अन्य

बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी

जीईआरडी किंवा गॅस्ट्रोऊसोफेगल रिफ्लक्स डिसीज ह्या आजारामध्ये लोअर यूसोफ्यागल स्फिन्क्टर किंवा एलईएस ह्या स्नायूवर परिणाम होतो. हा स्नायू अन्ननलिकेच्या खालच्या भागात पोटाजवळ असतो. हा आजार मोठी माणसे आणि बाळे दोघांना होऊ शकतो.

बाळांमधील रिफ्लक्स आणि जीईआरडी म्हणजे काय?

मोठ्यांमधील जीईआरडी मुळे गॅस होणे, जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. बाळांमध्ये जीईआरडी मुळे नेहमीपेक्षा जास्त लाळ गळते, उलट्या आणि अस्वस्थता येते. त्यामुळे श्वसनास त्रास होतो आणि पोटदुखी सुद्धा होते. जीईआरडी मुळे लहान बाळांमध्ये ऍसिड रिफ्लक्स होतो.मोठ्यांप्रमाणेच बाळांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टीनल रिफ्लक्स मुळे कुठलाही धोका नसतो. जीईआरडी किंवा रिफ्लक्स ही गंभीर स्थिती समजली जात नाही आणि त्यामुळे मुलाची वाढ किंवा क्षमता ह्यावर परिणाम होत नाही.

जीईआरडी आणि रिफ्लक्स किती सामान्यपणे आढळते?

बाळांमध्ये खाल्ल्यानंतर दूध किंवा अन्न बाहेर काढणे हे सामान्यपणे आढळते. परंतु, जर असे सारखे होत राहिले तर जीईआरडी होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचवेळा, आतड्यांची हालचाल नीट झाली नाही तर त्यामुळे जीईआरडी होऊ शकतो. बाळांची पचनसंस्था विकसित होत असते आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या आतड्याचा खालचा भाग हा तितकासा सशक्त नसतो आणि त्यामुळे उलटी होण्याचा त्रास होतो आणि त्याचे रूपांतर अगदी सहजगत्या जीईआरडी मध्ये होते.अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की नॅशनल डायजेस्टिव्ह क्लिअरिंग हाऊस नुसार बऱ्याच मुलांना त्यांच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत जीईआरडी चा त्रास होणे कमी होते. त्यामुळे असे गृहीतक मांडले गेले की बाळाची विकसित होत असलेली पचनसंस्था ह्या रिफ्लक्सचे कारण असू शकते.

बाळांमधील ऍसिड रिफ्लक्स आणि जीईआरडी ची कारणे काय आहेत?

बऱ्याच वेळा बाळाच्या आतड्याचा खालचा भाग (एलईएस) नीट विकसित झालेला नसतो किंवा त्याचे कार्य नीट होत नसते. काही वेळा, आईच्या आहारामुळे तसे होते, विशेषकरून बाळ स्तनपान घेतानाच्या टप्प्यावर हा त्रास होतो. मोठ्या मुलांमध्ये जीईआरडी होण्याची खूप कारणे असतात. सर्वात महत्वाचा मुद्धा लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे जर तुमच्या बाळाला लहान वयात हा आजार झाला असेल तर मोठेपणी सुद्धा होण्याची शक्यता असते.

लक्षणे आणि चिन्हे

जीईआरडीची लक्षणे ही समजण्यासाठी खूप अवघड असतात कारण बाळाला पाजल्यावर बाळाला उलटी झाली कि जीईआरडी मुळे ह्यातील फरक लक्षात येत नाही. जर दोन्हीची लक्षणे सारखी असतील तर बाळाला ऍसिड रिफ्लेक्स झाला आहे का किंवा जीईआरडी झाला आहे हे समजत नाही.त्याचे नीट निदान होण्यासाठी, तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधणे सर्वात उत्तम. तो पर्यंत तुम्ही इतर लक्षणांकडे लक्ष ठेऊ शकता. बाळाने थोडेसे दूध बाहेर काढणे आणि थोडी उलटी करणे हे नॉर्मल आहे. परंतु, जर बाळाने जोरदार उलटी केली आणि वेदना होऊन ते रडू लागले असेल तर ते जीईआरडी चे लक्षण असू शकते.
जीईआरडी ची लक्षणे चांगली समजून घेण्यासाठी तुमच्या जवळील आरोग्यतज्ञांची भेट ह्या.

जीईआरडी आणि रिफ्लक्सचे निदान कसे होते?

बऱ्याच वेळा जीईआरडी चे निदान लक्षणांवरून होते. बाळाच्या आहाराचा इतिहास आणि वाढीच्या तक्त्यावरून ह्याची सुद्धा निदान होण्यास मदत होते. परंतु जीईआरडीचे निदान होण्यासाठी काही तपासण्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात. जर तुमच्या डॉक्टरांना वाटले तर तुमचे डॉक्टर तुम्हाला जीईआरडी आणि रिफ्लक्स साठीच्या ह्या तपासण्या करण्यास सांगतील.

बाळांना होण्याऱ्या जीईआरडी चे धोके

आधीच्या काही आजारांमुळे आणि बाहेरील कारणांमुळे तुमच्या बाळाला जीईआरडी चा धोका असतो. खूपशा ऍलर्जिक प्रतिक्रियांमुळे किंवा संसर्गांमुळे जीईआरडी वाढतो आणि आणि ते त्याचे कारण पण असू शकते. जर बाळाची पचनसंस्था मजबूत नसेल तर जीईआरडी होऊ शकतो.

बाळांमधील ऍसिड रिफ्लक्स साठी उपचारपद्धती

जीईआरडी च्या तीव्रतेनुसार उपचारपद्धती बदलते

औषधोपचार

जीईआरडी वर औषधांनी उपचार केला जाऊ शकतो. सौम्य प्रकारचा जीईआरडी तोंडातून औषधे देऊन बरा करता येऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपचार म्हणजे नाश्त्याच्या आधी ३० मिनिटे औषधे घेणे आणि थोड्या अधिक तीव्र प्रकरणांमध्ये रात्रीच्या जेवणाच्या आधी ३० मिनिटे औषधे घेणे होय. जीईआरडी चे लक्षण म्हणजे खूप जास्त ढेकर देणे होय आणि तुम्ही त्यावर उपचार म्हणजे अँटासिड्स घेऊ शकता. खूप तीव्र प्रमाणातील जीईआरडी साठी डॉक्टर औषधे इंजेक्शनद्वारे देऊ शकतात कारण औषंधानी पटकन परिणाम करणे महत्वाचे आहे. लहान बाळांमध्ये ते कमी प्रमाणात दिले जाऊ शकते. तुमच्या बाळांना औषधे देण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधा.

रिफ्लक्स नियंत्रित राहण्यासाठी औषधे

रिफ्लक्स नियंत्रित राहण्यासाठी वेगवेगळी औषधे (जसे की पॅन्टोप्राझोल) मदत करतात. ही औषधे औषधांच्या दुकानात विकली जातात. तुमच्या मुलाला कुठलेही औषध देण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या.

शस्त्रक्रिया

खूप गंभीर प्रकरणांमध्ये, काही लोकांना जीईआरडी साठी सर्जरीची गरज भासू शकते. हे लहान बाळांसाठी खूप दुर्मिळ आहे.गंभीर प्रकरणांमध्ये, लहान बाळांना श्वसनाचा त्रास होतो किंवा ऍसिड रिफ्लक्स मुळे वाढ थांबली असेल तर तुमचे बालरोगतज्ञ तुम्हाला सर्जरी सुचवतील त्यास 'फंडोप्लिकेशन' असे म्हणतात. ह्या सर्जरीमध्ये, एलईएस घट्ट करून ठेवतात ज्यामुळे कमी ऍसिड अन्ननलिकेत परत जाईल. ही शस्त्रक्रिया खूप दुर्मिळ असते आणि जर औषधांचा काहीच परिणाम दिसला नाही तरच ती केली जाते.

लहान बाळे जीईआरडी वर मात करतात का?

एक वर्षाचे होईपर्यंत ९५%बाळे जीईआरडीवर मात करतात. बऱ्याच कमी टॉडलर्स मध्ये ह्याच लक्षणे दिसतात. परंतु, मोठ्या मुलांना सुद्धा असे होऊ शकते.

बेबी जीईआरडी किती काळ राहतो?

बरीचशी बाळे एक वर्षांची होईपर्यंत त्यावर मात करतात. पुढील दोन वर्षात तुम्हाला जीईआरडी सगळी लक्षणे नष्ट झालेली दिसली पाहिजेत जीईआरडी मुळे होणाऱ्या समस्या जीईआरडी मुळे खालील गोष्टी होऊ शकतात

रिफ्लक्स असताना बाळाला दूध पाजण्याविषयी टिप्स

बाळाला दूध पाजताना, तुम्ही खालील काही गोष्टी करून बाळाची अस्वस्थता खूप कमी करू शकता बाळाचा ऍसिड रिफ्लक्स घालवण्यासाठी घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदल
जीईआरडी म्हणजे तुमच्या बाळाला खूप अस्वस्थ करणारी स्थिती आहे. तुमच्या बाळाचा ताण कमी करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलून तो कमी करण्यासाठी विविध पर्याय जाणून घ्या.आणखी वाचा:बाळांमधील हिरवे शौच बाळांमधील अतिसारावर (जुलाब) १५ घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved