अन्य

बाळाला स्तनपान कसे कराल?

स्तनपान दिल्याने बाळाचे उत्तमरीत्या पोषण होते त्यामुळे पहिले सहा महिने डॉक्टर प्रत्येक नवजात बाळाला स्तनपान देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच, स्तनपान दिल्याने जी संप्रेरके तयार होतात त्यामुळे बाळाच्या आईची रिकव्हरी जलद होते. तथापि बऱ्याच मातांना स्तनपान देणे वेगवेगळ्या कारणांमुळे अवघड वाटते. काहींना योग्य रित्या स्तनपान कसे द्यावे ह्याचे ज्ञान नसते. त्यामुळे स्तनपान योग्य रित्या कसे करावे ह्याची माहिती असणे आवश्यक आहे, त्यामुळे स्तनपान करताना काही समस्या असल्या असतील तर त्या हाताळता येतील.

स्तनपानास कशी सुरुवात करावी?

ऐकून तुम्हाला वेगळे वाटेल, परंतु आई आणि बाळासाठी स्तनपान सुरु करण्याआधी योग्य मार्गदर्शन मिळणे चांगले. स्तनपान सुरु करण्याआधी तुम्हाला मदत होईल अशा काही टिप्स इथे देत आहोत कसे बसावे? तुम्ही स्वतःला जितके शक्य होईल तितके आरामदायक स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करा, तसे केल्यास तुम्ही बाळावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल. आधारासाठी उशीचा वापर करा आणि तुमचे शरीर नैसर्गिक आणि आरामदायक स्थितीत ठेवा. जर तुम्ही सी-सेक्शन प्रसूतीमधून रिकव्हर होत असाल तर डॉक्टर तुम्हाला कुशीवर झोपण्याचा सल्ला देतील आणि बाळाला शेजारी ठेवण्यास सांगतील. तुम्ही स्तनपानासाठी कुठलीही स्थिती निवडलीत तरी एक लक्षात ठेवा की तुमच्या पाठीत कसेही वाकू नका ह्यामुळे तुम्हाला वेदना किंवा अस्वस्थता जाणवेल. एकदा तुम्ही तयार झालात तर आता बाळाला स्तनपान देण्याची वेळ झाली आहे आणि पहिली पायरी म्हणजे बाळाचे ओठ स्तनाग्रांना लावणे ही होय. बाळाचे तोंड स्तनाग्रांना नीट लागणे ही महत्वाची पायरी आहे कारण त्यामुळे दूध नीट ओढले जाते आणि दुधाचा प्रवाह एकसारखा राहतो. तसेच बाळाच्या अन्ननलिकेत हवा जाऊ न देणे हे सुद्धा महत्वाचे आहे कारण त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात आणि बाळाला पोटशूळ होऊ शकतो.

बाळाचे तोंड स्तनाग्रांना कसे लावावे?

पहिली स्टेप म्हणजे बाळाला कुशीवर घ्या आणि बाळाचे तोंड तुमच्याकडे करा. बाळाचे पोट तुमच्या पोटाजवळ आहे ना ह्याची खात्री करा. बाळाला थोडे वर घेण्यासाठी गरज भासल्यास उशीचा वापर करा. बाळाची स्तनपान घेण्याची नैसर्गिक इच्छा खूप तीव्र असते आणि तुम्ही बाळास प्रोत्साहन दिल्यास बाळ नक्की त्यास प्रतिसाद देईल. तथापि, जर बाळ प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही खालील तंत्रज्ञान वापरू शकता

स्तनाग्रांवर पकड घट्ट करण्याच्या पद्धती

सुरुवातीला, बाळ योग्य स्थितीत येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. बाळाचे तोंड स्तनाग्रांना लावण्यासाठी इथे काही टिप्स दिल्या आहेत.

बाळाच्या तोंडाची स्तनाग्रांवरील पकड चांगली आहे हे कसे ओळखावे?

वरील तंत्र वापरून सराव केल्यानंतर, पकड चांगली बसली आहे किंवा नाही व तुमचे बाळ आरामदायक स्थितीत आहे ना हे तपासून पाहणे चांगले. खाली काही लक्षणे दिली आहेत जी तुम्ही तपासून पाहू शकता

स्तनपानासाठी योग्य स्थिती

बाळाची स्तनांवर योग्य पकड महत्वाची आहेच, परंतु स्तनपान देताना आई आणि बाळ दोघांची स्थिती बरोबर असणे सुद्धा महत्वाचे आहे. दोघेही आरामदायक स्थितीमध्ये असले पाहिजेत

. क्रॉस क्रेडल होल्ड: सुरुवातीच्या काळात स्तनपानासाठी ही स्थिती वापरा 

हि स्थिती खूप कॉमन आहे आणि नवीन मातांसाठी त्याची खूप मदत होते कारण ह्या स्थितीत प्रसूतीनंतर लगेच बाळाची स्तनांवरील पकड योग्य असते. सुरुवातीला थोडे ओशाळल्यासारखे होऊ शकते, तथापि ह्या स्थितीचा सराव केल्यास ह्या स्तनपानाच्या स्थितीची आई आणि बाळासाठी खूप मदत आणि फायदा होतो.

. क्रेडल होल्ड

तुमचे बाळ काही आठवड्यांचे झाल्यावर आणि तुम्हाला बाळाला नीट धरण्याची सवय झाल्यावर स्तनपानासाठी तुम्ही क्रेडल होल्ड ही स्थिती वापरू शकता

. फ़ुटबाँल होल्ड

ही स्थिती अमेरीकन फ़ुटबाँल पासून प्रेरित होऊन तयार झाली आहे. जर तुमचे सी-सेक्शन झाले असेल किंवा तुम्हाला जुळ्या बाळांना स्तनपान करायचे असेल तर ही स्थिती चांगली आहे

. साईड लाईंग

ही स्थिती ज्यांची सिझेरिअन प्रसूती झाली आहे किंवा प्रसूती नंतर शरीर नाजूक झाले असेल तर त्यांच्यासाठी चांगली आहे

. रिक्लायनिंग होल्ड

ज्या स्त्रिया सी-सेक्शन प्रसूतीमधून रिकव्हर होत असतात किंवा ज्यांना बसण्यास त्रास होत असेल त्यांच्यासाठी ही स्थिती उपयोगी आहे. ज्या स्त्रिया बाळाला बेड वर पाजतात त्यांनी ह्या स्थितीचा सराव करा

तुमच्या 'टॉडलर'ला स्तनपान देण्यासाठी सर्वोत्तम टिप्स

तुमचे बाळ टॉडलर झाल्यावर स्तनपान घेण्यासाठी विशिष्ट स्थितीची सवय त्यास आतापर्यंत झाली असेल. ह्या टप्प्यावर बरीच बाळे डोंबाऱ्यासारखे विविध अंगविक्षेप करत स्तनपान घेत असतात. कधी त्यांचे पाय हवेत असतात, तर कधी एक पाय वर एक खाली, कधी संपूर्ण शरीराची वळवळ सुरु असते तर कधी इकडून तिकडून फिरत असतात. तर ह्या बाळांना स्तनपान करतानाच्या काही टिप्स खालीलप्रमाणे

नवजात बाळाला किती वेळ स्तनपान द्यावे?

तुम्ही नवजात बाळाला स्तनपान करीत असता तेव्हा साधारणपणे एका वेळेला २०-३० मिनिटे लागतात, परंतु ते ६० मिनिटांपर्यंत वाढू शकते. लक्षात ठेवा की प्रत्येक बाळ वेगळे असते आणि तुम्ही एका वेळच्या स्तनपानास किती वेळ लागेल हे ठरवू शकत नाही. सामान्यपणे, सुरुवातीला आणि वाढीच्या काळात जास्त वेळ स्तनपान देण्याची गरज असते. स्तनपानाचे विशिष्ट वेळापत्रक करण्याऐवजी बाळाच्या मागणीनुसार स्तनपान देणे चांगले. तुमच्या बाळाने स्तनपान घेण्याचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर बाळाला फक्त पाच मिनिटे लागू शकतात. बाळाचे पोट नीट भरले आहे किंवा नाही हे समजण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत.

मी किती काळापर्यंत स्तनपान द्यावे ?

असे म्हटले जाते की तुम्ही तुमचे बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला स्तनपान दिले पाहिजे आणि अन्नपदार्थ आणि पाण्यापासून दूर ठेवले पाहिजे. त्यानंतर, घनपदार्थ बाळाला सुरु केल्यानंतर सुद्धा बाळ जोपर्यंत स्तनपान घेत आहे तोपर्यंत ते सुरु ठेवा. स्तनपान देणे म्हणजे फक्त बाळाला दूध देणे नव्हे तर त्याद्वारे आई आणि बाळामध्ये बंध निर्माण होतो आणि बाळाला सुरक्षित वाटते. जोपर्यंत बाळाला आणि तुम्हाला आरामदायक वाटते तोपर्यंत स्तनपान देत रहा.

किती वेळा बाळाला स्तनपान दिले पाहिजे?

जन्मानंतर बाळाला भूक लागलेली असते आणि बाळाची भूक तिसऱ्या दिवसाच्या आसपास वाढते. म्हणून सुरुवातीला, मागणी कमी असते आणि तुम्हाला स्तनपान देण्याच्या प्रक्रियेसाठी सुरुवात आणि प्रयत्न करावे लागतील. पहिल्या काही आठवड्यात, तुमच्या बाळाला प्रत्येक दोन ते तीन तासांनंतर स्तनपानाची गरज असते. म्हणजे २४ तासांमध्ये तुम्हाला कमीत कमी ८-१२ वेळा बाळाला स्तनपान दिले पाहिजे. तथापि, बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की बाळाला मागणीनुसार स्तनपान दिले पाहिजे. एक विशिष्ट वेळापत्रक करण्यापेक्षा बाळाला भूक लागलेली असेल तेव्हा स्तनपान दिले पाहिजे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा लॅक्टेशन तज्ञांशी ह्याविषयी संपर्क साधून ते काय म्हणतात ते जाणून घेतले पाहिजे. बाळ जसे वाढते तसे बाळाचे पोट सुद्धा वाढते. काही काळानंतर बाळ जास्त वेळ स्तनपान घेऊ लागेल आणि त्याची वारंवारिता कमी होईल. ह्या टिप्सचा योग्य वापर करून तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि स्तनपानाचा अमूल्य अनुभव घ्या. तुम्हाला शुभेच्छा! आणखी वाचा: स्तनपानाविषयी नेहमी विचारल्या जाणाऱ्या २० प्रश्नांची उत्तरे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved