अन्न आणि पोषण

१८ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार आणि पाककृती

जर तुमचे बाळ जर १८ महिन्यांचे असेल तर बाळाला नुसते दूध आणि बिस्किटे दिल्यास ते आनंदी होणार नाही. ह्या वयात तुमच्या लहान बाळाला अन्नपदार्थांचे खूप पर्याय हवे असतील. जसजसे तुमचे बाळ वाढते तसे चव आणि आवडीनिवडी वाढतात. जर बाळाला वेगवेगळे अन्नपदार्थ दिले तर बाळ खूप खुश होते. बाळाच्या आहारात आरोग्यपूर्ण पर्याय निवडल्यास बाळाच्या पोषणाच्या गरजा सुद्धा भागतात आणि बाळ जेवणाच्या वेळेची वाट पाहते.

१८ महिन्यांच्या बाळाची पोषणाची गरज

ह्या वयात तुमच्या बाळाला लागणारी पोषणमूल्ये खालीलप्रमाणे. खालील घटकांनी समृद्ध असे अन्नपदार्थ तुम्ही बनवत आहात ह्याची खात्री करा.

१. लोह

तुमच्या बाळाच्या आहारात तुम्ही लोह समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे त्यामुळे प्रतिकारप्रणालीचे कार्य सुरळीत राहते. ब्रोकोली, पालक ह्यासारख्या पालेभाज्यांचा समावेश बाळाच्या जेवणामध्ये करा.

२. चरबी

तुमच्या बाळाची भूक आधीइतकी जास्त नसेल. म्हणून दररोज बाळाला योग्य प्रमाणात चरबी मिळत आहे ना ह्याची खात्री करणे महत्वाचे आहे. खोबरे तसेच दिवसातून २ वेळेला बाळाला बटर दिल्यास बाळाला चरबी मिळू शकते. तुम्ही बाळाला तूप किंवा बटर सुद्धा देऊ शकता.

३. प्रथिने

वाढणाऱ्या बाळासाठी प्रथिने हे सर्वात महत्वाचे पोषणमूल्य आहे. त्वचा, केस, नखे, स्नायू आणि हाडांच्या आरोग्यासाठी ते महत्वाचे आहे. त्यामुळे बाळाच्या नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये प्रथिने समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश केला पाहिजे. तुमच्या बाळाला तुम्ही दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, सुकामेवा बीन्स इत्यादी प्रथिन समृद्ध अन्नपदार्थ दिले पाहिजेत. योग्य प्रमाणात हे अन्नपदार्थ दिल्यास बाळाची प्रथिनांची गरज भागेल.

४. कॅल्शिअम

दात आणि हाडांच्या विकासासाठी कॅल्शिअम हे महत्वाचे आहे. कॅल्शिअमचे काही उत्तम स्रोत म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, ब्रोकोली इत्यादी होय. वाढणाऱ्या बाळाला दूध देणे हे फार महत्वाचे आहे. म्हणून तुमच्या बाळाच्या आहारात दुधाचा समावेश करा. बाळाला दुधाबरोबरच कॉटेज चीझ सारखे पूरक पदार्थ देण्याची सुद्धा शिफारस केली जाते.

१८ महिने वयात तुमच्या बाळाला किती अन्नाची गरज असते?

जर तुम्ही तुमच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय शोधात असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. खाली दिलेल्या अन्नपदार्थांचा तुमच्या बाळाच्या आहारात समावेश करा.

१८ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

जर तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारासाठी वेगवेगळे पर्याय शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. खाली सुचवलेले पदार्थांचा तुमच्या बाळाच्या आहारात समावेश करा.

१. दूध

जर तुम्ही तुमच्या बाळाला अजूनही स्तनपान देत असाल तर ते चांगले आहे. परंतु दिवसातून एकदा बाळाला गायीचे दूध द्या. बाळाच्या दात आणि हाडांच्या निरोगी विकासासाठी दूध हे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे तुमचे बाळ दररोज एक कप दूध पिते आहे ना ह्याची खात्री करा. बाटलीऐवजी तुमच्या बाळाने कपने दूध तसेच पाणी पिण्यास शिकले पाहिजे.

२. फळे

तुमच्या बाळाच्या नाश्त्यामध्ये ताज्या फळांचा समावेश करणे म्हणजे बाळाच्या शरीराला लागणारी पोषणमूल्ये बाळाला मिळत असल्याची खात्री होण्याचा एक उत्तम मार्ग होय. कधीतरी बाळाला फळांची प्युरी किंवा रस देणे ठीक आहे परंतु ते दररोज देऊ नका कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात नसतात आणि बाळाच्या तब्येतीसाठी ते फायदेशीर नसते. बाळाला फळे कापून द्या.

३. भाज्या

तुम्ही बाळाच्या आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. जर तुमच्या बाळाला भाज्या आवडत नसतील तर तुम्ही बाळासाठी फिंगर फूड करून देऊ शकता. तुम्ही बाळासाठी गाजराचे काप किंवा कुस्करलेला बटाटा करून देऊ शकता. तसेच तुमच्या बाळाच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

४. मांस आणि सुकामेवा

जरी तुम्हाला हे दोन्ही पदार्थ एकत्र देणे विचित्र वाटत असले तरी हे दिल्याने तुमच्या बाळाची प्रथिनांची गरज भागते. तुम्ही बाळाला चिकन किंवा मासे, सोया मोड आलेले बीन्स, काजू आणि अशाच इतर अन्नपदार्थांसोबत देऊ शकता. तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला दररोज दिले पाहिजेत असे नाही तर ते दिवसाआड तुम्ही बाळाला देऊ शकता. परंतु जर बाळाला कुठल्याही पदार्थाची ऍलर्जी आहे असे तुमच्या लक्षात आले तर ते पदार्थ बाळाला देण्याचे तुम्ही थांबवले पाहिजे.

५. ब्रेड

तसेच जितके शक्य होईल तितके तुमच्या बाळाला पांढरा ब्रेड देणें टाळा. जर तुम्हाला बाळासाठी सँडविचेस तयार करायची असतील तर पांढरा ब्रेड बाळाला देण्याचा पर्याय चांगला आहे. तुम्ही बाळाला ब्रेड ऐवजी कोरडे सीरिअल किंवा बिस्कीटे देऊ शकता.

६. तूप

तूप हे आरोग्यासाठी चांगले असते आणि तुमच्या बाळाला वाढत्या वयात ते गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही बाळाला दररोज दही देत आहात याची खात्री करा. तुम्ही बाळासाठी तुपाध्ये पराठा करू शकता किंवा खिचडी मध्ये सुद्धा तूप घालू शकता. तुपाचा चमचा तुमच्या बाळासाठी खूप पोषक असतो त्यामुळे तुमच्या बाळाच्या आहारात त्याचा तुम्ही समावेश करत आहात ना ह्याची खात्री करा.

७. गूळ

प्रक्रिया केलेली साखरेपेक्षा तुमच्या बाळाच्या आहारात गुळाचा समावेश करा. गुळ आरोग्यासाठी चांगला आहे आणि त्यामुळे अन्नपदार्थाची चव वाढते.

८. पाणी

आपल्याला माहिती आहे की पाणी हे काही अन्न नाही. परंतु ते तुमच्या बाळासाठी महत्वाचे आहे. तुमचे बाळ दररोज पुरेसे पाणी पिट आहे ना ह्याची खात्री करा. तुम्ही बाळाला इतर द्रवपदार्थ सुद्धा देऊ शकता. जर बाळ योग्य प्रमाणात पाणी पीत नसेल तर तुमच्या बाळाला पचनसंस्थेचे किंवा आरोग्याचे प्रश्न असल्याची शक्यता आहे.

९. चीझ

दुधाबरोबरच तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचा सुद्धा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. तुमच्या बाळाला चीझ किंवा कॉटन चीझ खायला आवडते त्यामुळे काहीही काळजी न करता ते तुमच्या बाळाला द्या. योगर्टसह चीझच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे बाळाला पोषणमूल्ये मिळतात जी कदाचित फक्त दुधातून मिळणार नाहीत.

१० संपूर्ण धान्य

संपूर्ण धान्य खाण्याचे परिणाम जरी लगेच दिसत नसले तरीसुद्धा काही कालावधीनंतर ते तुम्हाला दिसतील. बाळाला सीरिअल्स किंवा ब्रेड देण्याऐवजी बाळाला गव्हाचा ब्रेड किंवा संपूर्ण धान्य सीरिअल्स द्या.

१८ महिन्यांच्या बाळासाठी सोपा आहार तक्ता

तुमच्या १८ महिन्यांच्या बाळासाठी इथे तक्ता दिला आहे त्याचा वापर तुम्ही बाळासाठी पोषक अन्नपदार्थ तयार करण्यासाठी करू शकता. तथापि, तुम्ही काही नवीन देण्याआधी डॉक्टर किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधा. तुम्ही बाळाच्या आहार योजनेत काही बदल करू शकता जे तुमच्या १८ महिन्यांच्या बाळासाठी योग्य असतील.
जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला फ्रेंच टोस्ट आणि दूध कुस्करलेला बटाटा पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात स्ट्रॉबेरी योगर्ट मोड आलेले मूग - ओट्स कटलेट आणि घरी केलेली टोमॅटो - पुदिना चटणी
दिवस २ रा बेसन ढोकळा + केळ्याचा मिल्कशेक १ छोटा ग्लास कलिंगड ज्यूस पालक पनीर पराठा शेवया खीर मिक्स व्हेजिटेबल - पनीर पराठा
दिवस ३ रा गव्हाचा पॅनकेक आणि चॉकलेट दूध चिकू टोफू भुर्जी, ज्वारी-गहू रोटी आणि किसलेले गाजर दूध + २-३ गहू आणि संपूर्ण धान्य बिस्किटे डाळ खिचडी आणि दुधी भोपळा सूप
दिवस ४ था अप्पे चटणी आणि चिकू मिल्कशेक केळं ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + चेरी टोमॅटो सफरचंद- खजूर मिल्कशेक पुलाव आणि टोमॅटो सूप
दिवस ५ वा अंडाभुर्जी किंवा पनीर लाडू आणि अंजीर मिल्कशेक पपई रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात घरी केलेले बटाट्याचे चिप्स, टोमॅटो चटणी + दूध नाचणीचा डोसा आणि बटाट्याची भाजी आणि सांबार
दिवस ६ वा गव्हाची लापशी, बदाम किंवा अक्रोड आणि बेदाणे घातलेली पेरू संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात नाचणी सत्व मेथी पिठले आणि ज्वारीची भाकरी
दिवस ७ वा गव्हाचा पॅनकेक आणि दूध डाळिंबाच्या ज्यूस, छोटा एक ग्लास रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात केळी - अक्रोड मिल्कशेक दही किंवा लस्सीसोबत पराठा
जेवण न्याहारी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला राजगिरा लाह्यांचा मिल्कशेक आणि चिरलेले अंजीर अळू वडी रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात बेसन लाडू पनीर कटलेट्स किंवा भाजलेला मासा आणि कोथिंबीर-टोमॅटो सूप
दिवस २ रा उकडलेले अंडे किंवा घरी केलेलं पनीर गाजराचा ज्यूस पालक पनीर आणि पराठा अप्पे आणि नारळ दही चटणी राजमा टोस्ट आणि चीझ
दिवस ३ रा बेसन-ज्वारी-कोशिंबीरी धिरडे आणि दही उकडलेले बीट टोफू भुर्जी आणि ज्वारी-गहू रोटी आणि किसलेल्या गाजराची कोशिंबीर मुरमुरे चिक्की आणि दूध पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप
दिवस ४ था ओट्स-स्ट्रॉबेरी स्मूदी छोटे धिरडे आणि हिरवी चटणी ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो डाळ पकोडा आणि दही पनीर कटलेट्स किंवा भाजलेला मासा आणि कोथिंबीर-टोमॅटो सूप
दिवस ५ वा अंडाभुर्जी मूग ढोकळा रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात मुरमुरे चिक्की + दूध थालीपीठ, लोणी किंवा ताक
दिवस ६ वा शेवया उपमा + वेलची-केशर दूध सफरचंद-पपई संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात मोड आलेल्या कडधान्यांची भेळ छोले पुरी + लस्सी
दिवस ७ वा गहू - केळे शिरा रवा लाडू रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात दही आणि कुठलेही फळ ( द्राक्षे आणि डाळिंब सोडून) व्हेजिटेबल कटलेट आणि बीन्सचे सूप
जेवण न्याहारी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला केळ्याचा पॅनकेक + दूध बदाम किंवा शेंगदाणा लाडू रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात संपूर्णधान्य बिस्किटे आणि दूध डाळ
दिवस २ रा संपूर्णधान्य मफिन + १ ग्लास दूध मिक्स फ्रुट्स पालक पनीर आणि पराठा ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा आणि दूध दही भात आणि किसलेली काकडी
दिवस ३ रा जव-सफरचंद लापशी आणि दूध घरी केलेली मावा बर्फी टोफू भुर्जी आणि ज्वारी-गहू रोटी व किसलेल्या गाजराची कोशिंबीर रवा ढोकळा आणि कोथिंबीर चटणी बाजरी-गहू रोटी आणि डाळ मेथी
दिवस ४ था ज्वारी इडली + चटणी + केशर दूध पेरूच्या फोडी आणि काळे मीठ ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो मसाला ताक आणि भाज्यांचे सँडविच पनीर किंवा अंडा भुर्जी, रोटी व व्हेजिटेबल सूप
दिवस ५ वा कॉर्नफ्लेक्स दूध आणि अक्रोड पावडर व स्ट्रॉबेरी पनीर किंवा उकडलेले अंडे आणि चाट मसाला रोटी+डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात दलिया उपमा आणि दूध कमी मसालेदार पावभाजी आणि मूग डाळ सूप
दिवस ६ वा बदाम खजूर मिल्कशेक मुरमुरे चिक्की संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही फ्रुट कस्टर्ड काप + हातसडीच्या तांदळाचा भात फ्रुट कस्टर्ड बेसन-ज्वारी-कोथिंबीर धिरडे आणि दही, बीन्स सूप
दिवस ७ वा पोहे आणि टोमॅटो, भोपळी मिरची + चॉकलेट- अक्रोड मिल्कशेक सोया-गहू गूळ पापडी रोटी+डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात दूध कस्टर्ड किंवा अंड्याचे कस्टर्ड पुडिंग राजमा भात आणि टोमॅटो सूप
जेवण न्याहारी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला १ अंडे किंवा पनीर पराठा आणि हिरवी चटणी पपईच्या फोडी, चाट मसाला आणि मध रोटी + डाळ + आवडीची भाजी+ काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात शेवयांची खीर पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा व राजमा सूप आणि किसलेले गाजर
दिवस २ रा अंडाभुर्जी+संपूर्ण धान्य टोस्ट + १ ग्लास ताजा संत्र्याचा रस २-३ गव्हाची बिस्किटे पालक पनीर आणि पराठा + काकडी दूध + २-३ गव्हाची किंवा संपूर्णधान्य बिस्किटे टोफू भुर्जी आणि ज्वारी-गहू रोटी आणि किसलेले गाजर
दिवस ३ रा राजगिरा लापशी आणि मध, अक्रोड पावडर उकडलेला बटाटा आणि गाजराची कोशिंबीर टोफू भुर्जी, ज्वारी-गहू रोटी आणि किसलेले गाजर सफरचंद-खजूर मिल्कशेक पनीर पराठा आणि टोमॅटो सूप
दिवस ३ रा १ कप पोहे + १ छोटा ग्लास ताजा संत्र्याचा रस दही पोहे आणि कुस्करलेले केळं ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो दही आणि मसाला पुरी मेथी मटार मलाई आणि पनीर पुलाव
दिवस ५ वा फ्रेंच टोस्ट + १ ग्लास ताजा सफरचंद ज्यूस ओट्स -सफरचंद स्मूदी खिचडी आणि दुधी भोपळा सूप गाजराची खीर पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात
दिवस ६ वा ढोकळा + हिरवी चटणी शेंगदाणा लाडू संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात मक्याचा चिवडा व्हाईट सॉस पास्ता आणि मिक्स व्हेज सूप
दिवस ७ वा ऑम्लेट किंवा बेसन धिरडे कुस्कारलेला बटाटा आणि चीझ रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात दुधी भोपळा हलवा पोंगल आणि भाज्यांचे सूप

१८ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती

दररोज नाश्त्यासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी नवीन काही तरी करणे हे अवघड जाऊ शकते. म्हणून इथे काही पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत ज्या तुमच्या बाळाला खायला आवडतील.

१. सोयाबीन कटलेट्स

तुम्ही बरेचदा ब्रेड कटलेट केलेले असेल. परंतु दुसरं काही करून बघायला काय हरकत आहे" सोया कटलेट करून पहा तुमच्या बाळाला ते फार आवडतील घटक कृती

२. डाळीच्या पिठाचे धिरडे

ह्या पाककृतीच्या विविधतेमुळे हा पदार्थ लहान मुले तसेच मोठ्या माणसांमध्ये प्रसिद्ध आहे, घटक कृती

३. केळ्याचा डोसा

केळ्याचा डोसा ऐकून थोडे वेगळे वाटेल परंतु तो खूप चविष्ट असतो. तुमच्या बाळासाठी केळ्याचा डोसा कसा करतात ते पाहूया घटक कृती

४. ओट्स आणि सफरचंद लापशी

ही नाश्त्यासाठीची पाककृती सगळ्या कुटुंबासाठी तयार केली जाऊ शकते. घटक कृती

५. पालक मूग खिचडी

पालक मूग खिचडी खूप चविष्ट लागते आणि त्याची पोषणास सुद्धा मदत होते घटक कृती:

तुमच्या बाळाला भरवण्यासाठी काही टिप्स

जर तुमचे बाळ खाण्यास त्रास देत असेल आणि स्वतःच्या प्लेट मधील अन्न संपवत नसेल तर इथे काही टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही बाळाला त्याचे अन्न खाण्यास मदत करू शकता. बाळाला खायचा मूड नसेल तर बाळाला खाण्यासाठी तयार करणे खूप अवघड आहे. परंतु आम्हाला आशा आहे की आहार तक्त्यात सांगितलेले पदार्थ तुमच्या बाळाला आवडतील. ह्या लेखात सांगितलेला आहार तक्ता हा नमुन्यासाठी दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये बदल करू शकता. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे बाळाला कुठल्याही नवीन पदार्थाची ओळख करून देण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधने होय. त्यामुळे डॉक्टरांशी बोलून तुमच्या १८ महिन्यांच्या बाळासाठी काय योग्य आहे ते जाणून घ्या. तुमच्या डॉक्टरांशी बोलून योजना तयार करा आणि तुमच्या मुलांना सर्वोत्तम ते द्या! अस्वीकारण:
  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३-४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
  9. तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved