बाळ

बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन – ते का वापरावे आणि कसे तयार करावे?

उन्हात बसणे तुमच्यासाठी आनंददायक असू शकते परंतु तुमच्या बाळासाठी नाही. खरं तर, ते आपल्या लहान बाळासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच आपल्या बाळाच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध असले तरी नैसर्गिक गोष्टींची निवड करणे नेहमीच चांगले.

बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन का वापरावे?

बाळासाठी ओव्हर--काउंटर सनस्क्रीन वापरत असताना पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण ही उत्पादने त्वचेसाठी हानिकारक असलेल्या रेटिनाइल पॅलमेट, एकेए, रेटिनॉल आणि ऑक्सीबेन्झोन सारख्या रसायनांनी भरलेली असतात. जरी सूर्यापासून त्वचेचे रक्षण करण्याचे उद्दीष्ट असणार्‍या उत्पादनांमध्ये ह्या रसायनाचा वापर केला जात असला तरी त्वचेचा उन्हाशी संपर्क आल्यास रेटिनॉल हे रसायन त्वचेचा ट्यूमर आणि जखमांची निर्मिती वाढवू शकते. ऑक्सीबेन्झोन त्वचेमध्ये शोषले जाते आणि त्वचेच्या ऍलर्जीस कारणीभूत ठरू शकते आणि त्यामुळे हार्मोन्समध्ये व्यत्यय येऊ शकतो. अशा प्रकारे, ६ महिन्यांपेक्षा लहान मुलांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन वापरणे नेहमीच चांगले.

घरी तयार केलेल्या सनस्क्रीनमध्ये वापरल्या जाणार्‍या नैसर्गिक घटकांमध्ये असलेल्या एसपीएफ विषयी जाणून घ्या

सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफ) सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास सनस्क्रीन किती प्रमाणात सक्षम आहे ह्याचे मोजमाप करते. अतिनील किरणांमुळे त्वचेचा क्षोभ, त्वचेचा कर्करोग आणि त्वचेचे नुकसान होऊ शकते असे म्हणतात. जेव्हा नैसर्गिक घटकांचा विचार केला जातो तेव्हा आपण त्यामधील एसपीएफ चा अंदाज अगदी सहजपणे काढू शकतो.

. गाजर बियाणे तेल

गाजर बियाणे तेलात एसपीएफ ३०-४० असते. लहान मुलांसाठी हि पातळी थोडी जास्त असली तरीही, घरी केलेल्या सनस्क्रीनमध्ये घालण्यासाठी तो एक चांगला घटक आहे

. लाल रास्पबेरी बियाणे तेल

त्यात एसपीएफ सामग्री २५-३० दरम्यान आहे.

3. नारळ तेल

नारळ तेलात ४ ते ६ पर्यंत एसपीएफ असते परंतु ते सर्वात परवडणारे एसपीएफ तेल आहे.

. बदाम तेल

बदाम तेल बाळांसाठीच्या अनेक उत्पादनांमध्ये घटक म्हणून वापरले जाते आणि ते मालिशसाठी सर्वाधिक पसंत केलेले तेल आहे. या तेलात सुमारे ५ एसपीएफ आहे आणि हा एक चांगला पर्याय आहे कारण यामुळे त्वचेला व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात शोषून घेता येईल.

. शीया बटर

४ ते ६ च्या एसपीएफ असलेले शिया बटर, तुमच्या मौल्यवान बाळाचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते

बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन लोशन तयार करण्याची रेसिपी

सर्वोत्कृष्ट नैसर्गिक एसपीएफ घटकांकडे पाहिल्यानंतर, नैसर्गिक सनस्क्रीन घरी कसे बनवायचे ते पाहुयात.

. सनस्क्रीन घरी तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी

एक काचेचे भांडे, एक लहान सॉस पॅन आणि ब्रश घ्या आणि सनस्क्रीन तयार करण्यास प्रारंभ करा. तयार सनस्क्रीन लोशन ठेवण्यासाठी झाकण असलेल्या काही काचेच्या बरण्या घेण्यास विसरू नका. तुमच्या आवडीचे तेल १ औंस घ्या. वापरण्यास उत्तम तेल म्हणजे बदाम तेल, परंतु थोडे स्वस्तात बसण्यासाठी बदाम तेल आणि नारळाचे तेल समान प्रमाणात मिसळू शकता. तीळ, सूर्यफूल किंवा जोजोबा तेल १औंस तुम्ही घेऊ शकता. परंतु अधिक संवेदनशील त्वचेसाठी, जोजोबा तेलाची निवड करा. नॉन-नॅनो आकाराच्या झिंक ऑक्साईडची निवड करा कारण ते विषारी नसते आणि त्वचेला त्रास देत नाही, तसेच सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनसंरक्षण प्रदान करते.% झिंक ऑक्साईड २ ते ५ दरम्यान एसपीएफ देते शिया बटरचे ८ औंस घ्या. ह्याचे दोन चमचे सनस्क्रीन लोशनमध्ये काही जलरोधक गुणधर्म जोडतील

. सनस्क्रीन घरी तयार करण्यासाठीची कृती

बाळाच्या त्वचेवर सनस्क्रीन वापरण्यासाठी टिप्स

बाळाच्या त्वचेवर घरी तयार केलेले सनस्क्रीन वापरताना येथे काही महत्त्वपूर्ण टिप्स आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजेत हे घरी तयार केलेले सनस्क्रीन वापरण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या बाळाच्या त्वचेवर मसाज करण्यासाठी केळीसारख्या ताज्या फळांच्या साले देखील वापरू शकता. आणखी वाचा: बाळांना होणारा सनबर्न
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved