बाळ

बाळांसाठी झोपताना उशी वापरावी का?

तुम्ही स्वतः मऊ आणि उबदार उशीवर झोपताना आपल्या बाळालाही उशी देऊन त्याला सुद्धा आराम मिळावा असे तुम्हाला वाटेल. उशीमुळे आरामदायक वाटते, झोपेची स्थिती सुधारण्यास मदत होते आणि झोप सुद्धा छान लागते. परंतु तुमच्या लहान बाळासाठी उशी वापरणे मूर्खपणाचे ठरू शकते. कारण उशी वापरणे तुमच्या बाळासाठी धोकादायक असू शकते. म्हणूनच, जर बाळाला उशी आवश्यक आहे का? बाळ उशीशिवाय राहू शकते का असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर हा लेख वाचा. तुमच्या छोट्या बाळासाठी उशी कधी आणि कशी वापरावी या संदर्भात तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही येथे चर्चा करू.

एखाद्या नवजात बाळासाठी उशी वापरायला हवी का ?

तुमच्या बाळाला आरामदायक वाटणे सर्वात महत्वाचे आहे आणि पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला आरामदायक स्थितीत ठेवण्यासाठी सर्व काही करू शकता. तुम्ही पहिल्यांदाच पालक झालेले असल्यास बाळ उशी वापरू शकते किंवा नाही हा प्रश्न तुम्हाला पडेल.आम्ही शिफारस करतो की तुमच्या छोट्या बाळासाठी तुम्ही उशी वापरणे टाळा. असे दिसून आले आहे की कोणत्याही प्रकारच्या मऊ बेडिंग सामग्रीमुळे लहान मुलांना गुदमरल्यासारखे होऊ शकते.

बाळांना उशी वापरण्याची शिफारस का केली जात नाही?

बाळाला उशी वापरण्याची शिफारस का केली जात नाही हा प्रश्न तुम्हाला एक पालक म्हणून पडेल परंतु ह्याचे कारण असे आहे की बाळाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये बाळाची मान आणि डोके नियंत्रित नसते. म्हणजेच अशा परिस्थितीत तुमच्या बाळाचे नाक किंवा तोंड उशीने किंवा इतर मऊ पांघरुणाने झाकले गेले तर बाळ आपले डोके हलवू शकणार नाही. यामुळे लहान मुलांना गुदमरण्याचा धोका असतो.
याशिवाय, लहान बाळांना वेगवेगळ्या घटकांची ऍलर्जी असते, जसे की पक्षांची पिसे, धूळ इत्यादींविषयी बाळे खूपच संवेदनशील असतात आणि उशीवर झोपल्यामुळे तुमच्या बाळाला विविध प्रकारची ऍलर्जी होऊ शकते. म्हणूनच, बहुतेक बालरोगतज्ञ बाळास सपाट आणि टणक पृष्ठभागावर झोपवण्यास सांगतात आणि मोठ्या आकाराचे ब्लँकेट, क्रिब बंपर्स किंवा उशा वापरू नयेत असा सल्ला देतात. बाळाला झोपायला मदत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याला उशीशिवाय त्याच्या पाठीवर झोपविणे हा होय.

बाळ उशी कधी वापरु शकतो?

जेव्हा कुठल्या वयाचे बाळ उशी घेऊन झोपू शकते ह्या प्रश्नाचा विचार केला जातो तेव्हा आम्ही शिफारस करतो की दोन वर्षे वयानंतर कधीही तुम्ही तुमच्या लहान बाळासाठी उशी वापरण्यास सुरवात करू शकता. तथापि, या वयानंतरही जर आपल्याला असे वाटत असेल की बाळाला उशीशिवाय झोपणे आरामदायक वाटत आहे तर आपण त्यास उशी देण्याचे टाळावे. काही वेळा, २ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बालरोगतज्ञ उशी वापरण्याची शिफारस करू शकतात. रिफ्लक्स, कानाचा संसर्ग आणि तीव्र सर्दी अशा काही आरोग्याच्या समस्यांमुळे ही शिफारस केली जाते. बाळाचे डोके उंचावर ठेवण्यासाठी रिफ्लक्स उशा डिझाईन केलेल्या आहेत. ह्या उशा श्वासोच्छवास आणि पचन सुलभ करण्यास मदत करतात आणि जर आपल्या बाळाला रिफ्लक्सचा अनुभव येत असेल तर बाळाच्या झोपेमध्ये त्यामुळे अडथळा येऊ शकेल. जर तसे असेल तर तुम्ही बाळाच्या डोक्याखाली उशी ठेवू शकता, परंतु उशीमुळे बाळाचे नाक आणि तोंड झाकले जाऊ नये म्हणून तुम्ही नेहमी सावध असले पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळासाठी दररोज काही तास काढले पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही त्याला उशी देता तेव्हा त्याच्या शेजारीच रहावे. तुम्ही जेव्हा एखाद्या कामात व्यस्त असता तेव्हा उशी बाळापासून आणि बाळाच्या क्रिब पासून दूर असल्याची खात्री करा.

बाळासाठी योग्य उशी कशी निवडावी?

उशीमुळे धोका असतो आणि उशी हे मुलांमध्ये एसआयडीएस किंवा अचानक झालेल्या मृत्यूच्या मुख्य कारणांपैकी एक कारण आहे. म्हणूनच, डॉक्टरांनी सल्ला देईपर्यंत उशी वापरणे टाळले पाहिजे. वर चर्चा केल्याप्रमाणे, दोन वर्षांच्या वयानंतर बाळांना उशा दिल्या जाऊ शकतात, परंतु सत्य हे आहे की दोन वर्षांचे झाल्यानंतरही याची आवश्यकता नसते. तुम्ही कदाचित तुमच्या बाळासाठी उशी वापरत असाल कारण कुटुंबातील प्रत्येकजण उशी वापरत असेल किंवा आपल्या बाळाचा पलंग आपल्या पलंगासारखा दिसावा म्हणून तुम्हाला बाळाला उशी द्यावीशी वाटेल. जर तुम्ही २ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तुमच्या बाळाला उशी देऊ इच्छित असाल तर उशी निवडताना तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा

तुमच्या बाळासाठी उशी निवडण्यासाठी टिप्स

बाळासाठी योग्य उशी निवडण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत.
आरोग्य आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन वर्षांपर्यंत मुलांना उशीची शिफारस केलेली नाही. मोठ्या मुलांनाही कदाचित उशी घेऊन झोपायला आवडणार नाही. वर सांगितल्याप्रमाणे,वैद्यकीय स्थिती असल्याशिवाय खरोखर बाळांना उशी वापरण्याची आवश्यकता नसते. जेव्हा तुमच्या मुलाचे वय जास्त असूनही जर उशी वापरण्यास आवडत नसेल तर त्याला ती वापरण्यास भाग पाडण्याची गरज नाही. बाळाला उशी आरामदायक आहे की नाही याबद्दल बाळाच्या वागण्यावरून संकेत मिळविणे महत्वाचे आहे. जर तुमच्या मुलाने उशीचा हट्ट केला तर तुम्ही बालरोगतज्ञांशी संपर्क साधून उशी वापरण्याचे योग्य वय आणि कुठल्या प्रकारची उशी निवडावी ह्याबद्दल जाणून घ्या. आणखी वाचा: बाळाला रात्री कसे झोपवावे?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved