बाळ

बाळाच्या केसांच्या वाढीसाठी १० टिप्स

छोटी बाळे व लहान मुले देवदूतांसारखे असतात आणि देवाने दिलेली ती एक सुंदर भेट असते. ती कशीही असली तरी गोडच दिसतात. पण पालक म्हणून बाळाच्या डोक्यावर थोडे केस असावेत म्हणजे ते अजून मोहक दिसेल असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. म्हणूनच हा लेख आहे, आम्ही इथे काही टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमच्या बाळाच्या डोक्यावर सुंदर केस येण्यास मदत होईल. तथापि ह्या टिप्स ६ महिने आणि त्यापेक्षा मोठ्या बाळांसाठी आहेत. जर तुमचे बाळ लहान असेल तर ह्या टिप्स त्यांच्यासाठी वापरण्याची ही वेळ नव्हे.

तुमच्या बाळाचे केस जलद कसे वाढतील?

विरळ केसांचा प्रश्न सोडवण्याचे विविध मार्ग आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे

१. व्हिटॅमिन डी

अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डी केसांच्या चांगल्या वाढीसाठी मदत करते आणि अनेक केसांच्या उत्पादनात वापरले जाते.

२. टोपी

बऱ्याच वेळा जेव्हा आई बाबांना बाळाच्या डोक्यावर केसविरहित भाग दिसला की काळजी वाटते. काहीवेळा तो वेगळ्या रंगाचा असू शकतो आणि तुम्हाला असेल वाटेल की जंतुसंसर्ग झाला असेल. पण असे का होते ह्यामागे एक साधे कारण आहे. जेव्हा तुम्ही बाळाला पाळण्यात झोपवता तिची किंवा त्याची पाठ अंथरुणाला घासली जाते आणि त्यामुळे केस गळती सुरु होते. पण तुम्ही बाळाला झोपवण्याआधी टोपी घातलीत तर हे सहज टाळता येऊ शकते.

३. बदाम

बदाम हे प्रथिने आणि अमिनो ऍसिडस्चा चांगला स्रोत आहे. तुमच्या मुलाला केसांच्या वाढीसाठी दिवसातून २-३ बदाम देण्याचा प्रयत्न करा.

४. लोह

केसांची वाढ सुधारण्यासाठी लोह हे अजून एक महत्वाचा पोषक घटक आहे. त्यामुळे केस तुटणे कमी होते. लोहयुक्त घटकांचा तुमच्या बाळाच्या आहारात समावेश करा. जसे की हिरव्या पालेभाज्या, बीन्स, भोपळा वगैरे.

५. केस विंचरणे

केसातून नुसता कंगवा फिरवल्याने केसांच्या वाढीत फरक पडतो. असे केल्याने स्काल्प चे रक्ताभिसरण सुद्धा वाढते. व्यवस्थित दिसावेत म्हणून तुम्ही बाळाचे केस सुद्धा कापू शकता. परंतु केस कापल्याने किंवा टक्कल केल्याने केस वाढतीलच ह्याची खात्री देता येत नाही. केस कापल्याने ते फक्त नीट दिसतात आणि दाट व झुपकेदार दिसतात.

६. केस स्वच्छ ठेवा

दर  २-३ दिवसातून तुम्ही तुमच्या बाळाचे केस बेबी शाम्पूने धुतल्यास त्याने केसात घाण साचणार नाही आणि ते स्वच्छ राहतील. केस धुताना कायम कोमट पाणी वापरा जे जास्त थंड किंवा जास्त गरम असणार नाही, त्यामुळे बाळाला आरामदायी वाटेल.

७. केसांना तेल लावा

केसांना तेल लावून मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची निरोगी वाढ होण्यासाठी लागणारी आर्द्रता सुद्धा मिळते. चांगला परिणाम दिसण्यासाठी तुम्ही शुद्ध आणि ऑरगॅनिक नारळाचे तेल वापरू शकता. बदाम पोटातून खायला देण्यासोबतच, बाळाच्या टाळूला बदामाच्या तेलाचा मसाज देऊ शकाल त्यामुळे पोषण मिळून रक्ताभिसरण सुधारेल.

८. कंडिशनर चा वापर

तुमच्या बाळाचे केस खूप कुरळे असतील तर तुम्ही कंडिशनर वापरू शकता. लहान मुलांसाठीच कंडिशनर वापरल्याने केस नीट ठेवणे सोपे जाते तसेच स्काल्प ला आवश्यक ते पोषण सुद्धा मिळते. फ्लेक्स घालवण्याकरिता सुद्धा असे केल्याने मदत होते. नैसर्गिक कंडिशनर जसे की अंडे, जासवंद आणि दही वापरणे हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. त्यांच्यामध्ये कुठलेही हानिकारक रसायन नसते ज्याचा बाळाला त्रास होऊ शकतो.

९. कोरफड

सगळ्यांना माहिती आहे की कोरफड त्वचेवर जादूईरित्या काम करते, तसेच केसांच्या वाढीसाठी सुद्धा ती मदत करते. तुम्ही तुमच्या बाळाच्या स्काल्पवर कोरफड लावा किंवा चांगल्या परिणामांसाठी शाम्पू आणि कंडिशनर सोबत मिसळा.

१०. वेगवेगळी उत्पादने वापरून पहा

केस वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांचा पोत वेगळा असतो. कुरळ्या केसांसाठी योग्य असलेला शाम्पू आणि कंडिशनर सरळ केसांसाठी योग्य ठरेलच असे नाही. कुठलाही संकोच न बाळगता नीट अभ्यास करून आपल्या मुलाच्या केसांसाठी कुठले उत्पादन योग्य आहे ठरवा आणि एकाच उत्पादनावर थांबू नका. वेगवेगळ्या शाम्पू चे छोट्या पिशव्या आणा आणि प्रत्येक आठवड्याला एक असे वापरून पहा, तुम्हाला कालांतराने लक्षात येईल की तुमच्या मुलासाठी कोणता शाम्पू योग्य आहे.

विविध टिप्स

प्रत्येक मूल हे एकमेवाद्वितीय आणि वेगळं असते, त्यांच्या केसांची वेगळी गरज असते आणि आणि तुम्ही त्यांच्यावर जे प्रयोग करता त्याला ते वेगवेगळी प्रतिक्रिया देतात. त्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम दिसले नाहीत तर पुढे जाऊ नका आणि बाळाच्या आहारात बदल करा. स्थिर राहून सगळं शांतपणे घ्या तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved