गर्भधारणा होताना

बाळ होण्यासाठी नियोजन करत आहात का? – गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम वय कोणते हे जाणून घ्या

लोकांना त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर म्हणजेच वेगवेगळ्या वयात मुले होतात. म्हणून, "बाळ होण्यासाठी विशिष्ट वय असावे लागते का?" असा प्रश्न निर्माण होतो. परंतु त्यामागची सत्यता म्हणजे, मुले होण्याच्या प्रत्येक वयोगटाचे काही फायदे आणि तोटे आहेत. तसेच तुमची आर्थिक स्थिती, तुम्ही ज्या समाजात राहता तो समाज आणि दोन्ही पालकांचे करियर हे सर्व घटक कुटुंबाची सुरवात करण्यासाठी योग्य वेळ ठरवण्यास कारणीभूत असतात. ह्या लेखात स्त्रीच्या वयावर अवलंबून असलेल्या गर्भधारणेच्या सर्व बाबींची चर्चा आपण करणार आहोत. ह्या सगळ्या घटकांचे सखोल ज्ञान घेतल्यास तुमच्यासाठी गर्भधारणेचे कुठले वय योग्य आहे हे तुम्हाला समजेल.

गरोदर राहण्यासाठी सर्वोत्तम वय कुठले?

ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याला प्रश्न विचारला आहे त्यांच्यावर अवलंबून असते. "सर्वोत्तम" ची व्याख्या प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असते. परंतु, बऱ्याच अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की गरोदर राहण्यासाठी सर्वात चांगले वय हे २०-३५ च्या दरम्यान असते. परंतु, बाळ होण्याचे योग्य वय हे बाळ वाढवता येण्याच्या वयापेक्षा वेगळे असते आणि ते वय म्हणजे तिशीचा मध्य होय.

गरोदर राहण्यासाठी वय महत्वाचे आहे का?

बाळ होण्यासाठी २०-३५ हे वय चांगले समजले जाते कारण ह्या वयात स्त्री गर्भारपणासाठी शारीरिकदृष्ट्या चांगली सक्षम असते. ह्या वयात गर्भधारणा होणे सोपे असते तसेच गर्भारपणाशी संबंधित गुंतागुंत जसे की प्री-इक्लॅम्पसिया, एक्टोपिक प्रेग्नन्सी इत्यादी होण्याची शक्यता खूप कमी असते. ह्या वयात स्त्रीबीज सुद्धा निरोगी असते. म्हणून, हा काळ स्त्रीने गर्भवती राहण्यासाठी सर्वात उत्तम आहे. तसेच दोन गर्भारपणांमध्ये पुरेसे अंतर सुद्धा तुम्ही ठेवू शकता. वेगवेगळ्या वयातील गरोदरपणाविषयी आपण चर्चा करूयात ज्यामुळे तुम्हाला तुमचे पहिले किंवा दुसरे बाळ केव्हा हवे ह्याविषयी निर्णय घेणे सोपे जाईल.

वेगवेगळ्या वयातील गर्भारपण

काहींसाठी २०-२५ वर्षे हा कालावधी बाळ होण्यासाठी योग्य असला तर सुद्धा काही लोक ३० वर्षे वयाच्या आधी बाळ होण्याचा विचार देखील करू शकत नाहीत. वेगवेगळ्या वयातील गर्भधारणेचे फायदे आणि तोटे

) २०-२५ वयातील गर्भारपण

ह्या वयात स्त्रीची प्रजनन क्षमता अतिउच्च असते आणि त्यामुळे गर्भधारणेची शक्यता अधिक असते. आयुष्याच्या ह्या काळात अनेक स्त्रीबीजे असतात. ह्या काळात गर्भधारणा राहिल्यास धोका कमी असतो आणि गरोदरपणानंतर झालेले बाळ निरोगी असते. ह्या कालावधीत बाळ होण्यामागचे फायदे आणि तोटे काय आहेत ते पाहुयात

) २६-३४ वयातील गर्भारपण

२६ ते ३४ हा गरोदरपणाची चांगला काळ आहे. विशेषकरून ज्या स्त्रियांची जीवनशैली आरोग्यपूर्ण आहे आणि ज्यांचा फिटनेस चांगला आहे अशा स्त्रियांच्या बाबतील हे लागू होते. परंतु, तुम्ही जर गर्भारपणाचा विचार करीत असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा. करिअर करणाऱ्या स्त्रियांसाठी, गरोदर राहण्यासाठी वयाच्या तिशीच्या सुरुवातीच्या काळाला प्राधान्य दिले जाते. किंबहुना, असे निदर्शनास आले आहे की ज्यांनी किशोरवयीन असताना बाळाला जन्म दिला त्यांना आयुष्यात नंतरच्या टप्प्यावर तिशीत आई झालेल्या स्त्रियांपेक्षा जास्त आरोग्याच्या तक्रारी येतात.

) ३५-४० वयातील गर्भारपण

३५-४० दरम्यान, प्रजननक्षमतेची पातळी कमी होत जाते आणि जसजसे तुम्ही चाळीशीकडे झुकता तसे गर्भधारणा होणे अवघड होत जाते. ह्या काळात बाळ होताना खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत

४) चाळिशीनंतर चे गर्भारपण

चाळिशीतल्या महिलांचे बाळाला जन्म देण्याचे प्रमाण गेल्या दोन दशकांपासून लक्षणीय रित्या वाढले आहे. परंतु, चाळिशीनंतर प्रत्येक महिन्यात गर्भवती राहण्याची शक्यता ५ टक्क्यांनी कमी होते. जरतुम्ही चाळिशीनंतर बाळाचा विचार करीत असाल तर तुम्हाला खालील गोष्टी माहिती पाहिजेत. गर्भारपणासाठी तुमच्या वयापेक्षा तुमची तब्येत चांगली असणे महत्वाचे असते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि गर्भावस्थेत योग्य ती काळजी घेतल्यास तुमचा गरोदरपणाचा काळ सुकर होईल आणि तुमचे वय काहीही असले तरी तुम्हाला निरोगी बाळ होईल. तसेच स्त्रीचे वय आणि प्रजनन क्षमतेसोबतच, निरोगी बाळ होण्यासाठी तिच्या पतीची प्रजनन क्षमता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. पुरुषांच्या बाबतीत वय आणि प्रजननक्षमता एकमेकांवर कसे अवलंबून आहेत ते पाहुयात.

पुरुषांचे वय आणि प्रजननक्षमता

गर्भधारणा होण्यासाठी फक्त उच्चप्रतीच्या स्त्रीबीजाची गरज नसते तर त्यासाठी निरोगी आणि चांगल्या शुक्राणूंची सुद्धा गरज असते. आणि, स्त्रियांप्रमाणेच, वयानुसार पुरुषांची प्रजननक्षमता सुद्धा कमी होते. म्हणून, जर एखादे जोडपे गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असेल तर पुरुषांची प्रजननक्षमता हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. पुरुषांची प्रजननक्षमता वयाच्या ४१ ते ४५ मध्ये दर वर्षी ७ टक्क्यांनी कमी होते. आणि त्यानंतर प्रजननक्षमतेमध्ये वेगाने घट होते. जर वडिलांचे वय ४५ पेक्षा जास्त असेल आणि आईचे वय काहीही असले तरी गर्भपाताचा धोका वाढतो. पुरुचाच्या वयाचा परिणाम होणारे इतर घटक सुद्धा पाहुयात वय जास्त झाल्यावर पुरुष वडील होऊ शकत नाही असे नाही. परंतु खरे पाहता, पुरुषांमध्ये सुद्धा स्त्रियांप्रमाणेच वयोमानानुसार प्रजननक्षमता कमी होत जाते आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे खूप अवघड होते. तुमच्या आयुष्यात एखाद्या विशिष्ट वयात गर्भवती राहण्याची किंवा मूल होण्याची कारणे भिन्न असू शकतात. परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण निवडलेल्या प्रत्येक पर्यायात आनंदी राहणे तसेच मुलांना वाढवतानाची आव्हाने पेलत आनंदात वाढ करत राहणे हे होय. आणखी वाचा: चाळीशीत गर्भवती होताना तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved