आरोग्य

बाळांमधील क्रेडल कॅप वर उपचार करण्यासाठी १५ सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय

    In this Article

क्रॅडल कॅप ही त्वचेची एक समस्या आहे आणि ती लहान मुलांमध्ये आढळते. डोक्याच्या टाळूवरची त्वचा बर्फाच्छादितफ्लेक्ससारखे दिसते. मोठ्या माणसांच्या डोक्यात कोंडा झाल्यावर जसे दिसते तसे लहान बाळांच्या टाळूकडील भाग दिसतो. काही मुलांमध्ये केस गळणे, खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा येणे आणि काही संसर्गजन्य आजार इत्यादी समस्या आढळू शकतात. वैद्यकीयभाषेत ह्यास 'इनफंटाईल सेबॉऱ्हिक डर्माटायटीस' असे म्हटले जाते. ही स्थिती प्रामुख्याने त्वचेतील तेल ग्रंथींच्या अतिस्रावामुळे उद्भवते. त्यामुळे त्वचेतील छिद्रे मृत पेशींसह बंद होतात. आईचे संप्रेरक बाळापर्यंत जाणे, मालासेझिया यीस्ट संसर्ग, स्वच्छता न राखणे आणि काही पौष्टिक कमतरता इत्यादी कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते.

लहान मुलांच्या क्रॅडल कॅपसाठी १५ घरगुती उपचार अवश्य वापरून पहा

लहान मुलांमध्ये क्रॅडल कॅपचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही घरीच प्रयत्न करू शकता. त्यासाठी खाली सूचीबद्ध केलेले काही प्रभावी घरगुती उपाय आहेत. हे सर्व घरगुती उपचार करून तुम्ही बाळाचे डोके सौम्य बेबी शैम्पूने किंवा बालरोगतज्ञांनी क्रॅडल कॅपसाठी लिहून दिलेल्या विशेष शैम्पूने धुवू शकता.

१. खोबरेल तेल

खोबरेल तेल नेहमी लहान जखमांसाठी अँटीफंगल आणि अँटीबैक्टीरियल एजंट म्हणून वापरले गेले आहे.  क्रॅडल कॅप असलेल्या बाळांना होणाऱ्या संसर्गाचा सामना करण्यासाठी खोबरेल तेल खूप प्रभावी आहे.ते अगदी सहज उपलब्ध होते आणि स्कॅल्पसाठी चांगले मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते. नारळाच्या तेलाचे दोन थेंब हातात घ्या आणि तळहातामध्ये चोळून गरम करा.आता बाळाच्या टाळूच्या ज्या भागाच्या त्वचेवर परिणाम झाला आहे त्यावर तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.सुमारे वीस मिनिटे बाळाला विश्रांती घेऊ द्या आणि मसाज करताना स्कॅल्प टिश्यूचे फ्लेक्स काढून टाका. वीस मिनिटांनंतर, कोमट पाण्याने आणि शैम्पूने तेल धुवून टाका.

२. ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगर टाळूचा कोरडेपणा कमी करण्याचे काम करते. ऍपल सायडर व्हिनेगरचे दोन भाग एक भाग पाण्यात मिसळून ते पातळ करा.हे मिश्रण टाळूवर लावा आणि सुमारे पंधरा मिनिटे तसेच राहू द्या. केस कोमट पाण्याने धुवा आणि आठवड्यातून दोनदा पुन्हा करा. ते बाळाच्या डोळ्यात जाणार नाही याची खात्री करा

३. व्हॅसलीन

व्हॅसलीन किंवा कोणतीही शुद्ध केलेली पेट्रोलियम जेली त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच डोक्यातील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. तुम्ही एक चमचा व्हॅसलीन घेऊन टाळूवर लावू शकता आणि रात्रभर तसेच ठेऊ शकता.दुसऱ्या दिवशी, ते पाण्याने धुवा. जेली स्वच्छ धुण्यासाठी थोडा सौम्य शैम्पू लावा.

४. ऑलिव तेल

ऑलिव्ह ऑईल हे विशेषतः त्वचेसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे कारण त्यात व्हिटॅमिन ई असते. ऑलिव्ह ऑइलमधील व्हिटॅमिन ई त्वचेचे पोषण करते आणि संक्रमणांपासून संरक्षण करते.काही चमचे ऑलिव्ह ऑईल लावून टाळूला हलक्या हाताने मसाज करा. काही तास किंवा रात्रभर विश्रांती द्या आणि टाळूला पोषण मिळण्यासाठी सौम्य शैम्पूने स्वच्छ धुवा. लहान मुलांमध्ये क्रॅडल कॅपसाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

५. बेकिंग सोडा

जरी बेकिंग सोडा लहान मुलांसाठी खूप स्ट्रॉंग पदार्थ वाटत असला तरीसुद्धा छिद्रांमध्ये अडकलेले तेल काढून टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो.बेकिंग सोड्याचे मिश्रण पाण्यात मिसळून टाळूवर लावा आणि पंधरा मिनिटांनंतर स्वच्छ धुवा. बेकिंग सोड्याची अल्कधर्मी पीएच टाळूवरील पीएच न्यूट्रल करते आणि टाळूवरील फ्लेक्स काढणे सोपे होते.परंतु हा उपयोग बाळांपेक्षा लहान मुलांसाठी केलेला चांगला.

६. टी ट्री ऑइल

निवडक औषधांच्या दुकानात उपलब्ध असलेले टी ट्री ऑइल हे प्रौढांद्वारे वापरले जाणारे एक लोकप्रिय अँटी-एक्ने औषध आहे. त्याच तत्त्वाचा वापर बाळांसाठी सुद्धा करून घेतला जातो. हे तेल ग्रंथींचा अतिरिक्त स्राव नियंत्रित करून, बाळांमध्ये क्रॅडल कॅपसाठी देखील उपयोगी ठरते.टी ट्री ऑइल वापरण्यासाठी, ते बदामाच्या तेलात १:१० ह्या प्रमाणात मिसळा आणि पातळ केलेले टी ट्री तेल टाळूवर हलक्या हाताने मसाज करून वापरा.सुमारे वीस मिनिटे ते तसेच राहू द्या आणि बेबी शैम्पूने धुवा.

७. व्हेजिटेबल ऑइल

बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही व्हेजिटेबल किंवा खनिज तेल देखील क्रेडल कॅपसाठी एक चांगला उपाय आहे. याचा उपयोग बाळाच्या त्वचेला शांत करण्यासाठी आणि त्वचेचे खवले सैल करण्यासाठी केला जाऊ शकतो. सुरक्षित बेबी शैम्पूने धुण्यापूर्वी हे तेल तुम्ही बाळाच्या टाळूवर लावू शकता आणि सुमारे दोन तास तसेच राहू देऊ शकता.

८. शिया बटर

बाजारात उपलब्ध असलेले शिया बटर हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे आणि ते संक्रमित त्वचेला शांत करते. शिया बटर बाळाच्या टाळूवर लावा. थोडा वेळ तसेच राहू द्या आणि मऊ ब्रश वापरून त्वचेवरील खवल्यांचा थर हळू हळू घासून टाका.नंतर मऊ कापडाने शिया बटर हलकेच पुसून टाकू शकता किंवा पाण्याने धुवू शकता.

९. बेबी ब्रश

मऊ आणि लवचिक ब्रिस्टल्स असलेले अनेक बेबी ब्रशेस बाजारात उपलब्ध आहेत. त्वचेला समसमान करण्यासाठी आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी नियमित अंतराने ह्या बेबी ब्रशने बाळाची टाळू विंचरून घ्या. असे केल्याने केवळ स्वच्छता राखण्यातच मदत होत नाही तर टाळूवरील छिद्रे बंद होण्यापासून बचाव होतो.

१०.  एवोकॅडो तेल

एवोकॅडो हे त्याच्या पौष्टिक मूल्यासाठी ओळखले जाते आणि फळांमधून काढलेले तेल आवश्यक रसायनांनी भरलेले असते. हे तेल प्रभावीपणे बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यासाठी मदत करते. टी ट्री ऑईलच्या दहा भागांमध्ये एव्होकॅडो तेल पातळ करा आणि टाळूला लावण्यासाठी मिश्रण तयार करा.लावल्यानंतर साधारण पणे १५ मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्या आणि सुरक्षित शाम्पूने स्वच्छ धुवा. डोळ्यांशी संपर्क होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.

११. आईचे दूध

आईचे दूध हे जादूचे औषध आहे. आईच्या दुधात सर्व प्रकारचे पोषक घटक आणि प्रतिपिंडे असतात. हे सर्वज्ञात आहे की नवजात बाळाच्या वाढीसाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.परंतु, क्रेडल कॅपसाठी देखील घरगुती उपाय म्हणून ते बऱ्याच काळापासून वापरले जात आहे. संवेदनशील त्वचेला शांत करण्यासाठी थोडे आईचे दूध बाळाच्या डोक्यावर तुम्ही लावू शकता. हे बाळाच्या त्वचेसाठी निरुपद्रवी आहे आणि जास्त काळ टिकू शकते.

१२. औषधी बेबी शैम्पू

बुरशीविरोधी प्रभाव असलेले काही सौम्य बेबी शैम्पू अनेक औषधांच्या दुकानांमध्ये काउंटरवर उपलब्ध आहेत.तुम्ही ते पातळ करून तुमच्या बाळाच्या टाळूला दररोज किंवा दोन दिवसांतून एकदा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी लावू शकता.केस धुतल्याने मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि बुरशीजन्य संसर्ग काढून टाकण्यास मदत होते .

१३. बदाम तेल

बदामाचे तेल हे आणखी एक महत्त्वाचे तेल आहे. ह्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते.हे तेल सामान्यतः निरोगी त्वचेसाठी घरगुती उपाय म्हणून सुचवले जाते आणि ते क्रॅडल कॅपसाठी देखील चांगले काम करते. बदामाचे तेल टाळूच्या संक्रमित भागांवर लावावे आणि मालिश करावे.थोडा वेळ तसेच ठेवून हे तेल ओल्या कापडाने तुम्ही पुसून घेऊ शकता.

१४. कॅलेंडुला

कॅलेंडुला ही एक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती तिच्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या घटकांसाठी आणि बुरशीविरोधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. कॅलेंडुला क्रीम गंभीर संसर्ग झालेल्या भागात लावले जाऊ शकते.हे क्रॅडल कॅपसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि हर्बल सोल्यूशन आहे आणि बाजारात देखील उपलब्ध आहे. हे क्रीम क्रॅडल कॅपवर आश्चर्यकारकरित्या काम करते.परंतु या उपायाचा एकमात्र तोटा म्हणजे ही क्रीम्स थोडी महाग आहेत.

१५. कोरफड

कोरफड शरीराच्या त्वचेला थंड करते. त्वचेच्या संसर्गासाठी असलेल्या अनेक औषधांमध्ये कोरफडीमध्ये असलेल्या घटकांचा समावेश असतो.कोरफडीचा ताजा गर बाळाच्या डोक्याच्या त्वचेवर तुम्ही लावू शकता. त्याच्या कूलिंग इफेक्टमुळे, कोरफडीचा गर लहान मुलांसाठी सावधगिरीने वापरणे आवश्यक आहे. जळजळ कमी करण्यासाठी जेल काही मिनिटांसाठी बाळाच्या डोक्यावर तसेच राहू द्या.
क्रॅडल कॅप ही लहान मुलांमध्ये सामान्यपणे आढळणारी त्वचेची एक स्थिती आहे आणि नैसर्गिक घरगुती उपचारांनी सहजपणे ती बरी होऊ शकते. जर घरगुती उपचारांनी ही समस्या कमी होत नसेल तर तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घेऊ शकता. चांगली स्वच्छता राखणे आणि ह्युमिडिफायर वापरणे हे उपाय करून तुम्ही बाळांमध्ये आढळणारी क्रेडल कॅपची समस्या रोखू शकता. आणखी वाचा: बाळांमधील क्रेडल कॅपची समस्य बाळांना येणारे फोड: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved