अन्न आणि पोषण

१७ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

बाळाला भरवणे ही काही सोपी गोष्ट नाही, बाळ जेव्हा १७ महिन्यांचे होते तेव्हा खाण्यासाठी खूप नखरे करते आणि मग बाळाला भरवणे हे तुमच्यासाठी एक आव्हान बनून जाते. जर तुम्हाला बाळाला काय भरवावे हा प्रश्न सतत पडत असेल तर आता काळजीचे काही कारण नाहींनाही . ह्या परिस्थितीत तुम्ही एकट्याच नाही आहात. जसजशी बाळाची वाढ होते तसे सगळ्याच नवीन माता ह्या परिस्थितून जात असतात. बाळाची काळजी घेणे हे काही सोपे काम नाही परंतु हळूहळू तुम्ही ते शिकाल. इथे काही उपाय आणि मजेदार पाककृती दिल्या आहेत त्यामुळे परिस्थिती तुम्हाला हवी तशी राहील आणि बाळाचे आरोग्य सुद्धा चांगले राहील.

१७ महिन्यांच्या बाळासाठी पोषणाची गरज

बाळाच्या नाश्त्यासाठी पर्याय निवडताना पालकांनी त्यांच्या १७ महिन्यांच्या बाळाच्या पोषणाच्या गरजा व्यवस्थितरीत्या लक्षात घेतल्या पाहिजेत. तुमच्या १७ महिन्यांच्या मुलाची पोषणमूल्यांची गरज खालीलप्रमाणे कर्बोदकांमुळे तुमचे बाळ दिवसातील सगळ्या क्रिया करू शकते. कर्बोदके ऊर्जा प्रदान करतातच परंतु त्यासोबतच बाळाच्या मेंदूचा विकास पण चांगला होतो. तुमच्या बाळाने दिवसातून १३५ ग्रॅम्स कर्बोदके घेतली पाहिजेत. तुमच्या बाळासाठी प्रथिने हा आणखी एक आवश्यक घटक आहे. जी बाळे फक्त शाकाहारी अन्न घेतात त्यांना पुरेशी प्रथिने मिळत नाहीत. म्हणून तुम्ही तुमच्या बाळाला योग्य प्रमाणात प्रथिने मिळत आहेत ना ह्याची खात्री केली पाहिजे. तुमच्या बाळाचे स्तनपान घेणे बंद झाले की लोहाच्या पातळीवर परिणाम होतो. जेव्हा बाळाला स्तनपान सुरु असते तेव्हा बाळाला पुरेसे ओह मिळते आणि नंतर ते कमी होते, परिणामी त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. म्हणून तुमचे बाळ जेव्हा १७ वर्षांचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे होते तेव्हा तुम्ही लोह-समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश बाळाच्या आहारात केला पाहिजे. साधारणपणे ह्या वयाला ७ मिलिग्रॅम लोह गरजेचे असते. सोडियम हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे असे क्वचित मानले जाते, कारण आपल्या बऱ्याच पदार्थांमध्ये शरीराच्या गरजेपुरते मीठ असते. कुटुंबे जर तोच आहार घेत असतील तर त्यांनी त्यांच्या आहारात मीठ आहे ना ह्याची खात्री केली पाहिजे. तुमच्या बाळाची भूक ही आधीसारखी खूप नाही परंतु त्यांना दिवसभर सक्रिय राहण्यासाठी पुरेशी ऊर्जा त्या आहारातून मिळत नसण्याचा धोका त्यातून उत्पन्न होतो. बाळ निरोगी राहण्यासाठी १०००-१४०० कॅलरीज दिवसाला घेतल्यास ते फायदेशीर ठरते. बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडतो की कुठल्या अन्नपदार्थांमधून बाळाला पुरेसे तंतुमय पदार्थ मिळतील. बरेचसे गव्हाचे पदार्थ तसेच काही फळे जी तंतुमय पदार्थानी समृद्ध असतात, ती खाल्ल्यास बाळाचा आहार संतुलित राहण्यास मदत होते. आता बाळ सारखे घराबाहेर पळत असल्याने बाळ दिवसभरात किती पाणी पिते ह्याकडे लक्ष देणे अवघड होते. परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे बाळ दिवसभरात पुरेसे पाणी पीत आहे ना ह्याची खात्री करा.

१७व्या महिन्यात बाळाला किती अन्न लागते?

मुलांची अन्नाची गरज ही त्यांचा आकार, वजन, पचनक्रिया आणि अशा बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. काही मुले इतरांपेक्षा खूप सक्रिय असतात आणि काही मुलांना खूप अन्न लागते. तथापि त्यांना दिवसाला १-. २ किलोकॅलोरीज लागतात.

१७ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

खाली दिलेले अन्नपदार्थ हे मुलांची पोषणाची गरज भागवतात.

. अंडी

अंडी हा असा पर्याय आहे जो तुम्ही बाळाला दिवसातल्या कुठल्याही वेळी, वेगवेगळ्या प्रकारे बनवून देऊ शकता. प्रथिने आणि कमी कोलेस्टेरॉल असे संतुलन असलेला हा पदार्थ तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अगदी योग्य आहे.

. दूध

तुमच्या वाढत्या वयाच्या बाळाच्या आहारात दुधाला पर्याय नाही. ते स्तनपानातून बाळाला मिळते किंवा डेअरीचे दूध बाळाला दिले जाते. जर तुमच्या मुलाला लॅक्टोस इंटॉलरन्स असेल तर तुम्ही सोया दूध किंवा तत्सम पर्यायांचा विचार करू शकता. तुमच्या मुलाला लागणाऱ्या सर्व पोषण मूल्यांनी ते समृद्ध आहे ना ह्याची खात्री करा.

. इतर दुग्धजन्य पदार्थ

दूध तर बाळाच्या विकासासाठी गरजेचे आहेच, परंतु दुधापासून बनवलेले इतर पदार्थ जसे की योगुर्ट पासून आवश्यक जिवाणू मिळतात, चीझ पासून प्रथिने मिळतात आणि बटरमुळे पदार्थाची चव वाढते. त्यामुळे, बाळाच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

. समुद्री खाद्यपदार्थ

१७ महिन्यांच्या बाळाच्या बऱ्याच पालकांना समुद्री खाद्य बाळाला देणे सुरक्षित वाटत नाही. आणि ते चुकीचेही नाही. खेकडा आणि सॉर्डफिश सारखे मासे खाणे अगदी प्रकर्षाने टाळले पाहिजे. बाळाच्या आरोग्यास सुरक्षित मासे खाल्ल्याने DHA आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स बाळाला योग्य प्रमाणात मिळतात.

. मांस

बाळाला टर्की, मटण असे पचनास जड असलेले मांस देणे टाळा. त्याऐवजी बाळाला कोंबडीचे मांस द्या, ते पचायला हलके असते आणि बाळाला चांगली प्रथिने मिळतात. ताजे आणि ऑरगॅनिक मांस भाजून बाळाला देणे हा सर्वात पोषक पर्याय आहे.

. सुकामेवा

सुकामेवा हा बाळाच्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर असतो. परंतु तो देण्याआधी बाळाला त्याची ऍलर्जी तर नाही ना हे तपासून पहिले पाहिजे. जर बाळाला ऍलर्जी नसेल, तर तुम्ही बाळाला बदामाचे किंवा अक्रोड नियमितपणे जेवणातून दिले पाहिजे.

. फळे

बाजारात मिळणाऱ्या फळांच्या तासापेक्षा बाळाला ताजी आणि ऑरगॅनिक फळे देण्याचा निर्णय चांगला आहे. लिबूवर्गीय फळांमुळे बाळाला लागणारी वेगवेगळी व्हिटॅमिन्स मिळतात. तसेच काही फळे जसे की अवोकाडोमुळे बाळाला चांगल्या प्रमाणात निरोगी चरबी मिळते.

. भाज्या

ह्या वयाच्या बाळासाठी सगळ्या भाज्या खाणे सुरक्षित आहे. जर तुमचे बाळ भाज्या खाण्यास त्रास देत असेल तर तुम्ही कलात्मक व्हा. तुम्ही भाज्या कापून, उकडून बाळास देऊ शकता. तुम्ही भाज्यांची आमटी करून बाळाला देऊ शकता.

. धान्य

नाचणी हा एक उत्तम पर्याय आहे जो प्रथिने आणि लोह ह्यांनी समृद्ध असतो आणि तुम्ही तो वापरून पहिला पाहिजे. तसेच बाजरी आणि तांदूळ ह्यांचा सुद्धा बाळाच्या आहारात नियमितपणे समावेश केला पाहिजे.

१०. तेल

जरी तेल हा एक विशिष्ठ अन्नपदार्थ नसला तरी तुम्ही बाळाचे खाद्यपदार्थ चांगल्या तेलात केले पाहिजेत ज्यामुळे बाळाला त्यापासून पुरेशी चरबी आणि पोषणमूल्ये मिळतील. नाश्ता तयार करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल वापरा.

१७ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना - आठवडा १ ला

जेवण

न्याहारी

नाश्ता

दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला इडली + सांबार + दूध अननस किंवा सफरचंदाचे तुकडे संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात पुलाव आणि दही चाट रोटी आणि चिकन करी + व्हेजिटेबल रायता
दिवस २ रा गव्हाचा पॅनकेक + चॉकलेट मिल्क पेअर पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही ओट्स -सफरचंद स्मूदी पनीर पराठा आणि शेवगा-कोथिंबीर सूप
दिवस ३ रा ओट्स धिरडे + चिकू मिल्कशेक १ संत्रे छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप पनीर-खजूर लाडू भाज्यांचे सूप किंवा चिकन सूप, व्हेजिटेबल पराठा आणि दही किंवा लस्सी
दिवस ४ था उकडलेलं अंडे + १ ग्लास केळ्याचा मिल्कशेक पेरूचा ज्यूस आणि चाट मसाला पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात पनीर आणि मॅश केलेले सफरचंद नाचणी आणि टोमॅटो सूप व राजमा भात
दिवस ५ वा केळ्याचा पॅनकेक + दूध

कलिंगड

संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात अननस रायता बाजरीची भाकरी + वांग्याचे भरीत + डाळ
दिवस ६ वा बेसन पराठा + १ ग्लास दूध चिकू ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो केळं-अक्रोड मिल्कशेक पनीर कटलेट किंवा भाजलेले मासे आणि उकडलेल्या बीन्सचे सूप आणि किसलेल्या गाजराचा रायता
दिवस ७ वा जव-सफरचंद लापशी आणि दूध पपई पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप भजी आणि दही पेज आणि पीठ पेरून केलेली मेथीची भाजी

१७ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना - आठवडा २ रा

जेवण न्याहारी

नाश्ता

दुपारचे जेवण

संध्याकाळचा नाश्ता

रात्रीचे जेवण

दिवस १ ला किसलेली काकडी आणि ओट्स पॅनकेक खजूर - शेंगदाणे लाडू संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात अळूवडी पनीर सँडविच, पुदिना चटणी + शेवग्याचे सूप
दिवस २ रा भाज्यांचा उपमा आणि ताक मिक्स फळांचा ज्यूस पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात टोमॅटो किंवा कोथिंबीर सूप पुलाव आणि टोमॅटो सूप
दिवस ३ रा ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच पेरूचा ज्यूस आणि चाट मसाला छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप पनीर आणि मॅश केलेले सफरचंद १ छोटा काप छोले + २ छोट्या पुऱ्या + १ छोटा ग्लास लस्सी
दिवस ४ था राजगिरा-गव्हाचा शिरा आणि गोडीसाठी कुस्करलेले मनुके कलिंगड पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात खीर शाही पनीर आणि पराठा व टोमॅटो-मशरूम सूप
दिवस ५ वा मोड आलेले मूग-ओट्स कटलेट आणि घरी केलेली टोमॅटो-पुदिना चटणी चिकू संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात दूध + पोपकोर्न इडली आणि कमी तिखट चटणी आणि सांबार
दिवस ६ वा दूध आणि नाचणी-बेसन लाडू पपई ज्वारी-गहू रोटी +मसूर पालक + काही चेरी टोमॅटो फ्रुट योगर्ट रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप
दिवस ७ वा उकडलेले अंडे किंवा बेसन धिरडे खांडवी आणि चटणी पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप पिस्ता-पनीर पुडिंग मेथी मटार मलाई आणि पनीर पुलाव

१७ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना - आठवडा ३ रा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला घरी केलेला नाचणीचा केक आणि दूध कापलेला पेरू संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात अंजीर-अक्रोड लाडू राजमा भात आणि टोमॅटो सूप
दिवस २ रा पुदिना पराठे आणि खजूर-टोमॅटो चटणी + चिकू मिल्कशेक उकडलेला चना चाट पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात दही आणि आवडीचे फळ ( डाळिंब आणि द्राक्षे नकोत) टोफू भुर्जी आणि ज्वारी-गहू रोटी आणि किसलेले गाजर रायता
दिवस ३ रा अंडाभुर्जी किंवा पनीर लाडू + अंजीर मिल्कशेक मुरमुरे शेव छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप आंब्याचे काप पोंगल आणि भाज्यांचे सूप
दिवस ४ था बाजरीची भाकरी आणि दूध पेअर- उकडून आणि कापून रोटी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात खाकरा कुस्करून आणि दूध थालीपीठ लोणी आणि ताक
दिवस ५ वा सफरचंदाची खीर + गाजर पराठा -,मठरी संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात केळ्याचा मिल्कशेक बाजरी-गहू रोटी आणि डाळ मेथी
दिवस ६ वा दलिया मोड आलेले मूग चाट ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो खीर पुदिना पराठा आणि दुधी भोपळा सूप
दिवस ७ वा ऑम्लेट किंवा डाळीच्या पिठाचे धिरडे आणि लोणी पपई पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप नाचणी सत्व

साबुदाणा खिचडी आणि काकडीची कोशिंबीर

१७ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना - आठवडा ४ था

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता

रात्रीचे जेवण

दिवस १ ला ऑम्लेट किंवा डाळीच्या पिठाचे धिरडे आणि ब्रेड बटर

कलिंगड

संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात खजूर-शेंगदाणा लाडू भाज्यांचे सूप आणि ग्रील केलेले चिकन/ पाणी आणि भाज्यांचे सँडविच
दिवस २ रा भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक चिकू पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात मिक्स फ्रुट ज्यूस पालक-मूग डाळ मुठिया
दिवस ३ रा उकडलेले अंडे आणि केळ्याचा मिल्कशेक छोले आणि पराठा व भोपळ्याचे सूप पेरूचा ज्यूस आणि चाट मसाला डाळ खिचडी
दिवस ४ था थालीपीठ लोणी आणि ताक ओट्स मफिन मिसी रोटी, चिकन किंवा पनीर आणि भाज्यांचा रायता नाचणीचा लाडू पनीर पराठा आणि कोथिंबीर-शेवगा सूप
दिवस ५ वा मोड आलेले मूग-ओट्स कटलेट आणि घरी केलेली खजूर-टोमॅटो-पुदिना चटणी ताजी नारळाची बर्फी संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरूट चे काप + हातसडीच्या तांदळाचा भात खांडवी आणि चटणी सगळ्या भाज्यांचे सूप किंवा चिकन सूप आणि व्हेजिटेबल पराठा आणि दही
दिवस ६ वा घरी केलेला नाचणी केक आणि दूध भोपळ्याचे सूप आणि टोस्ट ज्वारी-गहू रोटी + मसूर पालक + काही चेरी टोमॅटो गव्हाचे पॅनकेक आणि किसलेले गाजर नाचणी-टोमॅटो सूप आणि राजमा भात
दिवस ७ वा पुदीना पराठा आणि खजूर-टोमॅटो चटणी + चिकू मिल्कशेक पेअर आणि पपई चाट पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप

पनीर आणि पुदीना चटणी

पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात

१७ महिन्यांच्या बाळासाठी पदार्थांच्या पाककृती

रात्रीच्या जेवणाचे पर्याय सहज आणि सोप्या पद्धतीने मिळवता येतात परंतु नाश्त्यासाठी काय करावे हा प्रश्न कायम असतो आणि तेच तेच पदार्थ काही आठवड्यांनंतर केले जातात. इथे नाश्त्यासाठी काही मजेदार पाककृती दिल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या बाळासाठी करून बघू शकता.

. अवोकाडो टोस्ट

मुलांच्या आहारात चरबी असणे आवश्यक असते आणि ह्या पाककृतीद्वारे अवोकाडोचा आहारात समावेश केल्यास बाळाला योग्य प्रमाणात चरबी मिळत आहे ह्याची खात्री होते. म्हणून ही चविष्ट पाककृती तुमच्या बाळासाठी तुम्ही करून बघा.
घटक कृती

. केळी ओटमील

बाळाला लागणारी सर्व पोषणमूल्ये मिळण्यासाठी नाश्त्याची वेळ ही अगदी योग्य असते. ह्या पाककृतीतून बाळाला पुरेसे तंतुमय पदार्थ आणि व्हिटॅमिन्स मिळतात, तसेच बाळाला बराच काळ भूक लागत नाही. घटक कृती एका भांड्यात ओट्स शिजवून घ्या. त्यासाठी पाणी किंवा बदामाच्या दुधाचा वापर करा. मध्ये मध्ये ओट्स ढवळत राहा त्यामुळे ते चांगले शिजतील. ओट्स मऊ शिजल्यावर, चव वाढवण्यासाठी दालचिनी पूड घाला. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये केळ्याचे काप घाला, आता तुमची डिश खाण्यासाठी तयार आहे.

. सॅलेड

बाळाला सॅलेड खावेसे वाटत नाही परंतु जर त्यावर चीझ घातले तर बाळ नक्कीच ते खाईल. ही सॅलेडची पाककृती तुमच्या बाळासाठी करून पहा. घटक कृती

. चवदार रिसोतो

घटक कृती

. पंपकीन डीप (Pumpkin dip)

नाश्त्यासाठी हा पदार्थ चविष्ट तर आहेच, तसेच व्हिटॅमिन '' चा हा पदार्थ प्रमुख स्रोत आहे. घटक कृती

बाळाला भरवतानाच्या काही टिप्स

जर तुम्ही खालील काही टिप्स लक्षात घेतल्या तर बाळाला भरवणे अवघड जाणार नाही बाळाच्या अन्नाचा बराचसा भाग म्हणजे बाळाचे जेवण असते, परंतु बऱ्याच वेळा नाश्त्यामुळे बाळाला मजा येऊ शकते. वेगवेगळ्या पद्धतीने दिल्यास बाळाला न आवडणारे पदार्थ बाळाला आवडू लागतील. अस्वीकरण
  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३-४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता
  9. तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved