अन्न आणि पोषण

बाळांसाठी ओट्स – आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपीज

वयाच्या सहा महिन्यांपर्यंत, जर तुमच्या बाळाला तुम्ही फक्त स्तनपान दिलेले असेल तर ते चांगले आहे, कारण ह्या काळात त्याच्या वाढीस आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे बाळाला स्तनपानातून मिळतात. परंतु, एकदा का तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाले की बाळ नवीन पदार्थ खाण्यासाठी तयार होतेच परंतु बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी त्याला नवीन अन्नपदार्थांची सुद्धा गरज भासू लागते. बरेच पालक जेव्हा आपल्या बाळाला नवीन अन्नपदार्थ देण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांचा कल बाळाला भाज्या आणि फळे देण्याकडे असतो. परंतु बाळाला भाज्या आणि फळे इतर अन्नपदार्थांसोबत दिल्यास त्यामध्ये जास्त ऊर्जा असते आणि पौष्टिक मूल्यांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात वाढ होते. ओट्स हा असाच एक अन्नपदार्थ आहे आणि त्याबद्दल आपण ह्या लेखात चर्चा करूयात. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

व्हिडिओ: लहान मुलांसाठी ओट्स - फायदे आणि पाककृती

https://youtu.be/r5Lq2fx1Cro

ओट्स बाळांसाठी चांगले आहेत का?

ओट्स हे खनिजे, जीवनसत्त्वे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे लहान बाळांसाठी अन्नाचा तो एक चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे ओट्स तुमच्या बाळासाठी ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. ओट्सची पचनास देखील मदत होते आणि तांदळाच्या तुलनेत ओट्स पचायला देखील खूप हलके आहेत. ओट्स हा एकमेव अन्नपदार्थ आहे आणि लहान मुलांना त्याची सर्वात कमी ऍलर्जी होते. परंतु, तरीही कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया टाळण्यासाठी आपल्या बाळाला ओट्स खायला देण्यास सुरुवात करण्यापूर्वी बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

तुम्ही तुमच्या बाळाला ओट्स खायला द्यायला कधी सुरुवात करू शकता?

तुमचे बाळ सात महिन्यांचे झाल्यावर तुम्ही बाळाला ओट्स देण्यास सुरुवात करू शकता. ओट्स दलिया सारख्या सोप्या पाककृतींनी सुरूवात करा. तुमच्या बाळाला ओट्स खायला देताना त्यामध्ये फळे आणि भाज्या घालून बाळाला द्या. परंतु, बाळाच्या आवडीनिवडी आणि ऍलर्जी जाणून घेण्यासाठी तुम्ही एका वेळी फक्त एक जास्तीचा पदार्थ बाळाला द्या.

लहान मुलांसाठी ओट्सचे आरोग्यविषयक फायदे

ओट्स पौष्टिकतेने भरलेले असतात आणि विशेषत: लहान मुलांसाठी त्यांचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. त्यापैकी काही येथे आहेत:

. हाडांचा विकास आणि मज्जासंस्थेचे कार्य

ओट्समध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात आणि हि खनिजे तुमच्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक असतात. प्रत्येक खनिज आपल्या लहान मुलाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कसे योगदान देते याबद्दल येथे थोडक्यात माहिती दिलेली आहे.

. निरोगी वाढ

फोलेट, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, थायामिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन ह्यासारखी जीवनसत्वे असल्याने तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ओट्सची मदत होते.

. फ्री रॅडिकल्सच्या हल्ल्याचा धोका कमी करते

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात आणि शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या हल्ल्याचा धोका कमी करू शकतात आणि म्हणूनच, बाळाच्या आहाराचा तो एक आवश्यक भाग आहे.

. ऊर्जा प्रदान करते

प्रत्येक १०० ग्रॅम ओटचे पीठ बाळांना ४०० किलोकॅलरी ऊर्जा प्रदान करते. ही ऊर्जा लहान मुलांसाठी त्यांच्या विकासाच्या ह्या टप्प्यामध्ये आवश्यक असते आणि ती बाळाच्या वाढीसाठी मदत करते.

. पचन सुलभ होते

ओट्समध्ये आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते आणि ते आतड्यांच्या योग्य हालचालीसाठी आवश्यक असते. तुमच्या बाळाची पचनसंस्था अजूनही विकसित होत असल्यामुळे, ओट्स तुमच्या बाळाच्या प्रणालीवर कोणताही ताण न आणता पचनास मदत करू शकतात.

ओट्सचे पौष्टिक मूल्य

ओट्स तुमच्या बाळासाठी आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. येथे ओट्समध्ये असलेल्या पोषक तत्वांची संपूर्ण यादी आहे.

पोषण प्रकार प्रमाण (प्रती १०० ग्रॅम सर्व्हिंग) पोषण प्रकार
प्रमाण (प्रती १०० ग्रॅम सर्व्हिंग)
व्हिटॅमिन के ४.१ मिग्रॅ ऊर्जा ४०७ किकॅलरी
प्रथिने ११.०८ ग्रॅम एकूण लिपिड (चरबी) ९.५ ग्रॅम
कर्बोदके ६८.५ ग्रॅम फायबर १० ग्रॅम
साखर ३.८ ग्रॅम कॅल्शियम ५४ मिग्रॅ
लोह २.५ मिग्रॅ मॅग्नेशियम १०६ मिग्रॅ
फॉस्फरस ६१० मिग्रॅ पोटॅशियम ४२० मिग्रॅ
सोडियम ९.५ मिग्रॅ झिंक ५.३९ मिग्रॅ
थायामिन ०.८ मिग्रॅ रिबोफ्लेविन ३.३१३ मिग्रॅ
नियासिन १.० मिग्रॅ व्हिटॅमिन बी-६ ०.५६३ मिग्रॅ
फोलेट ५६ युजी व्हिटॅमिन ई ०.१ मिग्रॅ

तुमचे बाळ खाऊ शकेल असे ओट्सचे प्रकार

तुमच्या लहान बाळासाठी सुरक्षित असे ओट्सचे काही प्रकार इथे देत आहोत.

आता तुमच्या बाळाला कुठले ओट्स द्यायचे हे तुम्हाला आता माहिती झालेलं आहे त्याची निवड कशी करायचे आणि ते कसे साठवायचे ते आता पाहुयात.

ओट्सची निवड कशी करावी? तसेच ओट्सची साठवणूक कशी करावी?

तुमचे बाळ बहुतेक प्रकारचे ओट्स खाऊ शकत असले तरी, त्याला इन्स्टंट ओट्स किंवा जास्त प्रक्रिया केलेले ओट्स देण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे कारण त्यात कमी किंवा कोणतेही पोषण दिले जाणार नाही. म्हणूनच, तुमच्या बाळासाठी स्टील-कट किंवा नेहमीचे साधे ओट्स देणे चांगले. हवाबंद डब्यात ओट्सची साठवणूक करणे चांगले तसेच जास्त वेळ टिकण्यासाठी हे ओट्स थंड आणि कोरड्या जागेत ठेवा. जर तुमचे घर उबदार असेल तर तुम्ही कंटेनर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.

तुमच्या बाळाला ओट्स खायला घालताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

तुम्ही तुमच्या बाळाला ओट्सची ओळख करून देण्यापूर्वी, तुमच्या बाळाला या अन्नपदार्थाचा जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

लहान बाळांसाठी ओट्स रेसिपी

जर तुम्ही तुमच्या बाळाला ओट्सची ओळख करून देण्याची योजना तुम्ही आखत असाल तर येथे काही सोप्या पाककृती आहेत. ह्या पाककृतींची तुम्हाला मदत होऊ शकते.

. ऍपल ओट्स पोरीज रेसिपी

साहित्य

कृती

. साधी ओट्स पोरीज रेसिपी

साहित्य

कृती

. बेबी ओटमील आणि बनाना बार्स रेसिपी

ही कृती मोठ्या मुलांसाठी उत्तम आहे.

साहित्य

कृती

. केळी आणि ओट्स रेसिपी

साहित्य

कृती

. भाज्या घालून केलेले ओट्स

साहित्य

कृती

लहान बाळांसाठी ओट्स हे एक उत्तम पूरक अन्न आहे. तुमच्या बाळाला नवीन पदार्थ देताना हळूहळू सुरुवात करा. बालरोगतज्ञांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतरच बाळाला नवीन पदार्थ देण्यास सुरुवात करा., सर्वोत्तम फायद्यांसाठी, शक्यतो तुमच्या बाळाला सेंद्रिय अन्नपदार्थ देण्याचा प्रयत्न करा.

आणखी वाचा:

बाळांसाठी दलिया – आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपीज बाळांसाठी कस्टर्ड – तुम्ही करून पाहू शकता अशा पाककृती

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved