टॉडलर (१-३ वर्षे)

भारतातील विविध शिक्षण मंडळे – सीबीएससी, आयसीएससी, आय.बी. आणि राज्य शिक्षण मंडळ

    In this Article

आपल्या मुलाला शाळेत पाठवण्याची वेळ आली आहे का? तर मग तुमच्या मनात पुढे दिलेले विविध प्रश्न असू शकतात जसे की त्याच्यासाठी कुठले बोर्ड निवडावे, कोणता अभ्यासक्रम निवडावा किंवा तुम्ही होम स्कुलिंग किंवा शाळा नको ह्या पर्यायांचा विचार करत आहात का? गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलत आहे. शाळांमध्ये आधुनिक तंत्रे अवलंबली जात आहेत, बर्‍याच पालकांनी आपल्या मुलांसाठी होम स्कुलिंग सुरु केले आहे. ही प्रणाली सर्व पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि बरेच काही मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. खरं तर, संपूर्ण जगामध्ये शिक्षण व्यवस्था अशी आहे जी कधीही तशीच रहात नाही. नवीन पद्धती आणि कल्पनांसह विकसित होत राहते. म्हणून आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल चर्चा करणे अगदी सामान्य गोष्ट आहे. भारतात अस्तित्त्वात असलेल्या प्रत्येक बोर्डाविषयी माहिती शोधणे देखील महत्त्वाचे आहे. सामान्यत: चांगले बोर्ड कुठले आहे हे शोधण्याऐवजी, आपल्या मुलासाठी कुठले बोर्ड चांगले आहे ते शोधले पाहिजे.

भारतातील विविध शिक्षण मंडळे

तुम्ही वेगवेगळे अभ्यासक्रम आणि बोर्डांबद्दल चांगले किंवा वाईट समजून घेण्याचा प्रयत्न करीत असल्यास, त्यानंतर भारतात जी शिक्षण मंडळे आहेत त्याबद्दल एक संक्षिप्त आढावा इथे दिलेला आहे.

. सीबीएसई

सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) आज भारतातील सर्वात सामान्य आणि सर्वाधिक मान्यताप्राप्त बोर्ड मानले जाते. जेव्हा देशातील बहुतेक शाळांकरिता सामान्य शिक्षण मंडळाचे मानकीकरण करण्याचा विचार केला जातो तेव्हा सीबीएसईने ते साध्य केले. हे राष्ट्रीय स्तरावरील बोर्ड आहे जे देशभरातील अनेक खाजगी तसेच सार्वजनिक शाळांमध्ये अवलंबले जाते. फायदे तोटे

. आयसीएसई बोर्ड

आयसीएसई किंवा भारतीय माध्यमिक शिक्षणासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा एक मजबूत अभ्यासक्रम आहे जो संकल्पनांच्या मूलभूत गोष्टी आणि पाया ह्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. फायदे तोटे

. आयबी

इंटरनॅशनल बॅचलरॅट हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशंसित अभ्यासक्रम आहे आणि जगभरात त्याची ओळख आहे. हा अभ्यासक्रम भारतातील १०० हून अधिक शाळांमध्ये आहे. फायदे तोटे

. राज्य मंडळ

प्रत्येक राज्यात एक राज्य बोर्ड अभ्यासक्रम असतो. ह्या बोर्डाद्वारे एक मानक परीक्षा देखील घेतली जाते. राज्य अभ्यासक्रम खाजगी शाळा आणि सरकारी शाळांमध्ये देखील आहे. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम प्रत्येक राज्यात वेगळा असतो आणि तो विशिष्ट राज्यासाठी बनविला जातो. फायदे तोटे

. आयजीसीएसई

आयजीसीएसई अभ्यासक्रम विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त अभ्यासक्रम करायचा आहे त्यांच्यासाठी तयार केला आहे. आयजीसीएसई अभ्यासक्रमात ब्रिटनबाहेरील रहिवाशांना आणि इंग्रजी पात्रता प्रणालीचा पाठपुरावा करू इच्छित विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. फायदे तोटे

. सीआयई

केंब्रिज आंतरराष्ट्रीय परीक्षा, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त शिक्षण देते आणि जगातील दीडशेहून अधिक देशांमध्ये परीक्षा घेतली जाते. फायदे तोटे

. एनआयओएस

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) चे उद्दीष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण लवचिक आणि सार्वत्रिक बनविणे हे आहे. हे भारतातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात अनुकूल बोर्डांपैकी एक बोर्ड आहे. हे बोर्ड विद्यार्थ्यांनुसार चालते आणि मुलांनी काय शिकावे, त्यांना कसे शिकायचे आहे आणि कधी शिकायचे आहे याविषयी निर्णय घेण्याची परवानगी विद्यार्थ्यांना ह्या बोर्डाने दिलेली आहे. फायदे तोटे जेव्हा शालेय शिक्षण आणि शिक्षणाचा विचार केला जातो तेव्हा पालक आणि मुले यांच्यावर खूप दबाव आणि तणाव असतो. खरं तर, ह्यामुळे संपूर्णपणे मुलाच्या शिक्षणाबद्दलच्या संकल्पना समजून घेण्यासही त्रास होऊ शकतो. म्हणूनच, हे सुनिश्चित करणे फार महत्वाचे आहे की आपले मूल ओझे म्हणून नव्हे तर आनंदाने शिक्षण घेते आहे. असे असले तरी मुलांवर अभ्यासासाठी दबाव आणला जात नाही अशा शाळा शोधणे अशक्य आहे, तरीही आपण घरी हे बदल करू शकता. समजून घ्या की प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे. आपले मुल कोठे बसते हे शोधणे महत्वाचे आहे. यामुळे शिक्षणासोबत येणारा ताण आणि दबाव देखील कमी होईल. वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्यामुळे, पालकांना त्यांच्या मुलांसाठी योग्य बोर्ड निवडणे कठिण वाटू शकते. कधीकधी सामाजिक पक्षपात देखील विशिष्ट बोर्डाकडे दिसतो. तथापि, प्रत्येक बोर्ड कसे आहे आणि ते आपल्या मुलासाठी योग्य आहे का हे शोधणे आवश्यक आहे. जर तुमचे मूल खालच्या वर्गात शिकत असेल तर त्याबद्दल जास्त काळजी करू नका. तुम्ही एका वर्षानंतर त्याची शाळा नेहमीच बदलू शकता. आपल्या मुलासाठी कुठले बोर्ड चांगले आहे ह्याचा विचार करण्यापेक्षा, तुमच्या बाळाची उत्सुकता शिक्षणाद्वारे पोसली जात आहे का आणि तो शिक्षणाच्या प्रक्रियेचा आनंद घेत आहे का हे पहिले पाहिजे. आणखी वाचा: घरी शिकताना: लॉकडाऊन दरम्यान तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी तज्ञांच्या टिप्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved