अन्य

बाळाचे स्तनपान सोडवताना – लक्षणे, अन्नपदार्थ आणि घनपदार्थांची ओळख

बाळाचे स्तनपान सोडवणे हा बाळाच्या वाढीच्या चक्रातील महत्वाचा टप्पा आहे, कारण बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर घन पदार्थांची ओळख करून देण्याची ही पहिली पायरी असते. ही प्रक्रिया सावकाश करायची असते आणि त्यासाठी खूप सहनशीलता आणि समजूतदारपणाची गरज असते. त्याविषयी आणखी माहिती करून घेण्यासाठी आणि बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी योग्य वेळ कोणती हे माहिती करून घेण्यासाठी वाचा.

बाळाचे स्तनपान सोडवणे म्हणजे नक्की काय?

बाळाचे स्तनपान सोडवणे म्हणजे बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर पदार्थ खाण्याची सवय लावण्याची प्रक्रिया होय. बाळ वाढत असताना बाळाला कुठले अन्नपदार्थ द्यावेत हे माहिती असणे सुद्धा जरुरीचे आहे. जेव्हा बाळाच्या आहारात पहिल्या घनपदार्थाचा समावेश होतो तेव्हा ह्या प्रक्रियेला सुरुवात होते. ह्या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये "complementary feeding" असे सुद्धा म्हणतात. बाळाचे स्तनपान कमी करण्याची प्रक्रिया साधारणपणे बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर सुरु होते. तोपर्यंत, बाळाला आईच्या दुधातून पोषणमूल्ये आणि ऊर्जा मिळत असते, त्यामुळे बाळाची प्रतिकार प्रणाली मजबूत होऊन बाळाला संसर्गांपासून संरक्षण मिळते. बाळाचे स्तनपान सोडवणे आणि त्यांना घनपदार्थांची ओळख करून देणे हा बाळाच्या विकासासाठी महत्वाचा टप्पा आहे आणि त्यांच्या वाढीसाठी हा क्षण विशेष आहे. जर ह्या प्रक्रियेस केव्हा सुरुवात करावी हे तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर बाळाला स्वतःहून घनपदार्थ किंवा इतर द्रवपदार्थ घेऊ द्या. बाळाचे स्तनपान सोडवण्याची तपशीलवार मार्गदर्शन मिळण्यासाठी पुढे वाचा.

स्तनपान सोडवण्यास सुरुवात करण्यासाठी बाळ तयार असल्याची लक्षणे

लक्षात ठेवा की बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत बाळाला फक्त स्तनपान किंवा फॉर्मुला दूध दिले पाहिजे. स्तनपान सोडवण्याची प्रक्रिया हळूहळू आणि टप्प्यात झाली पाहिजे. बाळ स्तनपान सोडण्यास तयार असल्याच्या लक्षणांवर सुद्धा लक्ष ठेवले पाहिजे. ही लक्षणे खालीलप्रमाणे: ह्या सर्व क्रियांना जास्त ऊर्जा लागते आणि त्यामुळे बाळाची भूक वाढते. बाळाची भूक वाढण्यामागे बाळाच्या वाढीचा वाढलेला वेग हेसुद्धा एक कारण आहे. अशावेळी, स्तनपान बंद करू नका. बाळाची भूक लगेच नॉर्मल होण्याची शक्यता असते. जी बाळे तयार नसतात ती बाळे तोंडातून घनपदार्थ काढून टाकतात आणि त्यांना अन्नपदार्थ गिळता येत नाहीत. स्तनपान सोडावताना आणि बाळाला घनपदार्थांची सुरुवात करताना बाळाच्या बालरोगतज्ञांना एकदा भेट द्या आणि खालील काळजी घ्या.

बाळाचे स्तनपान सोडवताना घ्यायची काळजी

बाळाचे स्तनपान किंवा फॉर्मुला दूध सोडवणे ही प्रक्रिया जरा अवघड आहे. प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्यामुळे प्रत्येक मुलाचे स्तनपान सोडवतानाची प्रक्रिया वेगवेगळी असते. काही बाळांचे दूध इतर मुलांपेक्षा लवकर सुटते, तर काहींच्या बाबतीत दूध अचानक सुटते. बाळाचे दूध सुटल्याने आईच्या स्तनांमध्ये दूध साठून राहते आणि त्यामुळे आईला अस्वस्थ वाटते. अशा वेळी दूध कप मध्ये काढून ते बाळास दयावे. जो पर्यंत बाळाचे स्तनपान घेणे कमी होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया करावी. तसेच, खात्री करा की: वरील सूचनांव्यतिरिक, कुठले अन्न पोषक आहे आणि कुठले घातक आहे हे सुद्धा समजून घ्या. आपल्या ६ महिन्यांच्या बाळासाठी काय चांगले आणि काय चुकीचे हे माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा

स्तनपान सोडवण्यासाठी योग्य अन्नपदार्थ

६ महिन्यांच्या बाळासाठी पोषक पदार्थांमध्ये नैसर्गिक साखर असलेली फळे, कुस्करता येतील अशा भाज्यांच्या प्युरी आणि फळाचा ताजा रस ह्यांचा समावेश होतो. हवाबंद डब्यातील अन्नपदार्थांपेक्षा घरी केलेल्या पदार्थाना प्राधान्य द्या. जर तुम्ही पॅक केलेले अन्न घेतले तर त्यामध्ये जास्त प्रमाणात साखर, गोडीसाठी घातले जाणारे सिरप तर नाही ना ह्याची खात्री करून घ्या. भाजलेले पदार्थ सुद्धा टाळा! बाळाचा स्तनपान सोडवतानाचा एक तक्ता तयार करा आणि बाळाला वेगवेगळी चव आणि पोत असलेल्या अन्नपदार्थांची ओळख करून द्या त्यामुळे तुम्हाला बाळाला काय आवडते आणि काय नाही ह्यावर लक्ष ठेवता येईल. त्यामुळे बाळाच्या आई व्यतिरिक्त इतरांना सुद्धा बाळाच्या जेवणाच्या सवयी समजतील. तुमच्या बाळाला घनपदार्थांची सवय होण्याआधी, बाळाच्या स्तनपान सोडवण्याची सवय तुम्हाला झाली पाहिजे त्यामुळे संक्रमण तुमच्या दोघांसाठी सहज होईल.

स्तनपान सुटण्यासाठी बाळाचे प्रयत्न आणि पुढाकार

ह्यामध्ये बाळाला चमच्याने प्युरी भरवण्याऐवजी टेबलवरील अन्नपदार्थांची ओळख करून दिली जाते. तुम्ही बाळासाठी अन्नपदार्थ कुस्करून, कापून बाळापुढे ठेऊन देऊ शकता आणि आता पुढचे काम बाळाने करायचे आहे. ह्यामुळे आपण काय खात आहोत ह्याचे संपूर्ण नियंत्रण बाळाकडे असते. ह्याचा अर्थ असा नाही की बाळाला अन्नपदार्थ दिल्यानंतर तुम्ही बाळाजवळ थांबला नाहीत तरी चालेल. तुम्हाला बाळाजवळ थांबून बाळावर लक्ष ठेवले पाहिजे तसेच बाळाचे प्रतिक्रिया आणि संकेत समजून घेतले पाहिजेत. बरीच बाळे त्यांना जेवढे हवे तेवढे खातात. त्यामुळे बाळाचे संकेत समजतात आणि बाळाला किती पोषणाची गरज आहे हे सुद्धा समजते. बाळांचा विकास हळू आणि उशिराने होत असेल तर अशा बाळांसाठी वरील पद्धत वापरणे बरोबर नाही कारण त्यामुळे पोषणात कमतरता येऊ शकते. तसेच वरील प्रक्रिया करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत बाळाला खाण्यास पुढाकार घेऊ देणे ह्याचा अर्थ बाळाला अन्नपदार्थांची निवड करू देणे असा नाही. तुमच्या बाळाने पोषक आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. तुम्ही पोषक अन्नपदार्थांचीच निवड करीत आहात ना ह्याकडे लक्ष द्या.

स्तनपान सोडवताना बाळासाठी संतुलित आहार

आपल्या आहारापेक्षा बाळाचा आहार खूप वेगळा असतो. मोठ्या माणसांना चरबीपेक्षा पचन जलद होण्यासाठी तंतुमय पदार्थांची जास्त गरज असते, तर बाळांना तंतुमय पदार्थांपेक्षा चरबीची जास्त गरज असते. आहारात खूप जास्त तंतुमय पदार्थ असल्यास ह्या टप्प्यावर आवश्यक असलेल्या पोषणमूल्यांचे नीट शोषण होत नाही. स्तनपान सोडवताना नीट वेळापत्रक तयार करा आणि बाळाच्या आहारात साखर आणि सिरप घालण्याचे टाळा. तसेच मीठ सुद्धा टाळा कारण बाळाची मूत्रपिंडे जास्त मीठ शोषून घेण्यास तितकीशी सक्षम नसतात.

६ ते ९ महिन्यांच्या बाळांसाठी अन्नपदार्थ

बाळाचे स्तनपान सोडवताना तसेच बाळाची वाढ होत असताना बाळाला द्यायच्या अन्नपदार्थांची यादी टप्पा १ ला - जेव्हा बाळ सहा महिन्यांचे असते टप्पा २ रा: जेव्हा बाळ चमचा कसा वापरायचा ते शिकत असते टप्पा ३ रा: -९ महिने ( -३ सर्विग्ज पिष्टमय पदार्थ, १ सर्विंग प्रथिने)

बाळाचे स्तनपान सोडताना टाळावेत असे अन्नपदार्थ

ह्या काळात बाळास भरवू नयेत असे अनेक पदार्थ आहेत. टाळावेत अशा अन्नपदार्थांची यादी खाली दिली आहे

बाळाचे स्तनपान सोडवताना काही पोषक पाककृती

जर तुम्ही बाळाला घरचे पदार्थ द्यायचे ठरवले तर इथे काही सोप्या पाककृती दिल्या आहेत

१. रताळे आणि लाल भोपळा मॅश

एका रताळ्याचे आणि एका छोट्या लाल भोपळ्याचे साल काढून फोडी करून घ्या. मऊ होईपर्यंत उकळून किंवा वाफवून घ्या. तुमच्या बाळाच्या नेहमीच्या दुधात तुम्हाला हवे तसे कुस्करून घ्या.

२. सफरचंद आणि रासबेरी प्युरी

रासबेरी (१०० ग्रॅम्स) आणि एक मोठे सफरचंद (साल आणि बिया काढलेले) मंद आचेवर मऊ होईपर्यंत ५-८ मिनिटांसाठी ठेवा. प्युरी करून रास्बेरीच्या बिया गाळून घ्या आणि कोमट असताना खायला द्या

३. अवोकाडो आणि केळी मॅश करून

एक छोटे पिकलेले अवोकाडो आणि एक पिकलेले केळे मॅश करून घ्या आणि लगेच खायला द्या

४. हिरव्या मटारची प्युरी

हिरवा मटार (७५ ग्रॅम्स) थोडे मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. थोड्या थंड, उकळलेल्या पाण्यात किंवा तुमच्या बाळाच्या नेहमीच्या दुधात त्याची प्युरी करा आणि बाळाच्या भातात (१ टेबलस्पून) घालून द्या

५. गाजर आणि भोपळा मॅश

दोन गाजर वाफ देऊन शिजवून घ्या (साल काढून फोडी केलेले) आणि भोपळ्याचा एक छोटा तुकडा (साल काढून फोडी केलेला) मऊ होईपर्यंत शिजवून घ्या आणि एकत्र मॅश करा. थोडा बाळासाठीचा भात घालून तुम्ही हे मिश्रण घट्ट करू शकता.

६. फ्रेश फ्रुट योगर्ट

कुठलेही पिकलेले हंगामी फळ घ्या आणि साल काढून त्याचे हवे तसे तुकडे करा. पाण्यात ते फळ उकळून घ्या (१ टेबल स्पून) . फळ मऊ होईपर्यंत शिजू द्या आणि नंतर त्याची प्युरी करा. थंड झाल्यावर नैसर्गिक योगर्ट ( ४ टेबलस्पून) घालून चांगले मिक्स करा

७. गाजर आणि बीटरूट प्युरी

एक गाजर ( साल काढून फोडी केलेले) आणि एक बीटरूट ( साल काढून फोडी केलेले) मऊ होईपर्यंत वाफवून घ्या. मिक्सर मध्ये प्युरी करून घ्या आणि उकळून थंड केलेले पाणी किंवा बाळासाठीचे नेहमीचे दूध घालून चांगले सरसरीत करून घ्या.

८. बटाटा आणि पालक प्युरी

एक मध्यम बटाटा मऊ होईपर्यंत मीठ न घातलेल्या पाण्यात उकडून घ्या. पालक (२० ग्रॅम) पालक बटाट्यावर घालून शेवटचे काही मिनिटे शिजवून घ्या. पाणी काढून थोडे बाळासाठी दूध घालून चांगले मॅश करून घ्या. पालकाची प्युरी करून बटाट्यात घालून घ्या. उकळून थंड केलेले पाणी किंवा स्तनपानाचे दूध घालून चांगले सरसरीत करून घ्या

बाळाला घनपदार्थाची सुरुवात करताना

आधी सांगितल्याप्रमाणे, बाळाचे स्तनपान सोडवणे हा बाळाच्या विकासदरम्यान एक महत्वाचा टप्पा आहे. एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि ती म्हणजे प्रत्येक बाळ वेगळे आहे. बाळाला नियमितपणे बालरोगतज्ञांकडे तपासणीसाठी नेऊन त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. बाळाच्या विकासाचा तक्ता किंवा टेबल केल्यास बाळाच्या विकासाची नोंद ठेवता येते तसेच काही वेगळे आढळले तर त्यामुळे समस्या समजण्यास मदत होऊ शकते. उदा: ऍलर्जिक प्रतिक्रिया प्रत्येक बाळ विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून जात असते त्यामुळे त्याविषयी जास्त काळजी करू नका. तुमच्या बाळाचे स्तनपान सहज सुटले पाहिजे. बाळाची काळजी घेणे महत्वाचे आहेच परंतु बाळाची काळजी घेणाऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. निरोगी माणूसच निरोगी वातावरणात निरोगी बाळ वाढवू शकते. बाळाच्या आहारावर जितके तुम्ही लक्ष देता तितकेच तुमच्या आहारावर शक्य तितके लक्ष केंद्रित करा, त्यामुळे नक्कीच तुमच्या दोघांची तब्येत चांगली राहील. आणखी वाचा: बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना बाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved