अन्न आणि पोषण

बाळाला सुरुवातीला तुम्ही कुठल्या घनपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे?

एकदा आपले बाळ थोडे मोठे झाले की नियमित आहार देण्यास प्रारंभ करू शकतो का याबद्दल तुम्ही विचार करत असाल. आपण त्यांना कायमचे स्तनपानावर ठेवू शकत नाही, बरोबर? खाली बाळासाठी अन्नपदार्थ दिले आहेत - आपण त्यांना कोणत्या खाद्य पदार्थांची ओळख करून द्यावी? बाळासाठी सुरुवातीचे घनपदार्थ कशासाठी आणि कसे तयार करावे लागतील ह्याबद्दलची मार्गदर्शिका इथे दिलेली आहे.

आपल्या बाळाच्या आहारात घनपदार्थांची सुरुवात करून देण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे?

घनपदार्थांची ओळख करून देण्याची नेमकी वेळ आपल्या बाळाच्या विकासात्मक प्रगतीवर अवलंबून असते. तथापि, यासाठीचा सुवर्ण कालावधी जेव्हा बाळ ४-६ महिन्यांचे होते तेव्हा असतो. घनपदार्थांची सुरुवात ह्याआधी केल्यास त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो कारण बाळाचे आतडे अजून विकसित होत असते. परंतु जर आपण घनपदार्थांची सुरुवात करून देण्यास उशीर केला तर स्तनपान घेण्याच्या कम्फर्ट झोन मधून बाळास बाहेर पडणे कठीण होईल.

घनपदार्थांसाठी आपले बाळ तयार असल्याची चिन्हे

आपल्या बाळाचे निरीक्षण करणे आनंददायी आणि आकर्षक असते. ते करत असताना ही लक्षणे तुमच्या सहज लक्षात येतील.

बाळांना प्रथम अन्न कसे वापरावे?

बाळासाठी सर्वोत्तम प्रथम पदार्थांची यादी

बाळाची पचनसंस्था अद्याप विकसित होत असल्याने साध्या पदार्थानी सुरुवात करणे योग्य आहे.

. सफरचंद

सफरचंद चांगले स्टार्टर पदार्थ म्हणून काम करतात कारण मुलांना गोड आणि आंबट चव आवडते. सफरचंदामध्ये उच्च फायबर आणि कमी चरबीयुक्त सामग्री असल्यामुळे ते पोषक असते. बाळाला सफरचंद भरवताना त्याचे साल काढून प्युरी करून द्या.

. बीटरूट

बऱ्याच बाळांना बीटरूट आवडते.त्यामुळे त्यांच्या तोंडात ते लगेच विरघळावे म्हणून बीटरूट चांगले उकडून घ्या. बीटरूट्सचे पौष्टिक मूल्य जास्त असते कारण ते फॉलिक ऍसिडचे समृद्ध स्त्रोत असतात जे मेंदूच्या विकासास मदत करतात

. पेअर

पेअर आपल्या बाळाच्या पाचक प्रणालीमध्ये फायबरची चांगली मात्रा घालतात. त्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमची देखील भरपूर प्रमाणात असते जे हाडे तयार करण्याच्या प्रक्रियेस मदत करतात. साल काढायचे लक्षात ठेवा, बिया काढून टाका आणि शुद्ध स्वरूपात सर्व्ह करा

. मांस

मासे आणि कोंबडी हे आपल्या बाळासाठी आदर्श मांस आहे कारण त्यांना पचन होण्यासाठी कमीतकमी उर्जा आवश्यक आहे. ते प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहेत आणि अशक्तपणा कमी करतात. मासे भरवताना सगळे काटे आणि हाडे काढून टाकली पाहिजेत अन्यथा ते बाळाच्या घशास त्रास देऊ शकते. उत्कृष्ट परिणामांसाठी, गुदमरल्यासारखे प्रकार टाळण्यासाठी मांसाची प्युरी करा.

. दही

-८ महिने वयाच्या नवजात बाळांसाठी आदर्शपणे उपयुक्त असले तरी, बरेच बालरोग तज्ञांनी मुलायम पोत असल्यामुळे प्रथम आहार म्हणून याची शिफारस केली आहे. हा कॅल्शियमचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि आपल्या छोट्या देवदूताची पाचक प्रणाली सुधारण्यास मदत करतो

. केळी

गोड चव आणि मऊ पोत ह्यामुळे केळे हे बाळाच्या पदार्थांमध्ये आघाडीवर धावते. केळ्याची उच्च फोलेट सामग्री मेंदूस क्रियाशील राहण्यास मदत करते आणि पोटातील म्यूकोसल अस्तर सुधारण्यासाठी ओळखली जाते

. रताळे

बाळाच्या सुरुवातीच्या अन्नासाठी रताळे एक चांगला पर्याय आहे कारण त्याचा मऊ पोत बाळाला आराम. देतो. यामध्ये बीटा कॅरोटीन देखील आहे जे त्यांची दृष्टी सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

जर आपल्या बाळाने प्रथम अन्न नाकारले तर काय करावे?

बाळाला जबरदस्ती करणे टाळा. त्याच्या आवडीचा पदार्थ समजेपर्यंत वेगवेगळे पदार्थ देत रहा.

पदार्थ घशात अडकणे रोखण्यासाठी खबरदारी

किती अन्न पुरेसे आहे?

बाळ किती खाईल हे बाळाच्या भूकेवर आणि मूडवर अवलंबून असते. जर बाळाने डोके फिरवले किंवा रडण्यास सुरुवात केली तर त्याला जास्त अन्नपदार्थ देण्याचे टाळा.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

अन्नपदार्थांच्या ऍलर्जीविषयी जागृत रहा

आपल्या बाळासाठी प्रथम पदार्थांचा परिचय देताना, बाळाला ऍलर्जी होण्याचा उच्च धोका असलेले पदार्थ देणे टाळा. ह्यामध्ये अंडी, शेलफिश आणि शेंगदाणे यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. बाळ थोडे मोठे झाल्यावर म्हणजेच साधारणपणे आठ महिन्यांचे झाल्यावर हे पदार्थ दिले जाऊ शकतात. आपल्या बाळाला ऍलर्जी असू शकते का हे शोधण्यासाठी बाळाचे आधी जेवणाचे शेड्यूल सेट करा. अन्नपदार्थ बाळाला सकाळी लवकर भरवा जेणेकरून काही ऍलर्जिक प्रतिक्रिया असेल तर लक्षात येईल. बाळे सवयीचे गुलाम असतात. लहान बाळांचे स्तनपान/फॉर्मूला टप्प्याटप्प्याने बंद करणे आवश्यक आहे. सुरुवातीचे काही आठवडे कठीण असू शकतात कारण बाळ घनपदार्थ घेण्यास विरोध दर्शवू शकते. तथापि, थोडासा संयम आणि सुसंगता असल्यास, आपले बाळ वेळ न घेता घनपदार्थ घेण्यास सुरुवात करेल. आणखी वाचा: बाळासाठी केळ्याची प्युरी – ती करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग बाळासाठी गाजराच्या प्युरीची पाककृती – प्युरी कशी कराल?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved