आरोग्य

बाळांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन): लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध

जर तुमचे बाळ खूप वेळ तीव्र उन्हात असेल किंवा उलट्या अथवा अतिसारामुळे त्याच्या शरीरातील द्रवपदार्थ कमी झाले असतील तर त्या बाळाला डिहायड्रेशन होण्याची जास्त शक्यता असते. या लेखामध्ये दिलेली डिहायड्रेशनची चिन्हे आणि लक्षणे वाचून बाळाला या अवस्थेपासून वाचवण्याचे प्रॅक्टिकल उपाय येथे दिले आहेत. डिहायड्रेशनचे स्वरूप सौम्य असतानाच त्यावर उपचार करा.

डिहायड्रेशन म्हणजे काय?

दिवसभरात आपल्या शरीरातील पाण्याचा वेगवेगळ्या म्हणजेच घाम, लघवी, शौच आणि अश्रूंच्या स्वरूपात ऱ्हास होतो. हे शरीरातील ऱ्हास झालेले द्रव आणि त्याचे क्षार तुम्ही घेतलेल्या द्रवपदार्थाद्वारे आणि दिवसभर आपण घेत असलेल्या आहारामुळे भरून काढले जाते, यामुळे आपल्या शरीरास आवश्यक पातळीइतके हायड्रेट राहण्यास मदत होते. घरात किंवा घराबाहेर दोन्ही ठिकाणी दीर्घकाळ खेळल्यामुळे मुले मोठ्या प्रमाणात द्रव आणि ग्लायकोकॉलेट गमावू शकतात. जर तुमच्या बाळास अस्वस्थ वाटत असेल आणि ताप, अतिसार किंवा उलट्यांचा त्रास असेल तर ते डिहायड्रेशनचे कारण असू शकते. तसेच, काही आजारांमुळे त्यांना पाणी किंवा इतर द्रव पिणे कठीण होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा निर्जलीकरण होऊ शकते

बाळांमध्ये डिहायड्रेशन होणे किती सामान्य आहे?

जेव्हा मूल द्रवपदार्थांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पुरेसे द्रव घेत नाही, तेव्हा निर्जलीकरण होऊ शकते. प्रौढांपेक्षा बाळांना डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो, विशेषत: जेव्हा त्यांना पोटातील विषाणू किंवा गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा संसर्ग होतो तेव्हा हा धोका जास्त असतो. बाळाचे छोटे शरीर जेव्हा बर्‍याच प्रमाणात द्रव साठवण्यास असमर्थ असते तेव्हा त्वरीत निर्जलीकरण होऊ शकते. डिहायड्रेटेड बाळामुळे आई-वडिलांना खूप चिंता उद्भवू शकते परंतु जर तो सौम्य असताना लक्ष दिले तर ते डिहायड्रेशन सहजपणे सुधारले जाऊ शकते आणि गंभीर परिस्थिती टाळता येते.

नवजात अर्भकांमध्ये आढळणारी निर्जलीकरणाची चिन्हे आणि लक्षणे

ओल्या डायपर आणि लंगोटाची संख्या कमी होणे हे नवजात मुलांमध्ये डिहायड्रेशन झाल्याचे खात्रीशीर लक्षण आहे. डिहायड्रेशनचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो, म्हणूनच बाळाच्या क्रियाकलापांवर बारीक लक्ष ठेवा कारण डिहायड्रेशन झाल्यास बाळाला जास्त वेळ झोपावेसे वाटू शकते. डिहायड्रेशनची सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

खाली दिलेली लक्षणे तीव्र निर्जलीकरणाची आहेत

बाळांमध्ये डिहायड्रेशनची कारणे

बाळ डिहायड्रेट होण्याची अनेक कारणे आहेत आणि ती खालीलप्रमाणे आहेतः

. अतिसार आणि उलट्या

गॅस्ट्रोएन्टेरिटिस सारख्या पोटाचा विषाणूमुळे बाळाला अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. अतिसारामुळे बाळाच्या आतड्यांमध्ये कोणताही द्रवपदार्थ रहात नाही आणि त्यामुळे बाळाला त्वरीत निर्जलीकरण होते.

. ताप

निर्जलीकरण होण्याचे एक सामान्य कारण म्हणजे ताप. तापामुळे आपल्या बाळाला घाम फुटतो आणि शरीर थंड होत असताना बाष्पीभवन होते. सामान्य श्वासापेक्षा वेगवान श्वासोच्छवासामुळे आणखी द्रव-तोटा होऊ शकतो

. दूध आणि इतर द्रवपदार्थाचे सेवन कमी

जर घशात खवखवले असेल किंवा दात येत असतील तर बाळ स्तनपान घेण्यास नकार देऊ शकते. चोंदलेल्या नाकामुळे सुद्धा बाळ द्रवपदार्थ घेण्यास नकार देऊ शकते आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

. शरीरातील अति उष्णता

जर बाळासकपड्यांचे बरेच थर घातले असतील किंवा बाळाला कोंदट खोलीत ठेवले असेल तर बाळ घामामुळे द्रव गमावू शकते आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

बाळाला किती प्रमाणात द्रवपदार्थ आवश्यक असते?

नवजात बाळाला आईचे दूध किंवा फॉर्म्युला फीडद्वारे आवश्यक असलेले सर्व द्रवपदार्थ मिळतात. ह्या काळात (ते ६ महिन्यांचे होईपर्यंत), त्यांच्या क्रियाकलापांची पातळी अगदी मर्यादित असते. हा टप्पा ओलांडताच तुम्ही घन किंवा अर्ध-घन स्वरूपात अन्न परिचय करून द्याल आणि कपमधून थोडेसे पाणी बाळाला दिले जाऊ शकते. पातळ रस (१ भाग रसामध्ये १० भाग पाणी) दिल्यास त्यांच्या द्रवपदार्थाचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. गोड पेय, गरम पेय आणि कृत्रिम गोडवा असलेले कोणतेही पेय बाळ कमीतकमी एक वर्षाचे होईपर्यंत त्याच्यापासून दूर ठेवले जावे.

बाळांमधील डिहायड्रेशनचे निदान करण्यासाठी काही चाचण्या आहेत काय?

डिहायड्रेशनचे निदान करण्यासाठी चाचण्या, प्रयोगशाळेच्या बाहेर केलेले मूल्यांकन आणि प्रयोगशाळे मध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्या अशा दोन विभागांमध्ये विभागल्या जाऊ शकतात.

तुम्ही तुमच्या निर्जलीकरण झालेल्या बाळावर कसे उपचार करू शकता?

निर्जलीकरणावर उपचार करताना मुख्य उद्दीष्ट म्हणजे शरीरातील कमी झालेली द्रव पातळी भरून काढणे आणि द्रवपातळी सामान्य करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी पुढील उपाय केले पाहिजेत.

आपल्या बाळाला निर्जलीकरण होण्यापासून कसे प्रतिबंधित करावे?

प्रतिबंध हा एक उत्तम उपचार आहे, म्हणूनच आपण काळजी घेऊ शकता की जेणेकरून आपले बाळ आजारी पडणार नाही (ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते) आणि तीव्र उन्हाशी त्याचा संपर्क होत नाही. कसे ते येथे आहे

. आजारपणामुळे होणारे डिहायड्रेशन कसे रोखावे?

आजारी पडल्यास लहान मुले त्वरित मोठ्या प्रमाणात द्रव गमावू शकतात कारण यामुळे उलट्या आणि अतिसार होऊ शकतो. हे विषाणू आपल्या बाळापासून दूर ठेवण्यासाठी, बाळाला हाताळताना आणि मित्र नातेवाईक भेट देतात तेव्हा त्यांनीसुद्धा चांगले हात धुणे चांगले. आपल्या डॉक्टरांची कोणतीही भेट चुकवू नका आणि लसींच्या परिपूर्णतेसाठी लसीकरणाच्या वेळापत्रकाचे अनुसरण करा.

. बाहेर गरम असताना डिहायड्रेशन कसे रोखावे?

उन्हाळ्यात, बाळाला हलके आणि हवा खेळती राहील असे कपडे घाला. बाळाला उन्हापासून दूर ठेवा आणि बाळ झोपलेले असताना बाळाला कधीही ब्लँकेट किंवा स्वेटरमध्ये लपेटू नका डिहायड्रेशन ही एक सामान्य स्थिती आहे ज्याचा नवजात बालकांवर परिणाम होतो . लक्षणांवर बारीक लक्ष ठेवून तुम्ही त्यास प्रतिबंध करू शकता आणि त्यावर उपचार करू शकता. आणखी वाचा: मुलांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved