बाळासाठी सफरचंदाची प्युरी – पाककृती आणि साठवणुकीसाठी टिप्स

बाळाचा जन्म होतो त्या क्षणापासून पालकांना  नेहमीच आपली मुले वाढताना बघण्यात आनंद वाटतो. आईचं  आपल्या मौल्यवान आणि गोंडस बळावर  बारीक लक्ष असते, विशेषतः ते बाळ जेव्हा वेगवेगळे अन्नपदार्थ खाण्यास सुरुवात करते तेव्हा!

सफरचंद तुमच्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी एक चांगले फळ आहे. सफरचंद पचनास सोपे आहे आणि कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. तसेच, तुमच्या बाळाला सफरचंदाच्या प्युरीची गोड चव आवडते.

तुम्ही बाळाला सफरचंद केव्हा देऊ शकता?

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे, ‘An apple a day, keeps the doctor away’! आणि हे अगदी खरं आहे कारण  बाळांना घन पदार्थांची सुरुवात करून देण्यासाठी सफरचंद हे उत्तम अन्न आहे. सफरचंद प्युरीच्या स्वरूपात दिल्यास ते पचनास हलके असते आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते.

६ महिन्यांच्या बाळाला सफरचंदाची प्युरी देणे योग्य आहे कारण बाळ घन पदार्थ आणि सीरिअल्स खाण्यास तयार आहे ह्याची चिन्हे दिसू लागतात. तथापि, पहिले ६ महिने बाळास फक्त स्तनपान देणे योग्य आहे ह्याची नोंद घ्या.

बाळाला सफरचंदाची प्युरी देण्यास आई सुरुवात करू शकते, परंतु त्याचे प्रमाण कमीत कमी ठेवा कारण बाळ ह्या अन्नपदार्थांच्या नव्या स्रोताशी जुळवून घेत आहे

बाळांसाठी सफरचंदाची प्युरी तयार करण्यासाठी लागणारे घटक

सफरचंदाच्या प्युरीची चव आणि तिचे पोषणासाठीचे फायदे ह्यामुळे बाळाची आई ती आपल्या बाळाला भरवण्यास  प्राधान्य देते. जेव्हा तुमचे बाळ हे शिजवलेले सफरचंद सहज खाऊ शकते तेव्हा तुम्ही इतर फळेसुद्धा सफरचंदाच्या प्युरीमध्ये घालून त्यास अधिक चविष्ट बनवू शकता. जेव्हा बाळाची वाढ होऊ लागते, तेव्हा मऊ प्युरीच्या ऐवजी थोडी जाडसर प्युरी द्यावी,

बाळासाठी सफरचंदाची प्युरी करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी लागतील

 • १ सफरचंद
 • शिजवण्यासाठी २ कप पाणी
 • दालचिनी १ चिमूटभर (पसंतीनुसार)
 • स्तनपान, सरसरीत करून घेण्यासाठी
 • छोटा प्रेशर कुकर किंवा स्टीमर
 • फूड प्रोसेसर
 • साठवून ठेवण्यासाठी डबे

बाळासाठी सफरचंदाची प्युरी कशी करावी?

तुमच्या बाळासाठी ताजी आणि चवदार अशी सफरचंदाची प्युरी तयार करणे अवघड नाही! फक्त तुम्ही ताजे ऑरगॅनिक सफरचंद खात आहात ना ह्याची खात्री करा. जर तुम्ही जास्त दिवसांसाठी सफरचंदाची प्युरी तयार करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला  प्युरी जास्त सफरचंदाची बनवावी लागेल.

 1. सफरचंदे स्वच्छ धुवून घ्या, बिया काढून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करा.
 2. सफरचंदाचे तुकडे पाणी असलेल्या  छोट्या प्रेशर कुकर मध्ये किंवा स्टीमर मध्ये ठेवा.
 3. २० मिनिटांसाठी शिजवून घ्या.
 4. सफरचंद मऊ झाले आहे का ते तपासून पहा.
 5. सफरचंद बाहेर काढा आणि थंड झाले आहेत का ते बघा.
 6. शिजवलेले सफरचंद फूड प्रोसेसर मध्ये टाका आणि मऊ झाले आहे का बघा. तुम्ही उकडलेले सफरचंदाचे तुकडे निर्जंतुक केलेल्या वाटीत घेऊन चमच्याने मॅश करू शकता त्यामुळे प्युरीचा थोडा वेगळा पोत मिळेल.
 7. तुम्ही प्युरी मध्ये स्तनपानाचे दूध घाला त्यामुळे प्युरीचा पोत मऊ आणि चांगला होईल
 8. चवीसाठी थोडी दालचिनी पूड घाला
 9. सफरचंदाची प्युरी हवाबंद डब्यात ठेवा

सफरचंदाची प्युरी कशी साठवून ठेवाल ?

बाळाच्या मातांनो, जेव्हा तुम्ही प्युरी करीत असाल, जरी तुम्ही ती साठवली तरी त्याचा ताजेपणा तुम्हाला टिकवून ठेवता आला पाहिजे. तसेच दररोज सफरचंदाची प्युरी करणे हा काही योग्य पर्याय नाही, त्यामुळे थोड्या दीर्घ काळासाठी ही प्युरी कशी साठवून ठेवावी हा प्रश्न तुम्हाला पडेल.

 • प्युरी हवाबंद डब्यात साठवून ठेवा
 • तुम्ही ३ दिवसापर्यंत ती फ्रिज मध्ये ठेवू शकता
 • बर्फाच्या ट्रे मध्ये घालून तुम्ही ते संपूर्णतः गोठवण्यासाठी ठेऊ शकता
 • ३० दिवसांपर्यंत ते चांगले राहते
 • परंतु हे ट्रे फ्रिझर बॅग मध्ये ठेवा

सफरचंदाची प्युरी करण्याआधी घ्यावयाची काळजी

 • ताजी केलेली प्युरी साठवून ठेवावी. खाऊन उरलेली प्युरी साठवून ठेऊ नका
 • लक्षात ठेवा, तुमच्या बाळाला ३ दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवलेली प्युरी देऊ नका, जर ती गोठवून ठेवलेली नसेल तर
 • हळू हळू बाळाला सफरचंदाच्या प्युरीची ओळख करून द्या, कारण बाळाला त्याची सवय होण्यास वेळ लागेल. बाळाची प्रगती हळूहळू होईल
 • प्युरी करताना सफरचंदे ताजी आहेत ना ह्याची खात्री करा
 • प्युरी करताना आणि साठवताना, स्वच्छ भांडी आणि डब्यांचा वापर करणे गरजेचे आहे.

तुमच्या बाळाच्या आहारात फळांचा समावेश केल्यानंतर तुमचं बाळ निरोगी वाढत असतानाचा आनंद तुम्हाला जाणवत असेल. वर दिलेल्या टिप्स मुले तुम्हाला अगदी सुयोग्य सफरचंदाची प्युरी मिळेल आणि तुमचं बाळ ती आनंदाने खाईल

Share
Published by
मंजिरी एन्डाईत

Recent Posts

प्रसूतीनंतर करायचे व्यायामप्रकार

बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्या शरीराचा आकार पूर्ववत होणे महत्वाचे आहे, कारण त्यामुळे केवळ आपले आरोग्य सुधारत नाही तर बाळाच्या जन्मानंतरचे…

February 21, 2020

गरोदरपणात झोपतानाच्या सर्वोत्तम स्थिती

गर्भवती स्त्रीला चांगली झोप मिळावी असे वाटत असते परंतु शांत चांगली झोप मिळणे अवघड असते. गर्भारपणात झोपेत अडथळा येणे हे…

February 19, 2020

बाळाचा जावळ विधी: प्रक्रिया, सावधगिरी आणि टिप्स

बाळाचे जावळ काढणे म्हणजेच बाळाच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टाकणे. हा विधी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. हिंदू…

February 19, 2020

बाळांमधील अतिसाराची समस्या

अतिसार म्हणजे बाळाला पातळ आणि चिकट शी होते. बऱ्याचदा जिवाणू किंवा विषाणू किंवा काही पदार्थाविषयी संवेदशीलतेमुळे बाळाला जुलाब होतात. नवजात…

February 19, 2020

आपल्या बाळाचे नाक कसे स्वच्छ करावे?

आपल्याला लहानपणी एक इंग्रजी कविता होती,“Ten little fingers, ten little toes, two little eyes and one little nose. One little…

February 19, 2020

बाळांमधील बद्धकोष्ठता

वेगवेगळ्या अभ्यासांद्वारे असे निदर्शनास आले आहे की जगातील १०-१५% लोक इरिटेबल बाउल सिंड्रोम ह्या विकाराने ग्रस्त असतात तर २०% लोकांना…

February 19, 2020