अन्न आणि पोषण

२२ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहारतक्ता आणि पाककृती

पहिल्यांदाच पालक होत असल्यास बाळाला भरवणे हे आव्हानात्मक वाटू शकते. १८-२२ महिने ह्या वयोगटातील मुले ही खूप खेळकर आणि सक्रिय असतात. त्यांना त्यांच्या आवडीच्याच गोष्टी खायच्या असतात त्यामुळे त्यांना पोषक आहार खायला लावणे म्हणजे तुमच्या साठी खूप अवघड होऊन बसते. जर तुमचे २२ महिन्यांचे बाळ तुम्हाला पोषक आहार घेण्यास त्रास देत असेल तर हा लेख वाचा. ह्या लेखामध्ये अन्नपदार्थांचे काही पर्याय आणि पाककृती दिल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या २२ महिन्यांच्या मुलाला देऊ शकता.

२२ महिने वयाच्या मुलासाठी पोषणाची गरज

बाळाची निरोगी वाढ आणि विकास व्हावा म्हणून बाळाला योग्य पोषण हे अत्यावश्यक आहे. पालक म्हणून तुम्ही बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासास लागणारी पोषणमूल्ये मिळत आहेत ना ह्याची खात्री करा. २२ महिन्यांच्या बाळाला लागणारी वेगवेगळी पोषणमूल्ये आणि बाळाची वाढ आणि विकासात त्यातील प्रत्येकाचा सहभाग खालीलप्रमाणे आहे.

. प्रथिने

शरीराच्या टिश्यू आणि स्नायूंच्या विकासासाठी प्रथिनांचा महत्वाचा सहभाग आहे. वाढत्या बाळाच्या शरीरातील टिश्यू आणि स्नायू निर्मिती आणि दुरुस्तीसाठी प्रथिने मदत करतात.

. कर्बोदके

दिवसभर सक्रिय राहण्यासाठी कर्बोदके बाळास ऊर्जा देतात. कर्बोदकांमुळे बाळाच्या मेंदूचा विकास पण चांगला होतो. वाढणाऱ्या बाळाने दिवसभरात ६ वेळा कर्बोदके घेतली पाहिजेत. बाळाची कर्बोदकांची गरज भागण्यासाठी तुम्ही बाळाला संपूर्ण धान्य, ब्रेड, सीरिअल, पास्ता, मका आणि गहू दिले पाहिजेत.

. चरबी

बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी चरबी गरजेची आहे. चरबीमुळे स्नायूंची हालचाल होते आणि पेशी तयार होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या बाळाला निरोगी चरबी असलेले अन्नपदार्थ देण्यास संकोच बाळगू नका. तुम्ही बाळाला तूप, ऑलिव्ह ऑइल, आणि बटर देऊ शकता. मुलांना दररोज ३ टीस्पून चरबी मिळाली पाहिजे.

. व्हिटॅमिन

शरीराची पचनक्रिया, हाडे आणि स्नायूंची दुरुस्ती, प्रतिकारप्रणालीचा विकास ह्या सगळ्यामध्ये व्हिटॅमिन्सचा महत्वाचा सहभाग असतो. त्यामुळे वाढत्या बाळासाठी ते लागणारे पोषणमूल्य आहे. तुम्ही बाळाला दूध, चीझ, अंडी, फळे आणि भाज्या देऊ शकता. मुलांना दिवसातून कमीत कमी १ कप शिजवलेल्या भाज्या आणि १ कप फळे दिली पाहिजेत.

. व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी

गुणसूत्रांची निर्मिती, तांबड्या रक्तपेशींची निर्मिती, मेंदूचे कार्य सुरळलीत चालावे म्हणून व्हिटॅमिन बी १२ हे महत्वाचे आहे. हे नैसर्गिकरित्या भाज्यांमध्ये नसते. म्हणून शाकाहारी लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला व्हिटॅमिन बी १२ च्या गोळ्या दिल्या पाहिजेत. व्हिटॅमिन बी १२ असलेले अन्नपदार्थ सुद्धा बाळाला दिले पाहिजेत जसे की दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे इत्यादी. शरीर व्हिटॅमिन डी ची निर्मिती करते आणि सूर्यप्रकाश उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्य करते. तुमच्या बाळाला सकाळी किंवा संध्याकाळी पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आहे ना ह्याची खात्री करा.

. खनिजद्रव्ये

शरीराच्या वेगवेगळ्या कार्यासाठी खनिजद्रव्ये महत्वाची आहेत. लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडियम. कॉपर, क्लोराईड, सल्फर, जस्त, सेलेनियम वगैरे हे आवश्यक आहेत. ही सगळी खनिजद्रव्ये बाळाच्या आरोग्यपूर्ण विकासासाठी लागतात. ही खनिजद्रव्ये दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या, मांस , मासे, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या ह्यांच्या मध्ये आढळतात.

. तंतुमय पदार्थ

पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी तंतुमय पदार्थ जरुरी आहेत. तंतुमय पदार्थांमुळे अन्नपदार्थ पुढे सरकतात आणि पचन चांगले होते. मुलांसाठी तंतुमय पदार्थांमध्ये साल न काढलेले सफरचंद, पेअर, केळी, बियांसहित बेरी आणि संपूर्णधान्य जसे की ओटस आणि दही ह्यांचा समावेश होतो.

. पाणी

बाळाने सजलीत राहणे हे महत्वाचे आहे. बाळाच्या वजनाच्या ६०% वजन हे पाण्याचे असते. १ ते ३ वर्षे वयाच्या मुलांना १ लिटर पाणी लागते. बाळाने घ्यायावयाच्या द्रवपदार्थांमध्ये सूप, ज्यूस, दूध ह्यांचा सुद्धा समावेश होतो. परंतु पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

२२ व्या महिन्यांत बाळाला किती अन्नाची गरज असते?

२२ व्या महिन्यात बाळाचे पोट म्हणजे त्याच्या बंद केलेल्या मुठीच्या आकाराएवढे असते. म्हणून तुम्ही मोठ्या माणसाइतके बाळाने खाल्ले पाहिजे अशी अपेक्षा करता कामा नये. बाळाचे जेवण कमी ठेवा. सरासरी २२ महिन्यांच्या बाळाला त्यांच्या आकार आणि सक्रियतेच्या पातळीनुसार १००० -१४०० कॅलरी अन्न दिवसाला लागतात. ह्यामध्ये ८०-८५ ग्रॅम्स संपूर्ण धान्य, १ कप भाज्या, १ कप फळे, २ काप दूध (४५०-५०० मिली) आणि ५५ ग्रॅम्स मांस आणि बीन्स लागतात.

२२ महिन्यांच्या बाळाला लागणारे सर्वोत्तम अन्नपदार्थ

२२ महिन्यांच्या बाळासाठी इथे काही पोटभरीचे आणि पोषक अन्नपदार्थांचे पर्याय दिले आहेत.

. भाज्यांचे पराठे

पनीर, गाजर, कॉलीफ्लॉवर आणि उकडलेले बटाटे भरून बाळासाठी छोटे, तळव्याच्या आकाराचे पराठे तुम्ही करू शकता. त्यासोबत एक छोटा चमचा तूप घाला. त्यामध्ये कर्बोदके, तंतुमय पदार्थ आणि इतर भरपूर पोषणमूल्ये असतात आणि बाळाला त्यांच्या विकासास मदत करतात.

. चीझ डोसा

नेहमीप्रमाणे डोसा करा आणि त्यामध्ये चीझ किसून टाका. तुमच्या बाळाला ते आवडेल. तथापि, तुमच्या बाळासाठी छोटा डोसा करा. बाळ तो पटकन खाऊन टाकेल. चीझमुळे बाळाला कॅल्शिअम मिळते ते बाळाच्या हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. बाळाला दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी नाही ह्याची खात्री करा.

. व्हेजिटेबल इडली

साध्या इडल्यांऐवजी, इडलीच्या पिठात कुस्करलेला मटार किंवा किसलेला कोबी, गाजर घाला आणि मग उकाडा. ह्या भाज्या घातल्यामुळे बाळाला भरपूर व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन बी ६ मिळेल जे बाळाच्या केस, नखे इत्यादींसाठी महत्वाचे आहे.

. भाज्या आणि चिकन घातलेले अप्पम

ही डिश नेहमीपेक्षा वेगळी आहे पण पोषक सुद्धा आहे. चिकन सूप आणि व्हेजिटेबल सूप यांच्यासोबत तांदळाच्या पिठापासून केलेले अप्पम म्हणजे तुमच्या बाळासाठी पोषणमूल्यांचे एक संपूर्ण पॅकेज आहे. सूप मध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात ज्यामुळे तुमच्या बाळाची बाळाची पचनसंस्था चांगली रहाते.

. भाज्या घालून केलेली खिचडी

भात आणि मसूर दोन्ही मुलांसाठी चांगले असतात. आणि भाज्या घालून खिचडीचा अजून फायदा होतो. भारतीय घरांमध्ये हे मुख्य पोषण आहे, आणि गरम गरम वाढल्यास मुलांना सुद्धा खिचडी आवडते. भात आणि मसूर हे दोन्ही सुद्धा अतिशय उपयोगी प्रथिने असून बाळाच्या विकासासाठी ते उत्तम आहेत.

. भाज्यांचे काप कबुली चण्याच्या पेस्ट सोबत

लहान मुलांना कबुली चणे वाटून त्याची पेस्ट केलेली खूप आवडते. बाळाच्या मेंदूच्या आणि डोळ्यांच्या विकासासाठी त्याची मदत होते. तो लोहाचा सुद्धा उत्तम स्रोत आहे आणि तुमच्या बाळाला शिजवलेल्या भाज्यांचे काप त्यासोबत खायला खूप आवडतील.

. हंगामी फळे

तुमच्या मुलाला बाजारात उपलब्ध असलेली हंगामी फळे द्या. त्यामुळे बाळांना वेगवेगळ्या फळांमधून बरीच पोषणमूल्ये मिळाल्याची खात्री होईल. फळांचे पोषणासाठी वेगवेगळे फायदे होतील आणि त्यामुळे आरोग्य चांगले राहील. लोहाचा एक चांगला डोस घेतल्यास तांबड्या पेशींच्या निर्मितीस मदत होते आणि तंतुमय पदार्थांमुळे बाळाच्या पचनसंस्थेस आराम पडतो.

. जेवण संयोजन

छोले भटुरे, पालक पनीर, रोटी, डाळ भात आणि भेंडीची भाजी तसेच टोमॅटोची चटणी आणि डोसा हे बाळाला देऊन पहा. ह्या प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट फायदे आहे जसे की छोले हे प्रथिनांनी समृद्ध असतात, पालकामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात. ह्यामुळे बाळाचे स्नायू विकसित होतात आणि बाळाची निरोगी वाढ होते.

. टोमॅटो, कांदा आणि चीझ घालून अंडा भुर्जी

कांदा-टोमॅटो परतून त्यामध्ये अंडी फोडून घाला अंडाभुर्जी करा. वरून चीझ किसून घाला. अंडी, लोह चरबी आणि प्रथिनांनी समृद्ध आहेत आणि वाढत्या बाळासाठी हे फार महत्वाचे आहे.

१०. सँडविचेस

मऊ चीझ, काकडी आणि गाजर घातलेली सँडविचेस बाळासाठी पोषक असतात. काकडी आणि गाजर हे तंतूंचे चांगले स्रोत आहेत. तुम्ही बाळाला देण्याआधी काकडीचे साल काढून टाकत आहात ना ह्याची खात्री करा.

२२ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार योजना

२२ महिन्यांच्या बाळासाठी खाली आहार तक्ता - भारतीय:
दिवस न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला ढोकळा कापलेली फळे गाजर-पालक रायता आणि मेथीचा पराठा उकडलेले रताळे आणि चाट मसाला चिकन सूप आणि हक्का नूडल्स
दिवस २ रा अंड्याचा पराठा आणि केशर वेलची दूध केळं, शेंगदाणा लाडू अप्पे, भाज्यांचे सूप + बीटरूट रायता गव्हाची बिस्किटे आणि दही पालक डीप पोळी +भाजी + डाळ फ्राय
दिवस ३ रा बदाम, मनुके घातलेला दलियाचा शिरा आणि दूध मोड आलेले मूग, सफरचंद-पुदिना चाट नाचणी-गहू रोटी+ मोड आलेली कडधान्ये आणि पालक + काही चेरी टोमॅटो खीर भाज्यांचे सूप + पालक पनीर + पराठा
दिवस ४ था ओट्स वॉफेल आणि चॉकलेट मिल्क फ्रुट चाट पोळी+डाळ +आवडीची भाजी + गाजराचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात पनीरचे छोटे तुकडे मध आणि चाट मसालासोबत टोमॅटो -भोपळा-मसूर डाळ सूप आणि हातसडीच्या तांदळाचा भात
दिवस ५ वा मिक्स डाळींचे धिरडे आणि पुदिन्याची चटणी गाजर सफरचंद सूप पालक पनीर पराठा काही चेरी टोमॅटो शेवयांचा उपमा + केशर वेलची दूध मोड आलेले मूग आणि ओट्स चे कटलेट, घरी केलेल्या खजूर, टोमॅटो, पुदिना चटणीसोबत
दिवस ६ वा ठेपला + चुंदा + केशर-वेलची दूध फ्रुट चाट संपूर्णधान्य रोटी+ डाळ+ आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात खाकरा आणि दही बेसन-ज्वारी-कोथिंबीर धिरडे आणि दही
दिवस ७ वा बेसन पराठा+ १ ग्लास दूध लिंबू सरबत बाजरीची भाकरी+ वांग्याचे भरीत+ डाळ + मिक्स व्हेज रायता दूध आणि पोहे थालीपीठ, लोणी आणि ताक
जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला शेवयांचा उपमा + चीझ लावलेला टोस्ट पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा आणि कोथिंबीर-टोमॅटो सूप

बेसन-मेथी पराठा आणि गाजर-पालक रायता

साधे दही आणि केळं/सफरचंद/ कुठलेही हंगामी फळ पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा आणि कोथिंबीर-टोमॅटो सूप
दिवस २ रा मिक्स धान्यांचे धिरडे + बदाम मिल्कशेक फ्रुट चाट अप्पम + भाज्यांचे सूप + बीटरूट रायता शेंगदाण्याची चिक्की + /२ कप हंगामी फळाचे काप शिजवलेले बीन्स आणि टोस्ट
दिवस ३ रा बदाम वोफल्स (waffales) मनुके आणि मधासहित काकडीचे काप आणि दही मासे किंवा सोयाची आमटी आणि भात + काकडी आणि टोमॅटो सलाड फ्रुट मिल्कशेक सफरचंद-खोबरे-दही चटणी
दिवस ४ था खीर बेसन लाडू रोटी+ डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही काप + हातसडीचा तांदळाचा दलिया दलिया हक्का न्युडल्स + मक्याचे सूप
दिवस ५ वा ओट्स -बदाम खीर मखाना भाजलेला पालक पनीर पराठा + चेरी टोमॅटो पनीर मधासोबत आणि बदाम मेथी पिठलं आणि ज्वारीची भाकरी
दिवस ६ वा पोहे टोमॅटो आणि भोपळी मिरची + चॉकलेट-बदाम मिल्कशेक खजुराचे काप आणि बदाम व काजू संपूर्णधान्य रोटी +डाळ +आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात फळे कापून पराठा, दही किंवा लस्सी
दिवस ७ वा चिकन सँडविच आणि टोमॅटोचे काप

योगर्ट

बाजरीची भाकरी + वांग्याचे भरीत +डाळ +भाज्यांचा रायता बटाटा भाजून चीझसोबत बेसन पराठा, गाजर आणि पालक रायता
जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला पोहे दूध साधा खाकरा आणि दही बेसन-मेथी पराठा, गाजर पालक रायत्यासोबत केळे-स्ट्रॉबेरी-बदाम स्मूदी व्हेजिटेबल रायता +व्हेजिटेबल पुलाव + मूग डाळ सूप
दिवस २ रा रवा डोसा आणि सांबार कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर अप्पे, व्हेजिटेबल सूप + बीटरूट रायता बदाम-अंजीर मिल्कशेक व्हेज रिसोतो
दिवस ३ रा ओट्स-बदाम खीर, -३ घरी केलेली बिस्किटे + दूध काकडीचे काप आणि दही

मासे आणि सोया आमटी आणि भात

फळांचा मिल्कशेक

सफरचंद-नारळ- दही चटणी

दिवस ४ था पोहे, टोमॅटो आणि भोपळी मिरची घालून मसाला मखाना + केळ्याचा मिल्कशेक रोटी + डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही काप

दलिया

हक्का नूडल्स + स्वीट कॉर्न व्हेज सूप

दिवस ५ वा केळ्याचा पॅनकेक राजगिरा चिक्की दुधात घालून पालक पनीर + पराठा + काही चेरी टोमॅटो फ्रुट मिल्कशेक मेथी ठेपला, बटाटा भाजी आणि दही
दिवस ६ वा गव्हाच्या पिठाचा शिरा आणि दूध खाकरा आणि दही छोटी पोळी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटो/काकडी/गाजराच्या काही फोडी + १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी घरी केलेला दहीवडा छोटी पोळी +डाळ +आवडीची भाजी + टोमॅटो/काकडी/गाजराच्या काही फोडी + १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी
दिवस ७ वा भात आणि छोले आमटी फळे कापून बाजरीची भाकरी+ वांग्याचे भरीत+ डाळ+ व्हेजिटेबल रायता आलू टिक्की आणि पुदिन्याची चटणी मोड आलेल्या मुग-ओट्स कटलेट, घरी केलेल्या खजूर-टोमॅटो-पुदिना चटणी सोबत
जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला किसलेली काकडी-ओट्स पॅनकेक फ्रुट चाट बेसन-मेथी पराठा आणि गाजर-पालक रायता कापलेली फळे डाळ खिचडी आणि भोपळ्याचे सूप
दिवस २ रा व्हेजिटेबल उपमा आणि ताक केळं/सफरचंद किंवा एखादे हंगामी फळ अप्पे आणि भाज्यांचे सूप + बीटरूट रायता काकडीचे काप आणि दही छोले पुरी आणि लस्सी
दिवस ३ रा ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच केळं/सफरचंद/हंगामी फळ छोटी पोळी+ डाळ + आवडीची भाजी + गाजर/काकडी/टोमॅटो चे काही काप + १ चमचा कोथिंबीर/पुदिना चटणी शिरा दुधी भोपळा-मेथी मुठिया आणि ताक
दिवस ४ था राजगिरा-गहू शिरा, कुस्करलेले बदाम घालून सफरचंदाचा रस, चाट मसाला घालून रोटी + डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात कुस्करलेला बटाटा शाही पनीर पराठा आणि टोमॅटो मशरूम सूप
दिवस ५ वा दूध पोहे, केळ्याचे किंवा सफरचंदाचे तुकडे घालून केळं/सफरचंद किंवा हंगामी फळ पालक पनीर + पराठा + काही चेरी टोमॅटो नाचणीचा लाडू पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा =, बीन्स सूप आणि किसलेल्या गाजराची कोशिंबीर
दिवस ६ वा ज्वारीच्या लाह्यांची खीर चिकू संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे तुकडे + हातसडीच्या तांदळाचा भात सफरचंदाचे काप टोमॅटो आणि दुधीभोपळ्याचे सूप आणि पोळी/पराठा
दिवस ७ वा टोमॅटो आणि दुधी भोपळा सूप आणि पोळी/पराठा उकडलेला बटाटा चीझ घालून बाजरीची भाकरी + वांग्याचे भरीत + डाळ + मिश्र भाज्यांचा रायता दही/ मॅश केलेले केळं/पपई/अननस रायता बिसिबेळे भात, दही आणि काकडीचे काही काप

२२ महिन्यांच्या मुलासाठी काही पोषक पाककृती

२२ महिन्यांच्या मुलांसाठी इथे काही पोषक पाककृती दिल्या आहेत:

. डाळ, भात आणि भाज्या घालून केलेली खिचडी

२२ महिन्यांच्या बाळासाठी हे चविष्ट आणि पोषक जेवण आहे. घटक मूग डाळ ३ टेबलस्पून, हळद १ चिमूट, ३ टेबलस्पून तांदूळ, १ छोटे गाजर, स्वच्छ धुवून चिरलेला पालक, साल काढून बटाट्याचे तुकडे, /२ टीस्पून तूप आणि पाणी कृती डाळ आणि तांदूळ १/२ तास भिजत घाला. प्रेशर कुकर मध्ये चिरलेल्या गाजरासोबत डाळ तांदूळ घालून प्रेशर कुकरमध्ये ३ शिट्ट्या करून मऊ होईपर्यंत शिजवा. थंड होऊ द्या. जिरे मोहरीची फोडणी घालून वाढा.

. भाज्या घालून केलेले मसूर डाळ सूप

मसूर डाळ पटकन शिजते आणि त्यामध्ये प्रथिने खूप जास्त प्रमाणात असतात. तुमचे बाळ ते सहज पचवू शकेल. घटक १ छोट्या गाजराचे तुकडे, /२ कांदा बारीक चिरलेला, १ छोटा बटाटा, तुकडे करून, . टीस्पून तूप, पाणी, २ टेबलस्पून मसूर डाळ. कृती तव्यात तूप घालून मंद आचेवर ठेवा, चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. गाजर आणि बटाटे घालून काही मिनिटांसाठी परतून घ्या. मसूर डाळ आणि पाणी घाला. चांगले उकळून घ्या. जोपर्यंत डाळ आणि भाज्या चांगल्या मऊ शिजत नाहीत तोपर्यंत २० मिनिटांसाठी ते शिजवून घ्या. फूड प्रोसेसर मध्ये प्युरी करून घ्या आणि थोडे गरम असताना खायला द्या.

. मिश्र भाज्यांचे सूप

हा पदार्थ बाळासाठी अगदी स्वादिष्ट आणि पोषक आहे. घटक -६ पालकाचो पाने, १ छोटा बटाटा, १ टीस्पून मटार, १ लसूण पाकळी, /२ गाजर, पाणी, /२ टीस्पून तूप कृती भाज्या चिरून घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवा आणि चिमूटभर मीठ घाला. भाज्या मऊ होईपर्यंत कुकरमध्ये शिजू द्या, कुकरच्या ३ शिट्ट्या करा. तूप घालून हे मिश्रण मिक्सर मधून मऊ करून घ्या. व्हेजिटेबल सूप आता तयार आहे.

. स्ट्रॉबेरी मिल्कशेक

मुलांना हा चविष्ट मिल्कशेक खूप आवडेल घटक १ कप धुतलेल्या स्ट्रॉबेरी, १५० मिली दूध, १ टीस्पून योगर्ट, १ टीस्पून साखर कृती मऊ होईपर्यंत वरील सर्व घटक मिक्सरमधून काढून घ्या. गाळून बिया वेगळ्या करून घ्या आणि वाढा.

. ब्रेड पिझ्झा

मुलांसाठी हा पदार्थ चविष्ट आणि पोषक आहे घटक कडा काढून टाकलेले ब्रेड स्लाईस, किसलेले शेडर किंवा मोझारेला चीझ, टोमॅटो, हिरवी किंवा पिवळी भोपळी मिरची बारीक चिरलेली, किसलेले गाजर आणि मटार कृती ब्रेड टोस्ट करा आणि त्यावर थोडे बटर लावा. किसलेले चीझ त्यावर एकसारखे पसरावा. भाज्या शिजेपर्यंत परतून घ्या. किसलेल्या चीजवर पसरवा. ओव्हन मध्ये काही मिनिटे ठेवा आणि वितळू द्या. तुमचा ब्रेड पिझ्झा तयार आहे.

भरवण्याचा काही टिप्स

२२ महिन्यांच्या बाळाला भरवण्यासाठी काही टिप्स बाळाच्या भुकेमध्ये खूप बदल होत असतो. बाळाची वाढ, दात येणे आणि बाळाचे विकासाचे टप्पे ह्यानुसार त्यामध्ये बदल होत असतो. म्हणून वेगवेगळ्या मुलांच्या भुकेची तुलना करू नका. जर तुम्हाला असे लक्षात आले की मुलाला पुरेसे पोषण मिळत नाही तर तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा. अस्वीकारण:
  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३-४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
  9. तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved