बाळ

बाळाची अंघोळ : पद्धती, टिप्स आणि बरंच काही

बाळाची त्वचा खूप नाजूक आणि मऊ असते, बाहेरचे प्रदूषण आणि जिवाणू ह्याविषयी खूप संवेदनशील असते. हे जिवाणू हवेत, अन्नामध्ये आणि  बाळांसाठी आपण जी उत्पादने वापरतो जसे की टिशू, साबण आणि मॉइश्चरायझर्स मध्ये सुद्धा असतात. म्हणून बाळासाठीची उत्पादने जसे की साबण, शाम्पू, टिशू निवडताना त्यातील मुख्य घटक समजून घेणे आवश्यक आहे.

तुमच्या बाळासाठी अंघोळीचे महत्व

बाळाला अंघोळ घालण्याआधी त्याचे महत्व जाणून घेणे जरुरीचे आहे. बाळाची प्रतिकार यंत्रणा खूप नाजूक असते. बाळाची त्वचा खूप संवेदनशील असते आणि शरीरावरच्या जिवाणूंशी लढा देण्याइतकी ती सक्षम नसते. अंघोळीमुळे त्वचेवरचे हे जिवाणू नष्ट होण्यास मदत होते आणि त्वचेची रंध्रे मोकळी होतात, त्यामुळे आतील अशुद्ध घटक बाहेर येण्यास मदत होते. तसेच पालकांना सुद्धा बाळाच्या त्वचेवर काही खुणा, फोड आणि ऍलर्जी तर नाही ना हे जाणून घेण्यास मदत होते. लक्षात ठेवा बाळाची त्वचा नाजूक असते त्यामुळे मोठ्यांसाठीची उत्पादने बाळास वापरल्यास बाळाला इजा होऊ शकते. त्यामुळे बाळाला बेबी प्रॉडक्ट्स वापरली पाहिजेत जेणेकरून बाळाची त्वचा मऊ राहील आणि त्वचेला योग्य पोषण मिळेल.

बाळाला किती वेळा अंघोळ घातली पाहिजे?

बरेच पालक बाळ दवाखान्यातून घरी आल्याबरोबर रोज बाळाला अंघोळ घालतात. ह्याची खरंतर काहीही गरज नसते. नुकतेच जन्मलेले बाळ सुरक्षित वातावरणात ठेवलेले असल्याने विषारी गोष्टींच्या कमी संपर्कात येते. बाळाची अजून घन पदार्थ घेण्यास सुरुवात झालेली नसते तसेच अस्वच्छ पृष्ठभागांच्या संपर्कात ते येत नसल्यामुळे नवीन जन्मलेल्या बाळाला आठवड्यातून ३ वेळा अंघोळ घालावी. जेव्हा बाळ घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते आणि रांगायला सुरुवात करते, तेव्हा जिवाणूंशी लढा देण्यासाठी तुम्ही बाळाला आठवड्यातून जास्त वेळा अंघोळ घालू शकता. तुम्ही दिवसागणिक अंघोळीचे सत्र वाढवा म्हणजे बाळाच्या त्वचेला अंघोळीच्या वारंवारितेशी जुळवून घेता येईल.

बाळाला कुठे अंघोळ घालावी?

बाळाला कुठे अंघोळ घालावी हे महत्वाचे आहे. लक्षात असू द्या की बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा खूप नाजूक असते. जर तुम्ही थंड प्रदेशात राहात असाल तर बाळाला टबमध्ये घरातच जी खोली उबदार असेल तिथे अंघोळ घाला. जर तुम्ही उष्ण प्रदेशात राहात असाल तर पाण्याचे तापमान तपासून पहा. बाळाला कुठे अंघोळ घालावी हे तुम्ही बाळाला कशी अंघोळ घालत आहेत ह्यावर अवलंबून असते. जर तुम्ही बाळाला तुमच्या बेडरूम मध्ये अंघोळ घालत असलात तर खोली आधी गरम करून ठेवली आहे ह्याची खात्री करा. बाळाला अंघोळ घालण्याआधी टबखाली मॅट ठेवा. अंघोळीमुळे शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रित होते. जर तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल तर बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला आणि जर तुम्ही रहात आहात तिथे उष्ण हवामान असेल तर पाणी थोडे गार करून घ्या. खूपच थंड अथवा गरम वातावरण असेल तर बाळाला अंघोळ घालू नका. हे लक्षात असुद्या की तुमच्यासाठी जे उबदार असते ते बाळासाठी गरम असू शकते. तसेच तुमच्यासाठी थोड्या थंड असणाऱ्या गोष्टी बाळासाठी बर्फासारख्या थंड असू शकतात कारण बाळाची त्वचा खूप संवेदनशील असते. बाळाच्या गरजेनुसार आणि वातावरणाप्रमाणे तापमान नियंत्रित करा.

बाळाची अंघोळीची वेळ कशी ठरवाल?

बाळाची अंघोळीची वेळ ही अंघोळीपेक्षा जास्त महत्वाची जास्त महत्वाची असते. काही सर्वसाधारण नियम खालीलप्रमाणे, ह्याशिवाय काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही बाळाच्या अंघोळीच्या वेळेला लक्षात घेतल्या पाहिजेत :
वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या बाळाच्या गरजांनुसार बाळाच्या अंघोळीची वेळ ठरवा.

तुम्ही बाळासाठी कुठला क्लिंजर किंवा साबण वापरला पाहिजे?

साबणाची निवड करताना सर्वात महत्वाचा मुद्धा म्हणजे pH बॅलन्स. अगदी किंचित ऍसिडिक किंवा न्यूट्रल pH असलेले साबण किंवा उत्पादने बाळाच्या नाजूक त्वचेसाठी उत्तम असतात, त्यामुळे त्वचेची आर्द्रता नियमित ठेवणाऱ्या सुरक्षित कवचाचे नुकसान होत नाही. मोठ्यांसाठी वापरला जाणारा अल्कलीयुक्त pH असलेला साबण बाळासाठी खूप उग्र असतो, त्यामुळे बाळाची त्वचा कोरडी पडून बाळाला रॅशेस होऊ शकतात. असेही सांगितले जाते की बाळासाठी द्रव साबण वापरावा, कारण त्यामध्ये मॉइश्चरायझर्स असल्याने बाळाच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहते. बाळासाठी कुठला साबण वापरावा ह्यासाठी बालत्वचारोगतज्ञांची सल्ला घेतल्यास नक्की मदत होईल.

अंघोळीचे वेगवेगळे प्रकार

बाळाला वेगवेगळ्या प्रकाराने अंघोळ घातली जाते.

१. बाथ सीट

बाथ सीट वापरल्याने बाळावर आपली घट्ट पकड राहील. तुम्ही netted bather किंवा bath seat वापरू शकता. त्यामुळे बाळ थोडे उंचावर असते, त्यामुळे ते अंघोळीच्या पाण्यात स्वतःचे स्वतः बसते. ह्यामध्ये पाण्याचा प्रवाह बाळाच्या दिशेने असतो आणि मग ते पाणी हळूच खालच्या टब मध्ये सांडते आणि नंतर बाहेर वाहून जाते.

२. पारंपरिक अंघोळ

ही पद्धत कदाचित तुमच्या बाळासाठी सर्वात आरामदायी असेल. तुम्ही बाथरूम मध्ये बसून बाळाला तुमच्या मांडीवर झोपवता, बाळाचे हात पाय ताणून त्यांना मसाज देता, मध्येच थोडे थोडे पाणी बाळाच्या अंगावर शिंपडता त्यामुळे बाळाला सुरक्षित वाटते. परंतु ह्या अंघोळीच्या पद्धतीमध्ये तुम्ही सुद्धा ओले होता आणि साबण लागतो.

३. बाथ टब

बाथ टब मध्ये अंघोळ करताना बाळाला सर्वात जास्त मज्जा येते तसेच त्यामुळे पालकांसोबत बाळाचा बंध तयार होतो.

तुमच्या बाळाला बाथटबमध्ये अंघोळ कशी घालाल?

टबमध्ये बाळाला अंघोळ घालताना घ्यावयाची सुरक्षिततेची काळजी

आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी हे उपाय आवश्यक आहेत.

४. स्पंज बाथ

पहिल्या काही आठवड्यांमध्ये, बाळाला स्पंज बाथ देणे सोपे जाते. ह्यामध्ये बाळाला कोमट पाण्यात ओलं केलेल्या स्पंजने बाळाला पुसून घेतले जाते. ही प्रक्रिया करताना इथे काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत.

बाळाच्या अंघोळीसाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी लागतील?

बाळाच्या अंघोळीसाठी लागणाऱ्या गोष्टी इथे दिल्या आहेत.

बाळाचा चेहरा केव्हा आणि कसा धुवावा?

अंघोळीच्या आधी बाळाचा चेहरा धुवा. कोमट पाण्यात स्पंज बुडवून घ्या आणि खूप हलक्या हाताने बाळाचा चेहरा धुवून घ्या. बाळासाठी पाणी खूप गरम तर नाही ना ह्याची खात्री करून घ्या. नंतर बाळाचे डोळे पुसून घ्या. तसेच कानाची मागची बाजू आणि कानाचा बाहेरील भाग पुसून घ्या. कानातील मेण स्वच्छ करण्यासाठी कापसाची काडी किंवा बोटे वापरू नका, त्यामुळे कानाच्या पडद्याला हानी पोहोचू शकते. डोळ्याजवळ किंवा नाकातील कोरडा श्लेष्म स्वच्छ करण्याआधी कापसाने आधी डोळे आणि नाक ओले करून घ्या त्यामुळे तो मऊ होईल आणि स्वच्छ करणे सोपे जाईल. बाळाचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला साबणाची गरज नाही.

बाळाला अंघोळ घालण्याची पद्धत - बाळाची अंघोळ सोपी करण्यासाठी काही गोष्टी

बाळाला योग्यरितीने कशी अंघोळ घालावी :

बाळाच्या सुरक्षित अंघोळीसाठी घ्यावयाची काळजी

बाळाच्या अंघोळीविषयी काही महत्वाच्या टिप्स

निष्कर्ष: बाळाला अंघोळ घालण्याआधी तुमच्या बाळाची गरज समजून घेणे महत्वाचे आहे, आपण बाळाला अंघोळ घालताना बाळांसाठीच्या स्वच्छता उत्पादनांची शिफारस केली जाते. बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या अंगावर फोड किंवा रॅशेस तर येत नाहीत ना ह्याकडे लक्ष ठेवा. जर तुम्हाला बाळाच्या त्वचेवर ह्यापैकी काहीही आढळले तर तात्काळ तज्ञांची मदत घ्या. बाळाला अंघोळ घालण्यासाठी ऑरगॅनिक साबण आणि शाम्पू वापरा आणि रोजच्या वापरासाठी ऑरगॅनिक मॉइस्चरायझर्स आणि वाईप्स वापरा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved