की १९व्या दिवशी ओव्हुलेशन होते. म्हणूनच, चक्राच्या ३० व्या दिवसापर्यंत गर्भधारणा होऊ शकते. या सर्व गणना अंदाजे असल्याने प्रत्येक स्त्रीसाठी परिणाम वेगवेगळे असू शकतात. ही गणना डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) चा डेटा दाखवण्यासाठी समायोजित केली गेली आहे ही माहिती दर्शवते की ८०% मासिक पाळी चक्र २६ ते ३२ दिवसांदरम्यान असतात.

सुरक्षित कालावधीची गणना करण्यासाठी भिन्न पद्धती

सुरक्षित कालावधीची गणना करण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशा काही पद्धती येथे आहेतः सेफ पीरियड कॅल्क्युलेटर किंवा मासिक पाळी कॅल्क्युलेटर मासिक पाळी कॅल्क्युलेटर बऱ्याच वेळा अचूक असतात. तथापि, बर्‍याच लोकांना हे कॅल्क्युलेटर आणि अॅप्स खूप जटिल वाटतात. तसेच, त्यांनी वंध्यत्वाच्या कालावधीची गणना करण्यास सांगितलेली बहुतेक माहिती - उदाहरणार्थ, शरीराचे तापमान, गर्भाशयाच्या मुखातील श्लेष्मा आणि मासिक पाळीच्या तारखाइत्यादी प्रत्येक महिलेकडे सहज उपलब्ध असतीलच असे नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर हे कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या शरीराचे मूलभूत तापमान तसेच तुमच्या मासिक पाळीविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच, बरेच लोक, खाली दिले आहेत तसे सोपे मासिक पाळी कॅल्क्युलेटर वापरण्यास प्राधान्य देतात, ज्यामध्ये खूप महिन्यांची माहिती विचारत नाहीत परंतु तरीही अचूक परिणाम देतात.

. प्रजनन दिवस टाळा

तुमचा जास्त प्रजनन क्षमता असलेला कालावधी टाळा. लक्षात ठेवा, सुरक्षित दिवस मासिक चक्रांच्या लांबीवर अवलंबून असतात. खालील तक्त्यामध्ये विविध मासिक पाळी चक्रांच्या सर्वात जास्त प्रजनन क्षमता असलेल्या दिवसांची यादी दिलेली आहे. जर तुम्ही गर्भवती होऊ इच्छित नसल्यास, तुम्ही खालील दिवशी संभोग टाळणे आवश्यक आहे.
मासिक पाळी चक्राचे दिवस सर्वात प्रजननक्षम दिवस
२४ दिवस मासिक पाळी चक्राचे ५ ते १० दिवस
२८ दिवस मासिक पाळी चक्राचे ९ ते १४ दिवस
३० दिवस मासिक पाळी चक्राचे ११ ते १६ दिवस
३५ दिवस मासिक पाळी चक्राचे १६ ते २१ दिवस

. जेव्हा तुम्ही गर्भवती होण्याची शक्यता कमी असेल त्या कालावधीची गणना करा

कमीतकमी सहा महिन्यांपर्यंत तुमच्या मासिक पाळी चक्राचा मागोवा घेतल्यास तुमच्या प्रजनन क्षमता जास्त असलेल्या दिवसांचा आलेख तयार करण्यास तुमची मदत होईल. स्टेप १: हे सूत्र वापरा: तुमच्या सर्वात कमी कालावधीच्या मासिक पाळी चक्राच्या एकूण दिवसांमधून १८ दिवस वजा करा. येणारी संख्या वापरुन, तुमच्या पुढील मासिक पाळी चक्राच्या पहिल्या दिवसापासून मोजण्यास सुरुवात करा आणि आपल्या कॅलेंडरवर ती तारीख चिन्हांकित करा. स्टेप २: तुमच्या सर्वात कमी कालावधीच्या मासिक पाळी चक्रामधून ११ दिवस वजा करा. नंतर ती संख्या वापरुन, तुमच्या पुढील मासिक पाळी चक्राच्या पहिल्या दिवसापासून पुढे मोजा. कॅलेंडरवर ती तारीख चिन्हांकित करा. स्टेप ३: तुमचा सर्वात जास्त प्रजनन क्षमता असलेला कालावधी त्या चिन्हांकित तारखांमधील आहे. त्या तारखांशिवाय इतर कधीही असुरक्षित संभोग करणे सुरक्षित असणार आहे. परंतु , हे लक्षात घेतले पाहिजे की शुक्राणू ४ दिवसांपर्यंत जगतात, म्हणून दोन्ही बाजूंनी चार दिवस धोकादायक देखील ठरवा. लक्षात ठेवा की केवळ तुमचे मासिक पाळी चक्र नियमित असल्यास ह्या पद्धतीचा उपयोग होतो.

. सेफ पीरियड कॅल्क्युलेटर कोण वापरू शकेल?

नैसर्गिक कुटुंब नियोजन पद्धतींच्या कार्यक्षमतेबद्दल तुम्हाला डॉक्टरांना विचारण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर तपासणी करतील आणि तुम्हाला ती पद्धती तुमच्यासाठी प्रभावी आहे की नाही हे सांगतील. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच सुरक्षित कालावधी कॅल्क्युलेटरचा वापर नैसर्गिक जन्म नियंत्रण पद्धत म्हणून करा. जर तुमची मासिक पाळी नियमित असेल आणि साधारण २६ ते ३२ दिवसांच्या सरासरी श्रेणीत मोडत असेल आणि जर तुमचे सर्वात प्रदीर्घ मासिक पाळी चक्र आणि सर्वात कमी दिवसांचे मासिक पाळी चक्र ह्यामधील फरक सुमारे सात दिवसांचा असेल तर तुमच्यासाठी ही पद्धती जन्म नियंत्रणासाठी सुरक्षित आहे.

. सेफ पीरियड कॅल्क्युलेटर कोण वापरू शकत नाही?

वरील प्रमाणेच नियम लागू करताना - जर तुम्ही नियमित २६ दिवस ते ३२ दिवसांच्या चक्रामध्ये असाल आणि तुमच्या सर्वात लांब आणि सर्वात कमी कालावधीच्या चक्रातील फरक आठ दिवसांपेक्षा जास्त असेल तर ही पद्धत वापरणे धोकादायक असेल. लक्षात ठेवा की हार्मोनल बदलांमुळे, ही पद्धत वापरण्यासाठी बाळंतपणानंतर सहा महिने वाट पाहणे शहाणपणाचे ठरेल. तसेच, अनियमित चक्रांमुळे, ही पद्धत किशोरवयीन किंवा रजोनिवृत्तीच्या काठावर असलेल्या स्त्रियांसाठी योग्य नाही. पीसीओएस आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या परिस्थितीमुळे अनियमित चक्र असलेल्या स्त्रियांसाठी ही पद्धत कार्य करणार नाही.

. सुरक्षित कालावधीची गणना करण्याची उदाहरणे

सुरक्षित कालावधीची गणना करणे गोंधळात टाकणारे असू शकते. येथे त्याविषयीची दोन उदाहरणे दिली आहेत.

नैसर्गिक कुटुंब नियोजन (प्रजनन जागरूकता-आधारित पद्धती)

ओव्हुलेशन टप्प्यात आपले शरीर विविध चिन्हे दर्शविते. तुम्ही ही चिन्हे ओळखून लैंगिक संबंध टाळल्यास तुम्ही गर्भधारणा टाळू शकता. याला नैसर्गिक कुटुंब नियोजन देखील म्हणतात. प्रजनन क्षमता जागरूकता-आधारित विविध पद्धती आहेतः

. मूलभूत शरीर तापमान पद्धत

तुमच्या शरीराचे मूलभूत तापमान मोजणे अगदी सोपे आहे. हे सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे दररोज सकाळी सर्वात आधी तुमच्या शरीराचे मूलभूत तापमान घ्या आणि चार्टवर प्लॉट करा.

. शरीराच्या मूलभूत तापमानाचा चार्ट तयार करणे

तुमच्या शरीराचे पायाभूततापमान चार्ट करताना हे ४ नियम लक्षात ठेवाः
नियमित मासिक पाळी येणाऱ्या महिलांमध्ये गर्भवतीmहोऊ नये म्हणून सुरक्षा प्रमाण ८५% असते. परंतु यशाचा दर तुम्ही किती योग्य पद्धतीने सुरक्षित कालावधीची गणना करता आणि त्याचे अनुसरण किती काटेकोरपणे करता यावर अवलंबून असते. एकदा तुम्हाला प्रजनन काळाचा मागोवा कसा घ्यावा हे समजल्यानंतर तुम्ही वंध्यत्व कालावधी दरम्यान सुरक्षितपणे असुरक्षित संभोग करू शकता. तुम्हाला जर वाटले की तुम्हाला गर्भधारणेचा धोका आहे तर संरक्षण वापरा. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की कोणतीही पद्धत मूर्खपणाची नसते. बर्‍याच पद्धती अचूक आणि त्याच्या चाचण्या घेतल्या गेलेल्या असल्या तरी, महिलेच्या शरीरात होणारे हार्मोनल चढ-उतार गणना चुकवू शकतात. सुवर्ण नियम पाळणे चांगले: संशय असल्यास,तुम्ही प्रजननक्षम आहात असे समजा.

. गर्भाशयाच्या मुखातील श्लेष्मा / ओव्हुलेशन पद्धत

ओव्यूलेशन होत असतांना तुमच्या गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या श्लेष्माचा रंग बदलतो. गर्भाशयाच्या श्लेष्माचा रंग दररोज लक्षात घ्या. रंग बदलणे हे तुम्ही ओव्यूलेशनच्या टप्प्यात आहात सूचित करते. तुम्ही तुमच्या गर्भाशयाच्या मुखातून येणाऱ्या शेलष्माचा कसा अर्थ लावू शकता हे खाली दिले आहे

४ सिम्प्टो -थर्मल पद्धत

ह्यामध्ये बऱ्याच पद्धतींचे मिश्रण आहे, ह्यामध्ये ओटीपोटात वेदना, जड आणि हळूवार स्तनांसह शरीराचे तापमान आणि श्लेष्माचा रंग यासारख्या ओव्हुलेशनच्या लक्षणांचा मागोवा घेण्यात येतो. वेगवेगळ्या पद्धती एकाच वेळी वापरल्यामुळे अधिक चांगल्या अचूकतेसह सुरक्षित दिवसांचा अंदाज वर्तविला जातो.

. सायकल बीड ऍप

सायक ल लेबॅडस स्मार्टफोन अॅप अँड्रॉइड आणि आयफोन दोहोंसाठी उपलब्ध आहे. हे त्याच नावाच्या अत्यंत प्रभावी कुटुंब नियोजन पद्धतीवर आधारित आहे. कसे वापरावे ते येथे दिले आहे:

. स्टॅंडर्ड डेज पद्धत

कॅलेंडर पद्धतीप्रमाणेच, या पद्धतीमध्ये सलग आठ ते दहा मासिक पाळीचा मागोवा घेणे समाविष्ट आहे आणि तुमचे मासिक पाळी चक्र २७ दिवसांपेक्षा जास्त असेल तरंच ही पद्धत प्रभावी आहे. ही पद्धत वापरुन तुम्ही सुरक्षित दिवसाचा अंदाज कसा घेऊ शकता ते येथे दिले आहेः जेव्हा तुम्ही पहिले आणि शेवटचे प्रजनन क्षमता जास्त असलेले दिवस ओळखले आहेत, तेव्हा सुरक्षित लैंगिक दिवसांचा मागोवा घेणे देखील सोपे आहे. मानक गृहीतके:

गर्भधारणा टाळण्यासाठी प्रजनन जागरूकता पद्धती (एफएएम) किती प्रभावी आहेत?

बर्‍याच बदलत्या घटकांमुळे, सेफ-डेज पद्धत १००% विश्वसनीय नाही. काही स्त्रिया या पद्धतीवर पूर्ण विश्वास ठेवतात. हार्मोनल बदल (ज्याची आपल्याला माहिती नाही) आणि अनियमित मासिक पाळीमुळे वंध्यत्व कालावधीची गणना करण्यात त्रुटी येऊ शकतात. कंडोम हा सर्वात सोपा पर्याय आहे, परंतु आपल्याला वापरणे आवडत नसेल तर पुढील सर्वोत्तम निवड म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घेणे. एफएएम केवळ तेव्हाच प्रभावी ठरेल जेव्हा:

गर्भधारणा टाळण्यासाठी प्रजननाविषयी जागृती करण्याच्या पद्धती काय आहेत?

योग्यरित्या वापरल्यास, एफएएम्स आपल्याला नको असलेल्या गर्भधारणेपासूनसंरक्षण देऊ शकतात. एफएएम वापरण्याचे काही फायदेः

गर्भधारणा टाळण्यासाठी प्रजनन जागृती करण्याच्या पद्धतींचे तोटे काय आहेत?

सुरक्षित कालावधी दरम्यान लैंगिक संबंध ठेवताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

गर्भवती होण्याबद्दल चिंता न करता संभोग करण्याचे इतर मार्ग

गर्भधारणेची चिंता न करता संभोग करण्याचे इतर मार्ग शोधत आहात? आम्ही ते सुद्धा इथे समाविष्ट केले आहेत

. कंडोम वापरा

गर्भनिरोधकाची सर्वात सोपी पद्धत, कंडोम तुमचे एसटीडीपासून देखील संरक्षण करतात

. नवीन जागा, ठिकाणे आणि युक्त्या वापरून पहा

वेगवेगळ्या स्थितींमध्ये आणि घरात वेगवेगळ्या ठिकाणी संभोग करून आनंद घ्या

. सेक्स टॉयमध्ये गुंतवणूक करा

आपल्या दोघांनाही आवडते असे सेक्स टॉय शोधा. आनंददायक अनुभवासाठी व्हायब्रेटर, डिल्डो आणि असे बरेच काही निवडा.

. मादक फोरप्ले

स्ट्रीप पोकरचा गेम खेळा किंवा फोरप्लेमध्ये मजा आणण्यासाठी स्वतःचा एखादा गेम शोधा. एफएएम ही जन्म नियंत्रणाची एक पद्धत आहे, परंतु ह्या पद्धतीचे काही तोटे सुद्धा आहेत. तर, एखादी अपघाती गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही जागरुक असल्याची आणि गणना नीट केलेली आहे ह्याची खात्री करा. आणखी वाचा : स्त्री आणि पुरुषांसाठी गर्भनिरोधक पद्धती
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved