गर्भधारणा होताना

लवकर आणि सहज गर्भधारणेसाठी काय कराल?

बाळ होऊ नये म्हणून आतापर्यंत तुम्हीसुरक्षित शारीरिक संबंध ठेवून बरीच वर्षे घालवली आहेत. आता, तुम्हाला गर्भधारणा हवी आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर आई व्हायचे आहे. ह्या लेखामध्ये गर्भधारणा होण्यासाठी सर्वोत्तम काळ आणि बाळ व्हावे म्हणून कुठल्या पद्धती उपयोगी होतील ह्याविषयी चर्चा केली आहे. तसेच नैसर्गिकरित्या निरोगी बाळ व्हावे म्हणून त्यासंबंधी टिप्स आणि सूचना सुद्धा इथे दिल्या आहेत.

लवकरात लवकर गर्भवती कसे व्हाल?

तुमच्या दोघांचे वय ३५ पेक्षा कमी असेल आणि तुम्ही असुरक्षित संभोग करीत असाल तर तुम्हाला गर्भधारणा होण्यास ६ महिने लागतील. तथापि, जर वर्षभर प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला गर्भधारणा झाली नाही तर वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी वेळ लागू शकतो. ३० वर्षे वयाच्या स्त्रीची गर्भवती राहण्याची शक्यता २० % असते. त्यामुळे तुम्ही गर्भधारणा होण्याचा ताण न घेता, नियमितपणे लैंगिक आयुष्याचा आनंद घेत राहिले पाहिजे. गर्भधारणा होण्यासाठी खाली काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्ही पाळल्या पाहिजेत. प्रजनन तज्ञांच्या मते तुम्ही दररोज नव्हे पण नियमितपणे शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत कारण शुक्रजंतू ७ दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात. शुक्रजंतू तयार होण्यासाठी मध्ये थोडा काळ जाऊ द्यावा. तसेच महिन्यातील फक्त ६ दिवस असे असतात जेव्हा तुम्हाला गर्भधारणा राहू शकते. आणि हे दिवस म्हणजे ओव्यूलेशन च्या आधीचे ५ दिवस आणि ओव्यूलेशन चा दिवस होय. काही संप्रेरकांवर आधारित गर्भनिरोधक साधनांमुळे, जरी त्यांचा वापर थांबवला तरी प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. गर्भनिरोधक गोळ्या जर वापरत असाल तर त्यांचा संप्रेरकांवर होणारा परिणाम दीर्घकाळ नसला पाहिजे, आणि तुमची पाळी नियमित राहिली पाहिजे. जर तुम्ही इन्ट्रायुटेराइन डिव्हाईस (IUD) वापरत असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून ते काढून घेतले आहे ना ह्याची खात्री करा. Depo-provera चा परिणाम दीर्घकाळ राहतो त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याआधी १ वर्ष आधी ते घेणे थांबवा. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढेल. तसेच तुम्हाला निरोगी बाळ हवे असेल तर धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी सोडल्या पाहिजेत. नियमित फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेतल्यास ( गर्भधारणेच्या कमीत कमी एक महिना आधी) जन्मतः बाळामध्ये व्यंग असण्याची शक्यता कमी होते. वजन नियंत्रित ठेवल्याने आणि कॉफीचे प्रमाण १६ औंस इतके मर्यादित ठेवल्याने गर्भधारणेस मदत होते.

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम काळ कुठला?

गर्भधारणेसाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे ओव्यूलेशनचा काळ, ह्या काळात फलित स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर पडते. संभोगानंतर शुक्राणू ४८-७२ तास जिवंत राहते तर फलित अंडे फक्त १२ ते २४ तास जिवंत राहते. ह्याचाच अर्थ स्त्रीबीज अंडाशयातून सोडल्यापासून फक्त १२-२४ तासांमध्ये फलित होऊ शकते. त्यामुळे स्त्रीबीज सोडल्यानंतर त्यास फलनासाठी स्त्रीबीजवाहिनीमध्ये शुक्रजंतूचा पुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी ओव्यूलेशन केव्हा होणार आहे ह्याचा अंदाज असणे जरुरी आहे.
साधारणपणे स्त्रीचे मासिक पाळी चक्र हे २८ दिवसांचे असते. ओव्यूलेशन फक्त एकदा होते आणि ते पाळीच्या १४ व्या दिवसाच्या आसपास होते. परंतु २८ दिवसांचे मासिक पाळी चक्र क्वचितच आढळते, कारण बऱ्याच स्त्रियांचे मासिक पाळी चक्र २४-३५ इतक्या दिवसांचे असते. ओव्यूलेशन पाळी सुरु होण्याच्या आधी १४ व्या दिवशी होते. त्यामुळे २४ दिवसांचे मासिक पाळी चक्र असलेल्या स्त्रीला १० व्या दिवशी आणि ३५ दिवसांचे मासिक पाळी चक्र असलेल्या स्त्रीला २१ व्या दिवशी ओव्यूलेशन होते. ज्या स्त्रियांचे मासिक पाळी चक्र नियमित आहे अशा स्त्रिया ओव्यूलेशन केव्हा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट वापरू शकतात. तसेच ज्या ओव्यूलेशन किट्स द्वारे तुमच्या संप्रेरकांची पातळी मोजली जाते अशा किट मुळे ओव्यूलेशन केव्हा होणार आहे हे समजते. ज्या स्त्रियांची मासिक पाळी नियमित नसते, अशा स्त्रियांच्या बाबतीत ओव्यूलेशनचा अंदाज लावणे कठीण असते. जर तुमची मासिक पाळी नियमित नसेल तर तुम्ही खालील लक्षणांद्वारे ओव्यूलेशन केव्हा होणार आहे ह्याचा अंदाज लावू शकता. शरीर आरामात असताना शरीराचे जे तापमान असते त्यास शरीराचे मूलभूत तापमान असे म्हणतात. ओव्यूलेशन प्रक्रियेदरम्यान ह्या तापमानात वाढ होते.प्रत्येक दिवशी सकाळी बेडवरुन उठल्यावर तुमच्या शरीराच्या तापमानाची नोंद ठेवा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराच्या तापमानाचा नमुना मिळेल. तापमानात वाढ होण्याआधी २-३ दिवस प्रजननक्षमता खूप जास्त असते. ओव्यूलेशनच्या आधी स्त्राव ओलसर आणि चिकट होते आणि ओव्यूलेशननंतर योनीमार्गातील स्त्राव कमी आणि घट्टसर होतो.

ओव्यूलेशनच्या आधी शारीरिक संबंध ठेवा

तुम्हाला ओव्यूलेशन केव्हा होते ह्याचा अंदाज आल्यावर तुम्ही त्याआधी २-३ दिवस आणि ओव्यूलेशनच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवा . त्यामुळे स्त्रीबीज अंडाशयामधून सोडले जाण्याआधी निरोगी शुक्राणू बीजवाहिनीमध्ये असतील. जर तुम्हाला प्रजननाचा सर्वोत्तम काळ माहिती नसेल तर तुमच्या मासिक पाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात नियमितपणे शारीरिक संबंध ठेवा. त्यामुळे स्त्रीबीज सोडले जाण्याआधी बीजवाहिनी मध्ये पुरेसे निरोगी आणि सक्रिय शुक्रजंतू असतील. शारीरिक संबंध ठेवण्याविषयी आणखी महत्वाची टीप म्हणजे प्रजनन काळात संभोग करण्या आधी खूप काळ शारीरिक संबंध आलेच नाहीत असे करू नका. वीर्यामध्ये मृत शुक्राणू असू नयेत म्हणून दिवसातून एकदातरी वीर्यपतन केले पाहिजे.

गर्भधारणेची शक्यता वाढवण्याचे उत्तम मार्ग

बाळासाठी प्रयत्न करण्याआधी तुमच्या दोघांचीही तब्येत चांगली असली पाहिजे. तब्येतीच्या काही तक्रारी तर नाहीत ना किंवा जनुकीय समस्या तर नाहीत ना हे जाणून घेण्यासाठी बरेच डॉक्टर्स स्त्रीरोगतज्ञांना भेटण्याचा सल्ला देतात. तसेच डॉक्टर्स जीवन शैली बदलण्याचा सुद्धा सल्ला देतात त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. खालील गोष्टींचा वापर थांबवा:

. योनीमार्गासाठी वंगणाचा वापर

संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की योनिमार्गाच्या वंगणाचा वापर केल्यास शुक्रजंतूंना हानी पोहचू शकते आणि स्त्रीबीज फलनासाठी ते गर्भाशयापर्यंत पोहचू शकत नाहीत. कारण pH जास्त असल्याने शुक्रजंतू मरून जातात. ह्या हानिकारक गोष्टी वापरण्याऐवजी, संभोगा आधीच्या कामक्रीडे दरम्यान स्पर्श, चुंबन, मिठी अशा क्रिया १५-२० मिनिटे करा. जर ह्याचा उपयोग झाला नाही तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता कारण शुक्राणूंकरिता पाणी हानिकारक नाही.

. खूप कॅफेन घेणे टाळा

कॉफीचे सेवन आणि गर्भधारणा न होणे ह्यांचा संबंध संशोधनाद्वारे सिद्ध झाला आहे. २००-३०० मिग्रॅ कॉफी (म्हणजेच २ कप) घेणे ठीक आहे परंतु दिवसाला ५०० ग्रॅम (५ कप कॉफी) घेणे टाळा कारण त्यामुळे दीर्घकाळ गर्भधारणा होत नाही.

. मद्यसेवन

जरी मद्यसेवनाच्या सुरक्षित पातळीविषयी अद्याप संशोधन झालेले नसले तर गर्भधारणेस इच्छुक असलेल्या स्त्रीने मद्यसेवन टाळले पाहिजे. तसेच मासिक पाळी चक्राच्या दुसऱ्या भागात ओव्यूलेशन होते तेव्हा मद्यपान न करण्याची शिफारस केली जाते.

. धूम्रपान

शास्त्रीय अभ्यासाद्वारे असे लक्षात आले आहे की जी जोडपी धूम्रपान करतात त्यांना गर्भधारणा होण्यास बराच काळ लागतो. जर बाळ हवे असेल तर धूम्रपान संपूर्णपणे टाळले पाहिजे. धूम्रपानाचा फक्त तुमच्याच नव्हे तर भविष्यात तुमच्या बाळाच्या सुद्धा प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच धुम्रपानामुळे स्त्रियांच्या अंडाशयावर तसेच पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होतो, बीजांचे नुकसान होते तर स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती सुद्धा लवकर येते. तसेच धुम्रपानामुळे गर्भपात तसेच अकाली प्रसूती, कमी वजनाची बाळे इत्यादी समस्या आढळतात.

. ताण

ताण वाढल्यास पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर आणि स्त्रियांमध्ये ओव्यूलेशन वर परिणाम होतो. ताणामुळे ओव्यूलेशन चक्रामध्ये उशीर होतो आणि ओव्यूलेशनचा काळ चुकू शकतो, किंवा मासिक पाळीचा काळ सुद्धा वाढतो. करिअर, घर बदलणे इत्यादी गोष्टींचा ताण जोडप्याना येऊ शकतो आणि त्यामुळे गर्भधारणेच्या प्रयत्नांना उशीर होऊ शकतो. ताण कमी करणारे व्यायाम जसे की योग किंवा मन-शरीर विश्रांती कार्यक्रम तुम्हाला आराम मिळण्यास आणि गर्भधारणेची शक्यता वाढण्यास मदत करू शकतात.
गर्भधारणा होण्यासाठी कोणता विशेष आहार घेतला जावा ह्याविषयी कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही, परंतु पोषक आणि संतुलित आहार घेतल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. ह्यासाठी मासे, समुद्री खाद्य जसे की कोळंबी, सुरमई, कॅटफिश इत्यादी कमी पारा असलेले मासे तुम्ही खाल्ले पाहिजेत. तसेच शार्क, किंग मॅकेरेल असे पारा असलेले मासे खाणे टाळले पाहिजे. हे मासे खाल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते.

लवकर आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी काही उपयोगी टिप्स

जोडप्यांसाठी इथे काही टिप्स आणि सूचना दिल्या आहेत ज्या तुम्ही नैसर्गिक आणि जलद गर्भधारणेसाठी वापरू शकता: भावनोत्कटता प्राप्त केल्याने लैंगिक संभोग केल्याचा अनुभव चांगला सुधारू शकतो, परंतु यामुळे कोणत्याही प्रकारे गर्भधारणेवर परिणाम होत नाही. वंध्यत्व ही एक समस्या आहे जी पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही परिणाम करू शकते, अशावेळी वैद्यकीय सल्ला आणि तज्ञ डॉक्टरांची लवकरात लवकर मदत घेणे आवश्यक आहे.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved