बाळ

बाळाचे कान टोचताना काय काळजी घ्यावी?

तुम्हाला तुमच्या बाळाच्या कानात एखादा नाजूक हिरा लुकलुकलेला पाहायला आवडेल, परंतु काही पालकांना ही कल्पना खूप भयानक सुद्धा वाटू शकते. तुमच्या बाळाचे कान टोचून घेणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.

पालक आपल्या बाळाचे कान का टोचतात?

बरेच पालक आपल्या बाळाचे कान टोचून घेण्यामागे खूप कारणे आहेत. असे समजले जाते मोठेपणी कान टोचण्यापेक्षा बाळ लहान असतानाच जर कान टोचले तर बाळाला कमी वेदना होतात आणि तसेच बाळाची अस्वस्थताही कमी असते. तर काही पालक बाळाचे कान टोचून घेतात त्यामागे सांस्कृतिक कारण किंवा पारंपरिक मूल्ये असतात. तर काही पालक एखाद्या वेगळ्याच कारणासाठी कान टोचून घेतात आणि ते म्हणजे बाळाची लिंग ओळख. कानात एखादा खडा किंवा कानातले डूल असतील तर तर बाळाला चुकून मुलगा समजू नये म्हणून. कारण काहीही असो, जगातले बरेचसे पालक आपल्या बाळांचे कान टोचतात.

जन्मतःच बाळाचे कान टोचणे योग्य आहे का?

काही परंपरांमध्ये बाळाचे कान जन्मल्याबरोबर टोचतात तर काही पालक अन्य काही कारणामुळे जन्मतःच कान टोचण्याचा निर्णय घेतात. जर तुमच्या बाळाचे आरोग्य चांगलं असेल आणि त्यामध्ये अन्य काही गुंतागुंत नसेल तर जन्मल्यावर कान टोचावेत का ह्याविषयी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकता.

बाळाचे कान टोचणे केव्हा सुरक्षित असते?

बाळाचे कान टोचण्याने बाळाला खूप जोखीम असते म्हणून बरेचसे पालक संभ्रमात असतात की हे वय बाळाचे कान टोचण्याचे योग्य वय आहे का? जेव्हा तुम्ही बाळाचे कान टोचता तेव्हा संसर्गाचा धोका असतो, कारण तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा तितकीशी विकसित झालेली नसते, त्यामुळे कान टोचण्यासाठी थोडी वाट पाहावी हे चांगले. तज्ञांच्या मते बाळाचे कान टोचण्यासाठी बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत वाट पहावी. पण तुम्ही ह्यापेक्षा जास्त वेळ वाट पाहू शकता आणि आपल्या बाळाला ते ठरवू देऊ शकता.

बाळाचे कान कुणी टोचावेत?

परंपरेनुसार लोक त्यांच्या सोनाराकडून बाळाचे कान टोचून घेतात. तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांना किंवा बालत्वचारोगतज्ञांना ते तुमच्या बाळाचे कान टोचू शकतील का ह्याबद्दल विचारा. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना त्यांनी त्यांच्या बाळाचे कान कुठून टोचून घेतले ह्याविषयी विचारणा करू शकता. जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अशा ठिकाणाहून बाळाचे कान टोचून घेणे हे चांगले. उदा: दवाखाना, पार्लर किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ.

योग्य कानातल्याची निवड कशी कराल?

पूर्वी लोक कानात लिंबाच्या काड्या, त्यांच्या जंतुनाशक गुणधर्मामुळे कानात घालत असत. अजूनही बऱ्याच मातांना लिंबाच्या काड्या हा आपल्या बाळासाठी चांगला पर्याय वाटतो.
जर आपण आपल्या बाळासाठी धातूच्या कानातल्यांचा विचार करीत असाल तर सोने किंवा चांदीचे कानातले घेण्याचे सुचवले जाते. तुमच्या बाळासाठी योग्य कानातले निवडणे हे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही निवडलेले कानातले छोटे, सपाट आणि गोल आहेत ह्याची खात्री करा. तसेच त्यांचा कडा धारदार नकोत, आणि त्याचा स्क्रू मागच्या बाजूला असायला हवा. तुमच्या बाळासाठी लोम्बत्या कानातल्यांची निवड करू नका, ते कुठेही अडकून बाळाला इजा होण्याची शक्यता असते. तसेच ते बाळाने तोंडात घातल्यास श्वास गुदमरण्याची सुद्धा शक्यता असते.

बाळाचे कान टोचण्यासाठी तुम्ही स्वतःला आणि बाळाला कसे तयार कराल?

बाळाचे कान टोचण्याचे तुम्ही ठरवले आहे तर ! सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे बाळाचे आरोग्य. कान टोचण्याच्या वेळेला बाळाची तब्येत चांगली असणे हे अतिशय महत्वाचे आहे. बाळाचे कान टोचण्याआधी तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घेऊ शकता. कान टोचताना दुखू नये म्हणून तुमचे डॉक्टर काही वेदनाशामक औषधे लिहून देऊ शकतात. तसेच कानाच्या पाळीवर लावण्यासाठी क्रीम देऊ शकतात. त्यामुळे बाळाला कान टोचताना वेदना जाणवणार नाहीत. तुम्ही बाळाला हलकेफुलके कपडे घाला, जेणेकरून ते बाळाच्या कानाला इजा न होता खालून काढता येतील. बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले जावे म्हणून बाळाचे कान टोचताना त्याचे आवडते खेळणे सोबत घेऊन जाऊ शकता. जर तुमचे बाळ घनपदार्थ खाण्याइतपत मोठे असेल तर एखादा बाळाचा आवडता खाद्यपदार्थ सोबत ठेवा. बाळाचे कान टोचून झाल्यानंतर तुम्ही बाळाला तो खायला देऊ शकता.

बाळाचे कान कसे टोचावेत आणि कान टोचताना खूप दुखते का?

कान बरेच वेळा सुईने टोचतात, ही खूप जुनी पद्धत आहे. आत्ताच्या काळात कान टोचण्यासाठी 'gun' वापरतात. तुम्ही तुमच्या बाळाचे कान टोचण्यासाठी कुठलीही पद्धत निवडू शकता फक्त त्यासाठी वापरले जाणारे साहित्य निर्जंतुक करून घेतले आहे ह्याची खात्री करा. त्यामुळे बाळाच्या कानाला संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
कान टोचणारी व्यक्ती कानाच्या पाळीवर जिथे टोचायचे आहे तिथे पेनने किंवा मार्करने खूण करेल. असे केल्याने कान टोचणे सोपे जाते तसेच ते अचूक होते. खूण करण्यासाठी dye वापरणे टाळा कारण त्यामुळे बाळाच्या त्वचेची जळजळ होऊ शकते. सर्जिकल ग्लोव्हज घालून कान टोचणारी तज्ञ व्यक्ती बाळाच्या कानाची पाळी जंतुनाशक द्रव्याने पुसून घेईल. तुम्हाला ह्या प्रक्रियेदरम्यान बाळाचे डोके घट्ट धरून ठेवले पाहिजे. कान टोचायला जास्त वेळ लागत नाही परंतु कान टोचल्यानंतर बाळाला शांत करायला मात्र खूप वेळ लागू शकतो. एक कान टोचून झाल्यानंतर दुसरा कान टोचण्याआधी बाळाला शांत करा. कान टोचणे वेदनादायी असते आणि कान टोचल्यावर तुमचे बाळ रडू शकते. फक्त कान टोचतानाच बाळाचा कान दुखतो असे नाही तर जरी काही क्रीम किंवा लोशन वापरून बाळाच्या कानाची पाळी काही प्रमाणात बधिर केली जाते, आजपर्यंत तरी कान न दुखता कान टोचण्याची कुठलीही पद्धत अस्तित्वात नाही.

संभाव्य गुंतागुंत

बाळाच्या कान टोचण्याने खालील प्रमाणे गुंतागुत होऊ शकते.

सुरक्षिततेच्या टिप्स

खाली काही सुरक्षिततेच्या दृष्टीने टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही बाळाचे कान टोचण्याच्या वेळी वापरू शकता.

कान टोचणे खूप वेदनादायी असते का?

होय, कान टोचणे बाळासाठी खूप वेदनादायी असते. तुम्ही बाळाचे कान बंदुकीने किंवा सुईने टोचणे ह्यापैकी कुठलीही पद्दत निवडलीत तरी त्यामुळे बाळाला वेदना होणार आहेत. सुईने टोचल्यास इंजेक्शन दिल्यासारखे वाटेल तर बंदूक वापरल्यास स्टेपलरची पिन त्वचेच्या आरपार जात आहे असे वाटेल.

बाळाचे कान टोचल्यानंतरची गुंतागुंत कशी टाळावी?

बाळाचे कान टोचल्यानंतर बाळाचे कान लाल होऊन त्यांना सूज येईल. नंतरची गुंतागुंत टाळण्यासाठी तुम्ही खालील काही गोष्टी करू शकता.
तुम्ही बाळाचे कान टोचण्याचा निर्णय घेतला असल्यास कान टोचण्याआधी आणि नंतर खूप सावधानता बाळगण्याची जरुरी आहे. जर संसर्ग झाल्याचे कुठलेही लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved