बाळ

बाळाला चालण्यास कशी मदत कराल? – महत्वाचे टप्पे, काही खेळ आणि टिप्स

आपल्या बाळाचे वाढीचे आणि विकासाचे वेगवेगळे टप्पे असतात. पालथे पडून तुमच्याकडे बघून हसण्यापासून, ते प्रत्येक लहान गोष्ट त्यांच्या विकासाचा टप्पा असतो. सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा बाळ स्वतःचे स्वतः उभं रहाते आणि पहिले पाऊल टाकते तो असतो.

बाळ चालायला केव्हा शिकते?

बरीच बाळे जेव्हा १०-१२ महिन्यांची होतात तेव्हा चालायला सुरुवात करतात. काही बाळे त्याच्या आधीसुद्धा, म्हणजे ९ व्या महिन्यातच चालायला सुरुवात करतात. वेगवेगळ्या घटकांवर ते अवलंबून असते उदा: अनुवंशिकता, बाळाची शारीरिक ताकद तसेच बाळाची इच्छाशक्ती वगैरे.

बाळाचे चालण्यास शिकतानाचे महत्वाचे टप्पे

बाळाच्या वाढीच्या पहिल्या वर्षात बाळाच्या स्नायूंमध्ये ताकद आणि समन्वय विकसित होतात, त्यामुळे बाळ उभे राहून चालू शकते. इथे काही महत्वाचे टप्पे किंवा बाळाच्या चालण्याच्या अवस्था दिल्या आहेत. १. नवजात शिशूला आपण उभे धरले आणि पाय हवेत राहू दिले तर बाळ पाय कुठल्या तरी पृष्ठभावर ते दाबण्याचा प्रयत्न करते. बाळ काही महिने असे करत रहाते. २. वयाच्या ६ महिन्यानंतर बाळ पालथे पडते, रांगते आणि बसायला सुद्धा शिकते. तुम्ही जेव्हा बाळाला तुमच्या मांडीवर किंवा एखाद्या पृष्ठभागावर उभे करता तेव्हा बाळ पाय आपटते किंवा उसळ्या मारते. ३. ९ महिन्यांच्या आसपास, घरातील फर्निचरला धरून हळूहळू बाळ स्वतःला पुढे ढकलते. ह्या कालावधीत घरात फक्त दणकट गोष्टी ठेवा, त्यामुळे अपघात टळतील. ४. ९-१० महिन्यांचे तुमचे बाळ उभे असताना गुडघ्यात वाकून बसू शकते. १० महिन्याच्या बाळासाठी ही मोठी गोष्ट आहे. ५. १२ महिन्यांचे झाल्यावर, कशाचातरी आधार घेऊन बाळ काही पावले पुढे टाकते. आणि कुठल्याही आधाराशिवाय उभे राहते. तुमचा हात धरून ते चालण्याची सुद्धा शक्यता आहे. ६.१२ व्या महिन्यात बरीच बाळे चालण्यास शिकतात, सुरुवातीला थोडी अस्थिर असतात. १२ महिन्याचे झाल्यावर सुद्धा बाळ चालत नसेल तरीही काळजीचे कारण नाही. बाळाला आणखी काही महिने लागू शकतात.

तुम्ही बाळाला चालण्यासाठी कशी मदत करू शकता?

जर तुमचे बाळ चालण्यासाठी जास्त वेळ घेत असेल तर, बाळाची स्नायूंची ताकद वाढवून बाळाला चालण्यास तुम्ही मदत करू शकता. खाली काही मार्ग आहेत जे वापरून तुम्ही बाळाला चालण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.

१. व्यायाम

तुम्ही साधे आणि सोपे व्यायाम बाळाकडून करवून घेऊन बाळाचे स्नायू बळकट करू शकता त्यामुळे बाळाला चालण्यासाठी मदत होते.

२. बाळाला चालणे शिकवण्यासाठी काही खेळ

काही खेळ बाळांना चालण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी योग्य असतात आणि हे खेळताना तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मदत होऊ शकते.

इतर काही सुरक्षिततेच्या टिप्स

तुमचं बाळ नुकतंच चालायला शिकत असल्यामुळे तुम्हाला योग्य काळजी घेतली पाहिजे. आणि बाळाचा योग्य विकास होण्यासाठी नीट गोष्टी निवडल्या पाहिजेत. खाली काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. वरील सर्व खेळांची आणि व्यायामांची दिवसातून अनेक वेळा पुनरावृती करीत राहिल्यास बाळ लवकर चालायला शिकण्यास मदत होईल. बाळाला पायात काहीही न घालता चालायला शिकवल्यास बाळाला स्वतःचा तोल सांभाळता येण्यास मदत होईल. तसेच जरी तुमचे बाळ १८ महिन्यानंतरही चालण्यास शिकले नाही आणि बाळाच्या विकासातील उशिराबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही नक्कीच तुमच्या वैद्यांशी संपर्क साधू शकता.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved