आरोग्य

बाळाच्या डोळ्याच्या संसर्गासाठी १० सर्वोत्तम घरगुती उपचार

मोठ्या माणसांना आणि बाळांना डोळ्यांचा संसर्ग होण्याची शक्यता सारखीच असते. जन्मादरम्यान बाळाला डोळ्याचा संसर्ग होऊ शकतो. जन्म कालव्यात असलेल्या जीवाणूमुळे त्यांचे डोळे सूजू शकतात, खाज सुटू शकते आणि या लक्षणांमुळे तुमचे बाळ अस्वस्थ होईल आणि चिडचिड करू शकेल. तथापि, काही संक्रमण किरकोळ असतात आणि साध्या उपायांनी त्यावर घरी उपचार केले जाऊ शकतात. तसेच बर्‍याच वेळा पालकांना त्यांच्या बाळांच्या डोळ्यामध्ये संसर्ग आहे की नाही हे माहित नसते. बाळाच्या डोळ्याच्या संसर्गाबद्दल माहिती असल्यास आपल्याला लहान बाळाच्या अस्वस्थतेचे कारण ओळखण्यास आणि त्यानुसार त्यावर उपचार करण्यास मदत होऊ शकते. आपल्या बाळाला डोळ्याचा संसर्ग आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला येथे काही लक्षणे शोधण्याची आवश्यकता आहे.

डोळ्याच्या संसर्गाची लक्षणे

मोठ्या माणसांप्रमाणचे बाळे देखील डोळ्यांच्या संसर्गाच्या बाबतीत तितकीच संवेदनशील असू शकतात. थोडक्यात डोळ्यातील संक्रमण जिवाणू किंवा विषाणूजन्य असू शकते. आपल्या लहान बाळाला डोळ्यांचा संसर्ग झाल्याचे आपल्याला वाटत असल्यास ही लक्षणे पहा.

. लालसरपणा

डोळ्याच्या पांढर्‍या भागामध्ये किंवा पापण्यांच्या आतील भागाला लालसरपणा असलेला असल्यास आपल्या लहान बाळाला डोळ्यांचा संसर्ग झालेला असू शकतो.

. स्त्राव

डोळ्यातील कोणताही पिवळा स्त्राव म्हणजे डोळ्याला जिवाणूंचा संसर्ग झालेला असू शकतो. डोळ्याचा तो भाग स्वच्छ करा आणि कुठलाही स्त्राव पुसून टाका.

. फुगवटा

बाळाच्या पापण्यांना सूज येणे हे विषाणूंचा संसर्ग झाल्याचे लक्षण आहे.

. चिकटलेल्या पापण्या

जर तुमच्या बाळाच्या पापण्या एकमेकांमध्ये अडकलेल्या किंवा चिकटलेल्या असतील तर ते जिवाणूंचा संसर्ग झाल्याचे लक्षण असू शकते. अस्वस्थता कमी करण्यासाठी हळूवारपणे त्या मोकळ्या करा.

. डोळ्यातून पाणी येणे

डोळ्यातून पाणी येणे हे विषाणूंचा संसर्ग झाल्याचे लक्षण आहे. यामुळे डोळ्यांना खाज सुटणे आणि कोरडेपणा देखील होऊ शकतो. डोळे धुवा आणि तो भाग स्वच्छ ठेवा.

बाळांमधील डोळ्यांच्या संसर्गासाठी घरगुती उपचारांना प्राधान्य का दिले जाते?

जेव्हा एखाद्या बाळाला डोळ्याच्या संसर्गाचा त्रास होतो तेव्हा बाळाला वेदना सहन होत नाहीत, त्यामुळे बाळ खूप अस्वस्थ होते आणि रडायला सुरुवात करू शकते. तुम्ही स्वत: साठी वापरत असलेल्या डोळ्याचे थेंब बाळांसाठी योग्य नसतात. डोळ्याच्या तपासणीसाठी तुम्ही तुमच्या बाळाला डॉक्टरकडे नेऊ शकता आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता परंतु तोपर्यंत तुमचे बाळ अस्वस्थता सहन करू शकणार नाही. घरगुती उपचार नैसर्गिक पर्यायांवर आधारित असतात आणि बाळासाठी क्वचितच हानिकारक असतात. जरी ते संसर्गावर उपचार करत नाहीत, तरीही घरगुती उपचारांमुळे थोडा आराम मिळू शकतो, हे उपचार चिमुकल्याला शांत करू शकतात आणि पुढील तपासणीसाठी सहजपणे तुम्ही बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकता.

बाळांमधील डोळ्यांच्या संसर्गासाठी १० सर्वोत्तम उपाय

बाळांच्या डोळ्याच्या संसर्गावर इथे काही उपचार दिलेले आहेत.

. कॅमोमाइल तेल

कॅमोमाईल तेलाचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. तेलामध्ये अंतर्निहित विविध दाहक-विरोधी घटक आहेत ज्यामुळे तो डोळ्यांच्या संसर्गाचा उपचार करण्याचा एक चांगला पर्याय बनला आहे. तथापि, ही तेले जास्त प्रमाणात तीव्र आहेत, म्हणून ती पातळ स्वरूपात देखील डोळ्यांच्या सभोवती वापरली जाऊ नये कारण आपल्या बाळाची त्वचा संवेदनशील असते आणि डोळ्याभोवती त्यामुळे जळजळ होऊ शकते. म्हणूनच, ते थेट आपल्या मुलाच्या डोळ्यावर लागू करणे टाळा, परंतु आपण ते वापरू इच्छित असल्यास, तेलाचे काही थेंब एका ह्युमिडिफायरमध्ये किंवा काही वाफवलेल्या पाण्यात घालून त्यास बाळापासून सुरक्षित अंतरावर ठेवून देणे चांगले. संसर्गामुळे होणारी जळजळ होण्यापासून ह्या वाफेमुळे काही प्रमाणात बाळाला आराम मिळू शकेल. तसेच, खोली चांगली हवेशीर असल्याचे तसेच वाफ सौम्य असल्याचे सुनिश्चित करा.

. मीठ पाणी

या संदर्भात समुद्री मीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मीठ स्वतः एक चांगला स्वच्छता करणारा पदार्थ आहे आणि त्यात विविध घटक आहेत त्यामुळे मीठ एक चांगले प्रतिजैविक म्हणून सुद्धा काम करते. दोन कप पाण्यात एक चमचा मीठ घालून एकत्र गरम केल्याने डोळ्यांच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी तो एक चांगला उपाय आहे. हे द्रावण वापरून बाळाचे डोळे धुतले जाऊ शकतात कारण यामुळे बाळाच्या डोळ्यातील कोणतेही स्त्राव किंवा घाण स्वच्छ होईल. दुसरीकडे, पाण्यात बुडवलेले कापसाचे बोळे संसर्ग कमी करण्यासाठी बाळाच्या डोळ्यावर ठेवता येतात.

. आईचे दूध

हे कदाचित प्रथमच असामान्य वाटेल, परंतु आपल्या लहान मुलाला डोळ्यास संसर्ग झाल्यास सुखदायक परिणाम प्रदान करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आईचे दूध. डोळ्याच्या कोणत्याही संसर्गासाठी आपण एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी आम्ही शिफारस करतो; तथापि, आपण आईच्या दुधात कॉटन पॅड भिजवू शकता आणि आपल्या बाळाला क्लिनिक / इस्पितळापर्यंत पोहचेपर्यंत थोडा आराम देण्यासाठी आपल्या बाळाच्या डोळ्याभोवती ते तुम्ही ठेवू शकता.

. आयब्राइट प्लांट

डोळ्याच्या संसर्गासह विविध संक्रमणांवर उपचार करण्यासाठी ही वनस्पती चांगली आहे. वनस्पतीमध्ये पुष्कळ शुद्धीकरण गुणधर्म असतात ज्यामुळे डोळ्यांना खाज सुटते. ऍलर्जी विरोधी घटकांसह एकत्रित, हे सुजलेल्या डोळ्यांना देखील कमी करण्यास सक्रियपणे मदत करते. उकळलेल्या २ कप पाण्यात थोडेसे आईब्रायट टाका. त्यामध्ये कापसाचे बोळे घालून ठेवा आणि त्यातील पाणी काढून टाकून बाळाच्या डोळ्यावर ठेवा. लालसरपणा, डोळयांना खाज सुटणे यासारख्या किरकोळ आजारांना बरे करण्यासाठी हा उपाय प्रभावी आहे.

. कोमट आणि थंड पाणी

डोळ्याच्या संसर्गापासून मुक्त होण्याचा जलद मार्ग म्हणजे पाण्याचा वापर. थोड्याशा पाण्याने डोळे धुण्यामुळे त्वरित आराम मिळतो आणि त्या आत असलेल्या कोणत्याही लहान कणांना बाहेर काढू शकतो. नंतर, निर्जंतुकीकरण केलेले कॉटन बॉल्स कोमट पाण्यात भिजवून घ्या आणि थोडावेळ हळुवारपणे आपल्या बाळाच्या डोळ्यावर ठेवा. तापमानातील बदल संक्रमणाचा सामना करण्यास तसेच कोणत्याही स्त्रावची काळजी घेण्यास मदत करते. या उपायामुळे सूज आणि वेदना कमी होऊ शकतात.

. टी बॅग

चहामध्ये बरेच अँटी-मायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात ज्याचे सेवन केल्याने शरीराला फायदा होतो. डोळ्याच्या संसर्गाच्या उपचारांसाठी देखील हे लागू होऊ शकते. चहाची पिशवी कोमट पाण्यात बुडविणे आणि नंतर त्यास थंड होऊ दिल्याने चहाचे घटक सक्रिय करतात. नंतर ही चहाची पिशवी प्रत्येक डोळ्यावर ठेवली जाऊ शकते, किंवा संसर्गाच्या दुखण्यापासून बरे होण्यास मदत करते.

. चमेली फूल

हे एक सर्वात लोकप्रिय नैसर्गिक शीतलक आहे जे विविध नैसर्गिक सौंदर्य उपायांचा देखील एक भाग आहे. चमेलीचे पाणी त्वचा आणि डोळ्यांना शांत करण्यासाठी ओळखले जाते. चमेलीच्या फुलांना रात्रभर डिस्टिल्ड वॉटरमध्ये ठेवून, नंतर ड्रॉपरचा वापर करून पाणी डोळ्यात घालता येईल. त्यामुळे मिळणाऱ्या सुखदायक संवेदना डोळ्याच्या जळजळ होण्यापासून त्वरित आराम देतात.

. प्रतिजैविक

सशक्त जीवाणू डोळ्याच्या काही संसर्गास कारणीभूत ठरू शकतात आणि सामान्य घरगुती उपचार त्यांच्या विरूद्ध प्रभावी असू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, संसर्गजन्य जीवाणूंचा थेट सामना करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. आपले डॉक्टर बाळाला सुरक्षित मलम किंवा थेंब देण्याची शिफारस करू शकतात. डोळ्याजवळील पिवळ्या रंगाचा कोणताही स्राव मीठाच्या पाण्यात भिजलेल्या कापसाच्या बोळ्यानी काढून टाकला पाहिजे.

. मालिश

काहीवेळा, जेव्हा अश्रू मालिकांची वाट मोकळी नसते किंवा त्याच्या मार्गावर थोडा अडथळा येतो तेव्हा डोळ्याचा संसर्ग होतो. अशावेळी, आपली बोटे थोडी कोमट करून आणि डोळा आणि अनुनासिक पुलाच्या दरम्यान हळूवारपणे मालिश करणे चांगले आहे. बोटांची उबदारपणा अश्रू नलिका साफ करून, मार्गामध्ये अडकलेल्या कोणत्याही गोष्टीस मोकळे करण्यास मदत करते.

१०. जन्माच्या वेळी संसर्ग

बर्‍याच वेळा, जन्माच्या वेळेला होणाऱ्या डोळ्यांच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी डॉक्टर स्वत: बाळाच्या डोळ्यात थेंब घालतात. हे थेंब नवजात मुलाच्या डोळ्यांसाठी अत्यंत संवेदनशील असू शकतात आणि बाळाला डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. अशा परिस्थितीत, काहीही करण्याची गरज नाही. ही जळजळ आपोआप कमी होते. बाळाचे डोळे संवेदनशील असतात आणि कोणत्याही प्रकारचा संसर्ग किंवा जळजळ यामुळे बाळ लगेच अस्वस्थ होऊ शकते. वेदना शांत करण्यासाठी आणि बाळाला दिलासा देण्यासाठी आपण नंतर संसर्गाचे कारण काय आहे ते तपासू शकता आणि योग्य उपायांचा वापर करून त्यानुसार आपल्या बालरोग तज्ञाचा सल्ला घ्या. आणखी वाचा: बाळांच्या छातीत कफ होणे: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय बाळांच्या घसा खवखवण्यावर १० सर्वोत्तम घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved