बाळ

बाळांसाठी ६ इन १ लसीकरण – प्रत्येक आईने हे का विचारात घेण्यासारखे आहे?

मुलाच्या आयुष्याच्या विशेषत: सुरुवातीच्या काळात वेळेवर लसीकरण करणे महत्वाचे आहे. मुलांचे लसीकरण केल्याने त्यांचे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होते अन्यथा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती लढा देऊ शकणार नाही.

लसीकरण कसे काम करते?

ज्या विषाणू किंवा जीवाणू मुळे रोग / आजार उद्भवतात त्याचे क्षीण किंवा कमकुवत स्वरूप लसीकरणाद्वारे दिले जाते. कोणत्याही परकीय प्रतिजनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंडे तयार करण्यासाठी आपल्या शरीराची रचना केली गेलेली आहे. भविष्यात जर का, ह्यापैकी कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूंनी शरीरात प्रवेश केल्यास, ही प्रतिपिंडे त्यांच्यावर हल्ला करू शकतात, आणि रोगांपासून त्या व्यक्तीचे संरक्षण करू शकतात. विकसनशील रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या बाळांना पहिल्या काही वर्षांच्या कालावधीत एकाधिक लसीकरण केले जाते. काही पालकांना आपल्या लहान मुलांना वेदनेपासून वाचवायचे असते. लस शास्त्रामधील (व्हॅक्सिनोलॉजी) प्रगतीबद्दल धन्यवाद, ६ इन १ लसीकरणासारख्या संयोजन (कॉम्बिनेशन) लसीकरणामुळे मुलांचे संरक्षण करण्यास मदत करत आहे आणि एका पेक्षा जास्त लसींमुळे मुलांना येणारी अस्वस्थता सुद्धा टाळली जाते.

६ इन १ लसीकरण म्हणजे काय?

नावाप्रमाणेच, ६ इन १ लसीकरण हे एकल लसीकरण आहे. हे लसीकरण नवजात लहान मुलांचे, डिप्थीरिया (घटसर्प), डांग्या खोकला (पेर्टुसिस), हिपॅटायटीस बी (यकृतशोथ), एचआईबी रोग (हिमोफिलस इन्फ्लूएंझा टाइप बी), पोलियो आणि टिटॅनससह (धनुर्वातासह) सहा गंभीर आजारांपासून संरक्षण करते. संयोजन (कॉम्बिनेशन) लसीकरणामुळे डॉक्टरांकडे कमी वेळा जायला लागते, आपल्या बाळाला कमी इंजेक्शन्स घ्यायला लागतात, बाळाच्या वेदना कमी होतात आणि निश्चितपणे हे अधिक सुविधाजनक आहे!

६ आजार आणि त्यांचा प्रतिबंध

संयोजित (कबांइन्ड) लसीकरण सहा संसर्गजन्य आजारांपासून लहान बाळांचे संरक्षण करते. ते आजार खालीलप्रमाणे आहेत:

१. पोलिओ

अस्वच्छता आणि दूषित पाणी व अन्न ही पोलिओची कारणे आहेत. ह्याचा मुख्यत्वेकरून परिणाम पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर होतो. उपचार अजिबात न केल्यामुळे किंवा निकृष्ट दर्जाचे उपचार केल्यामुळे अर्धांगवायू सारखे कायमस्वरुपी अपंगत्व येऊ शकते किंवा अगदी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. उत्तम स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीने ठेवलेली चांगली स्वच्छता, लसीकरण या गोष्टी पाळल्यास पोलिओ टाळता येऊ सशकतो

२. डांग्या खोकला (पेर्टुसिस)

डांग्या खोकला म्हणूनही ओळखला जाणारा, पेर्टुसिस हा एक श्वसन रोग आहे जो संसर्गजन्य सूक्ष्म थेंबांद्वारे प्रसारित होतो. हा रोग अत्यंत संसर्गजन्य असल्याने, ज्यांना ह्याचा संसर्ग झालेला आहे त्यांच्यापासून मुलांना दूर ठेवले पाहिजे. संक्रमित व्यक्तीपासून दूर राहून आणि लसीकरणाद्वारे पेर्टुसिस होणे टाळले जाऊ शकते.

३. घटसर्प (डिप्थीरिया)

घटसर्प हा एक रोगजंतूसंबंधी संसर्ग आहे. प्रथमतः अर्भकांमधील नाक आणि घश्याला हा संसर्ग होतो. ह्या संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, फुफ्फुसाचा संसर्ग, अर्धांगवायू इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. संक्रमित व्यक्तीपासून दूर राहून आणि लसीकरणाद्वारे घटसर्प (डिप्थीरिया) टाळता येऊ शकतो.

४. एचआयबी रोग (हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी)

एचआयबी हा एक जिवाणूंमुळे होणारा रोग आहे. ह्या रोगामुळे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाह), मेनींजिटिस (मेंदुज्वर) आणि इतर गंभीर आजार होतात. उत्तम स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेची काळजी घेऊन आणि लसीकरणाद्वारे हिपॅटायटीस बी टाळता येऊ शकतो.

५. हिपॅटायटीस बी (यकृतशोथ)

हिपॅटायटीस बी (यकृतशोथ) हा एक विषाणूजन्य रोग आहे. ह्या रोगामुळे यकृताचे नुकसान होते. हा रोग दीर्घकालीन आणि तीव्र असू शकतो. गर्भवती माता जन्माच्या वेळी आपल्या बाळाला संसर्ग देखील देऊ शकते. संक्रमित व्यक्तीचे रक्त आणि शारीरिक द्रव संपर्क टाळल्यास तसेच चांगली स्वच्छता आणि लसीकरणाद्वारे हिपॅटायटीस बी (यकृतशोथ) टाळला जाऊ शकतो.

६. धनुर्वात (टिटॅनस)

धनुर्वात (टिटॅनस) हा एक जिवाणूंद्वारे होणारा रोग आहे. ह्या रोगामुळे मान, जबडा आणि शरीराच्या इतर भागांमधील स्नायूंमध्ये कडकपणा येतो. ह्या रोगाचे जंतू अनेकदा जखमा आणि कापलेल्या भागामधून मोठ्या प्रमाणात प्रवेश करतात, परंतु जखमेची योग्य काळजी आणि लसीकरण ह्याद्वारे धनुर्वात (टिटॅनस) रोखला जाऊ शकतो. जखमेची काळजी आणि देखभाल तसेच लसीकरणाद्वारे धनुर्वात टाळला जाऊ शकतो.

६ इन १ लसीकरणासाठी शिफारस केलेले वयोमान

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) ने शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार, डीटीपी-आयपीव्ही-एचआईबी-हेपबी बाळांना ६, १० आणि १४ आठवड्यांच्या वयातच दिले पाहिजे. ६ इन १ लसीकरण हे ६ आजारांसाठी संरक्षण प्रदान करते. जर आपल्या बाळाचे नियमित लसीकरण चुकले असेल तर, त्यात काही अडचण नाही, आपल्या मुलाच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधून भेटण्यासाठी अद्याप उशीर झालेला नाही. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

६ इन १ लसीकरणाचे फायदे

६ इन १ लसीकरण बाळ आणि पालक दोघांनाही विविध प्रकारचे फायदे देते.

बाळांसाठी फायदे:

१. वेळेवर संरक्षण २. कमी वेळा इंजेक्शन घ्यावे लागते ३. एकाधिक इंजेक्शन्स मुळे होणाऱ्या वेदना आणि अस्वस्थता कमी होते.

पालकांसाठी फायदे:

१. अधिक सोयीस्कर २. बालरोगतज्ञांकडे कमी वेळा जावे लागते ३. काम किंवा कौटुंबिक क्रियाकलापांपासून कमी वेळा सुट्टी घ्यावी लागते

एकापेक्षा अधिक प्रतिजन संयोजित केल्याने अधिक दुष्परिणाम होणार नाहीत का?

६ इन १ लसीकरणाचे दुष्परिणाम अन्य लसीकरणासारखेच असतात. संयोजन लसीकरणाने इंजेक्शन दिलेल्या जागेवर येणारी सूज किंवा वेदना संयोजन लसीकरणामुळे किंचित जास्त असू शकते. तरीही अनेक वेळा इंजेक्शन घेतल्यावर होणाऱ्या वेदनांपेक्षा ह्या वेदना कमी असतील. सामान्यतः बहुतेक लसीकरणांमध्ये जसा ताप, चिडचिडेपणा आणि भूक न लागणे इत्यादी दुष्परिणाम आढळतात तसे इथे सुद्धा आढळून येतात. ज्या काळात आरोग्याला सर्वात जास्त महत्व असते, त्या काळात ६ इन १ लसीकरण नवजात बालकांना तसेच त्यांच्या पालकांनाही सुविधा देते. जर तुमच्या नवजात बाळाचे लसीकरण बाकी असेल तर अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. ६ इन १ लसीकरणाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. अस्वीकारण: ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400 030, भारत द्वारे सार्वजनिक हितासाठी जारी केलेले आहे इथे दिलेली माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. ह्या लेखात कुठलाही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कृपया कोणत्याही वैद्यकीय प्रश्नांसाठी, आपल्या स्थितीबद्दल अथवा आपल्यास असलेल्या कोणत्याही प्रश्नासाठी किंवा समस्येसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शवलेल्या रोगांची यादी पूर्ण झालेली नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. CL code:  NP-IN-INH-OGM-220088, April 2022
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved