अन्न आणि पोषण

बाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी

बाळाला घनपदार्थ भरवणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. तुमचं बाळ आता घन पदार्थांच्या विश्वात पाऊल टाकत आहे, त्यामुळे आरोग्यपूर्ण पर्यायांनी सुरुवात करणे चांगले. बालरोगतज्ञ भाज्यांपासून सुरुवात करण्याचा सल्ला देतात. योग्य भाज्या निवडण्याचा आनंद, बाळाला भरवता यावे म्ह्णून प्रेमाने ते कुस्करण्याचा आनंद आणि एकुणातच बाळाला भरवण्याची प्रक्रिया  हे सगळं खूप समाधानकारक आहे.बाळाला घनपदार्थ भरवणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे, कारण तुमचे बाळ घनपदार्थांच्या एका नव्या विश्वात पदार्पण करत आहे. त्यामुळे पोषक पर्याय निवडून सुरुवात करणे चांगले. भाज्यांपासून सुरुवात करण्याचा सल्ला बालरोगतज्ञदेतात. योग्य भाज्या निवडण्याचा आनंद, त्याचा हवा तसा पोत करून बाळाला भरवण्याचे समाधान निराळेच!

बाळासाठी भाज्यांची प्युरी कशी कराल?

जरी बाजारात बाळांसाठी वेगवेगळे अन्नपदार्थ उपलब्ध असले तरी, बाळासाठी ताज्या भाज्या वापरून  जेवण तयार करणे हे आरोग्यपूर्ण असते.  त्यामुळे, घरी तयार केलेली  व्हेजिटेबल प्युरी हा त्यांना भाज्यांशी ओळख करून देण्याचा उत्तम मार्ग आहे.तुम्ही भाज्या उकडू शकता किंवा शिजवू शकता. काही भाज्या शिजवण्यासाठी काही सूचना खाली दिल्या आहेत: तुम्ही इडली स्टीमर किंवा कुठलाही चांगला स्टीमर भाज्या उकडण्यासाठी वापरू शकता. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही भाज्या  भांड्यामध्ये उकडू शकता.आता, तुमच्या बाळासाठी ५ सर्वोत्तम, पोषक आणि रंगीबेरंगी व्हेजिटेबल प्युरी कशा करायच्या त्या पाहुयात.प्युरी तयार करण्याआधी, तुम्ही वाट्या आणि चमचे गरम पाण्याने  निर्जंतुक करून घेतले आहेत ना ह्याची खात्री करा आणि ते जोपर्यंत तुम्ही वापरत नाही तोपर्यत पाण्यात बुडवून ठेवा.

१. भोपळ्याची प्युरी

भोपळा हा बीटा कॅरेटिन , प्रोटीन, लोह आणि व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. सशक्त प्रतिकार प्रणालीसाठी ह्याची मदत होते. भोपळा गोड असतो त्यामुळे बाळाला तो आवडतो. तुमचे बाळ  जेव्हा ६ महिन्याचे होते तेव्हा तुम्ही भोपळ्याची प्युरी देण्यास सुरुवात करू शकता.  भोपळ्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही  कारण भोपळ्यात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तसेच अँटिऑक्सिडंट्सने सुद्धा तो समृद्ध असतो. भोपळ्याचा प्रतिजैविक गुणधर्ण आतड्यातील जंतू  मारण्यास मदत करू शकतो.साहित्य:  कृती

२. बटाट्याची प्युरी

बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात आणि पुष्कळ प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. जरी बटाट्यामध्ये भरपूर मूल्ये असली तरी त्यामुळे बाळाला गॅस होऊ शकतो. म्हणून बाळ ८ महिन्यांचे होईपर्यंत वाट बघण्याचा सल्ला दिला जातो, आणि मग बाळाला मॅश पोटॅटो किंवा त्याची प्युरी द्यावी असे सांगितले जाते. बटाट्यामध्ये असलेले फॉस्फरस हे हाडांच्या विकासासाठी मदत करते.साहित्य: कृती किंवा तुम्ही त्यामध्ये खालील गोष्टी टाका

३. रताळ्याची प्युरी

रताळ्याची प्युरी ही खूप सुप्रसिद्ध आहे कारण तिचा पोत मऊ असतो, चव गोड़ असते आणि कमी ऍलर्जिक असते. बाळाचे वय जेव्हा ६ महिने किंवा त्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते बाळाला देऊ शकता. ही प्युरी  तंतुमय पदार्थानी समृद्ध असते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. रताळ्याच्या प्युरीमध्ये  व्हिटॅमिन अ, सी, इ. कॅल्शिअम आणि लोह  जास्त प्रमाणात  असते. ह्या सगळ्या पोषणमूल्यांमुळे दृष्टी चांगली राहते, त्वचा निरोगी राहते आणि पचनसंस्थ सुद्धा निरोगी राहते.साहित्य: कृती

४. मटार प्युरी

मटार  हे कॅल्शिअम, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन अ आणि सी ने समृद्ध आहेत. मटार बाळाच्या हाडांसाठी आणि स्नायूंसाठी चांगले असतात. बाळाचे वय ६ महिने आणि त्यापेक्षा जास्त होईल तेव्हा तुम्ही मटारची  प्युरी बाळाला देऊ शकता. कोवळे मटार घेतलेले चांगले कारण ते मऊ आणि गोड़ असतात. हवाबंद केलेले वाटणे घेणे टाळा आणि ताजे वाटणे घ्या. तुम्ही फ्रोझन वाटणे सुद्धा निवडू शकता.साहित्य कृती

५. गाजर, बीटरूट, बटाटा प्युरी

बीटरूट हे लोह आणि व्हिटॅमिन अ ने समृद्ध आहे. गाजर हे बीटा कॅरेटिन  आणि व्हिटॅमिन अ ने समृद्ध आहे. बाळाच्या दृष्टीसाठी ते चांगले असते आणि संसर्गास सामना करता यावा म्हणून ते शरीरास मदत करते. बटाटे हे कर्बोदकांनी समृद्ध असतात. काही बाळांना बीटरूट प्युरी आवडत नाही, त्यामुळे तुम्ही बीटरूट, गाजर आणि बटाटा घालून एकत्र प्युरी करू शकता. जेव्हा बाळ ८ महिन्यांचे होते ठेवा तुम्ही हे मिश्रण त्यास देण्यास सुरुवात करू शकता.साहित्य कृती

लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा गोष्टी

भाज्यांची प्युरी ही पोटभरीचे आणि पोषक अन्न आहे. आपण जरी काही भाज्यांच्या प्युरीच्या रेसिपीची चर्चा केली असली तरी  तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करू शकता तसेच तुमच्या बाळाला सर्वात जास्त आवडणारी भाजी सुद्धा निवडू शकता आणि बाळासाठी व्हेजिटेबल  प्युरी करू शकता.खाली काही मुद्दे आहेत जे तुम्ही ह्या भाज्यांच्या पोषक प्युरी करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत तुमच्या बाळासाठी आरोग्यपूर्ण, संपूर्ण आणि चविष्ट अन्न तयार करणे हे थोडे कठीण आहे, परंतु तो नक्कीच आनंददायी अनुभव आहे. तुम्ही अति उत्साही असाल परंतु लक्षात ठेवा की तुमचे बाळ ते अन्न सहज पचवू शकत नाही म्हणून हळू हळू तुमच्या बाळाला ह्या चवीच्या, रंगाच्या आणि वेगवेगळे पोत असलेल्या अन्नपदार्थांच्या दुनियेची ओळख करून द्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved