दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या बाळाने वर्षाचे होण्यासाठीचा अर्धा टप्पा ओलांडला आहे, विश्वास बसत नाही ना? ६ आणि ७ महिन्यांच्या बाळाच्या विकासामध्ये काही गोष्टी सारख्याच असतात. आपल्या बाळाने आतापर्यंत शारीरिक, मानसिक आणि संज्ञानात्मक कौशल्यांनी जगाकडे बघताना जबरदस्त झेप घेतली आहे. आपण त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतांना, सुनिश्चित करा की या प्रक्रियेदरम्यान आपल्या मुलासह आपण सुद्धा विकसित होत आहात, तसेच आपल्या बाळासोबत एक चांगला बंध सुद्धा तयार झाला आहे.

बाळाची वाढ

बाळाचे हसणे, बडबडणे ह्यामुळे तुमचे बाळ आता तुमचे छान मनोरंजन करू लागेल. निरनिराळ्या गोष्टींचा शोध घेऊ पाहणारे तुमचं बाळ आता डोंबाऱ्याच्या मुलासारखे भासेल! बाळाच्या बौद्धिक आणि सामाजिक कौशल्याना चालना मिळण्यासाठी बाळासाठीच्या वेगवेगळ्या क्रियाकलापांसाठी तयार रहा. बाळाच्या वृत्तीकडे बारीक लक्ष ठेवा त्यामुळे बाळाला कुठल्या प्रकारचे अन्नपदार्थ आवडतात ह्याकडे तुमचे लक्ष राहील.

बाळाचा विकास

कल्पना अस्तित्वात येतात, भावना विकसित होतात आणि तुमचे बाळ आता एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून विकसित होऊ लागले आहे. तुमच्या बाळाला आता तुमचा आवाज आणि भावना समजू लागतील. तुम्हाला बाळाचा बंध तुमच्याशी जोडला गेला आहे हे जाणवेल तसेच अनोळखी व्यक्तींविषयी चिंता आणि बाळाची खेळणी ते अन्नपदार्थ ह्या साऱ्याचा ठरलेला प्राध्यान्यक्रम ही सगळी लक्षणे तुम्हाला दिसू लागतील. तुमचे बाळ आता बडबड करत तुमच्याशी संवाद साधू लागेल, तुमच्या हाकांना प्रतिसाद देईल तसेच हातापायांनी हावभाव करून संवाद साधू लागेल. आता बाळाला दात येण्यास सुरुवात झाली असल्याने घन पदार्थ खाण्यास बाळ तयार आहे. बाळ आता पालथे पडू लागले आहे आणि घरात पूर्ण प्रयत्नांनी रांगू लागले आहे. ह्या टप्प्यावर तुमचे बाळ सतत नवीन गोष्टी शिकत असते. उदा: वस्तू पकडणे, वस्तू खाली ठेवणे आणि त्यासाठी लागणारी मदत मागणे इत्यादी.

२४ महिन्यांच्या बाळाचा विकास

पालथे पडणे

बाळाच्या मानेचे आणि खांद्यांचे स्नायू आता बळकट होत आहेत, आणि तुमचे बाळ आता पालथे पडू लागले आहे. तुमचे बाळ पालथे न पडता एकदम बसू लागेल आणि रांगू लागेल.

सामाजिक विकास

तुमचे बाळ आता अनोळखी व्यक्तींसोबत सुद्धा चांगला संवाद साधू लागेल. त्यांना काही प्रमाणात अनोळखी व्यक्तींची भीती/ चिंता वाटू शकेल परंतु बाळाला स्वतःकडे दुसऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायला आवडेल. तुमचे बाळ आता स्वतःच्या क्रियेबद्दल तुमचा प्रतिसाद समजून घेण्यास सुरुवात करेल आणि तुम्हाला अधिक गुंतवून घेण्याचा प्रयत्न करेल. लक्ष वेधून घेण्यासाठी विचित्र आवाज काढेल. आपल्याला काय हवे आहे हे सांगण्यासाठी तुमचे बाळ स्वतःचा असा एक पॅटर्न तयार करेल.

आरामदायक कपडे

बाळाच्या हालचाली वाढल्या असल्यामुळे बाळाला नीट हालचाल करता येईल तसेच बाळाला मोकळा श्वास घेता येईल असे कपडे घाला. खूप जास्त झालर, शिवण आणि टाके असलेले कपडे घालणे टाळा कारण त्यामुळे बाळाच्या हालचालींना अडथळा येऊ शकेल.

नॅपी

आता तुमचे बाळ घनपदार्थ खाऊ लागल्याने बाळाच्या शौचास वेगळा रंग किंवा वास येत असल्यास चिंता करू नका. जर बाळाला बद्धकोष्ठता झाली आहे असे तुमच्या लक्षात आल्यास पचनास सोप्या अन्नपदार्थांची निवड करा.

२५ आठवड्यांच्या बाळाचा विकास

सांकेतिक भाषा

बाळाला भूक, वाचन इत्यादी क्रिया सांगता येण्यासाठी बाळाला स्वतःची भाषा आणि मोटार कौशल्ये विकसित करण्यासाठी मदत करा. बरीच बाळे ह्या कालावधीत संकेत भाषा शिकतात आणि मोठे झाल्यावर भाषा कौशल्ये शिकतात.

डावखुरे की सामान्य

तुमच्या बाळाचा एक विशिष्ट हात वापरण्याकडे कल असेल, परंतु बाळ २-३ वर्षांचे होईपर्यंत ते पूर्णपणे विकसित होणार नाही. तुमची निवड बाळावर थोपवू नका कारण त्यामुळे बाळ संभ्रमित होईल, बाळाच्या हात आणि डोळ्यांचा समन्वय तसेच हस्तकौशल्यावर त्याचा परिणाम होईल.

खेळ

तुमच्या बाळाला आता खेळ खेळायला आवडतील विशेष करून ज्यामुळे बाळाच्या स्वरतंतूला व्यायाम मिळेल असे खेळ बाळाला आवडतात. प्राण्यांचे वेगवेगळे आवाज काढून तुमच्या बाळाची करमणूक करा. तुमच्या लक्षांत येईल की बाळ सुद्धा असे आवाज काढत आहे. किंवा काही प्रसंगी तुमची नक्कल करत आहे.

२६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळाच्या संवेदनांना प्रोत्साहन देणे

बाळाचे संवेदनकौशल्य वाढत आहे आणि तुमच्या बाळाला कुठल्याही गोष्टीला स्पर्श करण्यात, त्याचा अनुभव घेऊन गोष्टी तोंडात टाकण्यात मजा येते. वेगवेगळ्या संवेदना बाळाला कळाव्यात म्हणून तुम्ही बाळाला मऊ आणि सुरक्षित गोष्टी देत आहात ना ह्याची काळजी घ्या.

गोष्टीची वेळ

तुमच्या बाळाला फोटो आणि चित्रे आवडतील. बाळाची उत्सुकता वाढवण्यासाठी पुस्तके हे सर्वात चांगले माध्यम आहे. तसेच एखादा छंद आयुष्यभरासाठी विकसित करणे गरजेचे आहे. रंगीबेरंगी चित्रे आणि उदाहरणे असलेली पुस्तके वाचा.

फिंगर फूड

तुमचे बाळ स्वतःचे स्वतः खाण्याचा प्रयत्न करू लागेल. तसेच त्यामुळे खूप पसारा होऊ शकतो. परंतु बाळाला प्लेट मध्ये थोडे फिंगर फूड देऊन खाण्यास प्रोत्साहन द्या.

२७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

उसळणारी बाहुली

तुमचे बाळ स्वतःच्या पायावर भार देऊन उसळी मारू लागेल. तुमच्या बाळाला आधार देऊन उभे करा, आणि बाळ जमिनीवरून पाय उचलून हालचाल करू लागेल.

हस्तकौशल्य

तुमचे बाळ आता वस्तू धरून हस्तांतरित करू लागेल. बाळाचे हात, बोटे आणि मूठ ह्यांच्या हालचाल कौशल्याचा वापर वारंवार होऊ लागेल. बाळापासून दूर अंतरावर वस्तू ठेवा त्यामुळे बाळाची हालचाल कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल. बाळ कितीही निराश झाले तरी बाळाला वस्तू घेण्यास प्रोत्साहित करा. धोकादायक वस्तू बाळापासून दूर ठेवा कारण तुमचे बाळ आता अतिशय सक्रिय झाले आहे.

काल्पनिक मित्र

तुमचे बाळ माणसांसारख्या दिसणाऱ्या किंवा मऊ खेळण्यांना प्राधान्य देईल. हे त्यांच्यामध्ये जोपासणाऱ्या स्वावलंबनाचे लक्षण आहे.

बाळाची तब्येत

बाळाच्या जन्मानंतर पहिले काही महिने नियमित लसीकरणासाठी डॉक्टरांकडे जावे लागते. ह्या महिन्यात बाळाचे तिसरे लसीकरण द्यावे लागेल. लसीकरणाचा दिवस म्हणजे एखादा म्हणजेच एखादा घटनात्मक दिवस असल्यासारखा त्यास सामोरे जावे लागेल, परंतु तो दिवस प्रत्येक बाळासाठी वेगळा असतो. तुमच्या बाळाला ६ महिन्यांचे असताना पहिल्यांदा सर्दी होऊ शकते. परंतु घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तसेच जर तुम्हाला बाळाला पाजताना काही बदल जाणवला, तसेच बाळाला ताप,रॅश, उलट्या किंवा बाळ अस्वस्थ झालेले दिसल्यास बाळाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा.

बाळाच्या विकासाचे टप्पे - ६ महिने

बाळाच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक वाढीसंदर्भात काही विकासाच्या टप्प्यांदरम्यान तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचे वर्गीकरण तुम्ही ३ वर्गांमध्ये करू शकता -आकलनात्मक, शारीरिक आणि सामाजिक व भावनिक

आकलनविषयक टप्पे

आकलन कौशल्य हे आपल्या मुलाच्या मेंदूच्या विकास, बौद्धिक क्षमता आणि विचारांशी संबंधित आहे. शारीरिक टप्पे बाळाच्या शारीरिक आणि हालचाल कौशल्यांशी संबंधित काही वैशिष्ट्ये सामाजिक आणि भावनिक टप्पे ह्या भागात विकसित झालेली सामाजिक कौशल्ये दिली आहेत

वर्तणूक

तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ आता हुशार होत चालले आहे जेव्हा बाळ तुमचा चेहरा धरेल आणि प्रत्येक गोष्ट तोंडात घालू लागेल. बाळांना तुमच्याकडून ऐकायला आवडते त्यामुळे बाळासाठी वाचत रहा आणि त्यांच्याशी बोलून त्यांना संवादात गुंतवून ठेवा. तुमच्या बाळाला कधी कधी गेम्स खेळायला आवडतील आणि खेळून झाले की कंटाळा आल्याचे दर्शवतील.

६ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

आपले बाळ आता हालचाल-आधारित क्रियाकलापांचा आनंद घेत आहे. बाळाच्या उपजत गुणांना उत्तेजन देण्यासाठी काही क्रिया:
  1. मोठ्याने वाचा: कोणत्याही प्रकारचे संभाषण नेहमीच स्वागतार्ह असते कारण आपले बाळ उत्सुकतेने ऐकणारे असते आणि वाचण्याकडे बाळाचे बरेच लक्ष असते.
  2. खेळ: आपल्या बाळाला पिकाबु, रांगण्याची शर्यत लावणे किंवा त्यांच्या छान मऊ खेळण्यांनी गुदगुल्या करणे ह्यासारखे गेम आवडतील.
  3. संवेदनांवर आधारित क्रियाकलाप: ज्या खेळांमध्ये वस्तूंचा स्पर्श आणि अनुभव ह्यांचा समावेश असतो असे खेळ खेळा. कापड, ब्लॉक्स, पाणी आणि अगदी वाळूच्या वस्तूंसह खेळा.

६ महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमचे बाळ आता दिवसेंदिवस साहसी होत चालले आहे आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवत आहात. जे काही दिसेल ते तोंडात घालण्याची बाळाची सवय काहीवेळा तुम्हाला त्रासदायक होईल परंतु त्याचा खूप जास्त विचार करू नका. तुम्ही बाळासोबत असताना बाळाला वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेऊ द्या. बाळ जिथे असेल तो भाग बाळासाठी सुरक्षित करून घ्या. बाळासोबत बाहेर खेळा म्हणजे बाळाच्या कक्षा रुंदावतील. बाळाच्या लसीकरण्याच्या वेळापत्रकाकडे लक्ष ठेवा त्यामुळे एखादी लस द्यायची राहून गेली असे होणार नाही. तुमच्या बाळाशी बोला, त्याचे ऐकून बाळाला प्रतिक्रिया द्या त्यामुळे बाळ आणि तुमच्या मध्ये घट्ट बंध तयार होईल.

बाळाला भरवणे

तुमच्या बाळासाठी दूध हे पोषणाचे प्रमुख स्रोत आहे. तथापि, गर्भाशयात असताना असलेला लोहाचा साठा आता कमी कमी होत आहे. बाळाचा पहिला घन पदार्थ म्हणजे राईस सीरिअल होय. बाळांना सुरुवातीला त्याची चव आवडणार नाही. परंतु नंतर त्याऐवजी तुम्ही बाळाला फळांची प्युरी किंवा व्हिटॅमिन सी समृद्ध भाज्या देऊ शकता

बाळाची झोप

रात्री किमान १० तास झोप आणि दिवसा दरम्यान १-३ तासांची तीन वेळा झोपेची पद्धत ही आपल्या बाळाला या टप्प्यावर आवश्यक आहे. शांत रहा आणि बाळाला झोपेची चांगली सवय लागण्यासाठी एक वेळापत्रक तयार करा. नंतर त्याची बाळाला सवय होईल.

पालकांसाठी टिप्स

६ महिन्यांच्या बाळाचा विकास हा खूप वेगळा नसतो आणि बाळे आता नवीन गोष्टी शोधणे, शिकणे आणि शोधणे या गोंडस टप्प्यावर असतात. स्वच्छतेबद्दल जास्त बोलू नका कारण त्यांना गोष्टी शिकण्यासाठी त्यांचे हात गलिच्छ करणे आवश्यक आहे. बाळाचे हालचाल आणि आकलन कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना ६ महिन्यांच्या बाळांसाठी असलेल्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त ठेवा. बाळाच्या डॉक्टरांकडे गेल्यावर तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाच्या वजनावर लक्ष ठेवा. प्रत्येक मूल भिन्न आहे आणि हा विशिष्ट टप्पा जो त्यांच्या पहिल्या वर्षाच्या अर्ध्या अंतरावर असतो तो कालावधी "विशेष"असतो. आपल्या लहान बाळासोबत पुरेसा वेळ घालवा कारण त्यामुळे बाळाला वळण लागण्यास आणि बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved