Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी चुकीची नकारात्मक गरोदर चाचणी

चुकीची नकारात्मक गरोदर चाचणी

चुकीची नकारात्मक गरोदर चाचणी

गर्भधारणा चाचणीविषयी पहिला प्रश्न मनात येतो की गर्भधारणा चाचणीचा निकाल नकारात्मक येऊ शकतो का ? तुमची पाळी चुकली आहे, काही लक्षणे सुद्धा जाणवत असतात. परंतु आपण गरोदर तर नाही ना म्हणून तुम्ही गर्भधारणा चाचणी करून बघता. आणि चाचणीचा नकारात्मक निकाल बघून तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडता. परंतु त्यानंतरही मासिक पाळी आली नाही तर तुम्ही गरोदर असण्याची शक्यता असते आणि त्याचा धक्का बसू शकतो.

नकारात्मक गरोदर चाचणी म्हणजे काय?

जर तुम्हाला गर्भधारणा झालेली असताना, तुमच्या गर्भधारणा चाचणीचा चुकीने नकारात्मक निकाल आला तर त्यास चुकीची नकारात्मक चाचणी असे संबोधले जाते. म्हणजेच तुम्ही गर्भवती असताना सुद्धा तुम्हाला गर्भधारणा झालेली नाही असे चाचणी दर्शवते. प्रामुख्याने घरी केल्या जाणाऱ्या गर्भधारणा चाचणीच्या बाबतीत अशी चूक आढळते. संप्रेरकांची पातळी नीट मोजली जात नाही आणि गर्भधारणा झालेली नाही असे समजले जाते.

चुकीची नकारात्मक चाचणी सामान्यपणे आढळते का?

चुकीच्या नकारात्मक गर्भधारणा चाचणीमुळे अनेकांना प्रश्न पडतो की असे होण्याची शक्यता किती असते? सामान्यतः चुकीच्या नकारात्मक चाचणीची शक्यता चुकीच्या सकारात्मक चाचणीपेक्षा खूप जास्त असते, ती शक्यता साधारणपणे १०% इतकी असते. घरी करता येणाऱ्या चाचणीचे किट बऱ्याचदा अचूक असतात. जेव्हा वैद्यकीय चाचण्यांसाठी त्या वापरल्या जातात तेव्हा अचूकतेचे प्रमाण ९७. % इतके असते. सर्वसामान्य लोक जेव्हा ही चाचणी करून पाहतात तेव्हा अचूकता कमी होते.

चुकीच्या नकारात्मक चाचणीची कारणे

चुकीच्या नकारात्मक चाचणीची कारणे शोधताना आपल्या लक्षात येईल की त्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत. काही वेळा, डॉक्टरांना कुठल्या औषधामुळे चुकीची नकारात्मक चाचणी होते हे माहित असते आणि तुमच्या बाबतीत तशी शक्यता आहे का हे ते तपासून बघतात.

. निर्धारित वेळेआधीच निकाल बघणे:

घरी करता येणाऱ्या गरोदर चाचणी मध्ये अचूक निकाल मिळण्यासाठी लघवीशी प्रक्रिया होण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. वेळेआधीच निकाल बघितल्यास, तुम्हाला जरी गर्भधारणा झालेली असली तरी नकारात्मक निकाल मिळू शकतो. त्यामुळे किट वर दिलेल्या सूचनांचे नीट पालन करणे जरुरीचे आहे आणि रिझल्ट्स मिळण्यासाठी साधारणपणे १० मिनिटे वाट बघावी.

. चाचणी लवकर करून बघणे:

बऱ्याच स्त्रिया गरजेपेक्षा खूप आधी चाचणी करून बघतात. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात hCG ह्या संप्रेरकाची पातळी खूप कमी असते आणि ती ओळखणे खूप अवघड जाते. ह्या टप्प्यावर रक्ताची चाचणी केली तरी सुद्धा संप्रेरक ओळखले जात नाही, तर घरी केल्या जाणाऱ्या चाचणीत ते ओळखणे अवघड आहे.

. किट सोबत दिलेल्या सूचनांचे पालन न करणे:

चाचणीचा निकाल अचूक मिळण्यासाठी किटवर विशेष सूचना दिलेल्या असतात. जर चाचणीची पट्टी लघवीमध्ये नीट भिजवली गेली नसेल किंवा त्यावर पाणी पडून लघवीचा नमुना सौम्य झाला असेल तर चाचणीची अचूकता नाहीशी होते. तसेच चाचणीसाठी दिला जाणारा वेळ सुद्धा महत्वाचा आहे. खूप लवकर किंवा खूप तासांनंतर निकाल बघितल्याने अचूक निकाल मिळत नाहीत.

. चाचणीच्या किट ची संवेदनशीलता:

घरी करता येणाऱ्या गर्भधारणा चाचणी किट ची संवेदनशीलतेची पातळी वेगवेगळी असते आणि रक्ताच्या चाचणीप्रमाणेच hCG ची खूप कमी पातळी सुद्धा शोधली जाते. म्हणून कमी संवेदनशीलता असलेले किट वापरल्यास चुकीच्या निकालाची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे hCG ची एक विशिष्ट पातळी असल्याशिवाय चाचणी करू नका.

. लघवीची सौम्यता:

लघवीमधील घटकांवर ह्या चाचणीचे कार्य असते आणि लघवीमध्ये काही अशुद्ध घटक असल्यास चाचणीचा निकाल चुकीचा मिळू शकतो. सकाळच्या पहिल्या लघवीचा नमुना घेऊन चाचणी केली पाहिजे. जर तुम्हाला गर्भधारणा झाली असेल तर सकाळच्या लघवीच्या नमुन्यामध्ये hCG पातळी जास्त असते. त्यामुळे चुकीच्या नकारात्मक चाचणीची शक्यता कमी होते.

. गर्भधारणा चाचणीची मुदत संपणे:

गर्भधारणा चाचणी विकत घेण्याआधी तिची अंतिम मुदत काय आहे हे तपासून बघितले पाहिजे. जर मुदत संपली असेल तर निकाल अचूक असतीलच असे नाही.

. औषधे:

काही औषधे, विशेषकरून ऍलर्जी साठी किंवा फिट साठी असलेली औषधे घेत असाल तर अचूक निकाल मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे चाचणीचा निकाल चुकीचा नकारात्मक मिळतो.

. बीजवाहिनी मध्ये गर्भधारणा:

अशी गर्भधारणा खूप दुर्मिळ असते आणि ३५ वर्षावरील स्त्रियांमध्ये ती आढळते. अशा गर्भधारणेमध्ये गर्भाची वाढ गर्भाशयात होण्याऐवजी बीजवाहिनी मध्ये होते. अशी गर्भधारणा प्राणघातक ठरू शकते आणि ती लगेच काढून टाकली पाहिजे.

जर तुम्हाला चाचणीचा निकाल चुकीने नकारात्मक मिळाला तर काय कराल?

चुकीचा नकारात्मक निकाल मिळाला तर खालील गोष्टी केल्या पाहिजेत.

  • चाचणी पुन्हा एकदा करून पहा: जर तुम्हाला चाचणीचा निकाल नकारात्मक मिळाला तर चाचणी पुन्हा एकदा करून पहा. जर त्यानंतर एक आठवड्यानंतर सुद्धा तुम्हाला पाळी आली नाही तर पुन्हा एकदा चाचणी करून बघण्याची वेळ आहे. जर तुम्हाला गर्भधारणा झाली असेल तर hCG ची पातळी वाढण्यासाठी ७ दिवस पुरेसे आहेत आणि गर्भधारणा किटद्वारे ही वाढलेली पातळी लगेच ओळखली जाऊ शकते.
  • तुमच्या डॉक्टरांशी बोलून बघा: जर तुमच्या चाचणीचा निकाल नकारात्मक आला आणि त्यानंतर तुम्हाला मासिक पाळी सुद्धा आली नाही तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून बघा. डॉक्टर तुम्हाला अल्ट्रासाऊंड आणि रक्ताची चाचणी करायला सांगू शकतातआणि त्यामुळे तुम्हाला गर्भधारणा झाली आहे किंवा नाही ह्याचे अचूक निदान होऊ शकते.
  • तुमच्या मासिक पाळी चक्र तपासून पहा: असेही होऊ शकते की चाचणीचा निकाल अचूक आहे आणि तुम्हाला गर्भधारणा झालेली नाही परंतु तुम्हाला मासिकपाळी सुद्धा आलेली नाही. अशा वेळी तुमच्या डॉक्टरांशी किंवा स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधा. गर्भधारणा झालेली नाही हे निश्चित झाले की मासिक पाळी नियमित कशी होईल त्यावर काम करा.

जर तुम्हाला चाचणीचा निकाल चुकीने नकारात्मक मिळाला तर काय कराल?

चुकीची नकारात्मक/सकारात्मक चाचणी आणि बरोबर नाकारात्मक/सकारात्मक चाचणी ह्या मधील फरक

चुकीची नकारात्मक/सकारात्मक चाचणी

  • चाचणीचा निकाल नकारात्मक असतो, आणि खरंतर तुम्ही गरोदर असता
  • चाचणी अनुसार तुम्हाला गर्भधारणा झालेली असते परंतु प्रत्यक्षात तसे काही नसते

खरी नकारात्मक/ सकारात्मक गर्भधारणा चाचणी

  • गर्भधारणा चाचणीनुसार तुम्हाला गर्भधारणा झालेली नाही आणि प्रत्यक्षात सुद्धा तुम्ही गरोदर नसता
  • गर्भधारणा चाचणी नुसार तुम्ही गर्भवती आहात आणि प्रत्यक्षात सुद्धा तुम्ही गर्भवती असता

मासिक पाळी चुकण्याची अन्य काही कारणे असू शकतील का?

मासिक पाळी चुकल्यास, गर्भधारणा चाचणीचा चुकीचा नकारात्मक निकाल डॉक्टरांना भेटून तपासून घेतला पाहिजे. पण जर तुम्ही खरोखरीच गरोदर नसाल, तर मासिक पाळी चुकण्यामागे अन्य काही कारणे असू शकतात.

. घरच्या आणि ऑफिस मधील ताणामुळे मासिक पाळी चक्रामध्ये बदल होऊ शकतात.

. आधी तुमची पाळी अनियमित असेल तर नंतर सुद्धा ती तशीच राहिलेली असू शकते.

. खूप जास्त वजन वाढणे किंवा कमी होणे ह्यामुळे संप्रेरकांच्या पातळीत बदल होतो आणि त्यामुळं तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होतो.

. आजारपण, अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी ह्या सगळ्यामुळे तुमच्या शरीरावर तसेच मासिक पाळी चक्रावर परिणाम होतात.

. जर तुमची संततिनियमन करत असाल तर त्यामुळे तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.

. जास्त वयाच्या स्त्रिया किंवा रजोनिवृत्तीच्या जवळ असलेल्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित असते.

. खूप जास्त काम केल्याने त्याचा संप्रेरकांवर परिणाम होतो आणि मासिक पाळी उशिरा येते.

. खूप जास्त प्रवास, तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या वेळा, वातावरणातील बदल, झोपेचे विचित्र चक्र, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा ह्या सगळ्यांचा तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होत असतो.

. काही स्त्रियांना प्रोलॅक्टिनोमा ह्या विकाराचा त्रास होतो त्यामध्ये इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि पाळी उशिरा येते.

१०. आयुष्यातील प्राधान्यक्रम, व्यायाम, हालचाली ह्याचा एकत्रितपणे मासिक पाळीवर परिणाम होतो.

११. PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम मुळे ओव्यूलेशन नीट होत नाही आणि संप्रेरकांच्या समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे पाळी उशिरा येते.

जर तुम्हाला गर्भधारणा हवी असेल आणि चाचणीचा नकारात्मक निकाल आला तर निराश होऊ नका. थोडे दिवस बघून पुन्हा एकदा चाचणी करून पहा. आधीची केलेली चाचणी चुकीने नकारत्मक आलेली असू शकेल आणि पुन्हा करून बघितलेल्या चाचणीमुळे तुमचा गर्भधारणेचा प्रवास सुरु होऊ शकतो.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article