अन्न आणि पोषण

बाळांसाठी डाळीचे पाणी (वरणाचे पाणी) : फायदे आणि पाककृती

बाळाचे वय जेव्हा घन पदार्थ खाण्यायोग्य होईल तेव्हा बाळाला काय खायला द्यावे ह्याविषयी तुम्हाला खूप सल्ले मिळतील. परंतु सगळ्यांकडून बाळाला वरणाचे पाणी देण्याचा सल्ला हमखास दिला जातो. हे पाणी पौष्टिक असते. काही वेळा बाळाचे पालक, त्यामध्ये थोडी डाळ सुद्धा कुस्करून बाळांना देतात. वरणाच्या पाण्यासोबत बाळाला इतर पौष्टिक पदार्थ देणे बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते.

तूर किंवा मुगाच्या डाळीचे पाणी बाळाला का द्यावे?

लहान बाळांना मुगाच्या डाळीच्या वरणाचे पाणी देण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. लहान बाळांना त्यापासून मिळणारे फायदे असंख्य आहेत आणि ते तुमच्या बाळासाठी अत्यावश्यक आहेत.

लहान बाळांना डाळीचे पाणी देणे कधी सुरु करावे?

बहुतांशी पालक ६ महिन्यांच्या बाळाला डाळीचे पाणी देतात. कारण ह्याच वयात बाळे घन पदार्थ खाण्यास सुरुवात करतात. परंतु सर्वात आधी, बाळांना डाळीचे पाणी का द्यायचे हे माहिती असणे जरुरीचे आहे. काही जण बाळाला स्तनपानासोबत डाळीचे पाणी देतात तर काही जण बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी बाळाला डाळीचे पाणी देतात. डाळीचे पाणी देण्यासाठी आदर्श वय ६-८ महिने इतके आहे.

वरणाचे पाणी सुरु केल्यानंतर हळूहळू काही दिवसांनंतर वरण देण्यास सुरुवात करा. कारण वरणाच्या पाण्यात कर्बोदके, चरबी किंवा प्रथिने नसतात.

एका कप डाळीच्या पाण्यात एकाच सर्व्हिंगमध्ये, पौष्टिक घटक खालीलप्रमाणे असतात.

पोषण प्रमाण
ऊर्जा १३० कॅलरी
कर्बोदके २२.४ ग्रॅम
प्रथिने ९.१ ग्रॅम
तंतुमय पदार्थ ३.१ ग्रॅम
चरबी ०.५ ग्रॅम
व्हिटॅमिन ए १८.३ एमसीजी
व्हिटॅमिन बी ९ ५२.३ मिग्रॅ
नियासिन ०.९ मिग्रॅ
रिबोफ्लेविन ०.१ मिग्रॅ
थायमिन ०.२ मिग्रॅ
झिंक १ मिग्रॅ
सोडियम १०.२ मिग्रॅ
फॉस्फरस १.७ मिग्रॅ
पोटॅशियम ४२९ मिग्रॅ
मॅग्नेशियम ४१.४ मिग्रॅ
लोह १.५ मिग्रॅ
कॅल्शियम २८ मिग्रॅ

लहान बाळांसाठी डाळीचे पाणी कसे तयार करावे?

लहान मुलांसाठी मसूरचे सूप तयार करणे ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही सूप तयार करण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी वापरत असलेली सर्व भांडी निर्जंतुक करून घ्या आणि कोणत्याही बाह्य पदार्थांपासून ते मुक्त असल्याची खात्री करा.

आवश्यक साहित्य

कृती

  1. डाळ धुवून स्वच्छ करा आणि कुकरमध्ये हळद, पाणी आणि तूप टाका. डाळ मऊ होण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये ५ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्या.
  2. मिश्रण वेगळे करण्यासाठी चाळणीचा वापर करा आणि पाणी वेगळे करा . तुमचे मूल चवीनुसार कशी प्रतिक्रिया देते त्यानुसार, फक्त सुरुवातीच्या सर्विंगसाठी एक चिमूटभर साखर घाला.
  3. बाळाला वरणाचे पाणी देण्यापूर्वी, ते जास्त गरम नाही ना हे पहा.
  4. एकदा बाळाने वरणाचे पाणी घेणे सुरु केले आणि त्याने १० महिन्यांचा टप्पा गाठला की, तुम्ही हे वरणाचे पाणी आणखी घट्ट करू शकता. सुसंगतता समायोजित करण्यासाठी आणि ते पातळ करण्यासाठी त्यामध्ये उकळलेले पाणी घाला.

लहान बाळांना डाळीचे पाणी देताना लक्षात ठेवाव्यात अश्या काही टिप्स

४ महिन्यांच्या आणि त्याहून अधिक वयाच्या बाळाला वरणाचे पाणी देण्याआधी, बाळाला कोणतीही समस्या येणार नाही ह्याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही टिप्स पाळू शकता.

तुमच्या बाळाला घन पदार्थांची ओळख करून देण्याची हीच योग्य वेळ आहे का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुमचे बाळ त्यासाठी तयार आहे का हे जाणून घेण्यासाठी येथे काही मार्ग आहेत:

  1. बाळाला बसवल्यावर तो मान धरतो
  2. तुमचे बाळ जेवणाच्या टेबलावर मांडलेल्या अन्नामध्ये रुची दाखवत आहे.
  3. तुमचे बाळ त्याच्या जिभेची हालचाल करू लागते.
  4. तुमचे बाळ अन्न आत घेण्यासाठी तोंड उघडण्यास सक्षम आहे.

डाळीच्या पाण्याचा बऱ्याच बाळांना फायदा होतो आणि बाळांना घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी तो एक उत्तम मार्ग आहे. बाळांची जीभ संवेदनशील असल्याने त्यांना डाळीच्या पाण्याची चव आवडते. हळुहळु बाळाला चवीतील बदल आवडू लागतील. थोडीशी घट्ट डाळ खाण्यासाठी देखील बाळ तयार असेल.

आणखी वाचा:

बाळांसाठी शेळीचे दूध: फायदे आणि रेसिपी बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved