आरोग्य

बाळांना डास चावण्याची कारणे आणि उपाय

आपल्या बाळाभोवती डास घोंगावत असताना घालवलेल्या रात्री सहज विसरता येत नाहीत. ह्या रक्त शोषणाऱ्या कीटकांसाठी छोटी बाळे म्हणजे अगदी सोपे लक्ष्य आहेत. जर तुमच्या बाळाला डास चावत असतील तर त्याविषयीच्या माहितीसाठी ह्या लेखाचे वाचन सुरु ठेवा. घरगुती उपाय वापरून त्यावर उपचार करा आणि पुन्हा तसे होऊ नये म्हणून काळजी घ्या.

डास चावण्याची कारणे

बाळे डासांचा सामना करण्यास तयार नसतात आणि म्हणूनच ते त्यांच्यासाठी आकर्षक लक्ष्य बनतात. तुमच्या बाळाला डास चावण्याची कारणे खाली दिलेली आहेत.

1. अशुद्ध वातावरण

साचलेले पाणी आणि वाहणारे आणि उघडे कचऱ्याचे डबे डासांना आकर्षित करतात. जर हे सामान्यतः आपल्या भागात आढळले तर आपल्या बाळाला डास चावण्याचा धोका आहे.

2. उघडी त्वचा

जेव्हा आपण आपल्या बाळाला शॉर्ट पॅन्ट्स / नॅपिज आणि स्लीव्हलेस टी-शर्ट घालता तेव्हा बाळ डासांसाठी एक सोपे लक्ष्य बनते.

3. ओलसरपणा

ओले टॉवेल्स आणि कपडे, गळके छप्पर आणि ओलसरपणा हे डासांना आमंत्रण आहे आणि घरात जेव्हा लहान मूल असते तेव्हा ते टाळले पाहिजे.

4. उघड्यावरचे खाद्यपदार्थ

अन्नाच्या वासामुळे देखील डास आकर्षित होतात. जेव्हा घरात मूल असेल तेव्हा आपण स्वच्छता राखली पाहिजे.

5. लोशन किंवा क्रीम

जर तुमच्या बाळाच्या बेडरूममध्ये तेले, लोशन आणि क्रिम असतील तर ते डास चावण्याचे एक कारण असू शकते. वासयुक्त पावडर देखील टाळावी.

6. घाम

डास घाम आणि त्याच्या उबदारपणाकडे आकर्षित होतात. जर आपल्या बाळाला घाम येत असेल तर तो पुसण्यासाठी मऊ टॉवेल वापरा. आपल्या लहान बाळाला घाम येऊ देऊ नका.

7. पाण्यावर आधारित सजावट

फॅन्सी धबधबे, चमकणारे दिवे आणि पाणी वाहण्याचा आवाज आपल्या घरास एक अनोखा देखावा देतील, परंतु डासांना पैदास करणारे ते मैदान आहे. आपले निर्दोष बाळ अशा घरगुती डासांसाठी सोपे लक्ष्य बनू शकते.

तुमच्या बाळाला डास चावले आहेत हे कसे ओळखावे?

तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तुमच्या बाळाला डास चावले आहेत हे लक्षात घ्या

आपल्या बाळाला डास चावल्यास त्यावर कसा उपचार करावा?

बाळाची त्वचा बरी होण्यासाठी डास चावल्यानंतर हे परिणामकारक उपाय करून पहा

डास चावण्यावर घरगुती उपचार

मुलांना डास चावण्यापासून मुक्त होण्यासाठी हे उपाय प्रभावी आहेत आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. आवश्यक पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत!

प्रतिबंध

उपचार हा रोग बरा करण्यापेक्षा नेहमीच चांगला असतो. म्हणूनच बाळाला डास चावण्यापासून रोखण्यासाठी पुढील उपाय करा.

1. मच्छरदाण्यांनी झाका

आपल्या बाळाच्या पाळण्यावर आणि कार सीट वर एक जाळीदार मच्छरदाणी पसरवा. त्यामुळे हे भयानक कीटक बाळाच्या त्वचेच्या संपर्कात येत नाहीत.

2. आपल्या बाळाला झाकून ठेवा

आपण नेहमीच आपल्या मुलाचे हात व पाय पूर्ण कपड्यांनी झाकून ठेवावे, विशेषत: पावसाळ्यात हे जरूर करावे.

3. कीटक दूर करणारे औषध वापरा

आपल्या मुलाच्या त्वचेवर कधीही कीटकांचे औषध पुन्हा लावू नका. त्याऐवजी ते आपल्या मुलाच्या कपड्यांवर वापरा. कारण त्यामध्ये डीईईटी असतात, जे दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असुरक्षित असतात.

4. आपल्या बाळास पाण्यापासून दूर ठेवा

साचलेले पाणी आणि खूप झाडी असलेल्या भागात डासांची पैदास जास्त होते. जेव्हा आपण आपल्या बाळास फिरण्यासाठी बाहेर काढाल तेव्हा अशा ठिकाणे टाळा.

5. खिडक्यांवर जाळी लावा

जाळी किंवा पडद्याने खिडक्या झाकून ठेवा. जाळ्या लावल्यास डास घरात येत नाहीत. डासांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही टेबल फॅन सुद्धा सुरु करू शकता.

6. दरवाजे बंद ठेवा

अंधार पडायच्या आत दारे खिडक्या लावल्यास तुमच्या बाळाचे डास चावण्यापासून संरक्षण होऊ शकते.

7. रंगांकडे लक्ष द्या

मच्छर गडद निळ्या आणि काळ्या रंगाकडे आकर्षित होतात, त्यामुळे आपल्या बाळाला हलक्या रंगाचे कपडे घाला. आपल्या मुलाच्या खोलीत अल्ट्राव्हायोलेट, निळा किंवा फ्लोरोसंट बल्ब आहेत किंवा नाही हे तपासा आणि असल्यास ते बदलून टाका.

डॉक्टरांना कधी फोन कराल?

डास हे विविध रोगांचे प्रभावी वाहक आहेत आणि लहान मुलांपासून ते दूर ठेवले पाहिजेत. आपल्याला खाली नमूद केलेली लक्षणे दिसल्यास आपल्या बाळाला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल: डासांना कायमच दूर ठेवणे शक्य नाही. तथापि, डास चावण्याची शक्यता कमी करता येते. जेव्हा आपले बाळ झोपलेले असते किंवा खेळत  असते, तेव्हा आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करा. आपले घर डासमुक्त ठेवण्यासाठी दक्षता घेणे सर्वात आवश्यक आहे. आणखी वाचा: बाळाच्या त्वचेवरील फोडांवर कसे उपचार करावेत? नवजात बाळाच्या अंगावरील लव: कारणे आणि निदान
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved