गर्भधारणेचे टप्पे

गर्भधारणेची तिसरी तिमाही – गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रणयाचा आनंद

प्रणय हा नात्याचा एक नितांतसुंदर भाग आहे. परंतु आई बाबा होऊ पाहणारं जोडपं बाळाच्या सुरक्षिततेसाठी त्याचा त्याग करतात. परंतु त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे - ती म्हणजे जर आतापर्यंत तुमचे गर्भारपण सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण असेल तर गर्भधारणेदरम्यान, काळजी घेऊन लैंगिक संबंध ठेवले तर ते सुरक्षित असतात. परंतु त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यात लैंगिक संबंध सुरक्षित आहेत का?

गर्भारपणादरम्यान शारीरिक संबंध ठेवणे हे सुरक्षित आहे. जर तुमचे गर्भारपण आतापर्यंत आरोग्यपूर्ण असेल तर, सांगितलेल्या स्थिती केल्या तर गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यापर्यंत तुम्ही शारीरिक संबंध ठेऊ शकता. गर्भधारणेच्या काळात गुदद्वार संभोग टाळा कारण त्यामुळे गुदद्वाराच्या भागात रक्तस्त्राव होऊ शकतो आणि लैंगिक संबंध ठेवताना अस्वस्थता येऊ शकते आणि वेदना होऊ शकतात.

तिसऱ्या तिमाही मध्ये तुमचे लैंगिक आयुष्य कसे बदलते

शेवटच्या तिमाहीत, तुमचे पोट खूप वाढलेले असते आणि त्यामुळे तुम्हाला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तितकासा उत्साह राहत नाही. उत्साह कमी करण्यासाठी बाकीचे जे घटक आहेत ते म्हणजे सुजलेली पाऊले, पाठदुखी, थकवा, गळणारे स्तन, व्हेरिकोज व्हेन्स, योनीमार्गाला आलेली सूज आणि श्रोणीवरचा दाब. परंतु तरीही तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या स्थिती करून पाहू शकता. म्हणजे उदा: स्पून स्थितीमध्ये तुमच्या पतीला तुम्ही मागून लिंगप्रवेश करण्यास सांगू शकता कारण ह्या स्थितीमध्ये तुमची हालचाल कमीतकमी लागते आणि ते सुरक्षित आहे. तुमच्यासाठी आरामदायी असलेल्या स्थिती शोधा

तिसऱ्या तिमाहीत शारीरिक संबंध ठेवण्याचे फायदे

तिसऱ्या तिमाहीमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याचे खूप फायदे आहेत जसे की: गर्भजल पिशवी फुटत नाही तोपर्यंत तिसऱ्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे.

तिसऱ्या तिमाहीत शारीरिक संबंध ठेवणे केव्हा टाळले पाहिजे?

शारीरिक संबंध ठेवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या गर्भारपणाच्या स्थितीविषयी जागरूक राहा आणि शारीरिक संबंधांपासून दूर राहण्याची गरज आहे का हे तुमच्या डॉक्टरांना विचारा , तुमचे डॉक्टर तिसऱ्या तिमाहीत शारीरिक संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देऊ शकतात.

गर्भारपणाच्या ह्या शेवटच्या महिन्यांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्हाला आणि तुमच्या बाळाला धोका पोहचू शकतो का?

तिसऱ्या तिमाहीत शारीरिक संबंध ठेवल्यास त्याच्या गर्भाला त्रास होत नाही, तुमचे बाळ गर्भजल पिशवीत सुरक्षित असते आणि धोक्यापासून दूर असते.  गर्भाशयाच्या मुखापाशी असलेला म्युकस प्लग मुळे तुमच्या बाळाचे संसर्गापासून संरक्षण होते, त्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेविषयी काळजी करण्याचे कारण नाही. परंतु, वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियांना तिसऱ्या तिमाहीमध्ये शारीरिक संबंध ठेवणे आरामदायी वाटत नाही. त्यापैकी एक कारण म्हणजे तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाचे डोके खाली सरकू शकते आणि संभोगादरम्यान अस्वस्थता आणि दाब जाणवू शकतो. तसेच दोघांमध्ये तयार झालेल्या संप्रेरकांमुळे स्नायू आकुंचन पावतात आणि त्यामुळे प्रसूती प्रेरित होऊ शकते. म्हणून ज्या स्त्रियांचा अकाली प्रसूती होण्याचा इतिहास आहे त्यांना गर्भारपणाच्या शेवटच्या आठवड्यात शारीरिक संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. शेवटच्या ३ महिन्यात भावनोत्कटता (ऑरगॅझम) मुळे सराव कळा म्हणजेच Braxton Hicks contractions येऊ लागतात, ह्या सराव कळांच्या दरम्यान तुमचे पोट घट्ट होते. ही स्थिती  काही काळासाठीच राहते आणि त्याचा तुमच्या आरोग्यास काहीही धोका नसतो.

शिफारस केलेल्या लैंगिक स्थिती

गर्भारपणाच्या शेवटच्या तिमाहीत जसजसे गर्भाशयाची वाढ होते काही लैंगिक स्थिती करणे अवघड जाते आणि आरामदायी वाटत नाही. सुरक्षित आणि आरामदायक संभोगासाठी इथे काही लैंगिक स्थिती दिल्या आहेत त्या तुम्ही  गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये करून बघू शकता. जर तुम्हाला लिंगप्रवेशामुळे अस्वस्थता येत असेल तर तुम्ही मुखसंभोग किंवा हस्तमैथुनाचा पर्याय निवडू शकता.

टाळायला हव्यात अशा लैंगिक स्थिती

सामान्यपणे, गर्भारपणाच्या कुठल्याच टप्प्यावर कुठलीच स्थिती ही असुरक्षित नसते, अपवाद आहे तो फक्त मिशनरी स्थितीचा कारण ह्या स्थितीत तुम्हाला पाठीवर झोपायला लागते. कुठल्याही स्थितीचा पर्याय तुम्ही निवडला तरी तुमच्या पतीशी आधी बोला आणि खूप खोलवर लिंगप्रवेश टाळा कारण तुम्हाला त्यामुळे अस्वस्थता तर येईलच आणि रक्तस्त्राव सुद्धा होईल. मुखसंभोगाच्या दरम्यान तुमचा साथीदार तुमच्या योनीमार्गात हवा सोडणार नाही ह्याची खात्री करा, त्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतील, आणि ते तुमच्यासाठी आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकेल.

तिसऱ्या तिमाहीत शारीरिक संबंध ठेवल्याने प्रसूती प्रेरित होते का?

जर तुमचे गर्भाशयाचे मुख आणि गर्भाशय तयार असेल तर तिसऱ्या तिमाहीत संभोग केल्यास परसुती कळा प्रेरित होऊ शकतात, परंतु जर गर्भाशयाचे मुख तयार नसेल तर शारीरिक संबंध ठेवूनही तसे होणार नाही. गर्भधारणेच्या ४२ आठवड्यांनंतर सुद्धा जर तुम्हाला प्रसूती कळा सुरु झाल्या नाहीत तर शारीरिक संबंध ठेवणे टाळा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१. मला माझा पतीसोबत संभोग करावासा वाटतो. सध्या मी गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यात आहे. संभोग केल्यास माझ्या बाळाला धक्का/हानी पोहोचेल का?

ह्या प्रश्नाचे उत्तर आहे - नाही. बाळावर परिणाम होणार नाही कारण बाळ सुरक्षित आहे आणि गर्भजल पिशवीमध्ये नीट आहे, गर्भजलपिशवीमुळे सगळ्याच गोष्टी बाळापर्यंत पोहचत नाहीत. हो गर्भाशय थोडे हलण्याची शक्यता आहे परंतु ते नॉर्मल आहे. तुमची श्रोणी /ओटीपोट आरामदायक स्थितीत असल्यास ह्या महिन्यांमध्ये संभोग ठीक आहे.

२. मी असे ऐकले आहे की गर्भधारणेदरम्यान संभोग केल्यास गर्भपात होऊ शकतो, हे खरे आहे का?

अजिबात नाही! गर्भपात हा गर्भाचा जर असामान्य विकास होत असेल तर होतो आणि गर्भावस्थेत  शारीरिक संबंधांमुळे नाही. कमी धोका असलेल्या गर्भधारणेच्या परिस्थितीत अकाली प्रसूती सुद्धा प्रवृत्त केली जात नाही. त्यामुळे आतापर्यंत तुमची गर्भधारणा निरोगी असेल तर तुम्ही आरामात उबदार पांघरुणात शिरू शकता.

३. काल रात्री आमचे शारीरिक संबंध आले आणि मला रक्तस्त्राव झाला. मी आठ महिन्यांची गरोदर आहे आणि मला खूप काळजी वाटत आहे, कृपया मदत करा!

गर्भधारणेमुळे स्त्रीचे शरीर आणि तिचे लैंगिक अवयव खूप संवेदनशील होतात, त्यामुळे संभोगानंतर आणि त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला हलके डाग पडू शकतात. तुमच्या गर्भाशयाचे मुख नाजूक झाल्यामुळे तसे झाले असावे. जर रक्तस्त्राव थांबला नाही नाही तर तपासणी करून घेणे चांगले. गर्भधारणेदरम्यान संभोग करणे हे सुरक्षित नाही, हे जरी खरे असले तरी त्याची शिफारस केली जाते. त्यामुळे शारीरिक फायद्यांसोबत तुमचे तुमच्या पतीबरोबरचे नाते सुद्धा घट्ट होते, कारण त्यांना ह्या होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना कदाचित अवघड जात असेल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved