बाळ

बाळाला झोपेत घाम येणे: कारणे आणि ते हाताळण्याविषयी काही टिप्स

आपल्या बाळाला शांतपणे झोपलेले पाहणे हा एक आनंददायक अनुभव आहे. आपल्या बाळाला झोपताना किंवा इतर वेळी सुद्धा कोणतीही अस्वस्थता असेल तर बर्‍याच पालकांसाठी ती वेदनादायी असू शकते. तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर बाळाला घाम आला आलेला पाहिल्यास तुम्हाला काय वाटेल? हे चिंताजनक असू शकते, बरोबर? बाळांना रात्री घाम येणे सामान्य आहे की नाही हे आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता असू शकते. ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही बाळांना रात्री घाम येण्यामागील कारणांबद्दल आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ.

बाळांना रात्री घाम येणे

रात्री झोपेत असताना बाळाला खूप जास्त घाम येतो. रात्री घाम येण्याची अनेक कारणे आहेत आणि विशेषत: जर तो जास्त काळ टिकत असेल तर.त्या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये.

बाळांना रात्री घाम येणे सामान्य आहे का?

झोपेत घाम येणे ही बाळांमध्ये आढळणारी सामान्य गोष्ट आहे. तथापि, जर आपल्या बाळाला झोपेत खूप घाम येत असेल तर ते कदाचित आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्येचे लक्षण असू शकते. जर दीर्घकाळ असे होत राहिले तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.

बाळांना रात्री घाम येण्याची कारणे कोणती?

आपल्या बाळाला झोपेत असताना घाम का येऊ शकतो ह्याची काही कारणे आम्ही सूचीबद्ध केली आहेत.

. हालचाल

जेव्हा मुले गाढ झोपेत असतात तेव्हा त्यांना घाम येणे वाढते, कारण ते प्रौढांप्रमाणे झोपेत कूस बदलत नाहीत. जेव्हा मूल बराच काळ एकाच स्थितीत राहते तेव्हा शरीराचे तापमान वाढू शकते आणि तापमानातील वाढीचे नियमन करण्यासाठी घाम येणे ही शरीराची एक पद्धती आहे.

. घाम ग्रंथींची स्थिती

बाळांच्या घामाच्या ग्रंथी त्यांच्या डोक्याच्या जवळ असतात. त्यामुळे त्यांना रात्री जास्त प्रमाणात घाम फुटतो, जागे असताना बाळे जितके वेळा डोक्याची हालचाल करतात तेवढी झोपेच्या वेळी करत नाहीत. वर नमूद केल्याप्रमाणे, एका स्थितीत झोपल्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि घामामुळे ते नियमित होण्यास मदत होते.

. खोलीचे तापमान

बाळांच्या खोलीचे तापमान वाढल्यामुळे देखील रात्रीच्या वेळी प्रौढांप्रमाणेच बाळाला जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो.

. पांघरूण

बऱ्याच कुटुंबांमध्ये उन्हाळ्यातसुद्धा बाळाला पांघरूण घालणे ही एक पद्धत आहे. त्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान वाढते आणि त्यांना अति घाम येते. ही सामान्य कारणे आहेत ज्यामुळे बाळांना घाम येऊ शकतो. तथापि, काही आरोग्याच्या समस्या असतील तरी सुद्धा रात्री घाम येऊ शकतो.

बाळांना रात्री घाम येण्याची कारणे

जर रात्री झोपेत तुमच्या बाळाला असामान्यपणे घाम फुटला असेल तर ते काळजीचे कारण असू शकते. अशा काही आरोग्याच्या समस्या आहेत ज्यामुळे रात्री झोपताना बाळांना असामान्य घाम येऊ शकतो. चला त्यातील काही गोष्टींवर एक नजर टाकूया

. जन्मजात हृदयरोग

जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त बाळांना रात्री झोपेत असामान्यपणे घाम फुटू शकतो. अशा प्रकारचे विकार गर्भाशयात असतानाच विकसित होतात आणि खाताना, खेळतानाही ह्या बाळांना जास्त प्रमाणात घाम येतो.

. स्लीप एप्निया

स्लिप एप्निया हे बाळांना रात्री जास्त घाम येण्याचे एक कारण म्हणून आढळले जाते. ही समस्या असल्यास,बाळ श्वास घेताना थोडा वेळ विराम घेतात, त्यामुळे शरीराला जास्त काम करावे लागते. त्यामुळे, झोपेत बाळाला असामान्यपणे घाम फुटतो. स्लिप एप्नियामुळे बाळाला रात्री घाम येतो तसेच बाळाची त्वचा निळी पडते आणि घरघर होते.

. झोपेत गुदमरणे

झोपेच्या स्थितीमुळे गुदमरणे किंवा ब्लँकेट गळ्याभोवती गुंडाळले गेल्यामुळे एसआयडीएस किंवा सडन डेथ सिंड्रोम होऊ शकतो. तुम्ही नीट लक्ष ठेवल्यास तुमच्या लक्षात येईल की बाळ झोपलेला असताना बाळाच्या शरीराची उष्णता वाढल्यामुळे बाळाला खूप घाम येईल.

. हायपरहायड्रोसिस

असे आढळून आले आहे की काहीवेळा, खोलीचे तापमान नियंत्रित असूनही, रात्रीच्या वेळी बाळांना घाम फुटतो. हे हायपरहाइड्रोसिस किंवा अत्यधिक घाम येणे या समस्येमुळे असू शकते. मुलांमध्ये हे सामान्य कारण नसले तरी हायपरहाइड्रोसिसमुळे ग्रस्त असणा्यांना हातापायाला घाम फुटतो. तथापि, ही गंभीर स्थिती नाही आणि योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाने बरी होऊ शकते. उपचारांमध्ये शस्त्रक्रिया असू शकते किंवा मलम लावून किंवा औषधोपचार करून शस्त्रक्रियेविनाही समस्या बरी होऊ शकते. आपल्या बाळाला आवश्यक असलेल्या उपचारांसाठी त्वचारोगतज्ञांचा सल्ला घेतला असल्याची खात्री करा.

. सामान्य सर्दी

तुमच्या बाळाला सर्दी झालेली असल्यास त्याला घाम येणे शक्य आहे. नंतर तुमच्या बाळाला चोंदलेले नाक, खोकला इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

. ऍलर्जी

विशिष्ट ऍलर्जीमुळे बाळांना रात्री घाम येऊ शकतो. त्वचेच्या ऍलर्जीमुळे त्वचेवर पुरळ उठणे, वाहणारे नाक इत्यादींसारखी लक्षणे दिसू लागतात, बाळ जागे असताना ऍलर्जिक घटकांच्या सानिध्यात येते तेव्हा ही लक्षणे दिसू लागतात.

. श्वसन आरोग्य

बाळांच्या रात्री घाम येणे मुलाच्या श्वसन आरोग्याशी देखील जोडले जाऊ शकते. क्वचित प्रसंगी, दम्याचा त्रास, टॉन्सिलिटिस, हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनिटिस (फुफ्फुसाचा दाह) असलेल्या मुलांना रात्री घाम येतो. तर, रात्रीच्या वेळी आपल्या मुलाला जास्त प्रमाणात घाम येत असल्यास तुम्ही काय करू शकता? येथे काही टिप्स आहेत आपल्याला मदत करू शकतात.

बाळांना रात्री घाम येत असल्याची समस्या हाताळण्यासाठी काही टिप्स

बाळांमध्ये रात्री घाम येणे थांबवण्यासाठी काही सोप्या टिप्स इथे दिल्या आहेत

. खोलीचे तापमान नियंत्रित ठेवा

खोलीचे तापमान नेहमीच थंड (२६-२७ डिग्री सेंटीग्रेड दरम्यान) असल्याचे सुनिश्चित करा. आपल्या बाळाला आरामदायक आणि शांत झोप लागेल हे सुनिश्चित करण्यासाठी क्रिबमधून ब्लँकेट्स आणि पांघरुणे काढा त्यामुळे बाळाला आरामदायक वाटेल आणि शांत झोप लागेल.

. आपल्या बाळाला हायड्रेटेड ठेवा

तुम्ही बाळाला झोपवण्याआधी त्याचे शरीर सजलीत करणे आवश्यक आहे. घाम आल्यामुळे होणार्‍या द्रवपदार्थाच्या ऱ्हासास सामोरे जाण्यास मदत होईल.

. आपल्या बाळाला योग्य कपडे घाला

आपल्या बाळास श्वास घेण्यायोग्य व हलके कपडे घालायचे लक्षात ठेवा. त्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल आणि रात्री कमी घाम येईल. आपल्या बाळाला रात्री घाम येण्याची समस्या आहे की नाही याची पर्वा न करता, शांत झोपेसाठी त्याला आरामदायक कपडे घालणे महत्वाचे आहे.

. बाळाचे क्रिब सुटसुटीत ठेवा

आपल्या बाळाला क्रिबमध्ये झोपण्यापूर्वी ब्लँकेट्स, मऊ खेळणी, स्लीप पोसिशनर्स (जर आपण एखादे वापरत असाल तर), उशा इ. गोष्टी बाजूला करा. बाळाच्या आसपास ह्या गोष्टी नाहीत ह्याची खात्री करा. आपल्या बाळास रात्री घाम येत असल्यास खाली काही मुद्दे आहेत जे लक्षात ठेवणे आवश्यक आहेत.

लक्षात ठेवण्याचे मुद्दे

आपल्या बाळाच्या बाबतीत पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ह्या मुद्द्यांच्या आधारे रात्री बाळाला घाम येत असल्यास ती समस्या कशी हाताळावी तसेच वैद्यकीय मदत लागली तर ती केव्हा घ्यावी ह्याविषयी मार्गदर्शन करतील. . वरील खबरदारी घेतल्यानंतरही बाळाला रात्री घाम येत राहिल्यास तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. योग्य उपचारांसाठी बाळांना रात्री घाम येण्याच्या कारणाचे योग्य वेळी निदान केले पाहिजे. . बाळाला घाम येण्याबरोबरच बाळाची त्वचा कोरडी पडलेली असेल किंवा शौचास कोरडी होत असेल तर बाळाचे मूत्रपिंड कमकुवत असल्याचे सूचित होऊ शकते आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या बाळामध्ये इतर चिन्हे किंवा लक्षणे पहा, जसे की डोके आपटणे, दात खाणे, घोरणे इत्यादी. रात्री घाम येण्याबरोबरच ही लक्षणे दिसल्यास आपण त्वरित आपल्या बालरोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.

सामान्य प्रश्न

. माझ्या बाळाच्या रात्री घाम येत असेल तर मी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

रात्री तुमच्या बाळाला घाम आल्याचे तुमच्या लक्षात आले तर असे का झाले असावे ह्याचा विचार करावा. खोलीचे तापमान , जाड ब्लँकेट इ. सारख्या बाह्य घटकांमुळे असे झाले असेल तर तुम्ही त्याच्यावर काम करू शकता आणि समस्या पुन्हा उद्भवल्यास चूक सुधारू शकता. जर बाळाला कायम घाम येत राहिला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याव्यतिरिक्त, जर आपल्याला इतर संबंधित लक्षणे दिसली, जसे की दात खाणे, घोरणे इ., तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

. झोपेत असताना माझ्या बाळाच्या डोक्यावर घाम येणे सामान्य आहे का?

लहान मुलांच्या घामाच्या ग्रंथी त्यांच्या डोक्याजवळ असतात म्हणून रात्री डोक्याजवळ घाम येतो. . हालचालींच्या अभावामुळे डोक्यात जास्त उष्णता निर्माण होते, ज्यामुळे उष्णता कमी करण्यासाठी शरीर घामाद्वारे ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असते. तथापि, जर तुमच्या बाळास खूप जास्त घाम येत असेल, तसेच शौचास कडक होत असेल आणि कोरड्या त्वचेसारखी इतर लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आता तुम्हाला बाळांना रात्री घाम येण्याबद्दल सर्व काही माहित आहे, आपल्या बाळाला आरामदायक आणि शांत झोप लागण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. तसेच, तुम्हाला अजूनही काही शंका किंवा प्रश्न असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका. आणखी वाचा: बाळांसाठी झोपताना उशी वापरावी का? बाळाला रात्री कसे झोपवावे?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved