गर्भारपण

बाळंतपणानंतर डिंकाचे लाडू खाणे – फायदे आणि पाककृती

भारतामध्ये बाळंतपणात डिंकाचे लाडू खाणे खूप सामान्य आहे. नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू खाण्यास सांगितले जाते. बाळाला जन्म दिल्यांनतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी ह्या लाडवांमधून आईला आवश्यक ती पोषण तत्वे मिळतात. आईच्या शरीरासाठी बाळाचा जन्मानंतरचा टप्पा जन्मपूर्व अवस्थेइतकाच आव्हानात्मक असतो. तिच्या शरीराची आवश्यक ती काळजी घेणे जरुरीचे असते आणि प्रसूतीनंतरच्या आहारात डिंकाच्या लाडूचा समावेश केल्यास बाळाची आई लवकर पूर्ववत होऊ शकते.

डिंकाच्या लाडूचे पोषणविषयक फायदे

नव्यानेच आई झालेल्या स्त्रीला डिंकाचे लाडू खायला सांगितले जातात कारण ते पौष्टिक असतात. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे चांगले असते. नवीन आई झालेल्या स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलांसाठी डिंकाचे लाडू खाण्याची शिफारस केली जाते. लहान मुलांच्या डब्यासाठी डिंकाचे लाडू म्हणजे झटपट आणि पौष्टिक पर्याय आहे. डिंकाचे लाडू चवीसाठी चांगले आहेतच परंतु लहान मुलांना दिवसभर लागणारी ऊर्जा सुद्धा ह्या लाडूतून मिळत असते.

डिंकाच्या लाडूमध्ये लोह, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, प्रथिने, साखर, फायबर, सॅच्युरेटेड फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, सोडियम, चरबी इत्यादींसारखे विविध पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात. हे सर्व घटक आईला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात आणि बाळाला जन्म दिल्यानंतर बरे होण्यासाठी ह्या घटकांची मदत होते. स्तनपानाद्वारे देखील बाळाला पोषणद्रव्ये मिळतात. त्यामुळे डिंकाच्या लाडू सारख्या पौष्टिक स्नॅक्सचा काही भाग जन्मानंतरच्या आहारात समाविष्ट करावा.

आज बाजारात सर्व काही मिळते, हो अगदी डिंकाचे लाडू देखील! अगदी जवळच्या मिठाईच्या दुकानात देखील डिंकाचे लाडू असतील. पण, दुकानातील हे लाडू कोणत्या परिस्थितीत बनवले जातात याबद्दल तुम्ही जास्त काही सांगू शकत नाही, म्हणूनच घरी तयार केलेले डिंकाचे लाडू खाणे चांगले. तुम्ही डिंकाचे लाडू ह्यापूर्वी कधीही केलेले नसतील तर अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा!

डिंकाच्या लाडूची रेसिपी

बाळाच्या जन्मानंतर स्त्रीने निश्चितपणे डिंकाचे लाडू खावेत कारण ते शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा प्रदान करतात. हे लाडू करायला काही अवघड नाहीत. डिंकाच्या लाडूची रेसिपी खाली दिली आहे.

साहित्य:

पद्धत:

तुमच्यासाठी पुरेसे लाडू तयार झाल्यानंतर, त्यांचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा. दिवसातून सुमारे १ ते २ लाडू खाल्ल्याने तुम्हाला बाळंतपणानंतर आवश्यक ऊर्जा मिळते. प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू खाण्याचे काही प्रमुख आरोग्यविषयक फायदे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

गरोदरपणानंतर डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे

प्रसूतीदरम्यान तुमचे शरीर तीव्र आघातातून जाते. बाळंतपणानंतर, स्त्रीकडे असलेले ऊर्जा स्रोत आणि तिला बरे होण्यासाठी आणि बाळाची काळजी घेण्यासाठी लागणारी ऊर्जा ह्यामध्ये खूप फरक आहे. अशा वेळी डिंकाचे लाडू खाल्ल्याने तिला लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते.

भारतीय परंपरेनुसार अनेक कुटुंबांमध्ये बाळंतपणानंतर डिंकाचे लाडू खायला देतात. नव्याने आई झालेल्या स्त्रियांना डिंकाच्या लाडूचा नक्कीच फायदा होतो. लाडूंचे सेवन मध्यम प्रमाणात ठेवावे. कोणतेही दुष्परि णाम टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

आणखी वाचा:

प्रसूतीनंतर खावेत असे भारतीय अन्नपदार्थ प्रसूतीनंतरचा आहार – प्रसूतीनंतर कुठले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कुठले टाळावेत?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved