बाळ

बाळाचे रांगणे – एक विकासाचा टप्पा

मुलांच्या आयुष्यातील पहिल्या वर्षामध्ये रांगणे हा सर्वात महत्वाचा विकासात्मक टप्पा आहे आणि चालण्याच्या मार्गावरील तो पहिला टप्पा आहे. रांगण्यामुळे बाळ फक्त स्वतःचे स्वतः उठून बसत नाही तर त्यामुळे बाळाला शरीराचे संतुलन सांभाळता येते तसेच शरीराचे संतुलन राखून बाळ पुढे सरकते आणि स्नायू मजबूत होतात.

लहान बाळे रांगायला साधारणपणे केव्हा सुरुवात करतात?

बहुतेक बाळे ७ ते १० महिन्यांच्या दरम्यान कधीतरी रांगणे सुरू करतात, पण सामान्यतः ९ किंवा १० महिन्याच्या आसपास बाळे रांगण्यास सुरुवात करतात. हल्ली बरीच बाळे उशिरा रांगणे शिकत आहेत किंवा चालण्याच्या मार्गावरील हा टप्पा पूर्णपणे वगळताना दिसतात. (तथापि, हे फारच दुर्मिळ आहे)

आपले बाळ रांगण्यास तयार असल्याची चिन्हे

बाळाच्या रांगण्याचे अनेक टप्पे आहेत. प्रत्येक मुलाचा अनुभव वेगळा असला तरीही, तुमचे मूल रांगण्यास शिकणे महत्वाचे आहे. बरीच बाळे पालथे पडणे किंवा पुढे सरकणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी रांगणे शिकतात परंतु काहीजण आणखी वेगळ्या पद्धतीने रांगायला शिकू शकतात. त्याचप्रमाणे, लक्षणे सामान्य असली तरीही प्रत्येक मूल रांगण्याची वेळ वेगवेगळी असते. त्यामध्ये खालील लक्षणे समाविष्ट आहेत: जेव्हा आपले बाळ वरील लक्षणे दर्शविण्यास सुरूवात करते तेव्हा त्यांना त्यांची क्षमता आणखी वाढवू द्या त्यासाठी त्यांना जमिनीवर पोटावर झोपवा, खेळण्यासाठी खेळणी द्या आणि रांगण्यासाठी सुरक्षित जागा सुनिश्चित करा.

बाळाचे रांगण्याचे प्रकार

लहान बाळाचे रांगण्याचे सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कमांडो क्रॉलआणि बॉटम स्कुट. “कमांडो क्रॉल बेबीमध्ये सहसा जेव्हा मूल आपल्या पोटावर झोपते आणि पुढे सरकते, तर 'बॉटम स्कुट" मध्ये कुल्ल्यांच्या सहाय्याने बाळ पुढे सरकते.
रांगण्याचे इतर प्रकार खालीलप्रमाणे:

बाळे रांगणे कसे शिकतात?

बाळाला रांगण्यासाठी मदत करण्यासाठी काही व्यायाम आहेत. रांगणे सुरू करण्यासाठी, बहुतेक मुले त्यांच्या पोटावर पालथे पडून सुरुवात करतात, ज्यामुळे त्यांना सभोवताली पाहता येते आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते. मुलांना वस्तू आणि अडथळ्यांसह गुंतवून ठेवल्यामुळे त्यांना पुढे जाण्यास उत्तेजन मिळेल आणि रांगण्यास सुरवात करण्यासाठी त्यांचे स्नायू हालचाल करण्यास सक्षम होतील. जर बाळ पुढे सरकत नसेल तर ते होण्यासाठी आपण बाळाला कशी मदत करावी हे समजून घ्यावे जेणेकरून त्यांना रांगणे आणि नंतर चालणे सुरू करण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्यास मदत होईल. काही अकाली जन्मलेली बाळे त्यांच्या वयाच्या मुलांपेक्षा उशिरा रांगतात आणि चालतात. रांगणे बाळांसाठी कठीण क्रिया आहे आणि यात संज्ञानात्मक, मोटर आणि व्हिज्युअल-स्पेशिअल कौशल्ये समाविष्ट आहेत. रांगण्यास सक्षम होण्यासाठी, मुलांनी अशा क्रियांमध्ये भाग घेणे आवश्यक आहे ज्यामुळे त्यांचे पाठीचे, मानेचे, खांद्याचे आणि हाताचे स्नायू विकसित होऊ शकतात. त्यांचे वजन आणि संतुलन राखण्यासाठी बाळ सक्षम असले पाहिजे. बर्‍याच मुलांना त्यांची "बायनॉक्युलर व्हिजन" विकसित करण्याची देखील आवश्यकता असते. रांगण्यामुळे डेप्थ पर्सेप्शन मजबूत होण्यास मदत होते आणि त्यामुळे हालचालीस मदत होते. रांगण्यात प्रगती होत असताना, बाळाचं नेव्हिगेशन आणि स्मरणशक्ती कौशल्य विकसित करण्यात मदत होते.

जर आपले बाळ रांगत नसेल तर काय करावे?

जर तुमचे बाळ इतर मुलांप्रमाणे वेगाने हालचाल करत नसेल किंवा काही पद्धती इतरांप्रमाणे कार्य करत नसतील तर आपण खूप तणावग्रस्त होऊ नये. जेव्हा तुमचे बाळ तयार आणि सक्षम असेल तेव्हा ते रांगण्यास सुरुवात करेल. १० महिन्याचे झाल्यावरसुद्धा जर बाळ रांगत नसेल तर काही पालक चिंताग्रस्त होतील, परंतु जोपर्यंत ते हालचालीचे इतर प्रकार दर्शवित नाहीत तोपर्यंत काळजी करण्याचे कारण नाही. जर बाळ वर्षाचे झाल्यावरसुद्धा काही हालचाल करत नसेल तर डॉक्टरांना दाखवणे योग्य होईल.

आपल्या बाळाला रांगण्यास कशी मदत करावी?

बरीचशी बाळे जास्त मदत न घेता स्वतःचे स्वतः रांगायला शिकतील, तर बर्‍याच मुलांना त्यांच्या पालकांकडून थोडी मदत आणि मार्गदर्शन आवश्यक असेल. आपल्या मुलाची स्नायूंची मजबूती वाढविण्यासाठी आणि हालचाल करण्यास मदत करण्यासाठी काही टिप्स ह्यामध्ये समाविष्ट आहेत. पोटावर झोपवणे - पोटावर झोपवल्यामुळे बाळांना त्यांचे शरीर धरून ठेवण्याची शक्ती विकसित होण्यास मदत होते. त्यांना डोक्याची हालचाल करण्यास भाग पाडणे - डोके वर काढून मानेची हालचाल करणे हा बाळासाठी चांगला व्यायाम आहे, त्यामुळे त्यांचे स्नायूदेखील चांगल्या प्रकारे तयार होतात. खेळणी - प्लेटाईम मजेदार केल्याने आणि खेळण्यांनी आपल्या मुलाचे मनोरंजन केल्याने बाळाला रांगण्यास मदत होते. वस्तू किंवा खेळण्यांना आवाक्याबाहेर ठेवल्यास बाळाच्या शारीरिक हालचालीस आणि स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. आपल्या बाळास रांगण्यासाठी मदत करण्यासाठी काही इतर टिप्स प्रामुख्याने पालकांच्या वैयक्तिक आवश्यकतांशी संबंधित असतात. काही पालकांना बोगद्याचा किंवा पीकाबूचा खेळ खेळण्यास आवडते तर काही पालक बाळ एके जागी कसे बसून राहणार नाही ह्याची दक्षता घेतात. सर्वसाधारणपणे, सुरुवातीच्या काळात आपल्या मुलास अशा क्रियाकलापांमध्ये सामील चांगले आहे जी त्यांना कौशल्ये विकसित करण्यात मदत करतील ज्यामुळे त्यांना रांगण्यास सक्षम होण्यास मदत होईल.

बाळांच्या सुरक्षित रांगण्यासाठी काही टिप्स

बाळ जेव्हा रांगण्यास सुरुवात करते तेव्हा काय करावे ह्यासाठी अनेक शिफारसी आहेत. त्यानुसार बाळ जिथे रांगते किंवा रांगण्यास शिकते ती जागा बाळासाठी सुरक्षित असली पाहिजे
बाळाच्या सुरक्षिततेसाठी पायऱ्यांवर बॉक्स ठेवा - त्यांना वरच्या मजल्यापर्यंत रांगेत जाण्यासाठी मदत करण्यासाठी बॉक्स वापरा, परंतु त्यांना पायर्‍यावर जाण्यास आरामदायक होईपर्यंत बाळांसाठी संरक्षक साहित्य वापरा. हालचालीसाठी प्रोत्साहन म्हणून सुरक्षित खेळणी आणि वस्तू प्रदान करणे - बाळ पोहोचू शकेल अशा अंतरावरच्या तीक्ष्ण, फुटू शकतील अशा वस्तू किंवा बाळ तोंडात घालेल अशा वस्तू दूर करा. अडथळे दूर करा - सामान्य अडथळ्यांमध्ये लोम्बणाऱ्या तारा, एक्सपोज़ आउटलेट्स, अवजड फर्निचर आणि सुरक्षित नसलेल्या इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे. बाळाला रांगण्यासाठी मदत होतील अशा सुरक्षित टिप्स

रांगल्यानंतर पुढे काय?

रंगल्यानंतर, बाळे (सरावाद्वारे) हळूहळू कौशल्ये विकसित करतील ज्यामुळे त्यांना चालण्यासाठी गती मिळेल. मुले जेव्हा स्वत: फर्निचरला धरू लागतील आणि स्वत: ला स्थिर ठेवण्यासाठी इतर वस्तू वापरू लागतील, तेव्हा तुम्हाला समजेल की आपले मुल चालण्यास तयार आहे. एकदा त्यांना स्वत: च्या पायावर उभे राहता येऊ लागले की मुले फर्निचर किंवा वस्तू धरून ठेवून हालचाल करू शकतील आणि अखेरीस कोणतीही मदत न घेता बाळे स्वतंत्रपणे पाऊल टाकू लागतील आणि इथूनपुढे हालचालीसाठी धावणे, उड्या मारणे इत्यादी इतर कौशल्ये सुद्धा बाळ शिकेल. रांगणे हा आपल्या बाळासाठी एक महत्त्वपूर्ण विकासाचा टप्पा आहे आणि त्याबाबत चिंता वाटणे साहजिक आहे हे आम्ही समजू शकतो. बहुतेक बाळे ९ ते १० महिन्यांच्या दरम्यान रांगायला शिकतील. अर्थात प्रत्येक मुलाचा रांगण्याचा वेग वेगळा असेल आणि बर्‍याचदा ते वेगवेगळ्या प्रकारे रेंगाळतील. आपले बाळ रांगायाला तयार आहे हे दर्शवणारी बरीच लक्षणे असतील आणि तुम्ही त्यांना सुरक्षित मार्गाने रांगण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रांगणे, निःसंशयपणे, चालण्याच्या मार्गावरील एक महत्त्वाची पायरी आहे आणखी वाचा:  नवजात बाळाची काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved