अन्न आणि पोषण

१ वर्षाच्या बाळासाठी १५ स्वादिष्ट भारतीय पाककृती

जेवण हा एकआनंददायी अनुभव आहे आणि जेव्हा तुमच्या बाळाचे वय १२ महिन्यांचे होते तेव्हा तुमच्या बाळाची अन्नपदार्थांच्या वेगवेगळ्या स्वाद आणि पोतांविषयी वाढलेली उत्सुकता तुमच्या लक्षात येईल. ह्या वयाच्या बाळांना साध्या प्युरीच्या व्यतिरिक्त इतर पदार्थांची सुद्धा चव घ्यावीशी वाटते. परंतु अवघड भारतीय पाककृती मध्ये त्यांच्या पचनसंस्थेस अनुकूल होईल असा बदल कसा करावा जेणेकरून सोप्या पद्धतीने भारतीय अन्नपदार्थांची बाळास ओळख होईल हे ह्या लेखात दिले आहे.

१२ महिने वयाच्या बाळासाठी भारतीय अन्नपदार्थांच्या पाककृती

१ वर्षाच्या बाळाच्या पोटासाठी अनुकूल अशा काही पाककृती आम्ही इथे देत आहोत. त्यातील काही भारतीय बाळांसाठी नाश्त्याच्या पाककृती आहेत तर काही १ वर्षीय दक्षिण भारतीय बाळांसाठी सोप्या पाककृती दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांना भारतीय आहाराचा आनंद घेता येईल. लक्षात ठेवा

. लापशी

पातळसर आणि मऊ केल्यास लहान मुलांच्या आवडीचा हा खाद्यपदार्थ आहे.

) नाचणीची लापशी

ह्या मध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात आणि हाडांची घनता वाढण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी त्याची मदत होते. साहित्य कृती

) रव्याची लापशी

दुसऱ्या लापशीचा कंटाळा आल्यास हा एक चांगला पर्याय आहे. ही लापशी गोड आणि पचायला हलकी असते. साहित्य कृती

. भात

कुठलाही घटक घालून आपण भात करू शकतो आणि तो पचायला सोपा असतो

) केळ्याचा भात

गिळण्यासाठी हा एक सोपा अन्नपदार्थ आहे आणि तुमच्या लक्षात येईल तुमचं बाळ किती पटपट हा भात खाईल. साहित्य कृती

) कारा पोंगल

तुमच्या बाळाच्या आहारात समावेश करण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे साहित्य कृती कढीपत्ता काढून बाळाला देण्याआधी चांगले मॅश करून घ्या

. सूप

ही डिश आजारपणात किंवा दोन जेवणांच्या मधल्या काळात बाळाला देऊ शकता

) टोमॅटो आणि गाजर सूप

ही डिश व्हिटॅमिन्स ने समृद्ध आहे साहित्य कृती

) चिकन सूप

विशेषकरून जेव्हा मुले सर्दीने आजारी असतात साहित्य कृती

. आमटी

वेगवेगळ्या चवीची आमटी करता येते. पोळी किंवा भातासोबत देता येऊ शकते.

) माशांची आमटी

बाळांना मासे आणि मसाल्यांची ओळख करून देण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. साहित्य कृती

) डाळीची आमटी

डाळ हे कर्बोदके आणि प्रथिनांचे चांगले मिश्रण आहे साहित्य कृती

. अंड्यांचे काही पदार्थ

जटिल अन्नपदार्थांची ओळख करून देण्यासाठी अंडे हा एक चांगला पर्याय आहे

) अंड्याची भुर्जी

हा एक चांगला नाश्ता आहे आणि भाताबरोबर आपण देऊ शकता साहित्य कृती

) अंडे आणि ब्रेड

अंड्याच्या मऊपणामुळे ब्रेडचा कोरडेपणा कमी होईल साहित्य कृती

. झटपट डोसा

दक्षिण भारतात नाश्त्यासाठी डोसा हे प्रमुख अन्न आहे.

) रवा डोसा

ह्या डोशामध्ये आंबवण्याची प्रक्रिया होत नाही तुम्ही बाळाला सवय होण्यासाठी त्यामध्ये भाज्या घालू शकता. साहित्य कृती

) गव्हाचा डोसा

तुमच्या बाळाच्या आहारात गव्हाचा समावेश करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे साहित्य कृती

. गोड पदार्थ

गोड पदार्थांमध्ये साखर जास्त असल्याने मूड सुधारतो

) गोड पोंगल

प्रत्येक सणाला हा पदार्थ दक्षिण भारतीयांमध्ये केला जातो साहित्य कृती

) नारळ पायसम

उन्हाळ्यात हा गोड पदार्थ चांगला असतो साहित्य कृती

) आरारूट पुडिंग

बद्धकोष्ठता टाळण्यासाठी हा एक 'गोड' उपाय आहे साहित्य कृती तुम्ही तुम्हाला लागणारे किंवा बाळाला आवडणाऱ्या चवीप्रमाणे घटक ह्यामध्ये घालू शकता किंवा कमी करू शकता, कारण आपल्याला हवा तसा बदल आपण अन्नपदार्थांमध्ये करू शकतो. आणि सर्वात महत्वाचे, ताण घेऊन बाळासाठी कुठलाही पदार्थ करू नका. बाळासाठी अगदी प्रेमाने, आनंदाने आणि सकारात्मक दृष्टीने अन्न तयार करा कारण बाळांना ते लगेच लक्षात येते.

तुमच्या १ वर्षाच्या बाळाला भरवण्यासाठी काही टिप्स

. तुमच्या बाळाला जबरदस्तीने भरवू नका

ह्या वयाची बाळांच्या एखाद्या पदार्थांविषयी च्या संवेदना म्हणजेच त्यांना एखादा पदार्थ आवडतो आहे किंवा नाही विकसित होत असतात. तुमच्या मुलाला खाण्यासाठी प्रोत्साहित करा परंतु त्यांना आवडत नसलेले पदार्थ जबरदस्तीने भरवू नका ते कितीही पोषक असले तरीसुद्धा. प्रयत्न करा आणि दुसरा पर्यायी पदार्थ शोधा किंवा दुसऱ्या पदार्थात न आवडणारा पदार्थ घालून भरवा.

. अन्नपदार्थ खाण्यासाठी सोपे असले पाहिजेत

तुमच्या १ वर्षाच्या बाळाच्या घशात अन्नाचे मोठे घास अडकण्याची शक्यता असते त्यामुळे अन्न मऊ असुद्या, त्याचे छोटे घास करा आणि बाळाला ते नीट चावता येतील असे पहा.

. बाळाला देण्याआधी अन्न थंड करून घ्या

बाळाला भरवण्याआधी अन्नपदार्थ गार आहे की गरम हे तपासून पहा कारण बाळ लगेच खाण्यास सुरुवात करेल.

. खूप जास्त मीठ, चरबी, मसाले आणि साखर वापरू नका

भविष्यात अन्नपदार्थांमधील ह्या घटकांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे ह्या अन्नपदार्थांचा लागेल तेवढाच वापर करा. तुम्ही जेवढे मसालेदार पदार्थ खाऊ शकता तेवढे तुमचे बाळ खाऊ शकत नाही त्यामुळे बाळासाठी जेवण तयार करताना हा मुद्दा लक्षात घ्या.

. खाताना तुमच्या बाळावर लक्ष ठेवा

या वयात मुले स्वतःहून खाण्याचा आग्रह धरू शकतात, परंतु त्यांच्या हातात चमचा देऊन स्वतःची कामे करू नका. बाळ स्वतःच्या हाताने खात असेल तेव्हा तुम्ही बाळासोबत आहेत ना ह्याची खात्री करा जेणेकरून जर घास बाळाच्या घशात अडकल्यास तुम्हाला त्वरित मदत करू शकाल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved