बाळ

बाळाची नखे सुरक्षितपणे कशी कापावीत?

जेव्हा बाळाच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा विचार केला जातो, तेव्हा पालकांनी घ्यावयाची सर्वात चांगली खबरदारी म्हणजे बाळाची स्वच्छता. चांगली स्वच्छता राखल्यास तुम्ही रोगास कारणीभूत जंतूपासून मुक्त होऊ शकता आणि बाळाला निरोगी ठेवू शकता. बाळाची काळजी घेताना सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे हात आणि पायाच्या बोटांची नखे कापणे हा होय. धूळ, प्रदूषण आणि हानिकारक जिवाणू नखांच्या खाली गोळा होतात आणि जेव्हा बाळ हात किंवा पाय तोंडात घालतात किंवा जेव्हा बाळाला अंगठा चोखण्याची सवय लागते तेव्हा ते सहजपणे शरीरात प्रवेश करतात. तुमच्या बाळाची नखे कापल्याने हे टाळता येते.

नवजात बाळाच्या नखांबद्दल माहिती

बाळाची नखे मऊ आणि कोमल असतात, आणि ती अत्यंत लवचिक आणि जलद वाढतात. बाळाची नखे निष्काळजीपणे कापता कामा नये कारण त्यासोबत त्वचा सुद्धा कापली जाऊ शकते. नखांमध्ये अडकलेले हानिकारक जीवाणू संक्रमण आणि आजारांना कारणीभूत ठरू शकतात म्हणून तुम्ही स्क्रॅच मार्क्सवर लक्ष ठेवणे चांगले.

तुम्ही तुमच्या बाळाची नखे ​​किती वेळा ट्रिम केली पाहिजेत आणि त्यांचा आकार कसा असावा?

बाळाची नखे कापताना ती किती कापावीत आणि त्यांचा आकार कसा असावा हे समजणे आवश्यक आहे. बोटाच्या आकारानुसार नखे कापणे चांगले. बाळाची नखे खूप वेगाने वाढतात आणि दर आठवड्याला ती कापण्याची आवश्यकता भासू शकते. तथापि, नवजात बाळाच्या पायाच्या बोटांची नखे वाढण्यास जास्त वेळ लागू शकतो. आणि त्यामुळे पायाची नखे महिन्यातून एकदा कापली तरी चालू शकते.

आपल्या बाळाच्या बोटांना दुखापत न करता नखे ​​कशी कापता येतील?

आपल्या बाळाची नखे कापण्याआधी बाळाला इजा न करता ते कसे करावे हे समजून घेणे महत्वाचे आहे. म्हणजेच त्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि नखे कापण्याचे तंत्र समजणे महत्वाचे आहे.

बाळाची नखे कापण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची आवशक्यता आहे?

लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा टिप्स

आपल्या बाळाची नखे कापताना लक्षात घेण्यासारख्या गोष्टी:

बाळाची नखे ​​कापण्यासाठी इतर पर्याय

जर बाळाची नखे कापणे आव्हानात्मक असेल किंवा जर ती तुम्ही दुसर्‍या पद्धतीने कापण्याचे ठरविले तर येथे काही इतर पर्याय आहेतः

तुमच्याकडून चुकून नखांसोबत बाळाची बोटांची त्वचा कापली गेल्यास काय करावे?

नवजात बाळाची नखे कापताना अगदी सावध पालकांकडून देखील चुकून त्वचेचा कोपरा कापला जाऊ शकतो. असे झाल्यास घाबरू नका. आपल्या नवजात बाळास तयार करण्याची सुरुवात त्याची नखे ​​कापण्यापासून होते. ते स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने कसे करावे हे शिकणे महत्वाचे आहे. यासंदर्भात तुम्हाला काळजी वाटत असल्यास आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. बाळाची नखे कापण्याचे एक वेळापत्रक करून घ्या. सुरुवातीच्या काळात बाळाची नखे कापण्यासाठी तुम्ही कुटुंबातील मोठ्या सदस्यांची मदत घेणे चांगले. आणखी वाचा: बाळांसाठी गाईचे दूध  
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved